वणवा आणि जंगल

वणवा जंगलात विलीन होतो की जंगल वणव्यात?

फार फार वर्षांपूर्वी एक वणवा सुरू झाला आणि हळूहळू पूर्ण जंगल व्यापु लागला.

मजल दर मजल करत एका सदाहरित जंगलपाशी आला.
सदाहरितांनी आधीच दूर दूर च्या जंगलातील पशुपक्षीं ना आसरा दिलेलं ज्यांचं घर त्याच वणव्यात जळून गेलेलं.

गवत वेली किंचालल्या "वाचवा-आग-आग" त्यावर उंच उंच सावली न देणारी अशोकाची झाडे म्हणाली 'चूप बसा, तुम्हाला दिसत नाही पण मला दिसतंय, वणव्यात आहे तेज, अंधकार मिटवायला आलाय.

मेलेले प्राणी खाणारा गिधाड म्हणे बंद करा वणवाफोबिया. वणवा म्हणजे शांती आपल्या सर्वांना एक करणार हा वणवा.

पुरातन वटवृक्ष म्हणे असे किती महापूर भूकंप सुनामी येऊन गेली पण आपलं जंगल टिकून आहे, आपल्याला काही होणार नाही' .

जिकडे तिकडे गोंधळ सुरू झाला. केसरी राजाने घेतली मीटिंग, वजीर लांडगा म्हणे आपल्याकडे आहे लोकशाही, सर्वसमभावं, स्वागत तर करायलाच लागेल वनव्याच. एकजीव होईल आपल्यात.

बारा गावच पाणी पिलेला हत्ती म्हणाला एकजीव नाही, आपल्याला नष्ट करेल हा, ज्यांनी स्वतःच्या घराची राख रांगोळी केली त्याकडून काय अपेक्षा, विचारा त्या स्थलांतरित पक्ष्यांना. पक्ष्यांचाही तेच मत होतं.

शेवटी निर्णय झाला नाही. प्रत्येकांनी आपापल्या घराचं, झाडाचं बघायचं अस ठरलं

पण ज्याच्याकडे घर नव्हते ते पावसाची वाट पाहत राहिले, की पाऊस येईल आणि वणवा व उंच उंच घरी राहणार्यांना धुवून काढेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुणीतरी पाणी मारणारं कॉप्टर पाठवेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉप्टर वैगेरे युरोपात वापरतात. तिकडे युरोपात परवाच तुमच्या चिमण्यांना वनव्याच कार्टून दाखवलं म्हणून जाळण्यात आलं. .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दूरवरच्या जंगलातील अल्पसंख्याक पशूपक्षी, प्राणी यांना विशेषाधिकार बहाल केले गेलेच पाहिजेत मानवतावादी दृष्टीकोनातून. भविष्यात हेच अल्पसंख्य पशुपक्षी जेव्हा बहुसंख्येने वाढतात स्थलांतरीत लोंढ्यामुळे तेव्हा सर्वाधिकार मिळालेच पाहिजेत बहुसंख्य असल्याने हे वैश्विक सत्य आहे. अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार बहुसंख्यांक होऊ तेव्हा सर्वाधिकार हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. अशावेळेस समान अधिकार वगैरे अंधश्रद्धा असतात.
मुळात स्थलांतरित प्राणी, पशुपक्षांमुळे जर प्रस्थापित जंगलातील प्राणी, पशुपक्षांच्या हक्कावर गदा येत असेल तर जंगल सोडून जाऊ देत. जगभरात एवढी जंगले पसरलेली आहेत. तिकडे जाऊदेत. SmileWinkWink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू