'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस

काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे. हे विचार माझे नाहीत. हा ऋषीमुनिंनी दिलेला अध्यात्मिक , वैचारीक, व्यावहारीकदृष्ट्या महत्वाचा अनमोल ठेवा आहे.
----------------------------------------------------------
१. दररोज थोडा वेळ तरी समाधीचा अनुभव घ्या. Drop wishes. Invoke intuition. Make your mind available to intuition.
२. आपल्या मनात जे तरंग उमटतात ते आपले कर्म आहेच याबद्दल सहसा बरेच लोक क्लिअर असतात. परंतु आपल्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांच्या मनात काय तरंग उमटतात तेही आपलेच कर्म आहे.आपली जबाबदारी आहे.
३. मन-बुद्धी-चित्त (memory)-अहंकार - हे झाले internal life
४. षड्रिपु आपल्या मनात तसेच आसपास आपल्या वागणुकीमुळे कुरुपता निर्माण करतात.
५. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी सर्वात जड तत्व मग जल, नंतर अनुक्रमे वायु व अग्नी. अवकाशाच्या पोकळीत तर चेतना आहेच.
६. सत्व-रज-तम- ३ गुण तर वात-कफ-पित्त हे ३ दोष.
७. चराचरात प्रत्येक वस्तूमध्ये चेतना (conciousness) आहे.
८. शिळेपासून (अचर योनी) सजीवांपर्यंत प्रत्येकात चेतना आहे. प्रत्येकजण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती evolve होतो आहे.
- शिळा योनी , वृक्ष योनी या अचर योनी आहे.
- कीटक, पशु, मानव आदि योनी चर योनी आहेत.
९. गाडी लागते, फलाटावरती लोक चढतात. आपल्या डब्यात काहीजण प्रवासी म्हणुन येतात. कोणी थेपल्यांचा डबा उघडतं, कोणी बाहेरुन केळी आणलेली असतात. सारेजण वाटुन घेतात, गप्पा मारत प्रवास सुरु होतो. तसेच जीवनाचे आहे. आई-वडील-भाऊ - बहीण हे जीवाला मिळत जातात. सारे २ घडीचे प्रवासी असतात. आपापले स्टेशन/ गंतव्य स्थान आले, की उतरुन जातात.
१० प्रत्येक जीवाचा स्वभाव सत-चित-आनंदमयच आहे. Collective conciousness हा महासागर असेल तर individual concisousnee या लाटा आहेत. एकाला परमात्मा म्हणतात तर दुसर्‍याला जीवात्मा.
११. प्रत्येक क्षणी जीव २ अनुभव घेतो - Internal life आणि external life
१२. चेतनेचे ५ factors आहेत - Food, place, people,time & Karma
- जैसा अन्न वैसा मन
- जैसा संग वैसा रंग
- जैसा स्थान वैसा ज्ञान
१३ कर्म म्हणजे काय तर जीवाने ज्या ज्या योनिंमधुन आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे, त्या त्या योनीमध्ये त्याने काही संस्कार साठवलेले असतात, या पूर्वसंस्कारांमुळे तो घडत जातो. हा प्रभाव म्हणजे कर्म.
१४. जीवावर पडलेला तसेच जीवामुळे आसपासच्या जीवांवर पडलेला प्रभाव दोन्ही त्या त्या जीवाचे कर्म.
१५ ज्या स्वरुपाचे कर्म असते त्याच स्वरुपाचे फळ मिळते. तुम्ही पूर्वेला चालू लागलात तर दक्षिणेस कसे पोचाल?
१६. तुमच्या मनसा-वाचा-कर्मणामुळे जर भोवताली अप्रसन्नता निर्माण होत असेल तर त्या गोष्टीची तुम्ही जबाबदारी घ्या. ते तुमचे कर्म आहे.
१७ अन्य लोकांच्या मनात तुमच्याबद्दल अप्रसन्नता, राग, असूया असेल तर जबाबदारी घ्या. तुमचे मन शुद्ध राहील याची व अन्य लोकांचेही मन कसे शुद्ध, निर्विकार राहीलकते पहा. मैत्री करा, आत्मियता दर्शवा, स्तुती करा, caringly वागा. फळ मिळेलच असे नाही पण प्रयत्न तर तुमच्या हाती आहे.
१८. कोणी आक्रोश घेउन आला, तरी तुमच्या वृत्तीने तो निववा. dissipate करा. अवघड आहे खरे. पण रणजी ट्रॉफी काही सहज मिळत नाही. कोणत्या लेव्हलची टेस्ट मॅच खेळायची आहे ते तुम्न्ही ठरवा.
१९. मुमुक्षता म्हणजे काय तर परम तत्वापर्यंत पोचायची तहान.
२०. Food, people,time & Karma - optimize करा व जीवनाचे कल्याण साधा. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल.
