ऋषिकेश डायरीज्

कालच्या ५ तारखेला आकाशातून टपकलो आणि तसं अलगद इथल्या गुलाबी थंडीने मला कुशीत घेतले आहे. पावसाने हालहाल पछाडलेल्या मुंबईपासून मला तरी पाठ सोडवता आली. इथला हिरवा परिसर मनोवेधक आहे, सारे मळभ पुसून टाकणारा आहे. ऋषिकेशला पाहून मनात चमकून गेले की, आपली मानवजातसुद्धा निसर्गावर आलेली एक कीड आहे, खरंतर कीड ही कल्पना मानवाचीच, जे मानवाला घातक ते तो कीड म्हणून ठरवतो, पण निसर्गाला आपणच घातक ठरत आहोत, असं समजायला नको का.. बेमोसमी पावसाने, अतिउष्ण तापमानाने निसर्ग आपल्याला एखादी कीड नष्ट करावी तसा त्रास देत आहेच.
इथलं काम जवळपास २ आठवड्यात करण्याची योजना असल्याने इथल्या मुक्कामात डायरी लिहायला मिळेल, म्हणून ऋषिकेश डायरीज् ही शृंखला..
एकटं शांत जागेवर राहण्यात खूप सुख आहे.
एखाद्या भरगच्च अंधारात तेवत्या पणतीजवळ आसरा घेतल्यासारखे जणू..
मनातल्या विचारांना तरंगांसारखं उमटतांना आणि विरून जातांना पाहता येतं..
चांदण्यांतल्या क्षणांना जरासं गोंजारता येतं..
काही वेळा वाटतं..जवळ रहावं आपल्यातच घट्ट, कुणाच्यातही हरवून न देता.. आणि आपणावर आपोआप दाटून येत जावी आपलीच साय..

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढच्या पानांतही असंच असणारे का? अंधार पणती, चांदण्यातले गोंजारणे आणि दाटणाऱ्या सायी (घट्ट दुधामुळे असं होतं हा समज.)

बघू वाचायला जमतं का.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडतंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

ऋषिकेशसारख्या शांत आणि प्रसन्न परिसरात एकीकडे काम चालू आहे आणि बाजूला युट्युबवर फाल्गुनी पाठकची रोमँटिक गाणी, किती दिवसांनी सारखेच त्या गाण्यांचे व्हिडीओज् पाहणे चालू आहे, त्या लहानसहान रोमँटिक गोष्टी उलगडणाऱ्या व्हिडीओज् मधल्या राजकुमारांना पाहून मन अजूनच ताजेतवाने होत आहे. सुरवातीला राजकन्या राजकुमार यांचं त्रासणं, रुसणं, मुरडणं, किंवा विरह वगैरे, नंतर दोन्ही कसे हसत खेळत एकत्र दाखवले आहेत, असा गोड खट्याळ प्लॉट. तरी मध्ये मध्ये येणाऱ्या फाल्गुनीचे झिपऱ्या केसाने पूर्ण सुटात बागडणे थोडं समजून घ्यावे लागते, अर्थात तिचा आदर मनात आहेच, पण तिचा एकाच एक प्रकारचा पेहराव मनात मात्र प्रश्न निर्माण करत राहतो.
आज अचानक थंडी अगदी नीट पडली आहे, धुके दाट आणि एखादी चिंब करणारी सरसुद्धा बरसत आहे. इथलं वातावरण खरंच मुंबईच्या फॅशनसारखं बदलतं म्हणतात, त्याचा अनुभव येत आहे.
३ दिवस होत आले मी ऋषिकेशला आहे, तरीही हे घरी मी काहीसुद्धा सांगितले नाही. मला कधी कॉल आलाच तर, घरच्यांशी फोनवर मुंबईच्या कामात असल्यासारखा मी बोलत राहतो. मी मुलुंडलाच राहतो, काम पण तिथेच करतो, हेच त्या सर्वांच्या डोक्यात आहे, मी लोकल प्रवासदेखील करत नाही असे त्यांना वाटत असते. मुळात मलाच काही सांगावेसे वाटत नाही.
हे गजबज करणारं शहर मला आत शांत करतं, आणि माझ्या मनातल्या भावना काय नुसत्या चिंता या शहरापेक्षा जास्त गजबज करतात, हे मला आता पुरते कळाले आहे. आपल्या प्रत्येकाला भावना येतात, जातात आणि कधी त्या भावनांचे जंगल आपल्या भोवती तयार होते तर केव्हा त्यांची आपण रोपवाटिका लावून ठेवतो तर त्यांची अचानक कोणती शाही बाग देखील आपल्यात सजते. माझंही तसं झालं आहे, पण नेमका कोणता प्रकार माझ्या मनातल्या भावनांना झाला आहे, हे सांगता येत नाही, काहीसा न सुटणारा गुंता म्हणता येऊ शकतो.
मनातच चिंता येतात इतक्या की पुढेपण एकटाच का, एड्स झाला तर, पैसे कमावता नाही आले तर, कसंही करून श्वास घेतच राहावा का आणि काय काय.. कधी वाटत राहतं, या चिंतांना एक फुल यावे आणि सुगंध मुंबईभर पसरावा आणि मी त्यासोबत विरून जावं विनाकारणच. या टोचणाऱ्या चिंतांना ताऱ्यात साठवून द्याव्यात आणि रात्रभर तो तारा तुटावा म्हणून जागत बसावं..
फिरत सुटावं मुंबईभर जोवर या चिंतांना एक वाट मिळावी नदीसारखी अलगद समुद्रात घेऊन जाणारी तोवर...
मुंबई आय मिस यू!

