इतर

रुह से उठती हुई एक आवाज...

स्पर्धा का इतर?: 

बुशरा अन्सारी - पाकिस्तानी कलाकार

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक

स्पर्धा का इतर?: 

वण्डरफुल मिनारी

मी लहान होते तेव्हापासून माझं एक स्वप्न आहे आपली स्वतःची चिकार मोठी जमीन पाहीजे शेती करण्यासाठी. मोठ्या शहरात रहायला लागल्यापासून मला याची जाणीव अधिकच होऊ लागली. आपण काहीकाळानं गावी परत जायचं आणि स्वतःची छोटीशी का असेना शेती करायचीच. मातीशी जोडलेली मूळं असल्यामुळं हे सतत अन् वारंवार वाटत राहतं. कामाच्या व्यापात आपल्या या इच्छेला थोडंसं मागे सारावं लागतं, पण कधीतरी काहीतरी निमित्त घडतं अन् आपल्याला याची परत आठवण होतेच. तसंच एक निमित्त काल घडलं, ते म्हणजे एक चित्रपट, मिनारी, अमेरिकन मेड कोरियन सिनेमा. एका कोरियन कुटुंबाची गोष्ट.

स्पर्धा का इतर?: 

Sthree - त्या तिघींची गोष्ट

Instagram वरच्या meet the flow या पेजवर या टीमने मिळून STHREE नावाचा हा दृकश्राव्य माध्यमातला प्रयोग केलाय.
मराठी वाङ्मयात ओवी हा काव्यप्रकार बराच जुना. तो म्हटला की आठवतं ते स्त्रियांनी त्यांची दैनंदिन कामं करताना गाण्यातून केलेली अभिव्यक्ती.
आभा सौमित्र या एका अशाच हुशार मुलीने आताच्या काळातल्या 3 मुलींना केंद्रस्थानी ठेवून 3 ओव्या लिहिल्यात. त्या त्यांच्या त्यांच्या activity मध्ये आहेत आणि त्यातूनच त्या प्रत्येकीची लयबद्ध गद्यात अशी गोष्ट सांगितलीये. प्रेम, तेज आणि शांती ही यातली तीन elements.

स्पर्धा का इतर?: 

https://121clicks.com/

स्पर्धा का इतर?: 

कायगाव टोका, प्रवरासंगम येथिल शिल्पे: भारतीय दृष्यकलेचा आगळा नमुना

कायगाव औरंगाबादपासून तीसेक किलोमिटर अंतरावर आहे. अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांनी या मंदिराला फुटेज मिळण्याची संधिच दिली नसल्याने असेल. पण गोदावरी नदीच्या काठावरचे हे भलत्याच सुंदर लोकेशनवर असलेले हे मंदिर थोडेफार प्रसिद्ध व्हायला हरकत नाही. भारतभर मंदिरे पाहत हिंडणाऱ्या वास्तुविशारद मित्राने मला जवळजवळ ढकलत हे मंदिर दाखवायला नेले म्हणून अन्यथा माझ्या इनर्शियाला सीमा नाही. या मंदिराचा त्याने घेतलेला व्हिडिओ येथे: https://youtu.be/RZ06VNlpboM प्रथमतः पाहिले तेव्हाच ह्या मंदिरातल्या शिल्पांनी मन मोहून घेतले होते.

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार(२) - मंदार देशपांडे

इंटीरियर डिझायनर, कापड व्यावसायिक, कार डीलर, बांधकाम कंत्राटदार असे विविध व्यावसायिक लोक करोनाच्या काळात रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. मंदार देशपांडे यांनी काढलेले त्यांचे काही फोटो.

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार - मंदार देशपांडे

करोनामुळे कमाई बंद झालेले काही रिक्षाचालक आणि रंगारी यांसारखे व्यावसायिक सध्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. त्याची ही छायाचित्रे -

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न - मंदार देशपांडे

ऐन लॉकडाऊनमध्ये लग्न करायचं झालं तर? सोशल डिस्टन्सिंग पाळून एका जोडप्याचं पुण्यात लग्न झालं, आणि तेदेखील पोलिसांच्या आशीर्वादाने!

स्पर्धा का इतर?: 

करोना फोटोफीचर - आळंदी लॉकडाऊन - मंदार देशपांडे

दर वर्षी पालखीच्या वेळी आळंदी भक्तांनी फुलून जाते. या वर्षी मात्र करोनामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि परिसर सील केला गेला होता. अनेक लोकांना त्यांच्या हयातीत प्रथमच आळंदी अशी दिसली. मंदार देशपांडे यांनी काढलेले या लॉकडाऊन आळंदीचे हे काही फोटो.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर