धुलिवंदन

७ तारखेला होळी झाली दुसरे दिवशी धुलिवंदन.
सहज विचार करता धुलिवंदन हा शब्द कसा आला असा प्रश्न पडला. जालावर शोध घेतला पण काही चांगली माहिती मिळाली नाही.
धुलिवंदन ह्या शब्दामागे काही लोककथा वगैरे आहे का?
सहज पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ना गवसल्याने धुलिवंदनाचा दिवस झाल्यावर हे आमचे वरातीमागून घोडे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मलाही उत्सुकता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या माहितीप्रपणे होळीपौर्णिमेचा पुढचा दिवस धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. आदल्या रात्री झालेल्या होळीची राख अंगाला लावणे अभिप्रेत असते. होळीच्या चरणधुळीचे हे वंदन ते धुलीवंदन, सध्याचा रंगानी खेळण्याचा साज धुलीवन्दानाला कधी आला हे माहित नाही, माझ्या लहानपणी मला रंगपंचमीला मनसोक्त रंग खेळल्याचे आठवत आहे, धुळीवंदनाला नाही. आज मात्र रंगपंचमी देखील धुलीवंदनाच्या वेळीच साजरी होऊ लागलेली दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---------------------------------
सूरज में लगे धब्बा, फितरत के करिश्मे है |
बुत हमको कहे काफिर, अल्लाह की मर्जी है ||
...आणि अस्मादिक

चार दिवस सासूचे मध्ये पण असंच सांगितले होत त्या दिवशीच्या इपिसोड मधे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझ्या लहानपणी मला रंगपंचमीला मनसोक्त रंग खेळल्याचे आठवत आहे, धुळीवंदनाला नाही. आज मात्र रंगपंचमी देखील धुलीवंदनाच्या वेळीच साजरी होऊ लागलेली दिसत आहे.

माझ्या कल्पनेप्रमाणे रंग खेळण्याच्या दिवसाचा फरक हा प्रादेशिक पारंपरिक फरक असावा.

रंगपंचमीला रंग खेळण्याची प्रथा ही महाराष्ट्राच्या काही भागांतील असावी. उत्तरेत माझ्या कल्पनेप्रमाणे सरसकट होळीच्याच दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. (संदर्भः 'शोले'मधील 'होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों मे रंग मिल जाते हैं' हे गीत, अधिक स्वल्प स्वानुभव.)

(शिवाय, महाराष्ट्रातसुद्धा रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा सार्वत्रिक नसावी. माझ्या महाविद्यालयीन दिवसांतील माझ्या तत्कालीन सहवसतिगृहनिवासी नागपूरकर आणि मुंबईकर मित्रांकडून जे ऐकले होते, त्याअनुसार महाराष्ट्राच्या त्यात्या भागांतसुद्धा होळीच्याच दिवशी रंग खेळण्याची प्रथा असल्याबदल कळते. ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदरितच हा सण गलिच्छ्पणामुळे मनाला कधीच भावला नाही.
(फक्त होळी पहाणारी ) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0