(व्यवस्थापन : इतक्या कमी शब्दांच्या लेखनाला एक एक स्वतंत्र धागा काढण्यापेक्षा एकाच धाग्यात जमेल तसे प्रतिसाद देत गेलात तर बरे पडेल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मनातच चिंता येतात इतक्या की पुढेपण एकटाच का, एड्स झाला तर

आँ! असा कसा होईल एड्स? उगाच काहीही?

जवळ रहावं आपल्यातच घट्ट, कुणाच्यातही हरवून न देता.. आणि आपणावर आपोआप दाटून येत जावी आपलीच साय..

अशाने काय एड्स होईल? (उलट, सर्वात सुरक्षित मार्ग नसावा काय हा?)

नाही म्हणजे, कदाचित तुमचे बरोबर असेलही. (अनुभवाचे बोल तुम्हीच बोलू शकता. आपल्याला काय त्यातले कळत नाही.) पण लॉजिक कळले नाही, म्हणून शंका विचारली, इतकेच.

पैसे कमावता नाही आले तर

म्हणजे... पैसे कमावण्यासाठी नक्की काय करता म्हणालात तुम्ही? (नाही म्हणजे, २+२ची बेरीज जमविण्याचा प्रयत्न करतोय, आणखी काही नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मनातल्या भावना काय नुसत्या चिंता या शहरापेक्षा जास्त गजबज करतात,

तुम्ही वॉरिअर पेक्षा वरीअर दिसताय. योग्य कृती सातत्याने करत रहा आणि फळ ईश्वराधीन ठेवा. आपोआप मार्ग सुचत जाइल, गुंता सुटात जाईल.
सदासर्वदा देव सन्नीध आहे,
कृपाळुपणे अल्प धारीष्ट्य पाहे||

घरच्यांशी फोनवर मुंबईच्या कामात असल्यासारखा मी बोलत राहतो. मी मुलुंडलाच राहतो, काम पण तिथेच करतो, हेच त्या सर्वांच्या डोक्यात आहे,

