डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

(रुपक कथा)

नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग. चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे.

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ए आर ऐवजी डॉक्टर ल. ई. शहाणे नाव ठेवा असे सुचविते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातील श्राद्धाचा ब्राह्मण हे पाकिस्तानवरील रूपक आहे, अशी शक्यता वर्तविलेली इतरत्र वाचली. यात जर काही तथ्य असेलच, तर हा दुहेरी अभावित विनोद म्हणावा काय?

बोले तो, पाकिस्तान्यांना (ऑफ ऑल द थिंग्ज़) 'ब्राह्मण' म्हणणे आणि एकसमयावच्छेदेकरून ब्राह्मणांना (ऑ.ऑ.द.थिं.) 'पाकिस्तानी' म्हणणे बोले तो दोन शेपटांवर एकाच वेळी एकच पाय की हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन शेपटांवर एकाच वेळी एकच पाय की हो!

ROFL नबा ना!!! खरोखर! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा क्लू द्या ना काहीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.बोलवा त्याच पितराना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पितरांना जेवायला बोलावणे वगैरे प्रथांना तिलांजली द्यायला हवी, म्हणजे डॉ शहाण्यांसारख्या मित्रांपासून सुटका मिळविणे देखिल जमेल.

लेखकाच्या मित्राची अवस्था स्वनिर्मित कोळीष्टकात अडकलेल्या कोळ्यासारखी वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मनिषा तै - ती रुपक कथा आहे. पटाइत काका आता सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले तरी ते थेट नावं न घेता लिहीत नाहीत.

-------
माझ्या बालबुद्धी प्रमाणे.

-इथे श्राद्धाचा ब्राह्मण म्हणजे पाकीस्तानी कलाकार किंवा व्यापारी.
-काकांचा मित्र म्हणजे महेश भट्ट कींवा जोहर सारखी लोक.
-ज्याचे नाक फुटले तो म्हणजे सामान्य भारतीय नागरीक.

---------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळ्ळं ..

माझी प्रतिक्रिया त्याच प्रकाशझोतात वाचावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||