ती सध्या काय करते?

"तू वर्षभरासाठी दूर जातेयस आणि कुठे ते मला सांगत नाहीयेस?" निकोलाय अविश्वासाने म्हणाला. त्याच्या आवडत्या मश्रूम पिरोगींना त्याने हातही लावला नव्हता.

"मी नाही सांगू शकत रे, राजा! सरकारी गुपित आहे ते," व्हेराने त्याची मनधरणी करायचा पुन्हा प्रयत्न केला. पण निकोलाय फुरंगटून बसला होता.

अखेरीस व्हेरा म्हणाली, "तर मग ऐक."

===

निकोलायने वोदकाचा अजून एक घोट घेतला. ती जळजळीत ऊब घशाखाली जाताना त्याचे लक्ष समोरच्या आरशाकडे गेले. पन्नाशी उलटल्यावरही त्याच्या चेहर्‍यात फारसे बदल झाले नव्हते, पण डोळ्यांमधील निरागस भाव केव्हाच हरपले होते.

===

"आम्ही आता निघतोय," जाॅन्सन म्हणाला, "नाकामुरा दोन महिन्यांनंतर येईल."

व्हेराने यांत्रिकपणे हात हलवला, आणि समोरच्या उपकरणांमध्ये ती पुन्हा गुंग झाली. मनातील दुःख आणि खेद यांचा सामना करण्यासाठी सतत कार्यमग्न राहण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता.

===

जाॅन्सन नाकामुराला ब्रिफिंग करत होता. "आणि शेवटची पण महत्वाची गोष्ट - व्हेरा इवानोवासाठी हे मश्रूम पिरोगी घेऊन जा."

नाकामुरा म्हणाला, "व्हेरा इवानोवा म्हणजे..."

त्याला थोपवत जाॅन्सन म्हणाला, "तीच. २२ मार्च १९९१ रोजी एक वर्ष रहायला म्हणून मीर स्पेस स्टेशनवर गेली. तिचे आईवडील काही महिन्यांतच अपघातात गेले, पण ती परत येऊ शकली नाही - कशी येणार? ते दुःख सतत जाणवू नये म्हणून तिने टर्म वाढवून घेतली, आणि..."

नाकामुराने त्याचे वाक्य पूर्ण केले, "आणि ती पृथ्वीवर गेलीच नाही. आधी मीर आणि नंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहिली ती. गेली एकोणतीस वर्षं."

जाॅन्सन म्हणाला, "कामाला वाघीण एकदम. आणि कधी काही अपेक्षा नाहीत. कोणी पृथ्वीवरून येणार असेल तर मश्रूम पिरोगी मागवते फक्त. का कोणास ठाऊक?"

===

निकोलायने उरलेली वोदका संपवली आणि तो बारबाहेर पडला. त्याने तारीख आठवली, मनात हिशोब केला, आणि आग्नेयेकडे वळून आकाशात बघू लागला.

===

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

असेच भरकटू द्या यान.
-----------------
जे लोक अंतराळात जाऊन/राहून परत आलेत त्यांच्याकडे खूप गोष्टी असणार. शिकारी लोक जसे सांगतात तसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान, पण त्रोटक वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

खूप आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता जा निघोनी जसे की विरावे
धुके दूर रानात अलवारसे
तुझी पाठ होता मला शोधणे गे
कुठे फोडले काल मी आरसे !

गुड वन!
----------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0