असं का बरं? सांगा की ऋषीकेशला मजेत आहे म्हणुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि मुलुंडला कामाला आहात तिथून ती जागा दूर आहे हे कळलं. पण कथेचा काळ कोणता? लॉकडाउन अगोदर किंवा जेव्हा मोबाईलचे विडिओ कॉल्सही नव्हते तेंव्हाचा?
आता पैशाची चिंता म्हणजे एवितेवी कामावरून ब्रेक मिळाला आहे तर आठ पंधरा दिवस तिकडे गंगेजवळ ऋषीकेशाला राहिलात काय? आणि मग एकदम एडस? तिथे भावनिक गुंतागंतीचे रुपांतर कशात झाले की काय?
तर एवढा तरी उलगडा या भागात व्हावा ही अपेक्षा होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉकडाउन अगोदर..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भोवतालचा निसर्ग असा निवांत निरखताना कधी आपला सर्वांग होऊन जातो, हे कळतही नाही. आणि मग वाऱ्याची एखादी येणारी झुळूक आपल्या स्तब्धतेवर आक्रमण करते, जीवनाची, जगण्याची खूण आपल्याला वारंवार करून देते. अश्यावेळी वाऱ्याचे अगाध वावरणे आणि आपले जीवन जगणे एकसारखे वाटू लागते. हिरवा रंग सुखाचा तर करडा मातकट रंग दुःखाचा वाटू लागतो. अवखळ पाण्याचा आवाज निस्सीम आनंदाचा प्रतीक होतो तर पक्ष्यांचे सूर आपले अनोळखे अस्थिर भविष्य गुणगुणतात की काय असे वाटू लागते.
मनाचा कोपरा तर निसर्गासमोर केव्हाच उघडला जातो, विचारांना टाळा बसवता येत नाही ना भावनांना शिस्त, मन बोलू लागते, ओरडू लागते जे जे आजवर मनाने पाहिले, हुंगले, चाखले, स्पर्शले किंवा ऐकले, रंध्रांत साठलेले ते एकाएकी ओक्साबोक्सी बाहेर पडते.
हुकप्स आणि डेट्स यांच्यात मग्न आमच्या पिढीला हा निसर्ग आपलासा वाटतो, इथल्या निर्बंधरहित वावरात बेबंद उधळून द्यायला, दोनच का होईना अश्रूंना ओघळायला जागा देणारा हा निसर्ग आमच्या आवळलेल्या, मुडपलेल्या भावनांचे उत्सर्जन करत राहतो.
कुणी हुकप्समध्ये न सांगताच गुपचूप नकळत कॅमेरा ऑन ठेवून कामातीरेकात आपल्याला, आपल्या बेधुंद अवस्थेतल्या चेहऱ्याला टिपत जातो. नंतर समजल्यावर मी फक्त एक टेक्स्ट करतो, प्लिज डोन्ट शेअर टू एनीवन..
कुणी हुकप्स आटोपण्याआधी कंडोम आणायला सांगतो आणि तोच हुकप्स आटोपल्यानंतर निर्जन स्थानी 'येतो ५ मिनिटात' सांगून निघून जातो, अर्ध्या तास उलटल्यानंतरही तो समोर दिसत नाही तर, मी मनाला गच्च आवळून आपली दिशा निश्चित करतो.
कुणी बायकोला 'बाहेर २ मिनिट थांब' असे बोलून, सार्वजनिक मुतारीत आपल्याकडे लाळ गाळून पाहतो, लिंग खाजवून तोंडात कोंबून घ्यायला सांगतो, इथे तिथे हात लावण्याचा प्रयत्न करतो. माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या उन्हाने त्रस्त त्याच्या बायकोच्या अंधुक नजरेची असोशी त्या अप्रामाणिक माणसाला कशी समजावून सांगू.
जराही अपेक्षाविहीन मैत्रीला शरीर स्पंदनातच मोजणाऱ्या माझ्या सभोवराला मी कसे समजावू.
कुणी काय काय मागतो, सिगारेट, दारू, ड्रग्स, कंडोम, गर्लफ्रेंडचा कॉलेज प्रोजेक्ट पूर्ण करण्याची मागणी, गर्लफ्रेंड, बायको, आई, बहिणी, घरातल्या तमाम मादी जमात, जनन इंद्रियावरचे केशकर्तन...
हा उभा निसर्ग आज माझा खास आहे.
आज रसेल वाचताना चहूकडेच काय काळाच्या पटलावरपण परिस्थिती सारखी राहते, हे जाणवले, किंवा संवेदना पाहणाऱ्या लोकांना स्थिती एकसारखी पाहण्याची सवय असावी. तुकाराम असोत, दुर्गा भागवत किंवा रसेल असोत यांनी समाजस्थितीवर भाष्य सारखीच करावी की मी ती सारखी असल्यासारखी वाचावी, हे काही समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कुणी बायकोला 'बाहेर २ मिनिट थांब' असे बोलून, सार्वजनिक मुतारीत आपल्याकडे लाळ गाळून पाहतो, लिंग खाजवून तोंडात कोंबून घ्यायला सांगतो, इथे तिथे हात लावण्याचा प्रयत्न करतो. माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या उन्हाने त्रस्त त्याच्या बायकोच्या अंधुक नजरेची असोशी त्या अप्रामाणिक माणसाला कशी समजावून सांगू.
जराही अपेक्षाविहीन मैत्रीला शरीर स्पंदनातच मोजणाऱ्या माझ्या सभोवराला मी कसे समजावू.
कुणी काय काय मागतो, सिगारेट, दारू, ड्रग्स, कंडोम, गर्लफ्रेंडचा कॉलेज प्रोजेक्ट पूर्ण करण्याची मागणी, गर्लफ्रेंड, बायको, आई, बहिणी, घरातल्या तमाम मादी जमात, जनन इंद्रियावरचे केशकर्तन..

हा भाग आवडला -
बाकीचं लिखाण थोडं त्रोटक वाटलं, एकोळी विचार + शैली असं काहीसं - सविस्तर लिहा -
तुम्ही रिमोट वर्क वगैरे म्हणून इथे गेला आहात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९ ची गोष्ट आहे. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी नेमका ऋषिकेशला नाही, तर रायवाला-नेपाली फार्म भागात राहतो आहे. हा भाग हरिद्वार, ऋषिकेश आणि देहरादून या तिघांच्या मध्ये येतो, तिन्ही ठिकाणं समान अंतरावर आहेत. नानक जयंतीला मी देहरादूनला होतो. तिथे दिवाळीसारखाच नानक जयंती साजरी करण्याचा उत्साह दिसून आला. दूनचा एकुलता एक मोठा असा, पॅसिफिक मॉलमध्ये 'लास्ट ख्रिसमस' चित्रपट पाहिला. छान रोमान्स आणि गोड कपल असा देखणा होता 'लास्ट ख्रिसमस'.., दोन प्रसंगांतून दाखवलेले कुटुंबाचे एकत्र जमणं सुंदर दाखवले आहे, एक लेस्बियन कपल यात आहे.. आणि प्रचंड असा गोड हृदय चोरून घेणारा हिरो (खरंतर हिरो आपलं हृदय आपल्या प्रेमिकाला देतो, असं दाखवलं आहे.) आहे. चित्रपट पाहून ख्रिसमस येतो आहे, याची चाहूल लागते.
रक्ताने बांधलेले कुटुंब ही स्वार्थी संकल्पना आहे, असं मला तरी वाटतं. पिढी दरपिढी कुटुंबव्यवस्था चालते आहे, मान्य; शिस्त आहे, त्याची मान्य. पण आपण आज कुटुंबात एकमेकांविषयी धगधगत राहतो, कुणी म्हटलंच आहे की, रक्ताचीच नाती तेवढी जीवलग नसतात, कुटुंब वाढलं पाहीजे, निपजता आलं पाहिजे तरच त्याला अर्थ आहे.
प्रेम आणि घृणा ही देखील मला स्वार्थाचीच लक्षणं वाटतात. मुळात आपला जन्म ज्यातून झाला, तो स्वार्थच, मग तो स्थायी स्थायी दिसला, तर नवल नक्कीच नाही.
जे आवडतं ते प्रेमाने आपण जवळ आणत असतो, नावडतं ते घृणेने दूर लोटत असतो.
कधी स्वार्थासाठी आपण परस्पर विसंवादानेसुद्धा गोष्टी करत असतो, नावडती वस्तू आवडल्यासारखं आणि आवडलेली वस्तू दूरावून आपण आपला स्वार्थ साध्य करत असतो.
हा असा विचार माझ्या मनात येऊन पिच्छा सोडेनासा झाला आहे.
मला नेमकं ठरवता येत नाही, प्रेम आणि घृणा यांपलीकडे कसंही करून जगता येत असेल का? कारण आपण सर्व गोष्टींना या दोघांत विभागूनच प्रतिक्रिया देत असतो, वागत असतो.
नवीन गाणी असो, कला, पुस्तक असो की कार्य, कौशल्य किंवा विचार, आणि भावना देखील, यांना आपण आजवर जे जे काही आपल्याला सुसह्य वाटलेलं असतं, त्यानुसार जोखून आपलंसं करत असतो, मात्र या सर्वांना एकवार आपण सहज असं एकदाच अनुभवून तर पाहायला हवंय ना...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखनाचा धागा आहे पण
Permalink Submitted by चिमण_१९५४ on शनिवार, 24/04/2021 - 06:33.
एखादा फोटो चालेल इथे. पोन्तासाहेब येथे काय आहे? ते जवळ आहे ना?

एखादा फोटो चालेल इथे. पोन्तासाहेब येथे काय आहे? ते जवळ आहे ना?

___________________________

नबांनी फारच ट्यांजट मारली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

एखादा फोटो चालेल इथे.

काय सांगता!

हुंगले, चाखले, स्पर्शले

रंध्रांत साठलेले ते एकाएकी ओक्साबोक्सी बाहेर पडते.

कुणी हुकप्समध्ये न सांगताच गुपचूप नकळत कॅमेरा ऑन ठेवून कामातीरेकात आपल्याला, आपल्या बेधुंद अवस्थेतल्या चेहऱ्याला टिपत जातो.

कुणी हुकप्स आटोपण्याआधी कंडोम आणायला सांगतो आणि तोच हुकप्स आटोपल्यानंतर निर्जन स्थानी 'येतो ५ मिनिटात' सांगून निघून जातो

कुणी बायकोला 'बाहेर २ मिनिट थांब' असे बोलून, सार्वजनिक मुतारीत आपल्याकडे लाळ गाळून पाहतो, लिंग खाजवून तोंडात कोंबून घ्यायला सांगतो, इथे तिथे हात लावण्याचा प्रयत्न करतो.

जनन इंद्रियावरचे केशकर्तन...

याचा... याचा फोटो हवाय तुम्हाला? फक्त लेखन आहे, ते पुरे नाही झाले काय?

(तरी बरे, अगोदरची ती घट्ट साय की काय ती राहून गेली.)

(बाकी, ते अस्वलरावांचे ठीक आहे एक वेळ, परंतु, तुम्हालाही असल्या फँटसीज़ असतील, असे वाटले नव्हते. हं, चिमणराव? बाकी, सार्वजनिक चलनवलनावरून कोणाचे काही सांगता येत नाही म्हणा! आणि, तसाही तो तुमचा खाजगी मामला आहे; मला काय त्याचे! पण, तुम्हाला हौस आहे, तर एक वेळ व्यनितून फोटो मागविणे वेगळे, परंतु, येथे सगळ्यांना दर्शन कशाकरिता?)

नाहीतर मग काय इथे ऋषिकेशचे प्रवासवर्णन आहे असे समजून आला होतात काय? अहो, ती गल्लाभरू लिखाणे निराळी... (साभार: पु.ल.)

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे आहे ते उघडं नागडं (शब्दश:) - किंवा श्वापदजाणीवेने लिहिलेलं मला फार आवडतं.
जर मनात हिंसा, कामुकता, लोभ, राग, द्वेष, प्रेम आहे तर मग ते सरळसोट मांडलेलं बरं.
शैली वगैरे पुढल्या गोष्टी आहेत - पण "आहे हे असं आहे" ह्या नागड्या पातळीवरचं लिखाण मराठीत अजून असायला हवं.

आपल्याला तर असल्याच गोष्टी आवडतात राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यासाठी एक डिपी हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या भागासाठी लॅपटॉपमध्ये मी खरंतर अकाऊंट्सविषयी लिहून ठेवले होते, पण आता रात्री मी मोबाईलवरच लिहिण्यास घेतले, सोबत साऊंडक्लॉऊडवर राहुल देशपांडे यांचे चॅनल ऐकत आहे. अनवट गाणी, गझला, तराणे, गुरूजींना ट्रिब्युट्स, रेखीव आठवणींचा ओघ, जरा मिश्किली असा काही सुंदरसा नजराणा त्यांनी देऊन ठेवला आहे, शिवाय इंग्रजी गाण्यांचे गायन व चर्चादेखील आहे. आता ती काढून टाकलेली दिसते आहे, याचं वाईट वाटत आहे. केवळ तीनच ट्रॅक्स दिसत आहेत. इतक्या सुंदर कलावंताची डायरी अशी कशी बंद झाली, हे आवडतच नाहीये, मनाला तसं पटवताही येत नाहीये.
रात्री तेव्हा निसर्गाच्या श्वासांना ऐकत आहे..
सायंकाळी मनावरून पक्ष्यांचा थवा उडत आहे..
चारही दिशांना अंधार जाणवत आहे‌‌..
माझा मीपणा नुसता मनात तरंगत आहे..
अर्ध्यापोटी मुंबईला झोप कधीही लागत नसे, इथे ती तुडुंब पोटी येत आहे, मग या जागेवर स्वप्न ठरवून येतात. आईने किंवा भावाने मला रंगेहाथ पकडले आहे, अशी स्वप्नं पडतात.
इथे आल्यावर रोजच रात्री मरण येऊ दे असा धोशा चालू असतो, मात्र सकाळ परत पाहून नंतर उरलेल्या अहंकाराने श्वास चालू आहे.
अश्या एकांतवासात अडचणीचे, अपमानाचे किंवा लाजिरवाणे प्रसंग का बरे ठळक होत आहेत.
त्या दिवशी 'अलिगढ़', सिरास यांच्यावरचा चित्रपट पुन्हा पाहिला, असं एकटं जीवन आणि मरण पाहून जीव कासावीस होत आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोजच रात्री मरण येऊ देण्याचा धोशा चालत असेल तर कृपया काळजी घ्या. ताबडतोबीने डॉक्टर, समुपदेशक, जवळचे मित्रमैत्रीण यांपैकी कोणाशीतरी बोला. एकटेपणा आणि नैराश्य ही जोडगोळी धोकादायक ठरू शकते. माझी कळकळीची विनंती आहे कोणाशीतरी बोला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला या धाग्याविषयी अगदी दुसऱ्या पोस्टपासून, ominous फीलिंग आहे. कोणीतरी हे लाईव्ह मांडते आहे व त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे असे काहीसे. या अशा वाटण्याचे कारण म्हणजे तटस्थपणा आणि एकामागून एक येणाऱ्या रोजच्या पोस्टस. मध्यंतरी एका अन्य संस्थळावरती एका बाईंनी त्यांचा एकटीचा ;पायाला वाट फुटेल' असा प्रवास रात्री बेरात्रीचा, निर्जन स्थळावरचा, रोज मांडला होता व शेवटी गौप्यस्फोट केला की या ज्या काही रिस्कस त्यांनी घेतल्या (ज्या की प्रचंड होत्या आणि तरी वा वा, चान चान, कसं बाई तुम्हाला जमतं, मलाही करायचय - असले प्रतिसाद होते), त्या जीव उधळून दिल्याने घेतलेल्या होत्या. लकीली त्या वाचल्या आहेत व आता ठीक आहेत वगैरे - अशी शेवटची पोस्ट होती.
पण ठीक नसत्या तर काय? जर शेवटच्या दिवशी त्यांनी 'या शेवटच्या पोस्टनंतर, मी आज आत्महत्या करणार आहे' - असे जर लिहुन त्या गायब झाल्या असत्या तर?
_____________
जर हे फिक्शन नसेल आणि लाईव्ह असेल तर - हे जाणुन घेणे महत्वाचे आहे की आम्ही वाचक मदत करु शकत नाही. पण तुम्हाला स्वत:ची मदत स्वत: करायची आहे. स्युइसाईड प्रिव्हेन्शन नंबर शोधा, तिथे बोला. यु आर प्रेशिअस!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९ ची गोष्ट आहे.

आता ती पाने वाचून डिजिटल करताहेत. आताच्या काळात किती समुपदेशक लागतील.

एकटेपणा आणि नैराश्य ही जोडगोळी धोकादायक ठरू शकते हे मात्र खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९ ची गोष्ट आहे.

