अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा

एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.

निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच. आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे बघू. दिल्ली देशाची राजधानी. इथे देशातील सर्वात चांगली चिकित्सा सुविधा जनतेला उपलब्ध आहे, असा भ्रम देशातील अन्य राज्यांच्या लोकांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पण इथली परिस्थिती हि देशातील इतर शहरांसारखीच आहे.

मी उत्तम नगर इथे राहतो. या भागात राहणारे अधिकांश लोक छोटा-मोटा रोजगार करतात किंवा फेक्ट्रीत काम करून महिन्याचे ८-१० हजार रुपये किंवा दिवसाचे २००-३०० रुपये कमवितात. आता कल्पना करा हा सामान्य माणूस आजारी पडला. जवळपास असलेल्या सरकारी स्वास्थ्य केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये गेला. काय होईल. हॉस्पिटलमध्ये लोकांची भारी भीड. ३-४ तासांनी डॉक्टर त्याला पाहणार. नंतर औषधांच्या लाईनीत १-२ तास त्याला उभे राहावे लागणार. काही औषधी मिळतील. काही मिळणार नाही. औषधींचा दर्ज्याबाबत काही सांगण्यात अर्थ नाही. आजार बरा हो न हो, पण त्याचे त्या दिवसाच्या दिहाडीचे नुकसान होणार हे निश्चित.

उत्तम नगरमध्ये प्रशिक्षित MBBS डॉक्टर हि आहेत. त्यांची किमान फी ३०० रुपये आहे. (माझा फेमिली डॉक्टर हि ३०० रुपये घेतो. चांगल्या कॉलोनीत अर्थात जनकपुरी येथे डॉक्टर ५००-७०० रुपये फी घेतात). एवढी फी घेतल्यावर डॉक्टर किमान ३०० रुपयांची औषधी लिहिणारच. सामान्य जनतेला MBBS डॉक्टरकडे जाणे परवडणे शक्य नाही. आता उरले, स्वयंभू झोला छाप डॉक्टर. दिल्लीत किमान पन्नास हजाराहून जास्त झोला छाप डॉक्टर असावेत, असा अंदाज आहे. हे डॉक्टर ५० रुपयांत तीन दिवसांची औषधी देतात. स्वस्त असल्यामुळे सामान्य गरीब जनता अश्याच डॉक्टरांकडे जाते. आता ८-१० दिवस औषध घेऊन आजार बरा नाही झाला तर हा गरीब माणूस काय करणार. शेवटचा उपाय म्हणून तो ‘नीमवाल्या बाबाकडे जाऊन झाडा लाऊन घेणार’. नीमवाला बाबा काही मागत नाही. तुमची श्रद्धा हीच त्याची बरकत (कमाई).

आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे अधिकांश आजारातून आपण बरे होतोच. पीलिया, डेंगू इत्यादी आजारांपासून हि लोक बरे होतात. अर्थात शरीराला त्याची किंमत हि मोजावी लागतेच. सतत आजारांमुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. पण झाडा लावल्यामुळे आजारी व्यक्ती रोगमुक्त झाला, याचे श्रेय नीमवाल्या बाबाला मिळणारच. हळू हळू त्याची लोकप्रियता वाढत जाणार. चांगले श्रीमंत लोक पण हि त्याचा कडे जाऊन ‘झाडा’ लाऊन घेणार. नीमवाला बाबा किंवा बंगाली बाबा कुणाचे रोग दूर करीत नाही, तरी हि लोक रोगांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कडे जातात.

बाबालोकांचा विरोध करून अंधविश्वासाविरुद्ध लढा जिंकणे शक्य नाही. नीमवाल्या बाबा/ बंगाली बाबांकडे जाण्यापासून लोकांना थांबवायचे असेल तर चांगली, विश्वसनीय आणि सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडणारी चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचवावी लागेल.

काही महिन्यांपूर्वी डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जीवनावर आधारित सिनेमा बघितला होता. भामरागडसारख्या दुर्गम भागात, जादूटोणा करणारऱ्या तांत्रिकांकडे जाणे लोकांची मजबुरी होती. उत्तम डॉक्टर, उत्तम चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचली. लोकांचे तांत्रिकांकडे जाणे आपसूक बंद झाले.

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे.

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे.

एकदम चोक्कस.

तुमचे तीनही लेख एकत्र वाचल्यावर संगती अशी लागते आहे. "अंधश्रद्धा निर्माण होते त्यामागे आपले आयुष्याचे प्रश्न सुटत नाहीत हे मुख्य कारण असतं. ते प्रश्न सुटले नाहीत म्हणून असहाय झालेला माणूस जेव्हा एखाद्या बाबा-बुवाकडे वळतो तेव्हा तो विशिष्ट बाबा कसा चूक आहे हे सांगून फारसा उपयोग नसतो. त्या माणसाचे किंवा एकंदरीत समाजाचे प्रश्न सुटले की आपोआप अंधविश्वास निर्माण होणं कमी होतं." हे खूपच पटण्यासारखं आहे. आधीच्या लेखांमधल्या काही वाक्यांबाबत वाद झाले, तरीही हा गाभा योग्यच आहे.

जसजशी समाजाची सुबत्ता, आरोग्य, आणि शिक्षण वाढत जाईल तसतसा अंधविश्वास फैलावणं आपोआप कमी होत जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खुप सुन्दर विश्लेषण..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जसजशी समाजाची सुबत्ता, आरोग्य, आणि शिक्षण वाढत जाईल तसतसा अंधविश्वास फैलावणं आपोआप कमी होत जाईल

हे अजिबात मान्य नाही. श्रद्धेचे दिसणारे स्वरुप बदलेल फक्त. कारण अंधविश्वास्/श्रद्धा हे मुलभुत आहे, कुठलाही बाहेरचा पॅरॅमिटर त्यावर परीणाम करुन शकत नाही.

सुबत्ता आली तर बंगाली बाबा कडे जायच्या ऐवजी लोक डॉ. बत्रा कडे जातात. माझ्या मते डॉ बत्रा कडे जाणे आणि बंगाली बाबा कडे जाणे ह्यात दर्जात्मक फरक नाही.

होमिओपाथी वापरणारे १००% लोक हे शिक्षीत आणि सुबत्ता असलेल्या लोक च असतात. तुमच्या हायपोथिसीस ला उलटे पाडणारी ही लाखो उदाहरणे आहेत.

बालाजी तांबे आणि सध्या अनेक जी आयुर्वेद बेस वरची हेल्थ रीसोर्ट निघाली आहेत, तो म्हणजे बंगालीबाबाला शिक्षीत आणि पैसेवाल्या लोकांनी शोधलेला ऑप्शन आहे.
एक आयुर्वेद रीसोर्ट्वाला तर जन्मतारीख पण विचारतो औषध देण्याआधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की काय डेटा दिला तर तुम्ही अंधश्रद्धा कमी झाली आहे असं म्हणाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नक्की काय डेटा दिला तर तुम्ही अंधश्रद्धा कमी झाली आहे असं म्हणाल?

