‘गुजरा हुआ जमाना...’

चित्रपट : ‘शिरी फरहाद’
आवाज : लता मंगेशकर
कलाकार : मधुबाला
गीतकार : तन्वीर नक्वी
संगीतकार : एस एस मोहिंदर
१९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिरी फरहाद’ या चित्रपटातील ‘गुजरा हुआ जमाना...’
हे गीत म्हणजे लतादीदींच्या आजवरच्या गायकी वाटचालीतील पथध्वज ( माईलस्टोन) म्हणावा लागेल. तन्वीर नक्विंचे नजाकतदार शब्द अन काहीशा अप्रसिद्ध अशा एस एस मोहिंदर या संगीतकाराच्या सुरेल चालीवर सौंदर्यवती मधुबालेच्या ओठातून बाहेर पडलेले लतादीदींच्या मधुर सुरातील हे गीत पडद्यावर पाहणे अन ऐकणे म्हणजे जणू सुवर्णाला सुगंध अन सुस्वर लाभलेला अनुभवणे. गीताच्या आर्त भावविभोर शब्दातून हृदयात उतरणारा अर्थ एका अनोख्या विश्वात घेऊन जातो. प्रियकराला सोडून दूर जाणाऱ्या मजबूर प्रियतमेचे बेबस बोल त्या अर्थासह तीरासारखे काळजात घुसल्याविना रहात नाहीत.
५०-६० च्या दशकात, नुकतीच विशी पार केलेल्या लतादीदींचा आवाज ऐन भरात होता. पावसाळ्या रात्री काळ्या आकाशात अवचित चमकणाऱ्या विद्यूल्लतेसारखा तीक्ष्ण, बारीक , लवचिक, सहज अन सुरेल. ज्याच्या कानावर पडेल त्याला घडीभर तिथेच खिळवून ठेवणारा ! शरीराच्या रोमारोमाला लहरत नेणारा ! हृदयाच्या घड्याघड्यांमध्ये ठाण मांडून बसणारा ! त्या आवाजाने अन मृदू मधुर संगीताने ‘गुजरा हुआ जमाना...’ या गीतामधल्या आर्त भावाला एक वेगळीच मिती प्राप्त करून दिली.
मजबूर होऊन प्रियकराला सोडून दूर जाणाऱ्या प्रियेच्या व्याकुळ भावना अश्रू अन शब्दांचे रूप लेऊन साकार होतात. .
“गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा
हाफिज खुदा तुम्हारा...”
‘किती आनंदात गेले तुझ्या संगतीतले ते सुखाचे दिवस ! आता परत तर नाही येऊ शकत ते ..! आता त्यांची स्मृती कायमची हृदयात बाळगून तुझा निरोप घेणेच फक्त माझ्या हातात आहे. त्यांच्यासह तुझ्या विश्वातून कायमची निघून जाते आहे...खुदा हाफिज...! खुदा हाफिज...!’
“खुशिया थी चार दिनकी आसू है उम्रभरके..
तनहाईयोमे अक्सर रोयेंगे याद करके....
वो वक्त जो के हमने एक साथ है गुजारा...
हाफिज खुदा तुम्हारा...”
‘चार दिवसांचेच होते सुख अन अश्रूंची सोबत आयुष्यभराची..पण त्या सुखाच्या आठवणीवरच आता आयुष्य कंठायचे आहे. एकांत आला की त्या आठवणीही अश्रुंबरोबर कोसळत येतील, ज्या अलगद नेतील तुझ्यासोबत घालवलेल्या काळामध्ये, चार सुखद क्षणामध्ये. तुझ्यासोबत घालविलेल्या क्षणांच्या त्या आठवणीच आता जीवनाचा एकमेव आधार..!’
“मेरी कसम है मुझको तुम बेवफा न कहना
मजबूर थी मुहब्बत सब कुछ पडा है सहना
टूटा है जिंदगीका अब आखरी सहारा...
हाफिज खुदा तुम्हारा...”
‘शपथ आहे तुला , नको म्हणू मला विश्वासघातकी ! अरे तुला काय माहिती, काय काय सहन केलंय मी ते ? कशी सांगू माझी अगतिकता तुला ? माझी वेदना अन व्यथा मलाच माहिती ! सगळे उपाय खुंटले अन काही पर्यायसुद्धा दिसेना , अगदी शेवटचा आधारही जेव्हा कोसळून पडला तेव्हा हा (तुला सोडून जाण्याचा ) निर्णय घ्यावा लागला मला !’
“मेरे लिये सहरभी आई है रात बनकर
निकला मेरा जनाजा मेरी बरात बनकर
अच्छा हुआ जो तुमने देखा नही नजारा....
हाफिज खुदा तुम्हारा...”
‘सकाळ तर झाली आहे पण माझ्यासाठी तीसुदधा काळोखी रात्रच होऊन आली आहे. कारण काल रात्री तर तुझ्यासोबत होते मी तेव्हा रात्रच माझ्यासाठी उजळलेली सकाळ झाली होती. आणि आता, या उजळलेल्या सकाळी, जणू माझी शवयात्रा निघाली आहे एखाद्या शोभिवंत वरातीसारखी ... तुझ्या विरहाने मरून गेलेल्या माझ्या मनासह ... . बरं झालं तू नाही पाहिलास हा तमाशा ! नाहीतर काळीज फाटून गेलं असतं रे तुझं...’
‘बस ! हाच निरोप आता तुला..!
खुदा हाफिज...! खुदा हाफिज...!’

सदर गाण्याचा आस्वाद युट्युबवर इथे घेता येईल

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अहा! छान गाण्याचा तितकाच दमदार लेखाजोखा

पावसाळ्या रात्री काळ्या आकाशात अवचित चमकणाऱ्या विद्यूल्लतेसारखा तीक्ष्ण, बारीक , लवचिक, सहज अन सुरेल

हे लतादिदिंच्या आवाजाचे वर्णन तर खूप आवडले!

शेवटी गाण्याचा दुवा दिला असतात तर पैकीच्यापैकी मार्क दिले असते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद रिशिकेशजी . इथे मदत पान कुठे आहे दिसत नाही. दुवा देण्यासाठी पद्धत शोधायला. मदत कराल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला ज्या शब्दावर दुवा द्यायचा आहे तो सिलेक्ट करा --> डावीकडून चौथा आयकॉन (Insert Edit link) निवडा --> एक चौकट उघडेल तिथे लिंक चिकटवा --> OK वर क्लिक करा --> प्रकाशित करा Smile

नाहि जमलं तर प्रतिसादात लिंक द्या, संपादक ती लेखात घालून नक्की देतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्वा ! मन प्रसन्न होऊन गेले आणि आजचा कामाचा दिवस कितीही घाईगर्दीचा असला तरी दिवसभर लताचे 'वन ऑफ द बेस्ट्स' म्हटले जाणारे मधुबालासारख्या सर्वार्थाने सुंदर असलेल्या नायिकेच्या तोंडी असलेले 'गुजरा हुवा जमाना.....' गुणगुणत राहायला आवडेल. खूप हळवे वाटते तन्वीर नक्वी [मूळचा लाहोरचा] ची ही रचना. मी पाहिला आहे हा चित्रपट आणि ती लावण्यखणी वाळवंटात भटकणार्‍या फरहादसाठी हे गाणे म्हणते त्यावेळी असे वाटते की थांबावा तिचा तो कारवाँ आणि पडावी गाठ तिची त्या प्रियकराशी.

'खुशिया थी चार दिनकी...." अगदी अगदी. त्या दोघांच्या आयुष्यात आलेले ते मधुर चार दिवस आणि त्याच्याच आठवणीच्या शिदोरीवर आता उरलेले आयुष्य काढायला तयार असलेली शिरीन्..... गाण्यात जितकी कासाविस करणारी भावना तितकीच पडद्यावर मधुबालाने केलेला अभिनय. लताच्या या गाण्यात लागलेल्या आवाजाबद्दल तर काय बोलावे ? एस. मोहिंदर {मोहिंदरसिंग बक्षी त्यांचे पूर्ण नाव. आता ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. मुलाबाळात नातवंडात रमले आहेत.} यानी ह्या गाण्याचे फेमस स्टुडिओत रेकॉर्डिंग केले आणि त्या रात्री मधुबालाने ते ऐकले. त्यातील स्वरांनी आणि अर्थाने ती मोहरून गेली होती आणि या गाण्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी तडक थेट एस.मोहिंदर यांचा पत्ता मिळवून ती [बुरखा घालून] त्यांच्या घरी गेली. एस.मोहिंदर व त्यांची पत्नी देविन्दरकौर याना चक्करच आली त्या रुपवतीला आपल्या घरी पाहून. पुढे तिने निर्माण केलेल्या "महलोंके ख्वाब" च्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी तिने एस.मोहिंदर यांच्याकडेच दिली. असो.

एका सुमधुर आठवणीकडे हा लेख घेऊन जातो त्याबद्दल स्नेहांकिता यांना धन्यवाद. [आत्ताही या क्षणी हा प्रतिसाद लिहिताना हे गाणे - ऑडिओ - ऐकत आहे.]

त्या गीताचा हा 'मधुबाला' फोटो

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गाण्याची माधुरी हे परीक्षण लिहायला प्रव्रुत्त करून गेली, खरं, पण मधुबाला अन मोहिन्दरजी यांचा हा किस्सा समजल्यानंतर ते आणखीच गोड वाटू लागले आहे. आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हं. हा घ्या दुवा.
http://www.youtube.com/watch?v=01ivZkl3h8A

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0