अरे खरच की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अकाऊंट्सचे काम करणे हे खरंतर उद्योगाचे किंवा कोणत्याही आकृतीबंधाचे समांतर विश्व उभे करण्यासारखे आहे, ते पण पैश्यातून. प्रत्येक प्रक्रियेला, घटनेला पैश्यात आणि म्हणूनच एका ठराविक नियमात बसवून समोर ठेवणे म्हणजेच ताळेबंद आणि नफा नुकसानीचे पत्रक तयार करणे.
किरकोळविक्रीपासून ते कर्जफेडीपर्यंत, शिवाय प्रत्येकाचे पगारपत्रक आणि उद्योगी लोकांच्या रोज उठून नवनव्या हिशोबाच्या मागण्या अकाऊंटंटच्या जीवाला कधी उसंत मिळू देत नाही.
धंदा बंद पडणार की नाही, हे सर्वात आधी अकाऊंटंटच्या नजरेत येतेच, पण धंद्याला वाढीच्या एका सरळ रेषेत बसवणेसुद्धा अकाऊंटंटच्या जिव्हारी येत असते.
हॉस्पिटलचे अकाऊंट्स म्हणजे अजूनच किचकट आणि वेळखाऊ काम. प्रत्येक फाईल वेगळाच हिशोब लावायला बघते, आणि पेशंट स्वतःचा जीव बरा करून घेण्यापेक्षा त्याच्या पाण्यासारखा वाहणाऱ्या पैश्यासाठी जास्त तळमळत असतो. कारण खरेच आहे की, धंदेवाईक डॉक्टरांचा नफेखोरीचा हात असा विचार पेशंटच्या मनात येण्यामागे नक्कीच आहे.
अकाऊंटंट म्हणजे मराठीत लेखाकार, त्याला त्याचे मन बाजूला ठेवूनच समांतर विश्व तयार करावे लागते. बाकीच्यांशी चर्चा आणि संवाद अश्यावेळी त्याला घातक ठरतात. तंद्री भंग पडण्याची शक्यता असते. धंद्यातल्या मार्जिन्स चुकू शकतात आणि कोणताही व्यवहार पुन्हा तपासून पाहण्याची एकमेव अशी संधी हुकू शकते.
जे काही असो, मला ते करावे लागत आहे, आपणहून करणे आणि करावे लागणे यात फरक आहे. काही मंडळी काही काम आवडीने करतात, तर काहींना ती करावी लागतात, परिस्थितीमुळे, किंवा घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे. चुकीचे निर्णय अर्थात 'आम्ही चुकीचे आहोत', असे सांगून येत नाहीच, ते भविष्यातल्या घडामोडींवरून ठरत असते, त्या त्या क्षणाला आपल्याला निर्णय घ्यावा लागत असतो. आपण भविष्य व्हिज्युलाईज करून तो करत असतो, पण अनपेक्षित घटनाही कधी घडत असतातच ना. निर्णयांचे म्हटलं तर, लग्न काही लोकं आपणहून आवडीने करतात, तर काही लोकांना करावी लागतात.
माझा निर्णय फक्त घरापासून, कम्फर्ट झोनपासून किंवा नीट सांगायचं तर रक्ताच्या नात्यांपासून दूर जाण्याचा होता, अर्थात अजूनही तो निर्णय जिवंत आहेच. चुकीचा वगैरे ठरलेला नाहीये.. तर त्यामागे 'लग्न' हा मूळ कन्सर्न, तेसुद्धा अर्थात कुठल्यातरी मुलीशी लग्न. भारतीय लग्नाबाबतीत एवढे जागरूक का असतात. मुलांनी पुढे जाऊन लग्न करावीत, म्हणून मुलांना जन्म देतात का, असं मला कधी कधी वाटत असतं. प्रजनन झाले तर आरामात आपापली आयुष्ये व्यतीत करावीत ना, जोडीदाराला हवं नको ते बघावे ना, आपल्या आवडीकडे, पॅशनकडे लक्ष द्यावे ना, तर नाही, आपल्या मुलाच्या मुलाचे, त्याच्याही मुलाचे पाळण्यातले पाय पाहण्याची घाण हौस असते हो सर्वांना. असं कोणताही जीव पृथ्वीतलावर करत असतो, मान्य. पण आपणही तेच तेच करावे, बुद्धी मन आणि हृदय या संकल्पना पण आपणच निर्माण केल्यात ना, मग त्यांना पण कडीकुलुपात घालून समुद्रात फेकून द्या. आणि मग आपण त्याच बेसिक इन्स्टिंक्टवर जगत राहूया.
पुष्कळशी लोकं करून घेतात काही कामं तशी लग्न उरकतात, धन्य असतात ही लोकं, रोज उठून खायचं प्यायचं तसं लग्नपण करतात, सहसंवेदना आणि अ-नश्वर बंध याचे अ-लौकिकत्व लोकांना समजतच नाही. मी लग्नाच्या विरोधी उभा आहे असे नाही, त्या लग्न पद्धतीला पद्धत बनविण्यामागे माझा विरोध आहे. विरोध हा त्या गोष्टीत, प्रसंगात असल्यावर केला जातो हे माहित आहे मला, पण इतरांच्या अनुभवांना पाहूनसुद्धा आपण विरोध करू शकतो ना...पण असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याचा काही त्रास?