आधी तुमची अंधश्रद्धेची व्याख्या काय हे महत्वाचे. भानामती, नरबळी, चेटुक, बाबाबंगाली इतपतच तुम्ही अंधश्रद्धा म्हणत असाल तर गोष्ट वेगळी आहे. माझ्या मते ह्य वरच्या गोष्टी आणि होमिओपाथी, भविष्य, वास्तुशास्त्र, जपजाप, पोथ्या वाचणे ह्या अपाय न करणार्‍या गोष्टी सुद्धा तितक्याच दर्जाच्या अंधश्रद्धा आहेत. आता अपाय करत नाहीत म्हणुन चालत असतील तर ठीक आहे.
मी पूर्वीच दुसर्‍या धाग्यावर माझ्या प्युरीटंट मताबद्दल लिहीले होते.
१९७० साली इस्त्रो चा माणुस तिरुपतीला रॉकेट ची प्रतिकृती दाखवायला गेला नसता ( कमीतकमी लोकलज्जेस्तव ),पण आता जातो.
माझ्या बरोबरचे शास्त्राचे अनेक विद्धार्थी पेपर वर ||श्री|| असे लिहायचे.
-------
माझ्या श्रद्धे ला विरोध नाहीचे. कोणाला काय वाट्टेल ते करावे दुसर्‍याला त्रास होत नसेल तर.
पण आता श्रद्धा कमी झालीये हे मात्र पटत नाही. मॅनिफेस्टेशन बदलले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सद्याचे वास्तुशास्त्र (फन्ग श्वे) ज्या मोठ्या प्रमाणावर आणि समाजातल्या ज्या गटाकडून वापरले जातेय त्यावरून सहमत. पण मुळात वास्तुशास्त्र हे एक थोतांड आहे किंवा नाही हे अजून इथे ठरायचे आहे. ते तसे ठरले तर पूर्ण सहमत.
ऐसीवर जे ठरते ते खरे असते असा विश्वास आहे. आता हा अंधविश्वास आहे की कसे हे अजून ठरायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मुळात वास्तुशास्त्र हे एक थोतांड आहे किंवा नाही हे अजून इथे ठरायचे आहे

हा हा हा. तसे तर ज्योतिषशास्त्र सुद्धा थोतांड ठरायचे आहे अजून (म्हणे) !!!
-----------------------------
ओव्हरऑल मेडिकल सेवांची अनुपलब्धता मान्य केली तरी आजारी पडल्यावर केमिस्टला विचारून तो देईल ते औषध घेणे हे बाबाकडे जाण्यापेक्षा अधिक परिणामकारक आणि स्वस्त पडेल असे वाटते.
-----------------------------
झाडा लावणे म्हणजे काहीतरी पर्गेटिव्ह घेणे असावे. तसे असेल तर ते हल्ली बोकाळलेल्या पंचकर्मापेक्षा फार वेगळे नाही. माझ्या लहानपणी आमचे वडील* आम्हाला रेग्युलर वमन-विरेचन-बस्ती हे उपाय करायला लावीत.
*वडील वैद्य नसून इंजिनिअर होते. माझे आजोबा वैद्य होते त्यांच्याकडून आलेले हे ज्ञान असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपल्याकडे (महाराष्ट्रात) मांत्रिक किंवा भगत एका झाडाच्या किंवा एका विशिष्ट झाडाच्या टहाळ्या घेऊन रोग्याच्या अंगावर त्या झाडतो. मग ती बाधा उतरते किंवा ती होण्यास कोण्/काय कारणीभूत आहे हे तो रोगी स्वमुखातून सांगतो आणि नंतर त्यावर उपाययोजना करता येते. ह्याला कदाचित झाड लावणे म्हणत असतील. किंवा, झाडाझडतीतल्या 'झाडा'प्रमाणे रोग्याला जोरजोरात प्रश्न विचारले (बोल, तू कोण आहेस, काय हवंय तुला, सोडायला काय घेशील टाइप) जात असतील आणि झाडा घेतला जात असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. प्रकाश आंबेडकर ? तुम्हाला डॉ. प्रकाश आमटे म्हणायचे होते का ?

झाडा लावणे म्हणजे काय ? कारण झाडाचे अनेक अर्थ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहिताना चूक झाली. ठीक केली आहे.

राजेश गुरुजी, मी ज्या भागात राहतो ८०% लोक एका खोलीत राहणारे भाडेकरू आहेत. या भागात बंगाली बाबा लोकांचे प्रस्थ हि आहे. त्या मागचे कारण शोधताना, हि लेखमाला लिहिण्याचा विचार मनात आला. माझ्या जवळ चांगली शब्द संपदा नाही. ३४ वर्षांच्या सरकारी नौकरीत हे मात्र कळले आहे, कि कुणाचा विरोध करून, किंवा कुणावर कारवाई करून समस्या सुटत नाही. चा पाढा सोडून चा पाढा वाचणे अधिक प्रभावकारी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे.

