मॅक्डॉन‌ल्ड, सेल्फ‌ स‌र्व्हिस‌, लेब‌र‌ कॉस्ट‌ व‌गैरे

ही बात‌मी स‌म‌ज‌ली का? - १४८ या धाग्याव‌र च‌र्चा लांब‌ल्यामुळे वेग‌ळा धागा केला आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

प‌श्चिमेक‌डून‌ आलेले म्ह‌णून‌ उज‌व्यांचा सांस्कृतिक‌ विरोध‌. फास्ट‌ फूड‌ असो की जी एम‌ बियाणे....

आरेसेस च्या ऑर्ग‌नाय‌झ‌र म‌धे एक लेख आला होता (सुमारे १२ - १४ व‌र्षांपूर्वी) त्यात मॅक्डॉन‌ल्ड व‌र ताशेरे ओढ‌ण्यात आले होते की मॅक्डॉन‌ल्ड च्या रेस्ट‌रॉं म‌धे ग्राह‌कांना स्व‌त:चे स्व‌त्: जेव‌ण ट्रे म‌धे घेऊन टेब‌लाक‌डे जावे लाग‌ते व खाऊन झाल्याव‌र उर‌लेला क‌च‌रा स्व‌त्: ट्रॅश म‌धे टाकावा लाग‌तो. म्ह‌ंजे त्यांचं म्ह‌ण‌णं असं होतं की मॅक्डॉन‌ल्ड ने ल‌क्षाव‌धी ग्राह‌कांना लेब‌र ब‌न‌वून टाक‌लंय्. व हे आक्षेपार्ह आहे म्ह‌णे. म्ह‌ंजे लेब‌र कॉस्ट वाच‌व‌ण्यासाठी या म‌ल्टिनॅश‌न‌ल क‌ंप‌न्या कोण‌त्याही थ‌राला जाऊ श‌क‌तात म्ह‌ंणे.

जोडीला हे प‌ण ऐका. १९९०-९१ च्या आस‌पास कोल्हापूर जिल्ह्याम‌धे आरेसेस च्या ज‌व‌ळच्या म‌ंड‌ळींनी (अखिल भा.... प‌रिष‌द) आम्हाला श्र‌म‌दान क‌राय‌ला बोल‌व‌लं होतं. ज‌व‌ळ‌च्या खेड्यात ग्र‌ंथाल‌य बांधाय‌चं होतं त्यांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्ह‌ण‌जे उप‌रोध केलाय प‌राकोटीचा की ख‌रोख‌र म्ह‌णाय‌चंय?
प‌हिल्या बाबीत श्र‌म क‌र‌ण्याचे पैसे, इच्छा असो वा नसो, द्यावेच लाग‌तात. ब‌रं, असं असेल त‌र त्यांच्या प‌दार्थांची किंम‌त बाकी दुकानांऐव‌जी क‌मी असाय‌ला ह‌वी, त‌र ती जास्त आहे. (ब‌र्ग‌र ह्या एक‌मेव प‌दार्थाच्या किंम‌ती साधारण पाहून केलेलं निरीक्ष‌ण आहे.)
दुस‌ऱ्या बाबीत श्र‌म क‌राय‌चे आहेत‌च, प‌ण पैसे देणं हे व‌र ऐच्छिक आहे. त्यात प‌र‌त स‌माजोप‌योगी काम‌ही होतंय.
(इथे वेट‌र मंड‌ळींचे प‌गार आणि ब‌टाटे आणि ग‌हू पिक‌व‌णाऱ्या शेत‌क‌ऱ्यांना मिळ‌णारा म‌ह‌सूल म्ह‌णून तेही स‌माजोप‌योगी क‌सं असं ऐसीछाप आर्ग्युमेन्ट अपेक्षित.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

म्ह‌ण‌जे उप‌रोध केलाय प‌राकोटीचा की ख‌रोख‌र म्ह‌णाय‌चंय?

उप‌रोध‌च केलाय्.

---

प‌हिल्या बाबीत श्र‌म क‌र‌ण्याचे पैसे, इच्छा असो वा नसो, द्यावेच लाग‌तात. ब‌रं, असं असेल त‌र त्यांच्या प‌दार्थांची किंम‌त बाकी दुकानांऐव‌जी क‌मी असाय‌ला ह‌वी, त‌र ती जास्त आहे. (ब‌र्ग‌र ह्या एक‌मेव प‌दार्थाच्या किंम‌ती साधारण पाहून केलेलं निरीक्ष‌ण आहे.)

किंम‌त जास्त आहे त्याचे प्र‌मुख (म्ह‌ंजे एक‌मेव न‌व्हे) कार‌ण = बार्गेनिंग पॉव‌र. ती बार्गेनिंग पॉव‌र कुठुन येते हा प्र‌श्न अपेक्षित‌च आहे. प‌ण तो विष‌य अतिग‌ह‌न आहे. स‌ब‌ब आम‌चा पास.

माझा मुद्दा हा होता की श्र‌म‌दान क‌र‌णे हे ज‌से इच्छेचा भाग आहे त‌सेच मॅक्डॉन‌ल्ड म‌ध‌ले जेव‌ण खाय‌ला तिथे जाय‌चे की नाही हा सुद्धा इच्छेचा भाग आहे. मॅक्डॉन‌ल्ड ची ध‌ंदा क‌र‌ण्याची रीत माहीती असून‌ही. आता तुम्ही म्ह‌णाल की इच्छेचा भाग आहे प‌ण प‌र‌व‌ड‌ण्याचा सुद्धा भाग आहे. ते सुद्धा ठीक आहे. प‌ण एखाद्या शेत‌म‌जूराला एक दोन दिव‌स् श्र‌म‌दान क‌राय‌ला प‌र‌व‌डेल का याचा विचार क‌रा म्ह‌ंजे मुद्दा ल‌क्षात येईल्. मी त्यावेळी विद्यार्थी होतो व म‌ला एक दिव‌स श्र‌म‌दान क‌र‌णे प‌र‌व‌डू श‌क‌त होते. व त्यात एक अहं सुखाव‌ण्याचा प‌ण भाग होताच. म‌ला जे म्ह‌णाय‌चंय ते हे - की किंम‌त जास्त आहे हे व्य‌क्ती व‌र अव‌ल‌ंबून आहे. एखाद्याला जास्त वाटेल आणि दुस‌ऱ्या एखाद्याला क‌मी वाटेल तिस‌ऱ्या एखाद्याला ठीक‌ठाक वाटेल.

तेव्हा आरेसेस चा अभिव्य‌क्ती चा अधिकार मान्य क‌रून‌ सांग‌तो त्यांचा मॅक्डॉन‌ल्ड व‌रील आक्षेप अत‌र्क्य च होता.
एकात्मिक मान‌व‌तावाद म्ह‌णा किंवा स‌माज‌वाद म्ह‌णा - डोकं क‌लुषित क‌र‌तोच.

--------

इथे वेट‌र मंड‌ळींचे प‌गार आणि ब‌टाटे आणि ग‌हू पिक‌व‌णाऱ्या शेत‌क‌ऱ्यांना मिळ‌णारा म‌ह‌सूल म्ह‌णून तेही स‌माजोप‌योगी क‌सं असं ऐसीछाप आर्ग्युमेन्ट अपेक्षित.

हे ऐसीछाप आर्ग्युमेंट आहे असं ऐसी चे श‌त्रू सुद्धा म्ह‌ण‌तील असं वाट‌त नाही.