बाकी उत्सुकता वाढली आहे.
नबांनी फारच ट्यांजट मारली. त्यामुळे श्टॉप .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिल की बात कहीं नहीं जाती चुपके रहना ठाना है
हाल अगर है ऐसा ही तो ज़ी से जाना जाना है
मीर यांच्या बेगम अख्तर यांनी किती वेळा उंचीने गाव्यात ह्या ओळी. मनाच्या बोजड दरवाज्यास एकदाची काय भगदाड पडावी त्याने. काळोखात बेलगाम आवाजांना चाचपडणाऱ्या मनाला हुशारी यावी त्याने.
सगळं कसं ठरलं असतं ना, आपलं, इतरांचं, त्यांच्याही इतरांचं.. या ठरलेल्यालाच आपण अकस्मात घटनांनी ठेचकाळतो. सर्व स्थावर अकस्माताचे आहे, तिथे फक्त आपण काहीतरी ठरल्याचा ठोकळा घेऊन नाचत असतो. गणितातल्या गुणाकारांनी आणि भागाकारांनी अकस्माताला कवेत घेण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, त्यामुळे एवढे की, नंतर 'अकस्मात' अभ्यासता तरी नक्की येतो.
फुलांचे फार विशेष असते, कारण दूनच्या एका मॉनस्टरीमध्ये गेलो होतो, छान प्रसन्न असा माहौल होता, आणि तिथली फुलं आणि भित्तीचित्र सारखीच टवटवीत वाटत होती. ती रंग चित्रांतून घेत होती, की चित्रांना ती रंग पुरवत होती हे समजेनासे झाले होते. फुलं किती एकजीव होतात ना..निर्जीवातही..
आत सर्व तत्कालीन नालंदा येथील आचार्य आणि सध्याचे त्या मॉनस्टरीचे रत्नश्री किंवा गुरु यांच्या पुरुषभर उंच हातांनी रेखाटलेल्या सुबकश्या चित्रप्रतिमा होत्या, भवविवेक, असंग, वसुबन्धु, नागार्जुन असे अनेक होते, तिथे या प्रत्येक आचार्यांच्या एकेक कॉमेंटरी तिथल्या मॉंकच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून असतात. बहुतेक तत्कालीन नालंदाला येऊन पोहचलेले आचार्य हे दक्षिण भारतीय होते, आणि मुख्य म्हणजे झेनचा मूळ तत्त्व प्रसारक हा दक्षिणेतल्या तामिळनाडूच्या कांचीपुरीचा राजकुमार होता आणि पुढे मॉंक झाल्यावर तो चीनला स्थायिक झाला आणि तिथेच त्याच्याकडून 'झेन' जन्मास आले.
दूनला बक्कळ अशी नदी नाहीये, आणि तिथे पाणी चूनायुक्त असते. मसुरी देहरादूनच्या डोक्यावर आहे. बर्फ मसुरीला आणि थंड गारांचा पाऊस दूनला पडत असतो. मला बर्फ पाहायची इच्छा आहे, पण इथे आता जास्त वेळ थांबू नये, असंसुद्धा वाटत आहे.
'बाला' चित्रपट बघितला आणि 'ड्रिमगर्ल' आठवला, त्याच्यातही एक संदेश आयुष्मानने दिला होता,
१) ड्रिमगर्ल - माणूस खूप एकटा पडत चालला आहे आणि त्याला भावनांना वाट करून देता येत नाहीये... तर ते सर्वांकशी बोलून एकत्र येऊन निस्तरूया..
२) बाला - आपण जसे आहोत तसे स्वीकारा, कुणी खिल्ली उडवत असेल, तर त्यासाठी खिन्न न बनता, आपण आपल्यासाठी खंबीर बनूया..
गती आणि वेग दोन शब्द एकाच अर्थाची आहेत, नाही का.. पण कधी वाटते, गतीला स्फुरणाची जोड असते आणि वेगाला जिंकण्याची खुमखुमी..
मी इथे काहीबाही लिहीत आहे, आणि तेव्हा काळ्याशार बॅकग्राउंडवर गर्द लाल पाकळ्या विसावून द्याव्या तश्या काही ओळींचे संभाषण माझ्या नशिबी आले आहे.. मला ऋषिकेशने दूर नेऊन खूप काही दिले आहे.. खरंच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ड्रीम गर्ल आणि संदेश ?
ज्याची त्याची नजर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२६/११/२०१९
अजून मी इथेच आहे, बहुतेक हा शेवटचा भाग असेल, कारण परतण्याचे तिकीट आता हातात आहे. इथेच कायमचं राहून जातोय की काय, असं मला वाटत होतं. आज पाऊस पडला आणि वातावरण गारेगार करून गेला. आज २६/११ आहे, मुंबईसाठी कटू आठवणींचा दिवस. १२/३ बॉम्बस्फोटाचा तसाच २६/११ हल्ल्याचा डाग मुंबई कधी विसरू शकणार नाही.