पटलं एकदम! हा भाग आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोठ्या शहरांत जनरल प्रॅक्टिशनर ही जमात नष्ट झाली आहे का? जो उठतो तो* हॉस्पिटलच्या ओपीडीत जाण्याची गोष्ट करतो.

*हे मी झुग्गी झोपडीतल्या लोकांविषयी म्हणत नाही माझे काही दिल्लीकर कलीग सर्दी ताप आला की अपोलो हॉस्पिटलमध्ये जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्याही ओळखीतले अनेक लोक आम्ही फकस्त MDकडे जातो असं सांगतात. जालावरदेखील त्यांना 'जिपडा' असं प्रेमळ संबोधन दिलेलं वाचलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरे साहेब, दिल्लीतले ७० टक्के लोक एक खोलीच्या घरात राहतात. घरभाडे, वीज, परिवहन वर होणारा खर्च वगळला कि त्यांच्या जवळ इतर खर्चा साठी जास्तीस्जास्त ५ ते १० हजार उरत असतील. सरकार हि unskilled contract मजदूर ला ८००० रुपये पगार देते. मायापुरी सारख्या औधोगिक भागात हि ८-१० हजारच पगार आहे. बाकी दिल्लीत १० टक्के लोकांजवळ अमाप पैसा आहे. अधिकांश लोक स्वयंभू डॉक्टरांकडे जातात आणि नंतर बाबा लोकांकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विपरीत (आर्थिक, कौटुंबिक, शारिरीक, सामाजिक इ.) परिस्थितीतही जर सारासार विवेक वापरता आला तरच खर्‍या अर्थाने अंधविश्वासापासून मुक्तता मिळाली असे मी म्हणेन. सगळं चांगलं असताना तुम्हाला कशाच्या निवारणाची गरज नसते. निरोगी असताना बाबा काय डॉक्टर काय कोणाचीही गरज नसते..

रोगमुक्त (समस्यामुक्त) करणे हे ऑब्जेक्टिव्ह आहे. इट्स नॉट वे.

