चित्रपट

झॅनॅक्स, क्लायमेट चेंज आणि डोन्ट लुक अप.

तुम्ही एकाच वेळी ब्राउझरच्या चार टॅब्ज खोलुन एकात वॉशिंग्टन पोस्ट, दुसर्‍यात एनवाय टाईम्स, तिसर्‍यात द गार्डीयन आणि चौथ्यात द व्हाईस/हफिंग्टन पोस्ट/स्क्रोल/ओपीइंडीया/लोकसत्ता/सनातन प्रभात/संध्यानंद वाचत असाल तर तुम्ही 'डोन्ट लुक अप' हा सिनेमा पाहिला असल्याची शक्यता ६० ट्क्क्यांहुन अधिक आहे. तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिलेला नसला तर तो सिनेमा पहाण्याची शक्यताही तशी मोठीच आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

अशोक राणेः दृक्-श्राव्य कलांचे थरारक अनुभव पोचविणारा अवलिया

p2अशोक राणे हे नाव जाणत्या मराठी चित्रपट रसिकांना नवीन नसावे. चित्रपट गुरु, विकास देसाई यांनी तर त्यांना सिनेमा ‘जगणारा’ माणूस म्हणून गौरविले आहे. एक साधा प्रेक्षक, विद्यार्थी, फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता, चित्रपट समीक्षक, शिक्षक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे सदस्य, कधी ज्युरीचे अध्यक्ष, चित्रपट महोत्सवांचे आयोजक-संस्थापक-संचालक-सल्लागार, टीव्ही मालिकांचे लेखक, चित्रपट कथा लेखक, पटकथा लेखक, माहितीपटाचे दिग्दर्शक,….

समीक्षेचा विषय निवडा: 

रामप्रसाद की तेरहवी- जन पळभर म्हणतिल

मृत्यू म्हणजे काय? माणसाचे श्वसन थांबले, त्याची हृदयक्रिया थांबली आणि त्याच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला आणि थोड्या वेळाने तो मेंदूच मृत झाला की माणसाचे सगळे संपले, असेच आणि एवढेच आहे काय? विज्ञानाने शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि एक पिशवीभर क्षार असे शिकवले होते. म्हणजे मूलद्रव्यांतून जन्मलेल्या या शरीराचे परत मूलद्रव्यांत रूपांतर झाले की संपले. आत्माबित्मा सगळे झूट. मग त्या मृतदेहाचे दहन करा किंवा दफन. एक वर्तुळ पूर्ण झाले, एवढाच मृत्यूचा अर्थ. असेच ना? माती असशी मातीस मिळशी.. Ashes to ashes. Dust to dust. We are nothing, but dust and to dust we shall return. Amen…

समीक्षेचा विषय निवडा: 

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात.

समीक्षेचा विषय निवडा: 

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

गीली पुच्ची (देवनागरी शीर्षकामुळे गोंधळात पडू नका)

"अजीब दास्तान्स" नामक चार कथांच्या मोटेतली ही एक फिल्म आहे. केवळ तीस मिनिटात ही छोटी फिल्म मोठा कॅन्व्हास दाखवते. भारती आणि प्रिया ह्या दोन बायांची गोष्ट. भारतीकडे रूप, जात, लैंगिक ओळख, एकलेपणा, आर्थिक वंचना या सगळ्यांची वजाबाकी होऊन उरलेली बुद्धी, कष्टाळूपणा आणि लढाऊपणा यांची शिल्लक आहे. तर प्रियाकडे खाऊन पिऊन सुखी कुटुंब, सवर्णता, शिक्षण आणि रूप असूनही काहीश्या निर्बुद्ध निरागसतेमुळे वाट्याला आलेली दया, पुरुषी आपुलकी, गृहित धरले जाणे आणि आयुष्याविषयी दुखरा संभ्रम आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

पिफ २०२१ : चित्रपट महोत्सव आणि सामाजिकता

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ २०२१) पाहायला मिळालेल्या चित्रपटांकडे सामाजिकतेच्या अंगाने पाहण्याचा प्रयत्न हेमंत कर्णिक यांनी केला आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

Pagglait

उत्तर भारतीय समाजमन आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल महाराष्ट्रीय मनात एक अढी आणि संशय असतो. तिथे खरोखर चांगले बदल होत आहेत का, लोकांची मानसिकता बदलते आहे का, मुली-स्त्रिया बातम्यांच्यात ऐकतो तितक्या अजूनही असुरक्षित आहेत का इत्यादि प्रश्न मनात असतात. कामानिमित्त गेली काही वर्षे ' तिकडे ' बरेचदा जाणं झाल्याने आणि सुशिक्षित का असेनात परंतु बाकी समस्त पुरुष असलेल्या टीमचा भाग असल्यामुळे मनावर कायम दडपण असतं, हे अनुभवाने समजलं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

लाल इश्क्

"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे.
...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?"

समीक्षेचा विषय निवडा: 

IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (अंतिम भाग)

२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - चित्रपट