संवाद.
"ट्रेन?"
"ट्रेन? are you kidding me?"
"का?"
"इसवी सन किती साली तुम्ही मुंबैत ट्रेनने प्रवास केला होता? २०००? १९८०? की त्याही आधी?"
"बरीच वर्षं झाली खरी, पण तरीही ट्रेन इतकी वाईट नाही."
"गरम पाण्यातला बेडूक झालाय भेंडी तुमचा लेको. हळूहळू तापमान आपलं वाढतंय, आणि तुम्ही बसलाय आरामात सहन करत. अरे जी काही गर्दी आहे ती कसली भयानक आहे - and I'm sure you realise that deep within."
"हो, म्हणजे ट्रेनमधून लटकणं धोकादायक आहे हे खरंय-"
"तितकंच? लटकाल तर लटकाल हे सर्वद्न्यात आहे स्वामीजी. पण ट्रेनच्या प्रवासात समजा तुम्ही दरवाजाला न लटकता आत शिरलात तरी तुमचा शत्रू "घाम" हा असणारे.
.
आता तुमच्या गालावरून घाम ओघळेल. केसांत चिकचिक होईल आणि ते खाजायला लागतील
मग जेव्हा तुमचं बनियान घामाने थबथबल्याची त्रासदायक जाणीव तुम्हाला होईल, तेव्हाच मागून बेफिकीर आवाजात पृच्छा होईल - "अंधेरी?"
.
हीच संधी साधून तुम्ही त्यातल्या त्यात बरी जागा शोधायला सरकाल आणि मग धडपडणार्या गर्दीतून घामाचे नवनवे स्रोत तुमच्या आजूबाजूला पसरतील. त्यात परफ्यूममुळे उग्र झालेला घाम असेल, शिळ्या अन्नासारखा वाटणारा घाम, बरेच आठवडे आंघोळ न केलेल्या एखाद्याचा निर्ढावलेला घाम किंवा नुकतीच गरम पाण्याने आंघोळ करून आलेल्या इसमाचा व्हर्जिन घाम - असे कितीतरी घाम तुमच्यावर आक्रमण करतील.
आता तुमचा स्वत:चा घामच ह्यातून तुमची सुटका करू शकतो. जर तुम्ही प्रचंड घामट प्राणी असाल तर मग तुम्ही आतापावेतो आंघोळ केली असेल. आणि त्या थबथबलेल्या अवस्थेत तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा झाट फरक पडणार नाही."
"अरे पण- ते काही इतकं वाईट नाहीये"
"हेच ते. हेच ते टिपिकल मुंबईपण. मराठी सिरिअल्सच्या सुनांपेक्षा जास्त सोशिक तुम्ही मुंबैकर. अरे भोसडीच्यांनो कसे गुरासारखे प्रवास करता ते दाखवा एकदा तुमच्या नॉन-मुंबैकर मित्रमैत्रिणींना. फेफे होते लोकांची नुसतं असलं सगळं बघून. आणि मुंबैकर असली गर्दी असली तरी वर फुशारक्या मारतात "ये तो कुछ भी नही" म्हणून. काय च्युत्यागिरी आहे बे? ह्यात काय अभिमान आहे का? की म्हणे स्वत:ची गांड खाजवता येत नाही इतकी गर्दी तो कुछ भी नही. बाकीच्या वेळी काय एकमेकांच्यात घालून उभे असता काय-"
"हे फार होतंय. काहीही ऐकून नाही घेणार--"
"अरे जा बे. तुम्ही लोक साला कसल्या नरकात राहताय त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. खातेरं आहे खातेरं. 'बकाल' हा शब्द ऐकला की साला मुंबैच डोळ्यापुढे येते. काय घाण करून ठेवलीये शहराची बघितलंय ना? तुम्ही तिळातिळाने झिजत झिजत शेवटी गटार करून टाकणार मुंबैचं. आपापल्या घरांच्या ओअॅसिसमधे समृद्ध जीवन जगत, बिग बॉस बघत आणि रात्री एसीच्या लिमिटेड पण पूरक थंडाईत बायकोवर निवांतपणे हात टाकून झोपताना बाहेरच्या इंचाइंचाने वाढणाऱ्या घाणीकडे तुम्ही लोक डोळेझाक करता.
अरे हट भेंचोद."
"..... "
"आणखी ऐक लवडू. तुमची इच्छाशक्तीच ह्या सर्वव्यापी घाणीने इतकी नपुंसक केलीये, की रोजच्या रोज अॅमस्टरडॅम, टोरांटो, प्राग, ब्रिस्बेन इ.इ. चे फोटो रोज फेसबुकवर बघता, अव्याहत गळणाऱ्या सोशल मिडियातलं हे सगळं रोजच्या रोज डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला वाटत नाही की आपलं शहर असं ओंगळवाणं आणि गलिच्छ का? तिकडे टूर्सबरोबर जाऊन कौतुकं कराल आणि इथे- च्यायला. जाऊ देत. may be you don't deserve this. fuck you."
"एक छोटा अॅटम बॉंब फेकून अख्खं शहर बेचिराख केलं पायजेले- वगैरे डायलॉग्स मार तू आता."
"बोललात? पाजळलीत अक्कल? अबे- आता पुढे राजकारण्यांना शिव्या द्या, त्यांच्यामुळेच सगळं खड्ड्यात जातय वगैरे बोलून विषयाची लावून टाका."
"मग काय चूक आहे त्या-"
"बास. खूप शॉट दिलात. अरे गांडू- 'एल्फिन्स्टनचं प्रभादेवी झालंच पायजेले' सारख्या अडाणचोट मागण्या करणारे लोक तुम्ही. मैदानं, बागा, उत्तम बांधकाम, सुंदर रस्ते, देखण्या इमारती असलं काही तुमच्या दीडदमडीच्या मेंदूत घुसणारच नाही कधी. डोळे फोडून आणि नाकावर गॅसमास्क घालून राहिलं तरी ह्या शहराची मनावरची काळी छाया जाणार नाही कधी, समजलात? आणि मुंबै इतकी वाईट अवस्थेत आहे हेच न कळणाऱ्या तुमच्यासारख्यांशे नही बात करनी आपुन को.
जाव भेंडी."
ललित लेखनाचा प्रकार
लेखकसाहेब, पोट भरलं नाही
लेखकसाहेब, पोट भरलं नाही. अजून अशा खूप शिव्या द्या मुंबईला. किमान या लाईनवर विचार करणारे लोक आहेत हे पाहून बरं वाटतं. मुंबईत तीन वर्श्हे असताना अणुबॉंब टाकून अख्खं शहर कायमचं नश्ह्ट करावं असं दिवसातून ३-४ दा वाटे. मुंबईवरचा राग शेअर करायला कोणी मिळालं नाही. लेख वाचून आत्मा बराच थंड झाला. ललित म्हणून का होईना कोणि असा विचार करतं हे फार सुखावह आहे. वास्तविक मुंबई करांशी बोलताना शिश्ह्टाचाराच्या मर्यादा सांभाळून बोलावं लागतं म्हणून हे सगळं स्किप होतं, नैतर इथल्या श्रोतृपात्रासाठि माझ्याकडेपण चिकार डायलॉग्ज आहेत्.
====================
डिस्क्लेमर - माझं आणि मुंबैंचं तसं काही वाकडं नाही, सर्वे सुखीन्: भवन्तु मधे ते अपवाद नाहीत्. पण चीड येते साल्यांची.
खातेरे
https://msblc.maharashtra.gov.in/Sabdakosh/index.php/2016-09-28-08-43-51
(उद्धृत)
खातेरे
न.
खातर, खाचर. १. घाण, केरकचरा, खत इत्यादीची रास; गाळ; घाण. २. उकिरडा; केराची खाच. ३. (ल.) लाजिरवाणे, निरुपयोगी जगणे : ‘या खातेऱ्यातून सुटका होते ती एकापरीनं चांगली आहे.’ - रथ ८९.
ते पुलं म्हणत नाहीत का ओ,
ते पुलं म्हणत नाहीत का ओ, मुंबैला कुणी एक भिकार म्हटले तर आपण सात भिकार म्हणावे. तेवढाच म्हणणाऱ्यांचा कंडू शांत होतो आणि काहीतरी भव्यदिव्य केल्याचे समाधान वगैरे मिळते.
बाकी असली चीज काय आहे ते मुंबैकरांना नक्कीच माहितीये. बाकीचे लोक्स काही म्हणोत मग.
खरंय ते.
"विचित्र दिसत असले, तरी आपलेच आहेत ते" ~ बनवाबनवी आठवली.
२० वर्षं मुंबैतच राहिलोय मी - पण आता नाही बघवत. अर्थात २० वर्षांपूर्वी मुंबई फार चकाचक होती असं मुळीच नाहीये- पण तेव्हा आम्ही मुंबैकर असल्याकारणाने, एखादं शहर सुंदर कसं दिसतं हेच माहिती नव्हतं. तेव्हा "हाउ ग्रीन वॉज माय व्हॅली" प्रकार नाही. तर कूपमंडूकत्वामुळे मुंबई चांगलीच वाटली तेव्हा.