हे म्हणजे एखादा बॅट्समन खूप स्ट्र्गल करतोय. त्याला त्यातून वाचवण्यासाठी तंत्र सुधारण्याऐवजी, त्याचे शतक झाले की तो स्ट्रगल करणार नाही असे म्हणण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे.
एकिच मारा, पर सॉलीड मारा. असो म्याच हरली, पण तेंडल्याचे शतक झाल्याचे जे समाधान मिळते त्याचीच या वाक्याने पुनरावृत्ती केलि, ब्रावो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अंधविश्वास काय आरोग्यापुरताच असतो काय?
मॅच सुरू होण्याआधीच हरण्यात आलेली आहे. मग कोणी सेंचुरी मारो वा न मारो.
अंधविश्वासाचा प्रश्न अख्ख्या भारतीय समाजाला व्यापून राहिलेला आहे. गरीब, श्रीमंत, उच्च जात, नीच जात, सुशिक्षित, अशिक्षित सर्वजण त्यात येतात. केवळ आरोग्यच नव्हे तर जीवनाचे अनेक पैलू त्यात येतात. त्यासाठी नुसत्या सुखसोयी पुरवून उपयोग नाही. एकेकाळच्या वंचितांच्या नवनवीन लाटा नवमध्यमवर्गात सामील होताना ते आपल्याबरोबर हे अंधविश्वासही घेऊन येतात आणि त्यामुळे समृद्धी आली तरी जुने विश्वास तसेच राहिले असे चित्र निर्माण होते. शिवाय संख्यात्मक दृष्टीने अंधविश्वास वाढला असाही चुकीचा विदा काढला जाऊ शकतो. हा जो पूर्ववंचित नवमध्यमवर्ग आहे तो पूर्वी कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांचे जिणे याविषयी मेन-स्ट्रीमला काही पडले नव्हते. आता आपल्या मांडीला मांडी लावून बसू लागल्याबरोबर निकट वावरामुळे त्यांच्या पूर्व आणि सद्यजीवनामध्ये आम्ही आणि माध्यमेवगैरे रस घेऊ लागली आहेत. गावोगावच्या जत्रांमध्ये लोक जमतात, नवस फेडले जातात, जातपंचायतींच्या बैठका होतात, लग्नाची बोलणी होतात, घरातल्या, गावातल्या अनेक प्रश्नांवर तोडगे काढले जातात. हे सर्व कशा पद्धतीने होते हे आपल्याला ठाऊक असण्याचे कारण नसते. पण त्यातलाच कुणी एक आपल्याशेजारी येऊन राहू लागला की त्याचे वागणे बघून आपण खडबडून जागे होतो. "अरे, आताशी समाजात अंधश्रद्धा वाढलीय बरं का." बरे अतिसमृद्ध भारतीय समाजातही कसल्याकसल्या प्राप्तीसाठी व्रतेवैकल्ये पूर्वीइतक्या जोमाने नव्हे पण चालू असतातच. तेव्हा प्रखर प्रबोधनाची जरूर आहे. कलाकलाने घ्यायचे म्हटले तर दोनशे वर्षे लागतील यातून बाहेर यायला आणि तोपर्यंत समाजाचा एक फार मोठा भाग या मानसिक मुक्तीला, स्वतंत्र प्रज्ञेच्या निर्मितीला मुकेल. हे पर्यायाने आपले सर्वांचे नुकसान आहे. स्वयंप्रज्ञ समाज हे कोणत्याही प्रगत संस्कृतीचे भूषण आणि लक्षण असते.
अंधविश्वासाची व्याख्या मुळातच लेखातल्याइतकी भाबडी बनवायची असेल तर प्रश्नच मिटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वयंप्रज्ञ समाज हे कोणत्याही प्रगत संस्कृतीचे भूषण आणि लक्षण असते. अंधविश्वासाची व्याख्या मुळातच लेखातल्याइतकी भाबडी बनवायची असेल तर प्रश्नच मिटला.

कोणत्या संस्कृतीत असा स्वयंप्रज्ञ समाज अस्तित्वात होता ?

प्लेटो ने सुद्धा ही गलती केली होती. - Plato made the fatal error of equating knowledge with virtue and assuming that if one knows what is right he will do what is right _____________ from page 184 of Thomas Cahill’s 2003 volume "Sailing the Wine-Dark Sea: Why the Greeks Matter".