२१. Time, energy & मन (mind) ही ३ साधने आहेत. लक्षपूर्वक पाहीले तर तुम्हाला कळेल की ज्या रीतीने तुम्ही ही साधने वापरता , त्या रीतीने त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळते. तसेच जीवन तुम्ही निर्माण करता.
२२. प्रत्येक जीवाच्या चेतनेचे वेगवेगळे आहेत - कोणात वीररस अधिक आहे तर कोणात करुण रस. एखाद्यात शांती रसाचे आधिक्य आहे तर एखाद्यात भक्तीरस. कोणात वैराग्य तर कोणात शृंगार.
२३. तुम्ही हे रस blossonm करा. तुमच्यात भक्तीरसाची कमी असेल तर रोज गा-नाचा व तो रस जागवा, develop करा. तुमच्यात वीररस असेल तर अनाथाश्रमात जा, करुणरस जागवा. ब्रह्मरस असेल तर ज्ञान मिळवा, वाटा.
२४. blossoming - intensify-सुंदरता.
२५ बाह्य जगापेक्षा आतील जगाला जास्त महत्व आहे. That is the real game.
२६ आता नको असलेले विचार, स्मृती कसे काढून टाकायचे तर तुमच्याकडे सृष्टीने दिलेली ३ साधने आहेत - उच्छ्वास, attention & intention. तुमच्या अप्रसन्नतेचे भाव असतील प्रत्येक उच्छावासाबरोबर delete करुन टाका. Attention = Cursor, प्रत्येक उच्छ्वास = delete button. file मोठी असेल तर delete व्हायला वेळ लागेल. फार काळ तुम्ही एखादा blame करणारा किंवा नकारात्मक विचार केलेला असेल तर तो पुसण्यास वेळ लागू शकतो पण नक्की पुसला जाइल.
२७ रिक्त व्हा. Empty व्हा. सत-चित-आनंद आपोआप reset होइल.
- आता 'सत' म्हणजे काय तर. त्याचे ३ गुण आहेत. -
-- Ability to know,
--desire to know
--Accumulation of what you already know
- चित म्हणजे काय तर
-- Aliveness. हाताला संवेदना आहेत, sensation आहे, उर्जा आहे. ही energy आहे चित. कुंडलिनी शक्ती.
- आनंद म्हणजे काय
-- तर प्राणशक्ती. काहींमध्ये अधिक असते तर काहींची कमी असते. प्रेममय आनंद, करुणामय आनंद, वीररसपूर्ण आनंद
-- जेव्हा तुम्ही आनंदी असता तुम्हाला ती सर्वाधिक नैसर्गिक स्थिती वाटते की नाही?
-- की दु:खी असता तेव्हा तुम्ही म्हणता हां हाच माझ स्वभाव आहे,. हे मला नैसर्गिक वाटते?
-- आनंद जागवा, aliveness आपोआप येतो. aliveness जागवा - आनंद आपोआप चढतो. सत चढाओ, चित & आनंद will expand. आनंद चढाओ, सत & चित will expand.
-- तीन पायांचे मेज आहे हे. एक पाय लांबला की अन्य दोन पायही लांबतात.
२८ आता blossoming चेही २ प्रकार आहेत
- Negative to Neutral
--षड्रिपु त्यागणे आणि मूळ सत-चित-आनंद स्वभाव प्रस्थापित करणे म्हणजे Negative to Neutral
- Neutral to Positive
-- स्वतःमधील शांतरस, वीररस, ब्रह्मरस आणि अन्य सकारात्मकता intensify करणे म्हणजे Neutral to Positive
२९. Celebrate Life लोकं काय म्हणतील याची पर्वा करणे सोडा.
३०. Enthusiasm, Love, Joy are infectious. Rather than you getting affected by ppl, you affect them with these positive traits
३१. सोहम मंत्राइतकाच अजुन एक मंत्र लक्षात ठेवा - So What
- कोणी स्तुती केली - So What\
- निंदा केली - So What
- कोणाच्या हातून चूकी झाली - So What
- आपल्याकडुन चूकी झाली - So What
३२. आपण आयुष्य अनावश्यक serious करुन ठेवलेले आहे. Go crazy. घरी, ऑफिसमध्ये Go crazy. Let ppl know you cannot be controlled
३३. Seriousness चा मुखवटा फेका. Declaire you are crazy, पागल. आणि तुम्ही free व्हाल.
३४. सहजता = सुंदरता. सहज व्हा. हा जो शहाणपणाचा मुखवटा तुम्ही धारण केलेला आहे तो तुम्हाला माहीत आहे बेगडी आहे, वरवरचा आहे तसेच लोकांनाही माहीत आहे की हा मुखवटा आहे. अंदरका मामला कुछ और है| कधीना कधी तो फाटेल.
३५. Whole game is that of conciousness. We are pieces of conciousness expressing conciousness.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Panpsychism?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Panpsychism?? म्हणजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली.

हे वाचूनच जरा बरं वाटलं. उद्या (बुधवारी) माझा दुसरा डोस आहे, कोव्हिड लशीचा. आणि आजारी पडले तर कष्ट न घेता, सहज रजा घेता येईल अशा विचारानं मी सध्या खुश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि आजारी पडले तर कष्ट न घेता, सहज रजा घेता येईल अशा विचारानं मी सध्या खुश आहे.

अधुन मधुन लागेल तशी घ्यायची रजा.
१० हक्काच्या आणि मी १० विकत घेतल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवाच्या शुक्रवारीच घेतली होती; शहराच्या दुसऱ्या टोकाला Wildflower Centre आहे. तिथे स्थानिक रोपांची विक्री सुरू आहे. तिकडे जाऊन चिकार झाडं आणली. मग शनिवारभर, पाठ मोडेस्तोवर सगळी झाडं बागेत लावली.

आम्हांला (सध्या तरी) अमर्यादित सुट्ट्या काढता येतात. गेल्या वर्षी मी आठवडा काढलेला दिवाळी अंकासाठी. आणि इतर दोन दिवस दोन-दोन तास दांडी मारली होती, झाडं लावायला. पण लोळून, काहीही न करण्यासाठी एखादा दिवस काढला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह!!! खूप मस्त.

Wildflower Centre आहे. तिथे स्थानिक रोपांची विक्री सुरू आहे. तिकडे जाऊन चिकार झाडं आणली. मग शनिवारभर, पाठ मोडेस्तोवर सगळी झाडं बागेत लावली.

ये हुइ ना बात!

पण लोळून, काहीही न करण्यासाठी एखादा दिवस काढला पाहिजे.

टोटली!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहराच्या दुसऱ्या टोकाला Wildflower Centre आहे.

Center.

(नाही म्हणजे, रोमात रोमताना रोमनांसारखे रोमावे, इतकेच; बाकी काही नाही.)

बाकी चालू द्या.

