चंद्रप्रभाचे सिंह

"थर्टी डाॅलर्स. तीस डालर." काऊंटरमागचा गोरा बोलला आणि मी दहाच्या तीन नोटा यांत्रिकपणे काऊंटरवर ठेवल्या. ऑलरेडी घर शिफ्ट करतानाच्या कामाने दमलो होतो; आणि त्यात बायकोनं ग्रोसरी आणायला पिटाळलं होतं. पण तरी एकदम स्ट्राईक झालं. "डिड यू जस्ट स्पीक हिंदी?" त्याला विचारत मी त्याचा चेहराही पटकन बघितला. देसी नव्हता, गोराच होता पण चेहरेपट्टी जरा वेगळी होती. कदाचित इराणी वगैरे असावा.

"हां, हिंदी सीखी थी, लेकिन अभी ज्यादातर भूल गया," तो म्हणाला. मला जरा बरं वाटलं. Y2K च्या प्रोजेक्टसाठी आलो त्या, अमेरिकन मिडवेस्टमधल्या आडगावात आपली भाषा बोलणारं कोणी असेल असं वाटलं नव्हतं. "आप से मिलकर खुशी हुई! मेरा नाम सतीश है," मी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. "मुझे भी. मेरा नाम निकोलाय नझरबायेव्ह!"

हा तर रूसी-कझाक असणार! मी हसत म्हणालो, "प्रियात्न पझ्नाकोमित्स्या वाम! प्लेझर मीटिंग यू!" म्हातारा मोठ्यानं हसला. "हम एक दूसरे की भाषा बोलते है! कितने अचरज की बात है?" माझं रशियनचं ज्ञान कझानमधल्या एका महिन्याच्या प्रोजेक्टमुळे आहे आणि अगदीच जुजबी आहे हे मी त्याला सांगितलं, आणि आम्ही हिंदी-इंग्रजीतच बोलू लागलो. पाच मिनिटं बोलून मी त्याच्या ग्रोसरी शाॅपमधून निघालो.

नंतर वीकेंडसना खरेदीला त्याच्याकडेच जाऊ लागलो. हळूहळू मैत्री झाली. काही महिन्यांनी थँक्सगिव्हिंगला मला आणि बायकोला सुट्टी होती; तेव्हा निकोलायला जेवायला घरी बोलावलं. तो एकटाच रहायचा असं कळलं होतं; म्हटलं जरा लेट्स स्प्रेड द फेस्टिव्ह स्पिरिट.

निकोलाय ठरवल्याप्रमाणे बरोबर सहा वाजता आमच्याकडे पोचला. सत्तरीला पोचला असला तरी एकदम टापटीप होता म्हातारा. त्याचं स्वागत वगैरे केल्यावर स्वाती किचनमध्ये गेली, आणि आम्ही दोघे वोदकाची बाटली, शाॅट ग्लासेस आणि झाकुस्की घेऊन बसलो. झाकुस्की म्हणजे चखणा. पण यात तळलेले पदार्थ नसतात. चीझ, सलामी, व्हिनेगरमध्ये मुरवलेल्या भाज्या वगैरे असतं.

रशियन पद्धतीनुसार निकोलायने टोस्टचं लांबलचक भाषण केलं. मग वोदका, झाकुस्की, वोदका, झाकुस्की असा क्रम सुरू झाला. दोनतीन शाॅटसनंतर मी विचारलं, "निकोलाय, तू अमेरिकेत कधी आलास?"

"ब्याण्णव साली. सोविएत संघाच्या विभाजनानंतर सगळंच विचित्र झालं होतं. त्यात माझी आई रशियन आणि वडील कझाक, त्यामुळे माॅस्कोत स्किनहेड्सचीसुद्धा भीती. नोकरी नव्वद सालीच गेली. मग चान्स घेतला आणि आलो इथे. दोन वर्षं न्यू जर्सीमध्ये होतो. मग इथे आलो. हळूहळू सेटल झालो. लिव्हिंग द अमेरिकन ड्रीम." निकोलायने वोदकाचा अजून एक शाॅट घेतला.

"आणि हिंदी कुठे शिकलास? न्यू जर्सीमध्ये?"

"अरे हट! स्टार सिटीमध्ये. आपला आपण सराव करत. तेही टेक्निशियनची नोकरी सांभाळत."

"स्टार सिटी! माॅस्कोजवळचं अंतराळवीरांचं ट्रेनिंग सेंटर?" मी उडालोच.

"हो. तीस वर्षं नोकरी केली तिथे. तुमचे राकेश शर्मा आणि रवीश मल्होत्रा आले होते तेव्हा त्यांच्याशी हिंदीतच बोलायचो."

"तेव्हा शिकलास? केजीबीचा हेर वगैरे नव्हतास ना रे?" मी हसत म्हणालो.

"नाही रे बाबा. काॅलेजात असतानाच भारताबद्दल कुतुहल निर्माण झालं होतं. पाॅलिटेक्निकमधून पास झालो, नोकरी लागली तेव्हा लगेच शिकू लागलो." निकोलाय साॅसेजचा एक तुकडा खाण्यापुरता थांबला आणि परत बोलू लागला. "तुमच्या देशाने चंद्रप्रभाला सिंह रिलोकेट केले ते सगळं मी ओरिजिनल हिंदीत वाचलंय."

"कोण चंद्रप्रभा?" निकोलायला चढलीय का अशी शंका आली तरी मी विचारलं.

"कोण काय? गीरचे काही आशियाई सिंह उत्तर प्रदेशच्या चंद्रप्रभा अभयारण्यात नेले होते तुमच्या सरकारने. साधारण १९५७ च्या आसपास. सगळे सिंह गीरमध्ये होते. काही मोठा रोग आला तर थोडेतरी सिंह वाचावेत म्हणून रिलोकेट केले होते."

"तुला हे अजून आठवतंय?" मी चकित झालो. "म्हणजे, तू टेक्निकल माणूस. हे सिंह वगैरे कसं लक्षात राह्यलं?"

निकोलायने अजून एक शाॅट रिचवला. काही क्षण तो गप्प बसून होता. मग हळू आवाजात म्हणाला, "आता तुला सांगायला काही हरकत नाही. पण शपथ घे, अजून कोणालाही सांगणार नाहीस म्हणून."

मला कुतूहल स्वस्थ बसू देईना. मी शपथ घेतली, आणि निकोलाय पुढे वाकून बोलू लागला.

"अगदी असाच विचार आमच्या नेत्यांच्या मनात असणार. म्हणून एक टाॅप सिक्रेट प्रोजेक्ट सुरू केला होता. दहा जणांना - पाच पुरूष आणि पाच स्त्रिया - स्वयंपूर्ण अंतराळयानातून एका लघुग्रहाच्या कक्षेत पाठवायचं. त्यांनी तिथेच रहायचं. कायमचं. आणि नंतर त्यांच्या पुढच्या पिढीनंही."

"काहीही. चंद्रावर माणूस नाही पाठवला तुम्ही. लघुग्रह दूरची गोष्ट!" मी जवळजवळ ओरडलोच.

"क्वेश्चन ऑफ प्रायाॅरिटिज. अमेरिका चंद्रावर पोचले पण आम्ही ट्रॅक बदलला. नाहीतर तुला काय वाटतं - पहिला उपग्रह, अंतराळातला पहिला सजीव, पहिला अंतराळवीर, पहिला स्पेसवाॅकर हे सगळं करणारा देश चंद्रावर नाही पोचणार?" निकोलाय सात्विक संतापाने बोलला.

"ओके ओके. मान्य. पण मग सोविएत संघाच्या अस्तानंतर हा प्रोजेक्ट बासनात बांधला गेला ना? बुरान स्पेसप्लेनसेरखा?"

निकोलायने माझ्याकडे रोखून पाहिले. "चंद्रप्रभाचे सिंह. त्यांचं पुढे काय झालं कोणास ठाऊक. सगळे मेले, का अजून जगलेत काय माहीत?" निकोलाय आपला नववा किंवा दहावा शाॅट प्यायला आणि अनपेक्षित सोबर आवाजात म्हणाला, "१९८० मध्ये लाॅन्च झालं ते स्पेसक्राफ्ट. १९९० पर्यंत सगळं प्लॅनप्रमाणे चाललं होतं. नंतर काय झालं कोणास ठाऊक. माझी नोकरी गेली आणि क्लासिफाईड अॅक्सेसही."

मी नि:स्तब्ध झालो. काय बोलायचं सुचत नव्हतं. एवढ्यात स्वाती बाहेर आली, आणि आम्ही जेवायला गेलो. निकोलायशी अजून बोलायची संधी मिळाली नाही.

सोमवारी ऑफिसमध्ये आमच्या अॅडमिन ऑफिसरला बोललो, "निकोलायला भेटलो होतो वीकेंडला. काय स्टोऱ्या सांगतो यार." बाॅब म्हणाला, "ऐकायला मजा येते, पण म्हातारा बहुतेकदा थापा मारत असणार. मला एकदा सांगत होता, त्याला हिंदीपण येते म्हणून!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हा हा हा. गोष्ट अर्धवट राहिली असं वाटत राहिलं. मला अमेरिकेत पुष्कळ सोव्हिएत कनेक्शनवाले लोक भेटले. पार रशियन क्रांतीच्या आधी आलेल्या ज्यू लोकांच्या वंशजांपासून ते १९८९नंतर आलेल्या तरुणांपर्यंत. एकही माणूस (अमेरिकन लोकांसारखा) बोअरिंग नव्हता, म्हणून माझं त्यांच्याशी चांगलं जमायचं. नंतर त्या वर्तुळामुळे माझे अमेरिकन सहकारी मला 'सोव्हिएत हस्तक' म्हणू लागले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सस्पेन्स शाबूत ठेवावा लागतोय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला जमतय. आणि वेगवेगळे संदर्भ आणून टाकता. मजा येते.
--
आणि एक, लवकर आवरता तेही आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप खूप आवडलं. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

निकोलायच्या आणखी गोष्टी येणार असतील तर "सस्पेन्स शाबूत ठेवावा लागतोय" हे पटेल. नाही तर जंतूनं डोक्यात किडा सोडला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी थोडा कन्फ्यूज्ड आहे.

निकोलाय थापाडा आहे असा शेवट केला तर "आणि मी जागा झालो आणि कळलं सगळं स्वप्न होतं" टाईपचा क्लीशे शेवट होणार.

निकोलाय खरं बोलत होता असं डेफिनिटिव्ह वक्तव्य केलं तर त्या यानाचं पुढे काय झालं याचं समाधानकारक उत्तर देणारा उत्तरार्ध/ पुढला भाग लिहावा लागेल.

म्हणून तो खरं बोलतोय का खोटं हाच सस्पेन्स, असा विचार करत होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निकोलाय खरं बोलतोय का खोटं, ह्या उत्तरापेक्षा तो लोकांना कसं गुंगवून ठेवतो, ते जास्त रोचक आहे. तो खरं बोलतोय का खोटं, हे उत्तर लेखकानं दिलं किंवा तसे उघड हिंट दिले तर मजा जाईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किस्सा मस्त आहे.
निकोलाय खरंच सांगत असावा.
आता चंद्राच्या काळ्या बाजूला जर्मनीचा गुप्त बेस आहे. हे Iron sky सिनेमाच्या आधी आपल्याला तरी कुठे ठाऊक होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट आहे तशीच आवडली. अशी अधांतरी ठेवली तरच कल्पनाशक्ती जागी होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.