पण मग कामापरत्वे बरीच शहरं पाहिली आणि मुंबैतल्या बऱ्याच गोष्टी खुपू लागल्या. तेही ठीक.
गेल्या काही वर्षांत दोनदा अनुभवलेला प्रसंग आहे -
विमानतळावर उतरल्या उतरल्या विमानातून जेमतेम बाहेर आलो तोवर बाजूच्याने नाकावर रूमाल धरला. "कसली घाण येतेय?" म्हणून इंग्रजीतून विचारणा केली गेली.
किती लाजिरवाणा प्रसंग? अरे कुणी तरी माणूस पहिल्यांदा आपल्या शहरात येतोय त्याचं दुर्गंधाने स्वागत व्हावं?
तेव्हा मुख्य मुद्दा म्हणजे - हे शहर अधिकाधिक बकाल होऊ नये असं कुणालाच तीव्रतेने वाटू नये?
आणि मग डोक्यात जातो ते हे असले नामकरणाचे चाळे. गटारातच पाय द्यायचाय तर नाव शिवाजी काय आणि अफझलखान काय? कुणाला काय फरक पडतो?
======
तीव्र भावनांना चाट देऊन जर कुणी "झोपडपट्ट्यांच्या आक्रमणाचा" एखादा आलेख बनवून जिकडेतिकडे पाठवले पाहिजेत. १९८०त किती ठिकाणी झोपड्या होत्या. किती ठिकाणी पाणी तुंबायचं इ.इ. आणि आता २०१७ मधेसुद्धा मिलन सबवे आपला पाण्याखाली आहेच.
----
तिरशिंगराव म्हणतात तसं- स्वत: मुंबई केव्हाच सोडली, पण तरीही फर्स्ट लव म्हणून प्रचंड आवडतेच. असो. विषय मुंबईला शिव्या घालण्याचा नाही. सध्या तरी जी अवस्था आहे ती बघवत नाही.
अरुण कोलटकर यांची एक कविता
मै मॅनेजरको बोला मुझे पगार मंगता है
मॅनेजर बोला कंपनीके रुलसे पगार एक तारीखको मिलेगा
उसकी घडी टेबलपे पडी थी
मैने घडी उठाके लिया
और मॅनेजरको पुलिस चौकीका रास्ता दिखाया
बोला अगर कंप्लेंट करना है तो करलो
मेरे रुलसे पगार आजही होगा
मै भाभीको बोला
क्या भाईसाबके ड्युटीपे मै आ जाऊ?
भडक गयी साली
रहमान बोला गोली चलाऊंगा
मे बोला एक रंडीके वास्ते?
चलाव गोली गांडू
मै बर्मा गया उधर आग पिक्चर लगा था
पिक्चर देखने गया
उधर टिकटके वास्ते कुछ पासपोर्ट वगारा दिखाना पडता है
टिकटवालेने पूछा पासपोर्ट किधर है?
मै बोला भॅनचोद
मुझे टिकट मंगता है
उन लोगोने वापस मणिपूर भेज दिया
पुलीस कमिशनरने पूछा बर्मा कायको गया था?
मै बोला अबे लौंडीके बच्चे
इंडियामे रख्खा क्या है!
~अरुण कोलटकर
हां काय? ही बासीमर्ढेकरांची एक कविता.
पितात सारे गोड हिवाळा
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्या शांततेचा निशिगंध
या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा
.
मुंबै ला नाव ठेवण्याचा अधिकार फकस्त जन्माने मुंबईकर असलेल्यांनाच आहे.
ठीक. मी जन्माने मुंबईकर आहे. (जन्मस्थान: गिरगाव, पिनकोड ४०० ००४. बोले तो, प्रॉपर मुंबई. उपनगर नव्हे.)
स्वतःला उगाच शहाण्या समजणाऱ्या, पुणेकरांहूनही कूपमंडूक असणाऱ्या, बिनडोक नि झापडबंद (परंतु तरीही, मुंबईबाहेर पडल्यावर केवळ आपण मुंबईचे आहोत या भांडवलावर जेथे जातील तेथे (बहुतकरून अर्धवट माहितीवरून किंवा स्वतःच्या अचाट परंतु चुकीच्या कल्पनांवरून) (१) स्थानिकांना शहाणपण शिकविण्यास सरसावणाऱ्या, तथा (२) स्थानिकांशी विनाकारण हुज्जत घालू पाहाणाऱ्या) गुडफॉरनथिंग लोकांचे आत्यंतिक भिकारचोट असे शहर आहे ते.
काय म्हणणे आहे?
हा हा हा. छ.शि.ट चं छ.शि.म.ट
हा हा हा. छ.शि.ट चं छ.शि.म.ट करायची मागणी विसरलात का?