आम्हांला (सध्या तरी) अमर्यादित सुट्ट्या काढता येतात.

हे असे कोठे होते म्हणे? (कुतूहल + मत्सर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कागदोपत्री आम्ही कितीही सुट्ट्या काढू शकतो. म्हणजे, बंधन नाही दोनच आठवडे, चारच आठवडे वगैरे. स्टार्टप आहे.

मी गेल्या वर्षात पाच पूर्ण दिवस अधिक चार तास (औपचारिकरीत्या) काढले. शिवाय दोन दिवस मोडेम मोडल्यामुळे सक्तीची न-सुट्टी झाली. काही लोक आपापल्या देशांत जाऊन काम करत आहेत; तेही चालतंय. एक जर्मनीत आहे, एक रोमेनियात आहे. मीही भारतात दोन महिने जाऊन राहिले आणि महिनाभर जेमतेम काम केलं तरी चालेल.

पर्यायानं पगार शहराच्या मानानं जरा कमी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप छान. आम्हाला आजारी रजा अनलिमिटेड आहेत पण ऑफिशिअल रजा १० च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाबद्दल धन्यवाद. लेखामागची कळकळ, सद्भावना आणि या बाबतीत आपण केलेला अभ्यास लक्षणीय आहे. मात्र Occam’s razor ने लेखाचे बरेच संपादन करावे लागेल असे मला वाटते. आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत त्यातील अनेक गृहितके बसत नाहीत. जडवाद किंवा इहवादापासून इतक्या लांब जाण्यात अनेक वैचारिक धोके संभवतात. अर्थात आपणास या सर्वाचा फायदा होत असला आणि त्यातून इतरांस काहीच त्रास नसला तर उत्तमच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनेक वैचारिक धोके संभवतात.

अति तेथे माती हे सर्वच ठिकाणी लागू होते. ज्ञानमोदक पोथी मध्ये एक सुंदर उपमा आहे -
प्रपंच परमार्थ जाण| हे तुझे (गणपतीचे) दोन्ही चरण|
उभयऐक्यत्वे चालणे| घडे तुज||
तेव्हा जडवादाचेही महत्व आहेच. एकाच पायावर भार दिला तर तोल जाईलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विंदांची एक कविता मला खूप आवडते. तुह्मी वाचली असेल:

“त्याला इलाज नाही”

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चिताला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

- विंदा करंदीकर

विंदांसारख्या आयुष्य चांगलं समजलेल्या माणसाचीही अशी घालमेल होते. त्याबद्दल मला आदर आहे, पण निव्वळ जडवादाच्या पायावरही भक्कम इमारत बांधता येते अशी मला खात्री वाटते. असो!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

काय सुंदर कविता आहे. विंदा _/\_
परवा एका संस्थळावर कोणीतरी एका लेखकाचा विद्रोही आणि किंचित सनसनाटी मत मांडले होते - व्हॉट इफ देव म्हणुन हे जे काही आहे ते स्वत:च सैतानी/इव्हिल आहे? बापरे सटपटायला झाले मला. जास्तच का तर आपल्याला हे मत पटेल की काय असा विचार चाटुन गेला Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"There is nothing either good or bad, but thinking makes it so." - शेक्सपियर, "हॅम्लेट"मधून.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिपणं आवडली आणि कुठूनही सुरुवात करू शकतो.
प्रवासात ( रेल्वे/बस) कधीही खिडकीतून बाहेर पाहतो आणि ते आवडतं तसं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉपी करून वर्ड फाइल केली.( सोर्स लिंकसह) त्याची .epub file केली. टेक्स्ट साईज लहान मोठी करून पेज उलटून पाहता /वाचता येतंय मोबाइलात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile थँक यु. मीही मध्येच वाचते. मला अजुन व्हिडीओज ऐकल्यानंतर काही ॲड करावेसे वाटले तर वेगळ्या रंगाच्या फाँटमध्ये करणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0