तीन पैशांचा तमाशा, माझ्या पिढीचं नाटक

Teen paishacha tamasha

(छायाचित्र स्रोत : चंद्रकांत काळे - फेसबुक)

एकोणीसशे सत्तरच्या दशकात मराठी नाटक व्यवसाय (व्यावसायिक आणि प्रायोगिक) उत्तम प्रकारे चालू असावा. एखाद्या भाषिक रंगभूमीवर असू शकते तितपत वैविध्य मराठी नाटकांमध्ये होतं. शिरवाडकर कानेटकर पुलं मतकरी तेंडुलकरअशा अनेक नाटककारांची बहुतांश शब्दप्रधान, आणि बाळ कोल्हटकरांची शब्दबंबाळ, थोड्या वेगळ्या विषयांवरची मतकरी, दळवी यांची नाटके प्रचलित होती. कधीमधी छोटा गंधर्वांचे सौभद्र वगैरे. एकंदरीत मराठी मध्यमवर्गाला रुचेल आवडेल आणि झेपेल इतपत नाटकांची चालती होती. (आधी पीडीए व नंतर) थिएटर अकॅडेमीने प्रायोगिक ते व्यावसायिक अशी एक वाट घाशीराम, महानिर्वाण वगैरे नाटकांमधून चोखाळली होती.

नाटकांच्या विषयात विविधता असली तरी सादरीकरण पारंपरिक होते. अगदी (तथाकथित ) प्रक्षोभक घाशीराम आणि महानिर्वाण मध्ये ब्लॅक कॉमेडीचा वापर/उपयोग केला असेल तरीही त्यातील सादरीकरणाची चौकट पारंपरिकच होती.

या पार्श्वभूमीवर पुलंनी लिहिलेलं आणि थिएटर अकॅडेमीनी सादर केलेलं 'तीन पैशांचा तमाशा ', त्यातील सादरीकरणातील संपूर्ण वेगळेपणामुळे उठून दिसतं.

पारंपरिक दृकश्राव्य माध्यमांशी ओळख आहे, प्रेम आहे पण कढ नाही आणि नवीन दृकश्राव्य माध्यमं झेपू शकतील अश्या एकोणीसशे सत्तर-ऐंशीमध्ये कॉलेजात असलेल्या वर्गात हे नाटक कमालीचे लोकप्रिय झाले. नटसम्राट छाप नाटके झेपत आहेत पण बाळ कोल्हटकर शब्दबंबाळ नाटकांतील रिकामेपणा जाणवत आहे अशा पिढीला हे नाटक लै म्हणजे लैच आवडले. (हिंदी चित्रपटात ऐकलेल्या गिटार ड्रम्स अशा वाद्यांचा नाटकात लाईव्ह वापर हे या पिढीला विस्मयकारक होते आणि आवडून गेलेले होते. पाश्चात्य सुरावटी, रॉक सदृश गायनशैली याचा नाटकात वापर ब्लासफेमस न वाटणे हे नवे नॉर्मल झाले होते)

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी (२४ जून १९७८) या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता

जंतूंच्या मते ब्रॉडवे थिएटरवरील म्युझिकल्सशी खरोखरीचे आणि थेट नाते सांगणारे मराठीतील पहिले आणि बहुधा एकमेव मराठी नाटक. मराठीत संगीत नाटके बहू झाली असली तरी त्याची जातकुळी वेगळी आणि याची जातकुळी वेगळी.

जर्मन नाटककार ब्रेख्तच्या च्या थ्री पेनी ऑपेराचे हे मराठी रूपांतर. पुलंनी हे का केले याचे मला फार कुतुहूल आहे

नाटकाची कथा आणि लिखाण यात काही विशेष नाही. एकंदरीत पुलंना उमजलेली तत्कालीन मुंबईची अंडरबेली हा बॅकड्रॉप. अंकुश नागावकर नावाचा डॉन हे मध्यवर्ती पात्र. त्याची लफडी, त्याची दहशत, त्याचा पोलिसांमधीलही वट, त्याची करुण पार्श्वभूमी वगैरे. माजी संगीत नाटकातील नट असलेले आणि सध्या समस्त मुंबई भिकारी युनियन चालवून स्वतःचा एक विशिष्ट वट निर्माण करणारे पंचपात्रे. या पंचपात्र्यांच्या मुलीला अंकुश पटवून लग्न लावतो आणि मग पंचपात्रे त्याला पकडून देऊन कायद्याच्या हातात वगैरे इतपत. अंकुश तुरुंगात गेल्यावर त्याची तत्कालीन बायको डॉनगिरी सोडून गॅंगसकट सहकारी बँक स्थापून पब्लिकला लुटणे चालू ठेवणे अशी साइड कथानके. (हा सहकार चळवळीचा उपहास अत्यंत स्टेल वाटतो)
(अवांतर : पुलंचं मुंबई अंडरबेली आकलन जरा मर्यादित असावं. मुंबईत टेरर फैलावणारा अंकुशचे वेपन ऑफ चॉईस रामपुरी... वगैरे असा गंडलेला मामला. असो. )

मूळ कथानक संगीतामधून पुढे जातं. वैविध्यपूर्ण आणि उत्तम संगीत असल्याने हे नाटक अतिशय एन्जॉयबल ठरे. नाटकात पाश्चात्य संगीताचा भरपूर वापर असला तरीही पाश्चात्य ते गजल ते कव्वाली ते लोकसंगीत असे बदल सहजतेने आणि कानाला कुठेही न खुपता घडत असत. तमाशाचा मुक्त फॉर्म ठेवल्याने हे काहीही खुपत नसे.
It used to be an audacious intimidating high calibre musical assault of sorts.

सादरीकरण करताना मूळ फॉर्म हा तमाशाचाच वापरला आहे.नाटक पठ्ठे बापूरावांच्या गणाने चालू होते, व मग गवळण छोटीशी गजल. मग बतावणीमध्ये पारंपरिक तमाशाप्रमाणे कथेचा बॅकड्रॉप सांगून एकदम धक्क्याला सुरुवात होते. तीन गिटार, फुल ड्रमसेट च्या साथीने तीन गायक या तमाशाची कहाणी सांगू लागतात. सुरावट पाश्चात्य. आधी गवळण गाणारी गायिका, गण आणि गजल म्हणणारे गायक एकदम पाश्चात्य सुरावटीवर रॉक सदृश गाऊ लागतात. आणि कहाणी पुढे जाऊ लागते.

गायिका आहे माधुरी पुरंदरे. पुरंदरेंच्या इतर कार्यक्षेत्रातील कर्तृत्वामुळे (फ्रेंच, बालसाहित्य, लिहावे नेटके वगैरे ) त्यांचे गाणे आणि अभिनय अल्प चर्चित राहिला आहे. त्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या असाव्यात आणि या नाटकात अभिनयाखेरीज त्यांचे गवळण, गजल, कव्वाली आणि पाश्चात्य सुरावटीवर आधारित गायन अत्यंत उच्च दर्जाचे आहे.

गायक आहेत रवींद्र साठे आणि अन्वर कुरेशी. उत्तम खर्जातील आवाज असलेले रवींद्र साठे घाशीराम, मराठी चित्रपटसंगीत आणि टीव्हीवरील कार्यक्रमामुळे सुपरिचित आहेतच. पण अन्वर कुरेशी हे तेव्हा फारसे प्रसिद्धी नसलेले (आणि सध्या फक्त काही तुरळक गजल कार्यक्रम करणारे) मूळचे शास्त्रीय आणि गजलगायक आणि व्हायोलिनवादक. (अलका टॉकीज चौक, अरुण म्युझिक क्लास, पुलं, वसंतराव वगैरे बरंच लिहिलं गेलं आहे त्यांच्या घराबद्दल, जास्त लिहीत नाही) पण या तमाशात ते वरच्या पट्टीत आणि फ़ाल्सेटोमध्ये पाश्चात्य सुरावटीवर जे काही गातात ते जबरदस्त धक्कादायक आहे साठे आणि कुरेशींच्या गायनातून कथानक पुढे सरकत जातं.

