Feral people in the urban jungle

गोवा फिल्म फेस्टिव्हलला बेस्ट डाॅक्युमेन्टरीचं प्राईझ खरं आम्हालाच मिळणार होतं; पण आम्ही डाॅक्युमेन्टरी बनवलीच नाही भेंजो. तर त्याची ही गोष्ट.

आपापल्या ऑफिसातनं वेळेवर निघायचा मह्या आणि मी दोघेही प्रयत्न करतो. मला चटर्जीदाने आणि मह्याला त्याच्या बाॅसिणीनं सहासातपर्यंत सोडलं तर आम्ही स्टेशनला भेटतो, सद्गुरू स्टाॅलवर चहा पितो, एकेक सुट्टा मारतो आणि मग घरी जातो. रविवारी सकाळ-संध्याकाळी तर तिकडे पडीक असतोच. तर सांगायचा पाॅईंट हा की सद्गुरू स्टाॅल आमचा नेहमीचा अड्डा आहे. तिथला चहावाला पोऱ्या, माॅर्निंग वाॅकवालं पब्लिक, लायब्ररीतनं ब्रेक घेऊन येणारी काॅलेजची पोरं-पोरी, तिथला रेसिडंट कुत्रा टाॅमी, आणि या सगळ्यांकडून (म्हणजे टाॅमी सोडून) रोज आठदहा कप चहा, दोन मस्कापाव आणि दोनचार सामोसे मिळणारा एरीयातला वेडा हे सगळे आमच्या माहितीतले आहेत.

तर एके दिवशी आम्ही असेच गजाली पिटत होतो. मह्या विकिपिडियाचं रवंथ करत होता. म्हणजे त्याचे दोन छंद आहेत भेंजो - विकिपिडिया वाचणे आणि वाचलेला माझ्यासमोर परत उगाळणे. (तसे क्रिकेट आणि निकिता हेसुद्धा त्याचे छंद आहेत, पण ते जास्त वर्शिप कॅटेगरीत जातात.)

"भेंजो मोगलीची स्टोरी काय उगाच डायरेक्ट नाय शोधली किपलिन्नी! तशी पोरं असायची खरीखरी. एक दिना शनिचर नावाचा वुल्फबाॅय होता. नंतर दोन वुल्फगर्ल होत्या कमला आणि अमला नावाच्या."

मी खिककन् हसलो. "कमला का अमला?" एकदम एफेमवरच्या "कमला का हमला" टोनमध्ये म्हणालो.

मह्या उचकला. "भेंजो जरा सिरियसली घे. तेव्हा कोणी त्यांचा व्हिडिओ केला असता तर तुला खरं आहे ते कळलं असतं. पण आपल्याकडे भारतात भेंजो डाॅक्यमेंटेशन नाय."

मग तो विषय राह्यला आणि आम्ही दुसरं कायतरी बोलू लागलो. पण दुपारी लोळताना मला एकदम कीडा चावला. मी लगेच मह्याला फोन केला. आठदहा रिंगनंतर त्यानी उचलला.

"भेंजो मटण खाऊन झोपलो होतो रे. बोल."

"व्हिडिओ डाॅक्युमेन्टरी करायची भेंजो. सद्गुरू स्टाॅलच्या वेड्याच्या आयुष्याबद्दल. मी नावाचापण विचार केला - Feral people in the urban jungle."

मह्या जरा विचार करून बोलला, "आयडीया वाईट नाय. फिल्मिंग तर तू करशील. बाकीचं काय?"

"अरे फिल्मिंग झालं की चटर्जीदाला मस्का लावतो. तो तसा स्पोर्टिंग आहे; एडिटिंग वगैरे करून देईल फुकटात."

मग आम्ही डन केलं आणि रिसर्च करायचं ठरवलं. नंतर त्याचं फिल्मिंग करायचं, आजूबाजूच्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे, वाईड अॅन्गल कुठून घ्यायचा हापण विचार मी करत होतो. भेंजो अशी फिल्म बनवायची की दहाबारा फेस्टिव्हलमध्ये अवार्ड मिळाले पाहिजेत.

मग रिसर्च सुरू केला. सद्गुरू स्टाॅलवर कितीपण वेळ बसलं आणि कोणाशीही बोललं तरी कोणाला आमची आयडिया कळायची भीती नव्हती. मग हळूहळू माहिती मिळायला लागली.

म्हणजे हा वेडा तीनचार वर्षांपूर्वी इथे आला; पण तो कोण, कुठला हे कोणालाच माहिती नव्हतं. केमिस्टच्या दुकानापुढे तो रात्री झोपायचा; आणि पलीकडल्या सुलभमध्ये कधीतरी आंघोळ करायचा. कोणतरी दयाळू माणसं त्याला अधूनमधून जुने कपडे द्यायची, उरलेलं अन्न द्यायची. नायतर चहा, मस्कापाव हा रोजचा खुराक होताच.

त्याचं नावपण कोणाला माहीत नव्हतं. कोणाशी बोलायचाच नाय तो. कोणी काय सांगितलं तर फक्त मान हलवायचा हो किंवा नाय म्हणून. पण दुपारी स्टाॅलवर कोण नसेल तेव्हा नुसताच बसून लांबवर शून्यात बघत बसायचा. काय स्टोरी होती त्याची काय माहीत.

तर दोनतीन आठवडे आम्ही रिसर्च केला. एकदा तिथून चालत घरी येत होतो तर मी एकदम म्हणालो, "बरोबर नाय वाटत रे असा एका माणसाचा रिसर्च करायला."

मह्या म्हणाला, "हो रे. त्याला यातलं काय माहीतीच नाय, आणि आपण त्याच्या जीवावर फिल्म बनवणार. बरोबर नाय."

मग आम्ही डन केलं आणि डाॅक्युमेन्टरीची आयडीया ड्राॅप केली.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तुमची लेखनाची शैली भारी आवडते. लेख वाचून मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवदत्तवर डॉक्युमेंटरी काढायची आहे. Feral people in the internet jungle म्हणून.

(स्लॉथ्या नि सिंधुआज्जीबरोबर वाढलेल्या प्राण्याला feral नाही म्हणणार, तर काय म्हणणार?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकटा स्लॉथ्या नाही. सुहासिनी, तरस बल्बा, पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा इत्यादीही आहेत आमच्या जंगलात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"भेंजो मटण खाऊन झोपलो होतो रे. बोल."

आँ!

याच्या घरी चातुर्मासात कांदे खाल्ले, तर बोंबलतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चातुर्मास संपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मह्या म्हणाला, "हो रे. त्याला यातलं काय माहीतीच नाय, आणि आपण त्याच्या जीवावर फिल्म बनवणार. बरोबर नाय."

नाही म्हणजे, एथिक्स म्हणून वगैरे सर्व ठीकच आहे, परंतु, ते नॅशनल जिऑग्रफिकवाले वगैरे त्या माकडांवर वगैरे ज्या डॉक्युमेंटऱ्या काढतात, त्या काय त्या माकडांना लेखी पूर्वसूचना देऊन काढत असावेत काय?

तेव्हा कोठे बरे जात असावीत (त्या नॅटजिओवाल्यांची) एथिक्स?

माणसाला जो रिस्पेक्ट ड्यू आहे, तो गेला बाजार माणसाच्या पूर्वजांना का ड्यू नसावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रच्याकने, ग्रेट एप पर्सनहूड हा प्रकार काही देश थोडाफार मानतात म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच स्टाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वेडसर भेटायचा मुंब्रा डोंगरावर (200 मि) अगदी घट्ट टणटणीत शरीर. आम्ही किंवा इतर व्यायाम म्हणून, स्टामिनासाठी एक दोन फेऱ्या मारताना हा वीस लिटर्सचा पाण्याचा क्यान वरच्या देवळात पोहोचवायचा चारपाचदा. वाटेत थांबायचा आणि काही सांगत राहायचा. कुणी पैसे देत जेवायला.
आता पाण्यासाठी पंप लावल्याने हा दिसत नाही हल्ली.
(( फेसबुकवर पोस्ट टाकत दम लागून फासफुस फिसकारणारे आम्ही शहरी भेंजो फक्त..))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडले.
थोडे दिर्घ पल्ल्याचा लेख कथा लिहा अशी विनंती
जिथे फार इंटरेस्ट येऊ लागतो तिथे एकदम तुटल्यासारख वाटतं.
तुम्ही दिर्घ लिहिल्यास काहितरी भन्नाट निर्मीती होइल नक्की असे मनापासुन वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर आहे. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.