पिफ ला हजर राहिल्या नंतर

'पिफ' आता संपत आले आहे. म्हणून त्याविषयी धागा सुरु करत आहे. समीक्षा करण्याची माझी कुवत नसल्याने, हा चर्चेचा धागा कलादालनात लिहित आहे. तिथले चित्रपट पाहून आलेल्या माझ्या सारख्या सामान्य प्रेक्षकांनी व बुजुर्गांनी यांत लिहावे, अशी विनंती आहे.
मला त्यातले विझलस टेल, टॉल टेल्स, मोसाद, पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर, वन्स अपॉन अ टाईम इन अनातोलिया, केडी हे चित्रपट आवडले. तर मराठी विभागात, वाय, स्माईल प्लीज उल्लेखनीय वाटले.
स्वालोज ऑफ काबुल हा वॉटर कलर च्या माध्यमातून ॲनिमेशन केला असल्यामुळे अद्वितीय वाटला. गोष्टही छानच आहे.
सिंगल स्लीपर साईझ सेव्हन हा चित्रपट सर्वात जास्त आवडला. राधाक्रिष्णन पार्थिबान या अफलातून माणसाचा हा वन मॅन शो तुम्हाला थक्क करतो. स्क्रीनप्ले, डायरेक्शन ॲक्टिंग या सगळ्याच क्षेत्रांत या माणसाने काहीतरी अफाट करुन दाखवलं आहे.

आयत्या वेळेला फिल्म इन्स्टिट्युट ही जागा रद्द झाल्यामुळे अर्काईव्हज ते पीव्हीआर पॅव्हेलियन ही धावपळ जमण्यासारखी नाही, हे पहिल्या दोन दिवसांत लक्षांत आल्याने मग उरलेल्या दिवसांत फक्त पीव्हीआर चाच आश्रय घेतला. चारी स्क्रीन्सची प्रवेशद्वारे एकाच ठिकाणी असल्याने सोईचे गेले.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर

हा चित्रपट नक्की कशावर आहे, कल्पना नाही; परंतु, सतीपासून ते ब्राइडबर्निंगपर्यंत हिंदुसमाजातील कोणत्याही कालच्या-आजच्या ज्वलंत समस्येवरील चित्रपटाकरिता शीर्षक म्हणून हे खपून जाऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकलकोंड्या झालेल्या एका युवतीचे, तिच्या आईला पोर्ट्रेट करुन हवे असते. त्यासाठी बरेच आर्टिस्ट येऊन जातात. पण मुलगी पोर्ट्रेटसाठी बसायलाच तयार नसते. एक दुसरी तरुण चित्रकार तिचे पोर्ट्रेट करायला येते आणि तिचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करते..... वगैरे विषयावर हा चित्रपट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पाहिलेल्या सिनेमात मला 'इव्दु' हा भारतीय सिनेमा सर्वाधिक आवडला.त्याबद्दल इथे लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!