गूज

तुझ्यावरी आई माझा जीव जडू दे
कोल्यांची बाय तू लाडाची हाय
तुलाच माझ्या मनीचं ठाय
डोंगरावर तुझा दरबार भरू दे
तुझ्यावर आई माझा जीव जडू दे
लेकरांवर तुझी पाखर हाय
चंदनपालखी तुझी दिमाखात जाय
माणिकमोत्यांची फुलं तुला वाहू दे
चाफेनं आई तुझी परडी भरु दे
खणानारळानं तुझी ओटी भरीन
तांबुलविडा आई तुला अर्पिन
चरणांची आई तुझ्या सेवा घडू दे
तुझ्यावर बाय माझा जीव जडू दे
___________________________________
रेणु राजाची सुकन्या ऋषी जमदग्नींची भार्या
परशुरामाची जननी आई एकविरा भवानी
उधो उधो माझ्या अंबेचा दुर्गा भवानी कालिकेचा
________________________________________
अष्टमीच्या रात्री आभाळभर चांदण्यांची परडी उपडी होते. कार्ला गडावरती किर्रर्र काळोखाचं राज्य सुरु होतं. झोंबणाऱ्या वाऱ्याचे बोल तेवढे दर्याखोर्यात घुमत असतात. गडाभोवतालचं किर्रर्र रानही चिडीचूप निद्रेच्या आधीन झालंल असतं. त्या वेळी. गडावर चिटपाखरू जागं नसतं. गडावरच्या तलावात पडलेलं चंद्राचे प्रतिबिंब वातावरणाची गूढता अधिकच टोकदार करतं. अशा वेळी गडावर पाऊल ठेवण्याचं धाडस करू नका. आई ची चांदणझोका घेण्याची ही वेळ असते. जंगली श्वापदांच्या सान्निध्यात, पती काळभैरावासहित क्रीडेचा समय असतो. त्यात व्यत्यय आणण्याचे धैर्य मर्त्यच काय , अमर्त्य लोकांतही कोणास नाही.
हां पहाट फुटली झुंजूमुंजू होऊ लागलं कि गडाला जाग येईल. आईचा सौम्य रूपाचा समय. तेव्हा दर्शनाला जा. सुदैवी असाल तर तीच गर्दीतली एक होऊन तुमच्या भेटीला येईल. कासवी जशी तिच्या पिलांना नजरेनेच सांभाळते तशी सौम्य रूपातली आई तिच्या लेकरांवर मायेची पाखर घालत असते. उगीच तिला अनेकरूपा या नावाने शास्त्रकार संबोधत नाहीत.
तुम्हाला येणारा प्रत्येक अनुभव तिचा प्रसाद आहे. श्रद्धा ठेवण्या ना ठेवण्याने वास्तवात फरक पडत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

किती छान कल्पना! आई एकविरा माझ्या माहेरचं कुलदैवत, त्यामुळे कारल्याला अनेक वेळा जाणं झालंय. पण ही कल्पना मनाला भिडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद कांचन, च्रट्जी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गूज Goose

(चित्र विकीवरून साभार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वत्र शिटणाऱ्या या पक्ष्यांना गूज हेच नाव योग्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin सॉलिडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिक्विड नाहीये हे नशीब समजायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वत्र शिटणाऱ्या या पक्ष्यांना गूज हेच नाव योग्य आहे.

सहमत आहे. कधी बॅकयार्डात घुसले, तर आख्खे बॅकयार्ड हिरवे करून सोडतात.

(अवांतर: या प्रजातीतल्या पुरुषांना 'गँडर' म्हणून संबोधतात, यामागेसुद्धा असेच काही कारण असू शकेल काय?)

.......‌.‌.‌.

अवांतर माहिती: या पक्ष्याच्या विष्ठेचा रंग सहसा गडद हिरवा असतो, असा पूर्वानुभव आहे.१अ

१अअतिअवांतर: हे पक्षी रस्ता क्रॉस करताना शिस्तीत सिंगल फाइलमध्ये करतात (जेणेकरून रस्त्यावरील वाहतूक खोळंबून राहावी), असेही सार्वत्रिक निरीक्षण आहे.

'गूज' हे नामाभिधान (अचूकपणे वापरायचे झालेच, तर) केवळ त्या प्रजातीतील स्त्रियांना अनुलक्षून वापरता येते. मात्र, सामान्यतः ते (या नियमास धुडकावून) या प्रजातीतील कोणत्याही समाजघटकास अनुलक्षून लिंगनिरपेक्षतः सर्रास वापरले जाते. पण लक्षात कोण घेतो?

हा प्रतिसादांश स्त्रियांना uncomfortable वाटू शकतो काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

निरर्थक श्रेणी दिली आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनःपूर्वक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हाहाहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे विषयास धरुन प्रतिसाद देणाऱ्या सर्व यशस्वी कलाकारांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1