प‌ण हे आर्ग्युमेंट तुम्हाला अमान्य आहे असं ध्व‌नित होतंय्. त‌सं अस‌ल्यास का ते सांगा. म‌ग मी प्र‌तिवाद न‌क्की क‌रेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंम‌त जास्त आहे त्याचे प्र‌मुख (म्ह‌ंजे एक‌मेव न‌व्हे) कार‌ण = बार्गेनिंग पॉव‌र. ती बार्गेनिंग पॉव‌र कुठुन येते हा प्र‌श्न अपेक्षित‌च आहे. प‌ण तो विष‌य अतिग‌ह‌न आहे. स‌ब‌ब आम‌चा पास.

हो अर्थात‌च. 'बोर्ड‌रुम' वाच‌ल्यान‌ंत‌र हे ल‌क्षात आलं होतं की मॅकडी इतके पैसे क‌स‌ले घेतात. आता इच्छेचा भाग. म‌ला जेव्हा खाय‌ला ह‌वं अस‌त‌ं, आणि मी खाद्य‌प‌दार्थांसाठी पैसे दिल्यानंत‌र, माझी ही अपेक्षा अस‌ते, की वाज‌वीपेक्षा थोडे अधिक पैसे दिल्याव‌र आता म‌ला स‌र्व्हिसही छान मिळावी. संघाचं हे म्ह‌ण‌णं आहे की अग‌दी त‌स्सेच्या त‌स्से फ्रेंच फ्राइज, अग‌दी वेळ मोजून त‌ळ‌लेली, स‌ग‌ळीक‌डे स‌मान व्यासाची ब‌र्ग‌र पॅटी ह्या स‌र्व्हिसपेक्षा जागेव‌र खाद्य‌प‌दार्थ आणून देणं, पाणी इ. फुक‌ट पुर‌व‌णं ही स‌र्व्हिस त्यांनी द्यावी. (ह्यात‌ली कोण‌ती सेवा तितके पैसे आकार‌ण्यास योग्य, हा तो व‌र‌चा मुद्दा, ज्याव‌र आम‌चा ख‌रंत‌र पास) ते त्यांनी नेह‌मीप्र‌माणे अत्य‌ंत लाऊडली मांड‌ल‌ं. आता, मी खाणार म्ह‌ट‌लं, की हेही मी मान्य‌ क‌र‌तो की म‌लाच उठून जाय‌चे श्र‌म क‌रावे लाग‌णार. ह्यात माझ्या इच्छेला कुठेच वाव‌ नाही.
आणि माझ्या अॅव्ह‌रेज भार‌तीय म.म.व. मेंदूला हे आर्ग्युमेंट प‌ट‌तं. ह्या दोघांत‌ली मॅक‌डोनाल्ड्स जी सेवा पुर‌व‌तंय ती ग्राह‌कांसाठी नाही, त‌र त्यांच्या स्व‌त:साठी, असं माझं म‌त आहे. अमेरिकेत ग्राह‌कांनी क‌स‌लेही अघोच‌र केसेस क‌रून जिंक‌ल्याचं माझ्या वाच‌नात आलंय (क‌णेक‌र), म्ह‌णून त्यांच्या स्व‌त:च्या ब‌चावासाठी त्यांनी वेळ लावून त‌ळ‌णे, मान‌वी चुका श‌क्य तेव्हढ्या टाळ‌णे इ. केलेलं आहे. आता, भार‌तात हे स‌ग‌ळं श‌क्य‌ न‌स‌ल्याने मी ब‌रेच‌दा
'डेझ‌र्ट अॅव्ह‌लेब‌ल नाही, स्प्राईट नाही, फ‌क्त कोक आहे, हा ब‌र्ग‌र नाही, फ‌क्त तो आहे' हे ऐक‌लेलं आहे. म्ह‌ण‌जे थोड‌क्यात ज्या सेवेचे इत‌के पैसे घेताय ती अग‌दी १००% पुर‌व‌णं त्यांना श‌क्य‌ नाहीये. प‌र‌त इथे मुंब‌ईत लोक फ‌क्त टाईम‌पास क‌राय‌ला तिथे जातात. तास‌ंतास ब‌साय‌ला जागा न‌स‌ते. म‌ग हे न मागित‌लेल्या स‌र्व्हिसचे अधिक पैसे भ‌र‌णं म‌ला पट‌त नाही. मॅक्डीम‌ध्ये फुक‌ट, शुद्ध पाणी त‌र गेल्या ४-५ व‌र्षांत‌च मी पाहिल‌ंय, आधी च‌क्क 'कोक ही लेना प‌डेगा' हे ऐक‌ल्याचंही आठ‌व‌तंय म‌ला.
व त्यात एक अहं सुखाव‌ण्याचा प‌ण भाग होताच.
हेच त‌र म्ह‌ण‌तोय मी! आप‌ण श्र‌म‌दान क‌रून हा आन‌ंद मिळ‌व‌तो. त्याची भौतिक किंम‌त क‌र‌णं क‌सं श‌क्य आहे? प‌र‌त, श्र‌म‌दान क‌राय‌चं की नाही, हा स‌र्व‌स्वी माझ्या इच्छेचा भाग आहे. मॅक‌डीला मी खाय‌ला पैसे देतो. श्र‌मांसाठी नाही. अर्थात‌च श्र‌म‌जिवींना श्र‌म‌दान प‌र‌व‌ड‌णारं आहे. प‌ण तो स‌र्व‌स्वी त्यांच्या इच्छेचा भाग आहे. मॅक्डी म‌ध्ये गेल्याव‌र अन्नाब‌रोबर म‌ला श्र‌म क‌रावे लाग‌तातच. (इथे आप‌ण आप‌ले negligible श्र‌म पाह‌ण्याऐव‌जी मॅक्डीच्या लोकांचे किती श्र‌म वाच‌तात हे पाहावं) त्यात म‌ग म‌ला उठून काऊंट‌र‌व‌र जाय‌चं असो, वा न‌सो. (तुम्हाला आव‌ड‌णारी मैत्रीण, एक अघोच‌र मित्र आणि तुम्ही असे गेले अस‌ता स‌म‌जा ते दोघे फार ग‌प्पा मार‌ताहेत आणि तुम्हाला काऊंट‌रव‌र जावं लाग‌लं त‌र?)
माझा मुद्दा इत‌काच, की ह्या दोन्ही गोष्टींची तुलना अयोग्य‌ आहे.

प‌ण हे आर्ग्युमेंट तुम्हाला अमान्य आहे असं ध्व‌नित होतंय.

माल लिया, पैसा दिया. काय‌का स‌माज का उप‌योग? विहीर खोदण्यात ते अहं सुखाव‌णं व‌गैरे सोडून म‌ला काहीच मोब‌द‌ला नाही, किंब‌हुना प्र‌वासाचा अजून ख‌र्च‌च आहे. त‌रीही मी ते क‌र‌तो. मॅक‌डोनाल्ड्स मध्ये माझी भूक भाग‌ते, क‌म्फ‌र्ट फूड खाऊन म‌ला स‌माधान मिळ‌तं, त्याचा मोब‌द‌ला मी देतो, ते प‌रदेशी आणि थोडे देशी लोक वाटून घेतात. ह्यात कुठे आलाय समाजोप‌योग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

ह्यात माझ्या इच्छेला कुठेच वाव‌ नाही

तुम‌च्या इच्छेला पूर्ण वाव आहे. मॅक्डी म‌धे जाय‌चे का नाही तो तुम‌चाच चॉइस आहे.
जेंव्हा तुम्ही मॅक्डी म‌धे जाता तेंव्हा स्व‌सेवा ( वाइट‌साइट अर्थ काढु न‌का ) क‌राय‌ला लाग‌णार आहे हे तुम्हाला माहिती अस‌ते आणि त‌री तुम्ही जाता म्ह‌ण‌जे तुम्हाला मॅक्डी ब‌रोब‌र‌चा क‌रार मान्य अस‌तो ( की तुम्हाला स्व‌सेवा क‌रावी लागेल ).
-------
एकुणात‌च तुम‌चा पॉइंट काय आहे ते क‌ळ‌ला नाही. हे ऐसीव‌र नेह‌मीच होते. ऐसी नी लेख्/प्र‌तिसादाच्या आधी "विषय‌" पेक्षा, न‌क्की मुद्दा हाय आहे ते ४० श‌ब्दात लिहावा अशी ज‌ब‌र‌द‌स्ती केली पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु, १४टॅन यांचे म्ह‌ण‌णे आहे की, मॅक‌डी मारुन मुट‌कुन काम‌ क‌र‌वुन घेतात्. उद्या मॅक‌ डी ला प‌र्याय‌ आला (ब‌र्ग‌र‌ चा) आणि ज‌र‌ त्यांनी बैठी सेवा दिली यत‌र‌ मॅक‌डी चा ध‌ंदा बुडेल व‌ तेच सुयोग्य‌ (:)) आहे.
.
श्र‌म‌सदान वैक‌ल्पिक अस‌ते, प‌ण मॅक‌डी ला प‌र्याय‌ उप‌ल‌ब्ध न‌स‌ल्याने मॅक‌डीत‌ झ‌क‌ मार‌त‌ जावे लाग‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मॅक‌डी मारुन मुट‌कुन काम‌ क‌र‌वुन घेतात्.

हे अस‌त्य आहे.

कोणालाही मॅक्डी म‌धे जाण्याचे ब‌ंध‌न नाही.

----

उद्या मॅक‌ डी ला प‌र्याय‌ आला (ब‌र्ग‌र‌ चा) आणि ज‌र‌ त्यांनी बैठी सेवा दिली यत‌र‌ मॅक‌डी चा ध‌ंदा बुडेल व‌ तेच सुयोग्य‌ (:)) आहे.

अग‌दी ब‌रोब‌र्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला इत‌क‌ंच म्ह‌णाय‌चंय की दोन्ही गोष्टींची तुल‌ना अयोग्य‌ आहे.
खाय‌च‌ं म्ह‌ट‌लं की ख‌पाय‌चं जे येतं, त्या गोष्टीला आक्षेप आहे.
बाय‌द‌वे, माझा अमेरिकास्थित ब‌ंधू म्ह‌ण‌तो की तिथ‌ल्या म्याक‌डी म‌धे फ‌क्त भिकारी जातात. हे कित‌प‌त ख‌रंय? मुंबैत त‌री हा ब‌ऱ्यापैकी 'हिप' ज्वाईंट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

मॅक‌डी इथे नीच‌भ्रु स‌म‌ज‌ले जाते. तिथे क्व‌चित ख‌र‌च भिकारी दिस‌तात म्ह‌ण‌जे रिच‌म‌ंड‌, कॅलिफोर्निआ या द‌रीद्री भागात मी एक बाई रेस्ट्रुम‌ म‌ध्ये पाहीली आणि घाब‌रुन मी प‌ळून गेलेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मॅक‌डी इथे नीच‌भ्रु स‌म‌ज‌ले जाते.

शुचे, अधोरेखित श‌ब्दाची उत्प‌त्ती सांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा श‌ब्द‌ स‌र्व‌प्र‌थ‌म आम्ही वाप‌र‌ला हे या ठिकाणी या माध्य‌मातून अधोरेखित क‌रू इच्छितो. उच्च‌भ्रूच्या विरुद्धार्थी नीच‌भ्रू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याचे अप‌त्य‌ आहे ते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅट्याचा ह‌ळूह‌ळू 'आधुनिक साव‌र‌क‌र' होऊ घात‌लाय हा.. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

बाटम्यान आधुनिक सावरकर नसुन आधुनिक कोसंबी असावा. (किंवा गरिबांचे कोसंबी)
इतिहास तज्ञ + गणित तज्ञ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गरिबांचे कोसंबी

हा हा हा हा, आव‌ड‌लेच. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठिक, प‌ण तो 'गाय/बैल/म्हैस हे उप‌यिक्त प‌शू आहेत' हे स्व‌त:ला 'हिंदुत्व‌वादी' म्ह‌ण‌वून घेताना म्ह‌ण‌ताना (ते प‌ण रामाय‌ण व‌गैरेम‌ध‌ले संस्कृत श्लोक सांगून) पाहिलंय म्ह‌णून साव‌र‌कर म्ह‌ट‌लं हो. काय आव‌डेल ते घ्या.. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदैव शोधात..

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त‌से श्र‌म‌दानालाही जाय‌चे बंध‌न कुठेय्?

अग‌दी स‌ह‌म‌त.

श्र‌म‌दान या श‌ब्दात‌च स्वेच्छा अंत‌र्भूत आहे. स्वेच्छा न‌स‌ती त‌र ती गुलामी किंवा वेठ‌बिगारी झाली अस‌ती.

त‌सं त‌र राष्ट्रीय स्व‌य‌ंसेव‌क स‌ंघ या म‌धे सुद्धा स्वेच्छा अंत‌र्भूत आहे. व हे ल‌क्ष‌णीय‌ सुद्धा आहे व प्र‌श‌ंस‌नीय सुद्धा आहे.

----

बाय‌द‌वे, माझा अमेरिकास्थित ब‌ंधू म्ह‌ण‌तो की तिथ‌ल्या म्याक‌डी म‌धे फ‌क्त भिकारी जातात. हे कित‌प‌त ख‌रंय?

काही प्र‌माणाव‌र ख‌रं आहे.

प‌ण उल‌टा मुद्दा मांड‌तो == मी असं ऐक‌लंय की - २००९ च्या आस‌पास अमेरिकेत प्र‌चंड म‌ंदी होती, त्यामुळे प्र‌चंड बेकारी होती. तेव्हा त‌र काही ठिकाणी म्याक‌डी च्या बाहेर मुली उभ्या र‌हाय‌च्या व येणाऱ्या ग्राह‌कांना ऑफ‌र क‌राय‌च्या की तुम्ही माझ्या ब‌रोब‌र काही वेळ घाल‌वा व त्याब‌द‌ल्यात म‌ला एक ब‌र्ग‌र ख‌रेदी क‌रून द्या. अर्थात ही ऐकीव माहीती आहे. प‌ण असं होण्यासाठी ग्राह‌क हा भिकारी न‌स‌णं हे आव‌श्य‌क आहे. ख्यात‌नाम फुर्रोगामी बिल माहर यांनी याचा जिक्र केला होता. तो व्हिडिओ शोधावा लागेल्. युट्युब व‌र्.

----

म‌ला इत‌क‌ंच म्ह‌णाय‌चंय की दोन्ही गोष्टींची तुल‌ना अयोग्य‌ आहे.

आरेसेस वाद्यांचा हा फार पुराणा दावा अस‌तो की भार‌तात‌ली कोण‌तीही गोष्ट अतुल‌नीय अस‌ते. भार‌ताची कोण‌त्याही देशाशी तुल‌ना क‌राय‌ची नाही म्ह‌णे.

का ? त‌र म्ह‌णे आम‌चं क‌ल्च‌र्.... य‌ंव अन त्य‌ंव. आण‌खी उदाह‌र‌ण द्याय‌चं झालं त‌र मुर‌लीम‌नोह‌र जोशी जेव्हा रिटेल सेक्ट‌र म‌धील थेट प‌र‌कीय गुंत‌व‌णूकी च्या विरोधात् बोलाय‌चे तेव्हा त्यांची स‌ंस‌दीय भाष‌णे काढून प‌हा.

म‌ला नेम‌कं काय म्ह‌णाय‌चं होतं ते मी मूळ प्र‌तिसादात उप‌रोधाने मांड‌लेले अस‌ल्यामुळे ते स्प‌ष्ट झालेले न‌व्ह‌ते. तेव्हा स्प‌ष्ट‌ सांग‌तो - मॅक्डॉन‌ल्ड म‌धे ग्राह‌क स्वेच्छेने भांडी/ट्रे उच‌ल‌ण्याचे काम क‌र‌तात. व भार‌तात स‌ंघाच्या प्रेर‌णेने विद्यार्थी स्वेच्छेने ग्र‌ंथाल‌य बांध‌ण्यासाठी श्र‌म‌दान क‌र‌तात. प‌ण् मॅक्डॉन‌ल्ड ने लेब‌र कॉस्ट‌स क‌मी ठेव‌ल्या त‌र ते अयोग्य व स‌ंघाने लेब‌र कॉस्ट्स क‌मी केल्या त‌र ते योग्य ?

का ब‌रं ? त‌र त्यामाग‌चं स‌ंघाचं एक्स‌प्लेनेश‌न एक‌च - लाय‌ब्र‌री बांधल्यावर चे बेनिफिट्स अख्या खेड्याला मिळाले अस‌ते व मॅक्डॉन‌ल्ड च्या केस म‌धे ते बेनिफिट्स मॅक्डॉन‌ल्ड सार‌ख्या प्राय‌व्हेट क‌ंप‌नी ला मिळाले म्ह‌णून. ही अस‌ली क‌र‌प्ट विचार‌स‌र‌णी स‌ंघाची. तिचा उग‌म त्या भ्र‌ष्ट एकात्मिक मान‌व‌तावादात.

---
.
.
शेत‌म‌जूरांची लेब‌र कॉस्ट वाच‌व‌ण्यासाठी बैल विक‌त घेणाऱ्या शेत‌क‌ऱ्यांब‌द्द‌ल आरेसेस चं काय म‌त आहे ? बैल विक‌त घेण्याची कॅपिट‌ल कॉस्ट वाच‌व‌ण्यासाठी गाय पाळून तिच्याक‌र‌वी बैल निर्मीती क‌र‌णाऱ्या शेत‌क‌ऱ्यांब‌द्द‌ल आरेसेस चं काय म‌त आहे ? दुष्काळामुळे पाणी प‌र‌व‌ड्त नाही म्ह‌णून आप‌ली ज‌नाव‌रे सोडून देणाऱ्या म‌राठ‌वाड्यात‌ल्या शेत‌क‌ऱ्यांब‌द्द‌ल आरेसेस चं काय म‌त आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी स्व‌त: फार संघ‌वादी नाही. मी आयुष्यात एक‌दाही शाखेत गेलेलो नाही.

आरेसेस वाद्यांचा हा फार पुराणा दावा अस‌तो की भार‌तात‌ली कोण‌तीही गोष्ट अतुल‌नीय अस‌ते.

आप‌ल्या देशाच्या उगीच अती प्रेमात प‌ड‌णाऱ्या प्राण्यांपैकी मी नाही. हा मुद्दा तुम्ही उगीच इक‌डे उक‌रुन काढ‌लाय. उगीच 'सेल्फ स‌र्व्हिस'च्या नावाखाली लेब‌र कॉस्ट वाच‌व‌णे, आणि त‌रीही अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे ह्याव‌र आक्षेप आहे.

मॅक्डॉन‌ल्ड म‌धे ग्राह‌क स्वेच्छेने भांडी/ट्रे उच‌ल‌ण्याचे काम क‌र‌तात

हे तुम्ही आधीच गृहीत ध‌र‌ताय. खाय‌चं असेल, त‌र भांडी/ट्रे उच‌लाय‌ला प‌र्याय न‌स‌तो हेच मी मांडाय‌चा प्र‌य‌त्न क‌र‌तोय.

असो. तुम‌च्या लेटेस्ट प्र‌तिसादाव‌रुन तुम्हाला काय म्ह‌णाय‌चंय ते म‌ला क‌ळ‌लं, आणि मी त्याच्याशी स‌ह‌म‌त आहे. वादाला पूर्णविराम देण्यास ह‌र‌क‌त न‌सावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

हा मुद्दा तुम्ही उगीच इक‌डे उक‌रुन काढ‌लाय.

स‌ह‌म‌त आहे.
मॅक्डॉन‌ल्ड व‌र टीका क‌र‌ण्यामागे आरेसेस ची म‌ल्टिनॅश‌न‌ल क‌ंप‌न्यांविरुद्ध‌ आक‌स‌युक्त् भूमिका सुद्धा होती अशी माझी श‌ंका आहे.
श‌ंका का आहे ? याला रोख‌ठोक डेटा अस‌लेले उत्त‌र माझ्याक‌डे आत्ता उप‌ल‌ब्ध् नाही. प‌ण आरेसेस ला म‌ल्टिनॅश‌न‌ल क‌ंप‌न्यांब‌द्द‌ल जास्त आक‌स आहे असं माझं म‌त आहे.

व म्ह‌णून मुद्दा उक‌रून काढ‌ला.

----------

उगीच 'सेल्फ स‌र्व्हिस'च्या नावाखाली लेब‌र कॉस्ट वाच‌व‌णे, आणि त‌रीही अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे ह्याव‌र आक्षेप आहे.

तुम्हाला ह‌वं त‌र पूर्ण‌विराम क‌रू. प‌ण हा आक्षेप अत‌र्क्य आहे. तुम्ही विचार क‌र‌ताना क‌ंजुषप‌णा क‌र‌त आहात्.

(१) लोकांनी मॅक्डॉन‌ल्ड म‌धे (अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे) याच कार‌णासाठी मॅक्डॉन‌ल्ड जाय‌चंच नाही असं ठ‌र‌व‌लं त‌र मॅक्डॉन‌ल्ड झ‌क मार‌त ब‌र्ग‌र च्या किंंमती क‌मी क‌रेल. नैका ?
(२) मॅक्डॉन‌ल्ड च्या किंम‌ती "अव्वाच्यास‌व्वा" अस‌तील त‌र ब‌र्ग‌र ब‌न‌व‌णाऱ्या दुस‌ऱ्या छोट्या दुकानांना मॅक्डॉन‌ल्ड शी स्प‌र्धा क‌र‌णे स‌ह‌ज प‌र‌व‌डेल. नैका ? प‌र‌व‌ड‌णार न‌सेल त‌र तुम‌च्या म‌ते का प‌र‌व‌ड‌णार नाही ? छोट्या दुकानांना स‌ह‌ज श‌क्य आहे मॅक्डॉन‌ल्ड पेक्षा क‌मी किंम‌तीत ब‌र्ग‌र ब‌न‌वून विकाय‌ला !! स‌ह‌ज श‌क्य का नाही ??

या प्र‌श्नांची उत्त‌रे दिल्याशिवाय निष्क‌र्ष काढू न‌का. कार‌ण तो स‌ब‍ऑप्टिम‌ल असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकांनी मॅक्डॉन‌ल्ड म‌धे (अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे) याच कार‌णासाठी मॅक्डॉन‌ल्ड जाय‌चंच नाही असं ठ‌र‌व‌लं त‌र मॅक्डॉन‌ल्ड झ‌क मार‌त ब‌र्ग‌र च्या किंंमती क‌मी क‌रेल. नैका ?

ब‌रोब‌र.

मॅक्डॉन‌ल्ड च्या किंम‌ती "अव्वाच्यास‌व्वा" अस‌तील त‌र ब‌र्ग‌र ब‌न‌व‌णाऱ्या दुस‌ऱ्या छोट्या दुकानांना मॅक्डॉन‌ल्ड शी स्प‌र्धा क‌र‌णे स‌ह‌ज प‌र‌व‌डेल. नैका ? प‌र‌व‌ड‌णार न‌सेल त‌र तुम‌च्या म‌ते का प‌र‌व‌ड‌णार नाही ? छोट्या दुकानांना स‌ह‌ज श‌क्य आहे मॅक्डॉन‌ल्ड पेक्षा क‌मी किंम‌तीत ब‌र्ग‌र ब‌न‌वून विकाय‌ला !! स‌ह‌ज श‌क्य का नाही ??

इत‌र अनेक दुकाने ज‌ब‌र‌द‌स्त ब‌र्ग‌र ब‌न‌व‌तात. मॅक्डीचं भांड‌व‌ल, कुठेही शाखा काढाय‌ची अफाट ताक‌द ह्यापुढे भार‌तीय दुकानं क‌मी प‌ड‌तात.
आज‌काल मॅक्डॉन‌ल्ड म‌ध्ये युवाव‌र्ग‌च का जातो? एक म्ह‌ण‌जे, कित्तीही तास ब‌साय‌ची मुभा. काहीही न खाता (किंवा च‌रत च‌र‌तही) दिव‌स‌भ‌र तिथे प‌ड‌लेलं प‌ब्लिक मी पाहिलेलं आहे. त्यात प‌र‌त फुक‌ट, किंवा अत्य‌ल्प द‌रात‌लं वाय-फाय. पर‌त वातानुकुलित. मॅक्डॉन‌ल्डम‌ध‌ले द‌र, त्यांच्या क‌च्च्यामालाच्या दृष्टीने अव्वाच्यास‌व्वा आहेत, प‌ण ब‌क्क‌ळ पैसे खिशात अस‌लेल्या युवाव‌र्गाला त्याची चिंता नाही, न‌पेक्षा तेव्ह‌ढा विचार क‌राय‌चीही कुव‌त नाही. मॅक्डोनाल्ड्सपेक्षा अनेक‌प‌ट किंम‌त क‌मी ठेव‌णाऱ्या दुकानांना ह्या सुविधा प‌र‌व‌ड‌णाऱ्या नाहीत, त्यामुळे, स‌रास‌री दिड‌प‌ट-दुप्प‌ट किंम‌त आकार‌णाऱ्या मॅक्डोनाल्ड‌ला लोक प्राधान्य‌ देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

आज‌काल मॅक्डॉन‌ल्ड म‌ध्ये युवाव‌र्ग‌च का जातो? एक म्ह‌ण‌जे, कित्तीही तास ब‌साय‌ची मुभा. काहीही न खाता (किंवा च‌रत च‌र‌तही) दिव‌स‌भ‌र तिथे प‌ड‌लेलं प‌ब्लिक मी पाहिलेलं आहे. त्यात प‌र‌त फुक‌ट, किंवा अत्य‌ल्प द‌रात‌लं वाय-फाय. पर‌त वातानुकुलित. मॅक्डॉन‌ल्डम‌ध‌ले द‌र, त्यांच्या क‌च्च्यामालाच्या दृष्टीने अव्वाच्यास‌व्वा आहेत, प‌ण ब‌क्क‌ळ पैसे खिशात अस‌लेल्या युवाव‌र्गाला त्याची चिंता नाही, न‌पेक्षा तेव्ह‌ढा विचार क‌राय‌चीही कुव‌त नाही. मॅक्डोनाल्ड्सपेक्षा अनेक‌प‌ट किंम‌त क‌मी ठेव‌णाऱ्या दुकानांना ह्या सुविधा प‌र‌व‌ड‌णाऱ्या नाहीत, त्यामुळे, स‌रास‌री दिड‌प‌ट-दुप्प‌ट किंम‌त आकार‌णाऱ्या मॅक्डोनाल्ड‌ला लोक प्राधान्य‌ देतात.

(१) हे देशी दुकानं का ऑफ‌र क‌रू श‌कत नाहीत ?
(२) हे देशी उद्योज‌क का ऑफ‌र क‌र‌त नाहीत ? अंबानी क‌डे ब‌क्क‌ळ पैसा आहे की. अडाणी क‌डे त‌र स‌र‌कार‌द‌र‌बारी एक्स्ट्रा व‌ज‌न प‌ण आहे की. म‌ग ते का क‌र‌त नाहीत ?
(३) सेवाभावाने प्रेरित झालेला स‌ंघ आप‌ल्या ज‌ग‌प्र‌सिद्ध शिस्तीच्या जोराव‌र ह्याच्यापेक्षाही अचाट काहीत‌री क‌रू श‌क‌तो की. लातूर ला स‌ंघाच्या माण‌सांनी केलेलं अचाट काम आठ‌वा. म‌ग स‌ंघाच्या अज‌स्त्र स‌ंग‌ठ‌नाला / ज‌ग‌र‌नॉट ला ब‌र्ग‌र सार‌खी साधीसोपी व‌स्तू ब‌न‌वून वाज‌वी किंम‌तीत का विक‌ता येत नाही.

-

उत्त‌र हे आहे की कोण‌त्याही ब‌ळ‌ज‌ब‌रीविना युवाव‌र्ग तिथे जातो कार‌ण युवा व‌र्गाला तिथ‌ल्या अव्वाच्यास‌व्वा किंम‌ती पेक्षा इत‌र काहीत‌री जास्त व्हॅल्युएब‌ल वाट‌ते जे मॅक्डॉन‌ल्ड ऑफ‌र क‌र‌तो.

व ते नेम‌के काय हे स‌म‌जून घ्याय‌चे असेल त‌र अत्य‌ंत ग‌ह‌न विचार क‌रावा लागेल्. ते लोक अव्वाच्यास‌व्वा किंम‌ती लाव‌तात व आम‌चे नुक‌सान होते हा "मै आझाद हू" म‌धे दाख‌व‌लेलं आहे त‌सं "कौनो न्याय है का ?" टाईप (किंवा नेओमी क्लाईन स्टाईल) पांच‌ज‌न्य वाज‌व‌ण्यापेक्षा. आज अशी अनेक् उदाह‌र‌णं आहेत्. की अत्य‌ंत साध्यासोप्या व‌स्तूंम‌धे ब‌हुराष्ट्रीय क‌ंप‌न्यांनी प्र‌च‌ंड मुस‌ंडी मार‌लेली आहे. उदा. कॉफी म‌धे स्टार‌ब‌क्स, सोडा - कोकाकोला, पाणी - द‌सानी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगीच 'सेल्फ स‌र्व्हिस'च्या नावाखाली लेब‌र कॉस्ट वाच‌व‌णे, आणि त‌रीही अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे ह्याव‌र आक्षेप आहे.

हे मुद्दे मुळात‌च चुकीचे आहेत्. अव्वाच्या स‌व्वा पैसे माग‌णे हे गृहित‌क चुक आहे? तुम्हाला भार‌तात डॉमिनोचे पिझ्झा म‌हाग वाट‌त अस‌तील, प‌ण त्या कंप‌नीचा प्रॉफिट ब‌घित‌लात त‌र १०% सुद्धा मार्जीन नाहिये. म्ह‌ण‌जे आत्ता आहेत त्या पेक्ष्हा किम‌ती क‌मी केल्या त‌र कंप‌नी तोट्यात जाइल्.
उल‌ट‌ अश्या कंप‌न्यांमुळे काय‌देशीर रोज‌गार निर्माण‌ केला आहे व स‌र‌कार‌चे क‌र‌ उत्प‌न्न प‌ण वाढ‌ते आहे अश्या दृष्ह्टीकोनातुन ब‌घित‌ले पाहिजे.

ह्या उल‌ट र‌स्त्याव‌र‌च्या व‌डापाव‌ वाल्याच्य‌ प्रॉफिट मार्जीन ३०% त‌री अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फूड बिझ‌नेस‌म‌ध्ये प्रॉफिट १०% पेक्षा क‌मी अस‌णे हे प्र‌चंड अन‌रिअलिस्टिक वाट‌ते. ह्या आक‌डेवारीला आधार काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी १०% मार्जिन हे खुप जास्त सांगित‌ले आहे
डोमिनो वाल्यांचे मार्जिन २% प‌ण नाहिये. हे ब‌घ्.

http://www.moneycontrol.com/financials/jubilantfoodworks/results/quarter...
--------------------
माझ्या विधानांना विदा द्याय‌ची ग‌र‌ज‌ नस‌ते, पूर्ण अभ्यास आधीच अस‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या विधानांना विदा द्याय‌ची ग‌र‌ज‌ नस‌ते, पूर्ण अभ्यास आधीच अस‌तो.

ख‌रं म्ह‌ण‌तील कुणीत‌री.

बाकी डोमिनो वाले गंड‌लेत ख‌रेच‌. इत‌के पैशे घेतात त‌र मैद्याची लादी न खिल‌व‌ता ज‌रा ब‌रे पिझ्झे खिल‌वावेत‌. अजून ब‌राच प्रॉफिट होईल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग‌दी नेम‌के! थोड‌क्यात मांड‌ल्याब‌द्द‌ल अनेकानेक ध‌न्य‌वाद. शुचि, आप‌ण ज‌र क‌धी भेट‌लो त‌र ह्याबाब‌तीत एक‌दा फिस्टबम्प न‌क्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

म्याक डी ची डिलिव्हरी कधी वापरली नाही वाटत. प्लस कुपन कोड वापरून ज्यास्त बर्गर, ऱ्याप, बोटं ज्यास्तीची मिळतात. जास्तीच केचप पण मिळतं , नंतर डब्यात नेता येत सँडविच पराठे वगैरे सोबत
जायचंय जावा , आपण म्याक डोनाल्ड वाल्याना घरी येऊन डिलिव्हरी द्यायला लावतो.

------------------
लगाव बत्ती !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

विहीर खोदण्यात ते अहं सुखाव‌णं व‌गैरे सोडून म‌ला काहीच मोब‌द‌ला नाही,

"अहं सुखाव‌णं" ह्या पेक्षा मोठा मोब‌द‌ला काय पाहिजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला जेव्हा खाय‌ला ह‌वं अस‌त‌ं, आणि मी खाद्य‌प‌दार्थांसाठी पैसे दिल्यानंत‌र, माझी ही अपेक्षा अस‌ते, की वाज‌वीपेक्षा थोडे अधिक पैसे दिल्याव‌र आता म‌ला स‌र्व्हिसही छान मिळावी. संघाचं हे म्ह‌ण‌णं आहे की अग‌दी त‌स्सेच्या त‌स्से फ्रेंच फ्राइज, अग‌दी वेळ मोजून त‌ळ‌लेली, स‌ग‌ळीक‌डे स‌मान व्यासाची ब‌र्ग‌र पॅटी ह्या स‌र्व्हिसपेक्षा जागेव‌र खाद्य‌प‌दार्थ आणून देणं, पाणी इ. फुक‌ट पुर‌व‌णं ही स‌र्व्हिस त्यांनी द्यावी.

आम‌चं म्ह‌ण‌णं हे आहे की स‌ंघाचं म्ह‌ण‌णं चूक आहे.

आम‌चं म्ह‌ण‌णं हे आहे की तुम‌च्याक‌डे खालील ३ विक‌ल्प आहेत -

(१) तुम्हाला असं ज‌र वाट‌त असेल की तुम्ही वाज‌वीपेक्षा जास्त पैसे देऊन‌ही स‌र्व्हिस छान मिळ‌त नैय्ये त‌र तुमच्याक‌डे मॅक्डॉन‌ल्ड म‌धे न जाण्याचा विक‌ल्प आहे. म्ह‌ंजे तुम्ही तुम‌च्या घ‌री जेऊ श‌क‌ता.
(२) व‌डापाव‌च्या गाडीव‌र जाऊन खाय‌चा विक‌ल्प आहेच.
(३) आण‌खी एक विक‌ल्प आहे - मॅक्डॉन‌ल्ड सार‌खाच‌ माल व तेव‌ढीच विक्रीकिंम‌त लावून मॅक्डॉन‌ल्ड पेक्षा खूप छान सेवा देणारी क‌ंप‌नी काढ‌ण्याचा सुद्धा विक‌ल्प तुम‌च्याक‌डे आहे.

व हे तिन‌ही विक‌ल्प मॅक्डॉन‌ल्ड ला थेट् शिक्षा क‌र‌णारे आहेत्.
शिक्षा क‌शाब‌द्द‌ल ?? त‌र - वाज‌वी पेक्षा जास्त किंम‌त चार्ज क‌रून‌ही ... तुम‌च्या अपेक्षेनुसार स‌र्व्हिस छान न दिल्याब‌द्द‌ल.
शिक्षा क‌शी ?? त‌र मॅक्डॉन‌ल्ड चा रेव्हेन्यु बुड‌व‌लात तुम्ही. व न‌फा सुद्धा बुड‌व‌लात त्यांचा.

आम‌चं म्ह‌ण‌णं हे आहे की विक‌ल्पांची मांदियाळी म्ह‌ंजे स्वात‌ंत्र्य. आरेसेस ज्या साव‌र‌क‌रांबद्द‌ल स‌दा ह‌ळ‌वी अस‌ते त्या साव‌र‌क‌रांनी सांगित‌लेले आहे - "जे जे उत्त‌म‌, उदात्त, उन्न‌त म‌ह‌न्म‌धुर ते ते" = स्वात‌ंत्र्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आरेसेस ज्या साव‌र‌क‌रांबद्द‌ल स‌दा ह‌ळ‌वी अस‌ते

लोल. साव‌र‌क‌रांचा आणि स‌ंघाचा स‌ंब‌ंध‌ काय‌च नाय‌. साव‌र‌क‌र‌ त‌र‌ (भाक‌ड‌) गायी क‌सायाक‌डेच‌ धाडाव्या अस‌ं प‌ण‌ सांगाय‌चे. स‌ंघाच्या पाल‌थ्या घ‌ड्याव‌र‌ साव‌र‌क‌रांच‌ं पाणी टिक‌णार‌ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साव‌र‌क‌र‌ त‌र‌ (भाक‌ड‌) गायी क‌सायाक‌डेच‌ धाडाव्या अस‌ं प‌ण‌ सांगाय‌चे.

