Skip to main content

कथा

प्रायश्चित्त

तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.

ललित लेखनाचा प्रकार

किमयागार...

किमयागार

“ती बघ, केव्हढी मोठी लाट आलीय…”
“१..२…३..”
“ पकडली .. पकडली..”
खाली वाकून त्या फेसाळ लाटेला हातात पकडायचा प्रयत्न करत तो म्हणाला..
आणि लगेच परत ताठ झाला….
लाट परत जाताना पाऊले किंचित त्या ओल्या वाळूत अजून थोडी रुतली तशी तो चित्करला. “बघ बघ मी कसा खाली चाललोय… हा हा हा..” आहे

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान -१४

.
मुक्तिवाहिनीचा ध्वज
युद्धामुळे जनतेला नुकसान झाले असले तरी, कुणीतरी फायद्यात होते.
पाकिस्तानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तीन गोष्टी घडल्या.

पहिली म्हणजे, अयूब खानचे सैनिकी सरकार युद्धातील अपयशानंतर ढळले. याचा अर्थ होता, लोकशाहीचे पुनरुत्थान. दुसरी म्हणजे, पूर्वी पाकिस्तानने आपल्या वेगळ्या होण्याचा निश्चय केला. त्यांना वाटले की पश्चिमी पाकिस्तानमध्ये जास्त शक्ती नाही. तिसरी म्हणजे, पाकिस्तानने अमेरिकेकडे पाठ फिरवून चीन आणि सोवियत संघाकडे बाजू वळवायला सुरुवात केली.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान -१३

इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत.

तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले.

ललित लेखनाचा प्रकार

मी, पक्या आणि प्रिन्सेस

मी, पक्या आणि प्रिन्सेस
ती अ‍ॅक्सिडेंटची केस होती.
गाडी कुणी बाई चालवत होती, एकटीच होती. आणली तेव्हा बेशुद्ध होती. इमर्जेन्सीमध्ये पोलीस घेऊन आले होते. आधी सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल केली होती. पण जेव्हा ओळख लागली तशी चक्रे फिरली आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केली गेली. कोणी हाय प्रोफाईल असणार. पण मला काय त्याचे? आपल्या समोर सगळे पेशंट. पेशंट नंबर सो अॅंमड सो.
वेळ रात्रीची होती. मी घरी झोपलो होतो. अभिजितचा फोन होता.

ललित लेखनाचा प्रकार