औरत की हँसी / सरिता स्निग्ध ज्योत्स्ना

मध्यंतरी कविताकोष साईटवरती एक कविता वाचनात आली होती . तिचा मतीतार्थ हा होता की स्त्रियांवरती जे अत्याचार होतात, त्यांना जखडून ठेवलं जातं ते काही नवीन नाही. फार पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. अर्थात काही ठळक उदाहरणे उदा - सीतात्याग माहीत आहेच परंतु द्रोपदीचे देखील 'हसणे'.
या हसण्यातून महाभारत घडले - अंध राजाचे पुत्रही अंध असतात हे माहीत नव्हते असे काहीसे उद्गार तिचे होते असे वाचल्याचे स्मरते.
हे वाक्य की एका स्त्रीमुळे महाभारत घडले हेच मुळी खटकण्यासारखे आहे.
ती हसली असेल हे मान्य आहे, तिचे उद्गारही मान्य आहेत. पण मुख्य ते घडले कारण ती स्त्री होती. आणि स्त्रियांनी (निखळ अथवा कुचेष्टेने) कसेही हसणे हे आपल्या समाजात मान्य नव्हते
एक स्त्री हसली हे आपल्याला महाभारत होण्याचे कारण म्हणून बिंबवले जाते. हेच मूळात चूकीचे आहे.
ती भले बोलली असेल, कुचेष्टेने हसली असेल पण दुर्योधन मूर्ख होता की इतका रिअ‍ॅक्टीव्ह अर्थात रड्या होता की त्याने वस्त्रहरणाची प्रत्यक्ष कृती घडवावी.
तिचे निव्वळ उद्गार होते त्याची प्रत्यक्ष कृती होती आणि तरीही आपण हे शिकतो की एका स्त्रीने महाभारत घडवले.
.

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%80_...
.
.

शायद उस औरत को पता नहीं था
औरत के हँसने का मतलब
जो उसे जहन्नुम का रास्ता दिखाता है
उसने सुनी नहीं होगी
पांचाली की अनोखी कहानी
जिसकी उन्मुक्त हँसी
कठघरे में होती है खड़ी बार-बार
आज भी महाभारत रचने के जुर्म में

हा मुद्दा इतक्या वेळा महाभारताचा संदर्भ येउनही, माझ्या तरी लक्षात आलेला नव्हता. माझ्याकरता नवीन होता. तुमच्याकरता?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नवीनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

तिला माहीत होतं का नव्हतं - अंध राजाचे पुत्रही अंध असतात - ह्याचा प्रश्नच नाही. तिचं वागणं योग्य नव्हतंच, पण एवढा संहार झाला कारण तिचा कुजकटपणा दुर्योधनाला पचवता आला नाही. तोही ट्रंपतात्यांसारखा पातळ चामडीवाला होता; पांडवांनाही राज्याची हाव होतीच.

चांगलं झालं की श्रेय पुरुषाचं आणि वाईटाची जबाबदारी मात्र बाईची, ह्यात काही नवीन नाही; महाभारतकाळापासून असं चालत आलंय; एवढं फार तर म्हणता येईल. चेटकिणींना जाळणं असो किंवा सती-परंपरेचा उगम असो; किंवा मुलगा जन्माला न येण्याबद्दल बायकांना दोष देणं असो.

आणखी मोठ्या प्रमाणावर म्हणायचं तर दुर्बळांना, सत्ता नाही अशांना बळी देणं नेहमीचं. मग विहिरीच्या पायात महाराचं पोर बळी देण्याच्या प्रथा कुठून येतात, ह्याचंही स्पष्टीकरण मिळतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>>आणखी मोठ्या प्रमाणावर म्हणायचं तर दुर्बळांना, सत्ता नाही अशांना बळी देणं नेहमीचं. >>>>>> बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी मोठ्या प्रमाणावर म्हणायचं तर दुर्बळांना, सत्ता नाही अशांना बळी देणं नेहमीचं

अगदी बरोबर आहे. उदाहरणार्थ श्रेणीदानाची तलवार हाती ठेवून भिन्न मतांचे प्रतिसाद दाबून टाकणे, सदस्यांना पळवून लावणे, स्वतः "... ओके प्लिज" असे विशेषांक काढून सदस्यांना मात्र तत्संबंधित सदस्यनाम बदलायला लावणे... इत्यादी!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

्महाभारतातल्या अनेक गोष्टी पटत नाहीत . उदा. अनेक बुजुर्ग, पवित्र तसेच भीष्मांसारखे लोक राजसभेत बसलेले असतांना द्रौपदी चे - जरी ती दासी असली तरी वस्त्रहर्ण होते. कोणीही थांबवत नाही - नुसता निशेधाचा स्वरही काढत नाही?

एकामागे एक डाव हरत असतांनी पांडवांना काही शंका येत नाही? युधिष्ठीर सोडुन बाकी पांडव काही बोलत नाहीत ?

महाभारतात या पूर्वी कुठेही द्युताचा उल्लेख नाही की हा सर्व मान्य खेळ होता. एकदम वस्त्रहरणाच्या वेळीच उल्लेख येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0