जनूमामा पंचपात्रेची भूमिका चंद्रकांत काळेंनी केली आहे. पंचपात्रे माजी मराठी संगीत नाटकातले नट आणि सद्यस्थितीत मुंबईतील भिकारी युनियन चालवणारे प्रस्थ. चंद्रकांत काळेंना नाट्यसंगीत पद्धतीचे भरपूर गायन करण्यास स्कोप. काळेंनी गाताना हयगय न करता मस्त हात धुवून घेतला आहे.

नाटकाचा हिरो आहे अंकुश नागावकर.. नंदू भेंडे हा मुंबई रॉक सर्कल्स मध्ये लोकप्रिय कलाकार, त्याकाळी तो अलेक पदमसीच्या जिझस ख्राईस्ट सुपरस्टार या म्युझिकल मध्ये काम पण करे. रॉक गाण्याकरता सुयोग्य आवाज असलेला नंदू भेंडेचा (त्याचे वडील आत्माराम भेंडे जरी रंगकर्मी असले तरीही) मराठी रंगभूमीशी अजिबात संबंध नव्हता. त्याचा वावर मुंबई रॉक सर्कल्स मध्ये जास्त. त्याला कुणी हे करायला पटवला वगैरेंच्या महित्या कुणीतरी काढायला पाहिजेत. नंदूचे गाणे हे या नाटकातील स्टार अट्रॅक्शन. त्याविषयी जास्त लिहीत नाही. ते अनुभवणे जास्त योग्य.

याला संगीत दिले आहे तीन संगीतकारांनी. चंदावरकर, आनंद मोडक आणि नंदू भेंडे.

सुमार संहिता असूनही नाटक त्याच्या सादरीकरणामुळे आणि संगीतामुळे एक वेगळा हाय देत असे. एकतर मराठी स्टेजवर पारंपरिक वाद्यांबरोबरच गिटार्स ड्रमसेटच्या साथीने गायलेले विविध गायनप्रकार एकापाठोपाठ सुखद धक्के देत असत. एकाच नाटकात गण, गवळण, नाट्यसंगीत, गजल, कव्वाली, कोकणी /आगरी, लोकसंगीत, आणि रॉक व इतर विविध संगीत प्रकार या ताकदीने सादर केलेले निदान मराठीत तरी दुसरे उदाहरण नाही.

त्या काळात याचे संगीत सादरीकरणात तांत्रिक अडचणीही भरपूर असणार. थिएटर अकॅडेमीचे कलावंत आणि या नाटकाचा साउंड हाताळणारे कै नंदू पोळ यांनी याविषयक रोचक माहिती त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवली आहे.

इंग्रजी आणि मराठी समीक्षकांनी यात पोलीस आणि प्रस्थापित व्यवस्था यांचं साटंलोटं आणि समाजातील शोषित वर्ग म्हणजे छोटे गुंड, वेश्याव्यवसाय करणारे, भिकारी वगैरे असे बरेच अर्थ काढले वगैरे. पण तत्कालीन तरुण पिढीला (म्हणजे आम्हाला) यातील हे काही फारसं जाणवलं नव्हतं. आवडलं होतं ते म्हणजे विविध प्रकारच्या उत्तम संगीतामधून अत्यंत वेगाने पुढे जाणारा आणि मजा आणणारा सादरीकरणातील वेग. उत्तम दर्जाचे गण, गवळण, गजल, रॉक, पॉप, कव्वाली, लोकसंगीत, एकापाठोपाठ एक. शिवाय पारंपरिक वाद्यांबरोबरच (तबला, ढोलकं, पेटी, व्हायोलिन) तोपर्यंत मराठी नाटकांमध्ये स्टेजवर न दिसलेली /ऐकू आलेली गिटार,ड्रम्स, अकोर्डीअन, कीबोर्डस वगैरे वाद्यं.

