ही वेळ निराळी आहे

छातीत फुले फुलण्याची
वार्‍यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

डोळ्यात ऋतुंचे पाणी
मौनात मिसळले कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

तू वळून हसलीस जेव्हा
नक्षत्र निथळले तेव्हा
मन शहारून मिटण्याची
डोळ्यात चंद्र टिपण्याची . . .
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

ज्या चंद्र कवडशा खाली
कुणी साद घातली ओली
मग चंद्र वळून जाताना
किरणात जळून जाण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

पाऊस परतला जेव्हा
नभ नदीत हसले तेव्हा
कोरड्या मनाने कोणी
गावात परत येण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

थबकून थांबल्या गाई
की जशी शुभ्र पुण्याई
त्या जुन्याच विहिरीपाशी
आईस हाक देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

गावाच्या सीमेवरती
जगण्याच्या हाका येती
त्या कौलारु स्वप्नांना
आयुष्य दान देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

हे गाणे जेव्हा लिहिले
मी खूप मला आठवले
शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

गेलेले दिवस परत येत नाहीत, तसंच गेलेलं मनही पुन्हा मिळत नाही. त्या ऊर्मी, ते हेलावणं कुठे जातं कळत नाही. ते हलकंफुलकं मन गेलं, आणि आत्यापर्यंतच्या ओझ्यांनी झालेलं हे जडशीळ काहीतरी वागवत बसायचं, हे आणखीनच एक ओझं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीअक्षरे वर स्वागत.

कविता आवडली. आणखी अशाच वाचायला मिळतील अशी आशा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कविता आवडली.

अरूण म्हात्रे यांनीच लिहीलेलं 'उंच माझा झोका' या मालिकेचं शीर्षकगीत इथे आहे. (माहितीचा स्रोतः रामदास)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडली कविता. गोष्टी हातातून निसटतात हे फार सहजपणे व्यक्त केलं आहे तुमच्या शब्दांनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली. अजून येऊद्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

हे आठवले -

To everything there is a season,
a time for every purpose under the sun.
A time to be born and a time to die;
a time to plant and a time to pluck up that which is planted;
a time to kill and a time to heal ...
a time to weep and a time to laugh;
a time to mourn and a time to dance ...
a time to embrace and a time to refrain from embracing;
a time to lose and a time to seek;
a time to rend and a time to sew;
a time to keep silent and a time to speak;
a time to love and a time to hate;
a time for war and a time for peace.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला "वो शाम कुछ अजिब थी" आठवलं. ही कविता छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर संदर्भ दिला आहे..मस्त आहेत या ओळी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेदिनी..

वा छान आहे कविता
आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

लिरिकल-सहजसुंदर कविता ! वरील प्रतिसादांशी सहमत, आणखी कविता येथे वाचायला मिळाव्यात !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची....."
- मस्त !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहाहा!
आवडती अवतरणे वेगळी काढता येणार नाहीत.. सारी कविताच आवडली आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अप्रतिम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाणे म्हणूनही छान वाटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता वाचून तुम्ही एक प्रथितयश कवी आहात असे वाटते. नसाल तर नक्कीच व्हाल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कविता / गाणे अतिशय आवडले. शेवटी शब्दांना हाका नाहीत फक्त रितेपण आहे हे जाणवून खिन्न झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लय आहे कवितेला..पण उदासिनताही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेदिनी..

अरुणजी अप्रतिम कविता...!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले

अरे वा

सुंदर कविता आणि खयाल आहेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0