इथे गाणांच्या आणि चित्रांच्या, पुस्तकांच्या दुनियेत रममाण व्हायला होते, बिनदिक्कतपणे आणि तास अन् तास. विचार आणि भावना एकीकडे भिरकावून या छंदांमध्ये हरवायला होते. तेव्हा मन आहे की नाही असं काही जाणवत नाही, आपल्या सर्वांना मन आहे, नाहीतर आपले दिवस-रात्र कसे गेले असते, चैन-बेचैन यांचा खेळ नसताच तर आपण कसे जगलो असतो.
एखाद्या गर्द रानातून वाट काढत जावे, पुढे जाण्यासाठी काही खुणा दिसाव्या नाही तर मनाला वाटेल तो निर्णय घेऊन चालतच जावे. तेव्हा कुठे ऋषिकेश किंवा तत्सम ठिकाणी दोन क्षण विसावा मिळतो. कधी कारण ठावूक नसतानाही आपण चालत राहतो. कारण माहित करून घेण्याची इच्छा मरून गेलेली असते. अभिव्यक्त मात्र होत असतो, किंबहुना आपण नकळतपणे प्रत्येक क्षणाला व्यक्त होत असतो, ठरवून कधी, तर कधी न ठरवता, प्रसंगानुसार. प्रसंग नसतील तर आठवणी उन्मळून येतात, त्याही सरल्या तर मन निवर्ततं.
निर्वातातलं मन प्रेमासाठी उत्तम असावं, कारण विचार, भावना, प्रसंगानुचित किंवा कारणानुचित व्यक्त होणं, आणि आठवणी या सर्वांनंतर जर आपण उरलो की माणूस हा केवळ श्वासांवर जगणारा आदिम बेसिक जीव होतो, तिथे त्या क्षणाला आपण इतर तंतोतंत आपल्यासारख्या कुणाला प्रवेश दिला की प्रेम झालेच. प्रेमाचा व्यक्ती आपल्या शरीराला तर वाचतोच पण आपल्या विचारांना, भावनांना, आपले प्रसंगी वागणे, आपल्यात दडलेल्या आठवणी यांना ओळखून असतो.
राधाचे कृष्णावर प्रेम आहे म्हणजे त्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला राधा पुरती ओळखून आहे, त्याच्या एकांतसमयीची, मनातल्या निर्वातक्षणांची एकमेव ती अधिकारी आहे.
मध्यंतरी मी २ दिवस गुडगावला कॉन्फरन्ससाठी होतो, चकचकीत शहर. ओळख साफ न दाखवणारं. माणूस तिथे दोन गटात स्पष्ट विभागलेला दिसतो. मजूर आणि धनवान. मजूर अर्थात राबराब राबतोय आणि धनवानाच्या रोजंदारीचा अंदाज काही लागत नाही, पण अखंड धनाच्या राशी त्याच्या अंगावरून खाली घळघळत आहेत. चहुकडल्या गदारोळाला एकही सूर, संस्कृतीची जाण अजिबात जाणवून येत नाही.
फॉरेनर्सचा राबता मात्र जाणवण्याइतका आहे. टॉयलेट्सला त्यामुळेच पाण्याचे जोडलेले पाईप्स नाही, पेपर्स आहेत.
गाझियाबादला होतो, आणि तिथून देहरादूनची शताब्दी न पकडता अर्ध्या तास आधीची लखनऊची माझ्याकडून पकडली गेली आणि अलिगढला मला उतरावं लागलं, सकाळच्या ८ वाजेच्या अलिगढचं दर्शन मला झालं, अलिगढ चित्रपटाची आठवण झाली आणि कसबसा परत संध्याकाळी ४ वाजता हरिद्वारला येऊन पोहचलो. आता हसायला येत आहे, शताब्दी ही दिल्लीकरांसाठी नवीन नाही, तर माझ्यासाठी नविन असते, मुंबईत एखादी शताब्दी बघणारा मी, टिसीने विचारले देखील मी शिकला-सवरला तर दिसतो, पण नक्की खरं आहे ना..
गाझियाबाद अन्आर्गनाइझ्ड स्टेशन आहे, असं मी म्हणणार नाही, पण चुक पूर्णतः माझी नाही, अनाऊंसमेंट कोकलणारी बाई देहरादून शताब्दीबद्दल एक अवाक्षर उच्चारत नव्हती आणि डिस्प्लेवर देखील त्याबद्दल शांतता होती. मी अर्ध्या तास आधीच तिथे येऊन पोहचलो आणि समोर दिसणार्‍या शताब्दीवर नई दिल्ली - ... असं दुसरा शब्द न समजून यावा असं काहीतरी खरडलं होतं. मी चढलो आणि २ मिनिटांचा थांबा असलेली ती लखनऊ शताब्दी लगेच वेगाने पळायला सुरूवात झाली. माझ्या जागेवर आधीच कुणीतरी बसलेले होते, आणि टिसी तिथेच माझा करूणास्पद अपमान करायला उभा होता.
पण रामचंद्र सिरास यांची आत्मऽहत्या की निर्घृण खून असं अजूनही न उलगडलेल्या अश्या गूढ अलिगढला मला जाता आलं हे माझं मी आता नशीब समजतो.
समाप्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डायरी मधील नोंदी मनाला स्पर्शून गेल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0