माझं म्हणणं हे आहे की स्वयंप्रज्ञ समाज निर्मिती हाच भाबडेपणा आहे. व्यक्ती ही Bounded Rationality ने कलूषित असते हे मान्य न करणे हे pretense of knowledge बाळगणेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Rationality is the quality or state of being reasonable, based on facts or reason. Rationality implies the conformity of one's beliefs with one's reasons to believe, or of one's actions with one's reasons for action.
योग्य काय आहे याची माहिती असणे हे योग्य कृतीप्रत नेतेच असे नाही हे खरे. पण सत् आणि असत् (म्हणजे खरे आणि खोटे असा अर्थ नाही.) यांची माहिती आणि जाणीव असणे हे योग्य कृतीस प्रवृत्त करू शकते. सम्यक ज्ञानासोबत सम्यक कृती असतेच असे नाही मात्र सम्यक कृतीसोबत सम्यक ज्ञान असतेच असते. कृतीला परिस्थितीजन्य मर्यादा असतातच आणि ज्ञानाला नसतात;. पण त्या त्या मर्यादांमध्ये शक्य तितकी सम्यक कृती घडवून आणणे सम्यक ज्ञानाने शक्य होते. म्हणून ज्ञान आणि त्याची लालसा वाढवणे आवश्यक आहे. (मी वरती 'प्रबोधन' हा शब्द वापरला आहे.) अर्थात हासुद्धा एक हेतू किंवा उद्दिष्ट किंवा विचार आहे आणि त्याच्या अंमलबजावणीला म्हणजे कृतीला मर्यादा आहेतच.
अवांतरः भारतीयांचे सामाजिक जीवन हे अजूनही बहुतांशी ट्राय्बल स्वरूपाचे आहे. (टोळ्या, गावकी-भावकी, मोठाली संयुक्त कुटुंबे इ.) त्याचे काही फायदे काही तोटे आहेतच. पण सद्यकाळात व्यक्तिकेंद्रित समाजव्यवस्था असणे हे अधिक हिताचे ठरेल. मुक्त व्यक्तिगत प्रज्ञेचे उत्स्फूर्त आविष्कार समाजाला अधिक फलदायी ठरतील. (इथे सांघिक प्रयत्नांना झिडकारण्याचा हेतू नाही.) व्यक्तीचे उन्नयन, त्याची प्रज्ञा (आत्मभान) जागृत करणे, सम्यक्ज्ञानयुक्त स्वयंनिर्णयाची वेळ व्यक्तीवर वारंवार येऊ देऊन त्याची निर्णयशक्ति कसास लागेल अशी परिस्थिती निर्माण होणे हे मला आवडेल. आणि यास सद्यपरिस्थिती अनुकूल आहे. यासाठी आवश्यक असलेला माहितीपुरवठा आज कमी सायासांत उपलब्ध आहे. ज्ञान म्हणजेच सद्हेतू आणि सद्गुण असे नसले तरी सद्हेतू म्हणजे काय ते ज्ञानाने कळते. (यावर पूर्णज्ञान, शुद्ध ज्ञान, ज्ञान हे गुणातीत असते, शुद्ध ज्ञानाला विकार चिकटत नाहीत इत्यादि आध्यात्मिक आणि भारतीय तत्त्वज्ञानात्मक परिभाषा वापरून लिहिता येईल पण ते जाउ दे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकून अन्डरलाइन झालेय. ते नाही असे समजून वाचावे.
(दुरुस्त केले आहे - संपादक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार, संपादक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः भारतीयांचे सामाजिक जीवन हे अजूनही बहुतांशी ट्राय्बल स्वरूपाचे आहे. (टोळ्या, गावकी-भावकी, मोठाली संयुक्त कुटुंबे इ.) त्याचे काही फायदे काही तोटे आहेतच. पण सद्यकाळात व्यक्तिकेंद्रित समाजव्यवस्था असणे हे अधिक हिताचे ठरेल. मुक्त व्यक्तिगत प्रज्ञेचे उत्स्फूर्त आविष्कार समाजाला अधिक फलदायी ठरतील. (इथे सांघिक प्रयत्नांना झिडकारण्याचा हेतू नाही.) व्यक्तीचे उन्नयन, त्याची प्रज्ञा (आत्मभान) जागृत करणे, सम्यक्ज्ञानयुक्त स्वयंनिर्णयाची वेळ व्यक्तीवर वारंवार येऊ देऊन त्याची निर्णयशक्ति कसास लागेल अशी परिस्थिती निर्माण होणे हे मला आवडेल. आणि यास सद्यपरिस्थिती अनुकूल आहे. यासाठी आवश्यक असलेला माहितीपुरवठा आज कमी सायासांत उपलब्ध आहे. ज्ञान म्हणजेच सद्हेतू आणि सद्गुण असे नसले तरी सद्हेतू म्हणजे काय ते ज्ञानाने कळते. (यावर पूर्णज्ञान, शुद्ध ज्ञान, ज्ञान हे गुणातीत असते, शुद्ध ज्ञानाला विकार चिकटत नाहीत इत्यादि आध्यात्मिक आणि भारतीय तत्त्वज्ञानात्मक परिभाषा वापरून लिहिता येईल पण ते जाउ दे.)

माझा कोपर्‍यापासुन नमस्कार _/\_ काश हम भी आपके जयसे होश्यार होते कुछ् अछ्चा सोच पाते कुच अछ्चा लिख पाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!