या नाटकाचे प्रयोग १९९१ साली थांबले असावेत. दुर्दैवाचा भाग म्हणजे याचे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही. (थिएटर अकॅडेमीने यापूर्वी रंगमंचावर आणलेल्या घाशीरामचे रीतसर विडिओ शूटिंग करून ठेवले आहे.)

नंदू भेंडे, नंदू पोळ, आनंद मोडक आणि भास्कर चंदावरकर या मंडळींचे निधन झाले आहे. तीन पैशांचा तमाशाचं मॅजिक परत येणं आता अवघड दिसतंय.

प्रख्यात संगीतकार कै.आनंद मोदक हे या नाटकाच्या तीन संगीतकारांपैकी एक. त्यांनी याविषयी दोन लेख लोकसत्ता मध्ये लिहिले होते. त्या लिंक जोडत आहे. (आभार श्री. चिंतातुर जंतू )
लेख १
लेख २

विशेष आभार : हे लिहिताना लागणारे बरेच मूळ संदर्भ श्री. चिंतातुर जंतू यांनी प्रयत्नपूर्वक शोधून शोधून दिले. त्यांचे मनःपूर्वक त्रिवार आभार आभार आभार.
त्यांना मी खूप पिडले त्याबद्दल क्षमायाचना.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

आढावा आटोपशिर घेतला आहे एवढं बोलून (मागच्या बाकावर) बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान करुन दिली आहे ओळख.

हा सहकार चळवळीचा उपहास अत्यंत स्टेल वाटतो

स्टेल का प्रेसियंट? (विशेषत: सहकारी बँका आणि सहकारी कारखाने ज्या पद्धतशीरपणे लुटले जातानाच्या बातम्या वाचनात येतात त्या अनुषंगाने)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाटकात जे दाखवले आहे ते स्टेल आहे. त्याचा वास्तवातील लुटालुटीशी संबंध वाटत नाही.ते अत्यंत नाईव्ह पद्धतीनी लिहिले/ दाखवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजा - परधानजी संवादासारखे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. तसं नाहीये. नॉर्मल उपहासात्मक आहे. आणि ते जमलं नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रयोग थांबले हे ठीक, पण कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन नसणे हे फार वाईट. असं का झालं असावं?

---
तुम्ही दिग्दर्शनाविषयी काहीच लिहिलं नाहीये. नेपथ्याविषयीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन नसणे हे फार वाईट. असं का झालं असावं?

हे भारतात सर्व प्रकारच्या प्रयोगशील कलांत झालं आहे - संगीत, नृत्य, अगदी सिनेमासारख्या मूलतः मुद्रित कलेबाबतदेखील. उदा. फाळक्यांचा 'राजा हरिश्चंद्र'देखील पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाही. त्यातल्या त्यात पुलं संचालक असताना एनसीपीएमध्ये काही प्रमाणात काम झालं. तिथे कदाचित 'तमाशा'बद्दल काही असूही शकेल, म्हणजे फोटो वगैरे. पण ध्वनिचित्रमुद्रण असल्याचं माझ्या ऐकिवात तरी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे का झालं याविषयी टी ए वालेच कुणी सांगू शकतील. आकलनाच्या पलीकडचं आहे हे.
दिग्दर्शनाबद्दलही जंतू किंवा कुणी तसे तज्ञ समीक्षक सांगू शकतील. ती अशक्त संहिता या प्रकारे फुलवणे हे ज्या कुणी केले असेल ते थोर. त्यात कलाकार सक्षम असल्याने त्यांनी या मुक्त फॉर्म चा मोकाट उत्तम वापर केला.
नैपथ्य : ते काय असतं ? काही जाणवलं आणि खटकलं नाही बुआ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याचे नाव ऐकले होते फक्त आणि पुलंच्या पुस्तकांच्या शेवटी जी नावे असतात त्यात पाहिले आहे. छान माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0