बायोपिक च्या नावानं चांग भलं

(मागच्या वर्षी ठाकरे चित्रपट पाहून लिहिले होते. आत्ता सहज मोबाईल मधील लिखाण चाळत असताना सापडले म्हणून पोस्ट केले)

ठाकरे चित्रपटाच्या निमित्ताने...

सध्या बायोपिकवर एकूणातच चित्रपटसृष्टीत महापूर येऊ लागलाय.
बायोपिक आणि शब्दांकन करून लिहिलेली चरित्रे ही केवळ आणि केवळ महात्म्य मिरवण्यासाठी असतात. लोकांना ज्या गोष्टी माहित आहेत त्याच परत लार्जर दँन लाईफ करून स्क्रिनवर दाखवून केवळ पैसे कमवण्यासाठीचा गोरखधंदा आहे. लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी की मनोरंजन करुन घ्यावे याच मुलभूत गोष्टीत फसलेलं आहे सगळं. एक दोनदा असे सिनेमे पाहून किंवा 'शब्दांकित' चरित्रे वाचून हे केवळ प्रचारासाठी केलेय का असा प्रश्न पडतो. प्रस्तुत लेखाचा मुद्दा बायोपिक आणि तत्सम इमेज बिल्डिंग साठी वापरली जाणारी माध्यमं यावर आधारित आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिक वर सर्वार्थाने लक्ष केंद्रित केले आहे. दक्षिणेकडे हाच ट्रेंड चालूय उर्वरीत भारतातही हाच चालूय. प्रांतिक अस्मिता बळकट करण्यासाठी नवं हत्यार वापरात येऊ लागले आहे. एक काळ होता शब्दांकित चरित्रे खपवली जात असंत. मग फोटोबायोग्राफीचा भलताच ट्रेंड येउन गेला. आता बायोपिक वर रोख आहे. आदिम काळापासून चालत आलेला पुतळे उभे करण्याचा प्रकार तर आता भव्य दिव्य इव्हेंटमध्ये थाटामाटात साजरे करायचा काळ आहे. पुतळा संस्कृती जशी वाईट तशी होऊ घातलेली बायोपिक संस्कृती पण वाईट. मध्यंतरी फ्लेक्स संस्कृतीने उच्छाद मांडला होता. स्क्रिप्टेड प्लॉटवर सरसकटपणे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रे पोसली जाताहेत. घरोघरी आदळणारी समाजमाध्यमं तर लाईफ लाईन झाली आहेत सिलेक्टिव्ह आणि डिस्क्रिमिनेटिव्ह माहिती प्रसारित करायला. त्यामुळे व्यक्ती वा समुह कमी कालावधीत प्रभावित केला जातो. २०१९ मध्ये बायोपिक आधारित चित्रपट गरजेचे आहेत की कार्य कर्तृत्वाचे आलेख सांगणारे माहितीपट गरजेचे आहेत यावर विचार होणं गरजेचे आहे. चित्रपट मनोरंजन होणे हेच धोरण असते तर माहितीपटात ज्ञानार्जन व्हावे हा शुद्ध हेतू असतो. बायोपिक हे उदात्तीकरण करतात तर माहितीपट हे ग्राउंड रिअँलिटी दाखवतात. अर्थातच या दोन्हीमागचा कर्ता करविता मेंदू हा प्रामाणिक असावा. बायोपिक मध्ये सोयीनुसार इमेज बिल्डिंग केली जाते. लार्जर दँन लाईफ कँनव्हॉसवर मग फायद्याचेच फक्त लोकांपर्यंत आणले जाते. २०१४ मध्ये भारतात व्यक्तीस्तोमाला खतपाणी घालून बऱ्याचशा गोष्टी प्रभावित केल्या गेल्या. आता त्याची जागा बायोपिक घेतेय असे वाटते.
-------------
२७ जानेवारी २०१९
हैद्राबाद

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दरबार सभेतले भाट नक्की काय करत होते पूर्वी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी खरंय...
आज या विषयावर अजून बऱ्याच गोष्टी लिहिता येतीलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

तरीही हरिश्चंद्राची फ्याक्ट्री,राम जोशी फिल्लम हवीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयत्नांची पराकाष्ठा करून तयार केले चित्रपट आहेत ते.
आज जरी ब्रिगेडींचा दादासाहेब फाळकेंना विरोध असेल कारण त्यांच्या मते दादासाहेब तोरणे हेच खरे आद्य चित्रपट कर्ते. पण हरिश्चंद्राची फँक्टरी परेश मोकाशी यांनी जबरदस्त बनवला आहे.
लोकशाहीर रामजोशी यांचा बायोपिक तर गदिमांच्या लेखणीतून अवतरला आहे.
सो नो कमेंट्स
व्ही. शांताराम, बाबूराव पेंटर, गदिमा, बाबुजी, परांजपे, पुल, अत्रे वगैरे माझी श्रद्धास्थाने
काटकसरीने संसार करावा तसे यांनी मराठी चित्रपट केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू