फोटोग्राफी कशी करावी

मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.

नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.
Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम
हा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं.

आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन येते.
Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/80 at f/4.5 लेन्स 35 mm प्राइम

Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम

फोटो काढताना काँपोसिशनकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यामुळे कुठल्याही कॅमेरावर चांगले फोटो येऊ शकतात.

थियरीतला महत्वाचा भाग असतो म्हणजे "डेप्थ ऑफ फिल्ड". कॅमेराचा डोळा जास्त उघडला की "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी होते, म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट शार्प राहाते आणि बाकीचा भाग धूसर राहातो. अ‍ॅपरचर कंट्रोल करून "डेप्थ ऑफ फिल्ड" बदलता येते. याच्यासाठी "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरा. याच्यात आपण स्वतः अ‍ॅपरचर निवडायचे असते आणि कॅमेरा आपोआप योग्य तो शटर इंटरव्हल निवडतो.
"डेप्थ ऑफ फिल्ड" चे उदाहरण बघुया.

Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम 1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम

यात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे.
पहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो.
f स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे.

कधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो "ओव्हर-एक्स्पोज" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं? शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).

Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/2.2 लेन्स 35 mm प्राइम 1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा)

जर फोटो "अंडर-एक्स्पोज" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).

Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/14 लेन्स 35 mm प्राइम 1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा)

फोटो "ओव्हर-एक्स्पोज" झालाय की "अंडर-एक्स्पोज" झालाय ते कसं ओळखायचं? ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा.

आता तुम्ही विचार कराल मी जर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त "अ‍ॅपरचर" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ? ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही "शटर प्रायोरिटी" किंवा "मॅन्युअल" मोड वापरला पाहिजे. "शटर प्रायोरिटी" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अ‍ॅपरचर निवडतो. "मॅन्युअल" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अ‍ॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो.

साधारणतः "डेप्थ ऑफ फिल्ड" कंट्रोल करायचे असेल तर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर "शटर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा. खालील उदाहरण "शटर प्रायोरिटी"चं आहे.

Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/15 at f/14 लेन्स 35 mm प्राइम 1/10 at f/25 लेन्स 35 mm प्राइम

माझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 सेकंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा.

सूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात.
उदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत?) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.

Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम 1/500 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम

तुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्रमश: आहे का?
>>मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.>>
लेखाचा उद्देश स्पष्ट होत नाहीये.
एवढेच लिहिणार का आणखी मालिका?
(तुम्हाला डिवचण्यासाठी नाही पण काही उत्तमोत्तम मराठीत यावे ही इच्छा आहे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अचरटजी तुम्हाला लेखाचा उद्देश "साधत" नाहीये म्हणायचय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रमश: आहे का? >>> नाही

लेखाचा उद्देश स्पष्ट होत नाहीये. >>> DSLR कॅमेरा जे अजूनही ऑटो मोडमध्ये वापरतात, अश्या लोकांच्या माहितीसाठी लेख लिहिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही जो मोड सिलेक्ट करुन फोटो काढलाय आणि ऑटो मोड नी तोच फोटो ह्याची शेजारी शेजारी ठेऊन तुलना केली पाहिजे. असे काही फोटो आहेत का तुमच्या कडे उदयदादा.

कारण हल्ली ह्या कॅमेरांमधली सॉफ्टवेअर फारच प्रगत झाली आहेत. तुम्हाला एलसीडी स्क्रीन वर फोटो दाखवायच्या आधी पण म्हणे इमेज प्रोसेसिंग होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वात शेवटी, डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये आहे आणि उजवीकडचा प्रोग्राम मोडमध्ये आहे

फोटोग्राफीबद्दल इंग्रजीत भरपूर लेख आहेत, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून हा लेख लिहिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कारण हल्ली ह्या कॅमेरांमधली सॉफ्टवेअर फारच प्रगत झाली आहेत. तुम्हाला एलसीडी स्क्रीन वर फोटो दाखवायच्या आधी पण म्हणे इमेज प्रोसेसिंग होते.

हे नविन नाही. डिफॉल्ट डीएसएलआर फोटो हे 'जेपेग' मोड मध्ये असतात. सेन्सरने टिपलेला ते जेपेग मध्ये कॉम्प्रेस केलेला फोटो ही प्रोसेस म्हणजे इमेज प्रोसेसिंगच होय. (म्हणूनच लोक रॉ मोड वापरतात. सेन्सर वरतीसुद्धा फिल्टर्स बसवलेले असतात. अन त्या फिल्टर्सचे अ‍ॅव्हरेजिंग करून फोटो बनवला जातो. तेव्हा तिथेही इमेज प्रोसेसिंग आहेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

मिपालेखांची लिंक दिलीच आहे.वेगळे सांगणार असाल तर "target audience" कोणता ते ठरवा असं म्हणायचं आहे.
बहुतेक dslr मधल्या सर्व सोयी असणारा कॅम्रा घेतलेला आहे आणि फक्त शटर वापरतात त्यांच्यासाठी आहे का? portrait,wildlife,street ,candid असे विषय घेणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख उपयुक्त आहे. सपाट आणि त्रिमिती फोटोंचं उदाहरण आवडलं. (बाकी माहिती होती किंवा सहज लक्षात येतं म्हणून फार भावलं नाही एवढंच.)

उदाहरणादाखल भोपळे दाखवणं हा निर्णय मुद्दाम घेतला का सध्या दुकानांत भोपळे दिसत आहेत म्हणून आपसूक निवड झाली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सपाट आणि त्रिमिती फोटोंचं उदाहरण आवडलं.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0