...त्या (कसायाकडे धाडलेल्या) भाकड गायींचे जर बर्गर बनवले, तर खाणारा वातड म्हणेल ना! त्याचे काय? कसायाकडे धाडायला चांगल्या धडधाकट, धष्टपुष्ट, तरण्याताठ्या जवान गायीच पाहिजेत. सावरकरांचे सांगायला काय जाते? ग्राहकाचा काही विचार नको?

बाकी, सावरकर बोलूनचालून मराठीच म्हणा! या असल्याच, ग्राहकाचा विचार न करण्याच्या मराठी वृत्तीमुळेच महाराष्ट्र व्यापारात मागे पडला. असो चालायचेच.
.....
बाकी, बर्गर हा चांगल्या गायींचा अपव्यय आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. त्यापेक्षा ष्टेक भाजावेत. पण असो, पसंद अपनी अपनी, आणखी काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी म‌ध्ये अभाविप‌ (स‌ह‌ज गंम‌त म्ह‌णून) ब‌रोब‌र ट्रेक ला गेलेलो. तिथे त्यांनी गोमांस‌बंदीब‌द्द‌ल विचार‌लं. मी म्ह‌ट‌लं, साव‌र‌क‌रांनी म्ह‌ट‌लेलं की गाय उप‌युक्त प‌शू आहे. कोणा पेप‌र‌मिंट‌वाल्यांना त्यांनी (गायीच्या म‌ण‌क्यापासून ब‌न‌व‌लेलं) जिलेटिन वापराय‌ला प्रोत्साह‌न दिलेलं, त्याबाब‌त बोल‌लो. बाकी काही नाही,
तो ट्रेक प‌हिला आणि शेवट‌चाच ठ‌र‌ला. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

१. मॅक्डॉनल्ड्स हे 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते' या कॅटेगरीत मोडू शकते हा मतभेदाचा मुद्दा असू शकतो. (आय बेग टू डिफर.)

२.

(३) आण‌खी एक विक‌ल्प आहे - मॅक्डॉन‌ल्ड सार‌खाच‌ माल व तेव‌ढीच विक्रीकिंम‌त लावून मॅक्डॉन‌ल्ड पेक्षा खूप छान सेवा देणारी क‌ंप‌नी काढ‌ण्याचा सुद्धा विक‌ल्प तुम‌च्याक‌डे आहे.

ज्या दिवशी या भारतवर्षात/(हिंदूंच्या) हिंदुस्थानात/तुम्ही-त्याला-जे-काही-म्हणत-असाल-त्यात आरेसेस ('राष्ट्रकार्य' म्हणून) बर्गरचे (आणि त्यातही प्रेफरेबली हम्माच्या) दुकान थाटेल, त्या दिवशी 'आता आयुष्यात आणखी काही पाहायचे उरले नाही' म्हणून डोळे मिटायला मी मोकळा होईन. (त्यांचे बर्गर हे मॅक्डॉनल्ड्सइतकेच - किंबहुना त्याहूनही - भिकार असतील, याची खात्री आहे, परंतु तरीही इट वुड बी अ वेल्कम चेंज.)

('शुभस्य शीघ्रम्' म्हणून प्रकल्पाचा नारळ वाराणसीत फोडला जावा, की मथुरेत, की अयोध्येत? 'हम बर्गर वहीं बनाएंगे...')

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बार्गेनिंग पॉव‌र

कुठुन‌ येते काय ग‌ब्ब‌र्? बार्गेनिंग‌ पॉव‌र मोनोपॉलीतुन येते. झ‌क‌ मार‌त‌ जाव‌ं लाग‌त‌ं.
तुम्ही त‌र अग‌दी खुल्या अर्थ‌व्य‌व‌स्थेचे पाइक‌ ना, तुम्हीच‌ म्ह‌ण‌ता ना, जित‌के विक‌ल्प‌ जास्त तित‌के उत्त‌म‌. म‌ग‌ हे स‌त्य‌ नाही का की विक‌ल्प नाही = एका व्यापाऱ्याचा (व्हेन्ड‌र्) माज!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठुन‌ येते काय ग‌ब्ब‌र्? बार्गेनिंग‌ पॉव‌र मोनोपॉलीतुन येते. झ‌क‌ मार‌त‌ जाव‌ं लाग‌त‌ं. तुम्ही त‌र अग‌दी खुल्या अर्थ‌व्य‌व‌स्थेचे पाइक‌ ना, तुम्हीच‌ म्ह‌ण‌ता ना, जित‌के विक‌ल्प‌ जास्त तित‌के उत्त‌म‌. म‌ग‌ हे स‌त्य‌ नाही का की विक‌ल्प नाही = एका व्यापाऱ्याचा (व्हेन्ड‌र्) माज!!!

मॅक्डी हे खुल्या अर्थ‌व्य‌व‌स्थेचे स‌र्वोत्त‌म उदाह‌र‌ण आहे.
(१) कोणालाही मॅक्डी म‌धे खाय‌ला जाय‌चे ब‌ंध‌न नाही.
(२) ज्यांना जाय‌चे आहे त्यांना प्र‌तिब‌ंध नाही.
(३) ज्यांना नाही जाय‌चे त्यांना स्व‌त्:चे ब‌र्ग‌र चे दुकान खोलाय‌चे असेल त‌र प्र‌तिब‌ंध नाही.

------

मॅक्डी ची बार्गेनिंग पॉव‌र ही अनेक गोष्टींचे कॉम्बिनेश‌न क‌र‌ण्यातून येते. व हे शिकाय‌चे असेल त‌र ऐसी व‌र शिकता येणार नाही. बिझ‌नेस इकॉनॉमिक्स चे क्लासेस घ्यावे लाग‌तील्. व ते क‌रून‌ही पुरेसे स‌म‌जेल याची ग्यार‌ंटी नाही.

-----

बार्गेनिंग‌ पॉव‌र मोनोपॉलीतुन येते. झ‌क‌ मार‌त‌ जाव‌ं लाग‌त‌ं.

ऑ ?

कोणी ज‌ब‌र‌द‌स्ती केलिये ?

मॅक्ड ची मोनोपोली त‌र अजिबात नाही. ब‌र्ग‌र किंग आहे, कार्ल ज्यु आहे. इत‌र रेस्त‌रॉ आहेत‌च की जिथे ब‌र्ग‌र मिळू श‌क‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मॅक्डी हे खुल्या अर्थ‌व्य‌व‌स्थेचे स‌र्वोत्त‌म उदाह‌र‌ण आहे.<<

>>(१) कोणालाही मॅक्डी म‌धे खाय‌ला जाय‌चे ब‌ंध‌न नाही.<<

मॅक‌डीम‌ध्ये फ‌क्त फ‌ड‌तूस‌ माण‌सं जातात. तिथे त्यांना स्व‌स्तात खाद्य मिळ‌त‌ं. ह्या निमित्तानं आज ग‌ब्बू फ‌ड‌तुसांसाठीच्या स्व‌स्त‌ अन्न‌पूर्णा टैप‌ हाटिलाची स्तुती क‌र‌तोय हे अद्याप कुणाच्या ल‌क्षात आलं नाही की काय? Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मॅक‌डीम‌ध्ये फ‌क्त फ‌ड‌तूस‌ माण‌सं जातात. तिथे त्यांना स्व‌स्तात खाद्य मिळ‌त‌ं. ह्या निमित्तानं आज ग‌ब्बू फ‌ड‌तुसांसाठीच्या स्व‌स्त‌ अन्न‌पूर्णा टैप‌ हाटिलाची स्तुती क‌र‌तोय हे अद्याप कुणाच्या ल‌क्षात आलं नाही की काय?

स्तुती ?

सुल‌भ (paid) शौचाल‌ये प‌ण खुल्या अर्थ‌व्य‌व‌स्थेची उदाह‌र‌णे आहेत. म्ह‌णून काय सुल‌भ शौचाल‌यांची स्तुती क‌रावी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुल‌भ शौचाल‌याची स्तुती त‌र केलीच पाहिजे. १२ जानेवारी रोजी पानिप‌तास गेलो अस‌ताना पोटाचे एक‌द‌म पानिप‌त झाले होते. तेव्हा सुल‌भ शौचाल‌य‌ न‌स‌ते त‌र‌ अव‌घ‌ड झाले अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मॅक्डॉन‌ल्ड‌च्या सेल्फ‌ स‌र्व्हिस‌ब‌द्द‌ल‌ आक्षेप‌ अस‌लेल्या लोकांनी ऑन‌लैन‌ इन्क‌म‌ टॅक्स‌ रिट‌र्न‌ भ‌रू न‌येत‌. डिपार‌मेण‌ तुम‌च्याक‌डून‌ डेटा एंट्री क‌र‌वून‌ घेत‌ आहे. साव‌ध‌ ऐका पुढ‌ल्या हाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>मॅक्डॉन‌ल्ड‌च्या सेल्फ‌ स‌र्व्हिस‌ब‌द्द‌ल‌ आक्षेप‌ अस‌लेल्या लोकांनी ऑन‌लैन‌ इन्क‌म‌ टॅक्स‌ रिट‌र्न‌ भ‌रू न‌येत‌. डिपार‌मेण‌ तुम‌च्याक‌डून‌ डेटा एंट्री क‌र‌वून‌ घेत‌ आहे.<<

मी फ‌ड‌तूस न‌स‌लेला भार‌तीय‌ अस‌ल्यामुळे मी ह्या कामांसाठी पैसे मोजून लोकांना राब‌व‌तो. Smile
(अमेरिक‌न मित्रांना हे अस‌लं स‌ग‌ळं क‌र‌ताना पाहिलेलं तेव्हाच मी त्यांना ह्या सेल्फ‍स‌र्व्हिस‌विष‌यी चिड‌व‌लं होतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पाहिलेलं ?? जंतू , यु टू ? काय हे भाषेचं बनवलंत , प्रसादामृतअग्रजेची छडी खाणार तुम्ही आता नक्की

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'पाहिलेलं'मध्ये नक्की काय चुकीचं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती मुंब‌ईची म‌राठी आहे. पुण्याच्या प्र‌माण‌ म‌राठीत‌ तेच‌ वाक्य "पाहिल‌ं होत‌ं" असा प्र‌योग‌ क‌रून होईल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

द‌क्षिण म‌हाराष्ट्रीय बोलीत‌ही पाहिलेलं असंच रूप होतं. इन‌फॅक्ट जुन्या पिढीतील लोकांच्या तोंडीही अशी रूपे ऐक‌लेली आहेत‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि या विषयावरचा एक लेख इथे शेअर केला होता जंतु यांनी . त्याविषयी हा फ्रेंडली banter होता हा खुलासा मिहीर यांच्या करता ( हो उगा कोल्हापूर पुणे भाषिक वाद नको )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वयाची पहिली वीस वर्षे मुंबईत पायही न ठेवता गेलेलो, आलेलो, पाहिलेलं, सांगितलेलं अशी रूपं लहानपणापासून ऐकली आणि वापरली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+111111111111111111111111111

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोंकणात: क्येलंन् (शॉर्ट), क्येलंनीत् (लाँग) इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बनवलंत ---> बनवलं आहे. नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अहो मिहीर आणि बॅटमॅन , हे लिहिणे फक्त एका विशिष्ट लेखाबद्दल आहे जो जंतू यांच्या एका ( बहुधा)परिचिताने लिहिला होता व श्री जंतू यांनी इथे शेअर केला होता . जंतूंनी त्या लेखाच्या संदेश ( !) / आशयाशी विसंगत अशा शब्दप्रयोग केला म्हणून त्यांना काढलेला चिमटा होता . यात बरोबर-चूक , योग्य -अयोग्य , प्रचलित - अप्रचलित , पुणेरी प्रमाण - अपुणेरी लोकभाषा वगैरे असला कुठलाही संदर्भ व हेतू नाहीये .
जंतू यांनी परत तो लेख जर शेअर केला तर संदर्भ लागू शकेल .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देहु गावाचे माजी सरपंच तुकाराम काळोखे सांगत होते. "देहु गावात वारी असेपर्यन्त गावातील लोक बाहेरगावीच रहात असत ''. "गावामधून वारी गेल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असे, आम्ही 15 दिवस गावात जात नसू, परंतु या वेळी वारी गेल्यानंतर सकाळी गावात पोहोचलो तर संपूर्ण गाव स्वच्छ होतं." "संघाचे 800 स्वयंसेवक अहोरात्र 3 दिवस 'निर्मल वारी अभियान' राबवत होते त्याचाच हा परिणाम होता." पुढे वारीच्या प्रत्येक मुक्कामात साधरण 500 स्वयंसेवक हे 'निर्मल वारी अभियान' राबवत आहेत. संघावाचून कोण स्विकारील काळाचे आव्हान ? या वेळची आषाढ़ी वारी निर्मल वारी म्हणून साजरी करायची असे संघाने ठरवले . आणि काय अाश्चर्य हजारो स्वयंसेवकांची फौज तयार झाली . दिंड्या मुक्कामाच्या गावातून पुढे गेल्या की मागे उरायचे ते शौचाचे व घाणीचे साम्राज्य पण माऊलींवरील श्रद्धेपोटी व हिंदू धर्मावरील प्रेमापोटी वारी रस्त्यावरील सर्व गावे ही घाण मुकाट्याने सहन करीत . पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गावांची होणारी ही अडचण ओळखली आणि निर्मल वारीचे नियोजन सुरू झाले. अडचणींचे डोंगर उभे राहिले पण हार मानील तो स्वयंसेवक कसला ? दिंड्यांबरोबर निघाले हे स्वच्छतेचे वारकरी फिरती शौचालये घेऊन . ज्या गावात दिंडीचा मुक्काम त्या गावात अगोदरच ही शौचालये तयार . परिणाम वारी आता निर्मल झालीय . संघाच्या निरपेक्ष वृत्तीने काम करणार्या स्वयंसेवकांना आशिर्वाद देत दिंड्या पुढे सरकताहेत अशक्य ते शक्य करतो तोच स्वयंसेवक आणि त्याला असा कणखर बनवतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची नियमित होणारी शाखा. कृपया हि पोस्ट शेअर करा.... कळू दे लोकांना संघाचे कार्य

.
.
ही पोस्ट आलेली आहे व्हॉट्सॅप्प व‌र.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0