चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

मिसेस कोठारींना सॅनिटोरियमचा अगदी कंटाळा आला होता. म्हणजे मेडिटेशन, फिश स्पा वगैरे त्यांना आवडायचं. पण ग्लुटेन फ्री, डेअरी फ्री जेवण किती दिवस खायचं? शेवटी त्यांनी सॅनिटोरियममधून चार दिवस सुट्टी घेऊन जवळच राहणाऱ्या लेकीकडे जाऊन राहायचा निर्णय घेतला.

माॅर्निंग वाॅकमध्ये खंड पडू नये म्हणून चालतच जायचं असं मिसेस कोठारींनी ठरवलं. आणि एका प्रसन्न पहाटे, तहानलाडू भूकलाडू वगैरे न घेता, त्यांनी मार्गक्रमण केले.

शरद ऋतू होता. हवेत किंचित गारवा होता. मिसेस कोठारी जंगलातल्या पायवाटेवरून झपाझप चालत होत्या. अचानक पानांची सळसळ झाली, आणि एक धूर्त कोल्हा त्यांच्यासमोर अवतीर्ण झाला.

आता कोल्हा म्हणजे फाॅक्स नाही. फाॅक्सला मराठीत खोकड म्हणतात. पाळीव मांजराच्या साधारण दुप्पट आकाराचं खोकड बघून वय वर्षे बाराहून मोठ्या कोणत्याही माणसाला भीती वाटणार नाही. पण कोल्हा - म्हणजे जॅकल - हा तुलनेने मोठा प्राणी आहे. गावठी कुत्र्याएवढ्या या प्राण्याची कोणाला भीती वाटली तर त्यांना दोष देऊ नका.

तर, कोल्हा म्हणाला, "म्हातारे, म्हातारे, खाऊ का तुला?"

(कोल्हा बोलला कसा, आणि मिसेस कोठारींना ते समजलं कसं, असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका. जंगल, कोल्हा, किंवा मिसेस कोठारी मंतरलेल्या होत्या असं समजा.)

मिसेस कोठारी म्हणाल्या, "खातोस तर खा. पण मी आहे साईझ झिरो. तुला मिळणार काय? त्यापेक्षा मी लेकीकडे जाते. चार दिवस राहते. तूपरोटी खाते. (इथे बहुधा डेअरी फ्री आणि ग्लुटेन फ्री अन्नाबद्दलचा राग उफाळून आला असावा.) जाडीजुडी होते. मग परत येते. तेव्हा तू मला खा."

कोल्हा म्हणाला, "डील! पण तू जाडीजुडी झाल्यावर मी तुला ओळखणार कसा? तुझं नाव तरी सांग."

मिसेस कोठारी म्हणाल्या, "जी जाडीजुडी म्हातारी दिसेल तिला तू खा. एवढा काय तो चोखंदळपणा?"

तरी कोल्ह्याने हट्ट केला आणि मिसेस कोठारींना आपलं नाव सांगावं लागलं. नंतर कोल्ह्याचा निरोप घेऊन त्या मार्गस्थ झाल्या, आणि यथावकाश लेकीकडे पोहोचल्या.

चार दिवस लेकीचा पाहुणचार घेऊन त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. लेकीने हॅलोवीनसाठी आणलेल्या एका प्रचंड भोपळ्यात बसून त्यांनी प्रवास सुरू केला. हा disguise असला तरी camouflage नव्हता. त्यामुळे कोल्ह्याने त्यांना थांबवले.

कोल्हा म्हणाला, "भोपळ्या भोपळ्या, त्या सिनियर सिटिझन मिसेस कोठारींना पाहिलंस का कुठे?"

त्याला उत्तर मिळालं, "म्हातारी कोठारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक!"

स्वतःलाच आदेश किंवा सूचना देणारा भोपळा बघून कोल्हा भयचकित झाला आणि पळून गेला. मिसेस कोठारी मार्गस्थ झाल्या.

एके ठिकाणी पायवाटेचे दोन पायवाटांमध्ये विभाजन झाले होते. राॅबर्ट फ्राॅस्टची कविता आठवत मिसेस कोठारींनी कमी प्रवास झालेली पायवाट निवडली, पण त्यामुळे त्या पुन्हा लेकीच्या घरी पोहोचल्या.

म्हातारी, भोपळा वगैरेंशी अनभिज्ञ असलेले लांडगा आणि वाघ यांना काहीही फरक पडला नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

>>>स्वतःलाच आदेश किंवा सूचना देणारा भोपळा बघून कोल्हा भयचकित झाला आणि पळून गेला. मिसेस कोठारी मार्गस्थ झाल्या.

मला ऐसीवर 'हसून डोळ्यात पाणी' हा ईमोजी कसा देतात माहिती नाही. पण मला हे वाचून तसं झालं. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

थोडक्यात, कोल्ह्याने खाण्यापेक्षाही वाईट झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली.

==========

जंगल, कोल्हा, किंवा मिसेस कोठारी मंतरलेल्या होत्या असं समजा.

तूपरोटी खाते. (इथे बहुधा डेअरी फ्री आणि ग्लुटेन फ्री अन्नाबद्दलचा राग उफाळून आला असावा.)

कोल्हा म्हणाला, "भोपळ्या भोपळ्या, त्या सिनियर सिटिझन मिसेस कोठारींना पाहिलंस का कुठे?"

"म्हातारी कोठारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक!"

राॅबर्ट फ्राॅस्टची कविता आठवत मिसेस कोठारींनी कमी प्रवास झालेली पायवाट निवडली, पण त्यामुळे त्या पुन्हा लेकीच्या घरी पोहोचल्या.

म्हातारी, भोपळा वगैरेंशी अनभिज्ञ असलेले लांडगा आणि वाघ यांना काहीही फरक पडला नाही.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॉक्स: खोकड
कोल्हा : जॅकल
लांडगा : वुल्फ
=========

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान चविष्ट कथा मोठ्या भोपळ्याच्या प्याकिंगमध्ये असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिच्चारा कोल्हा

आणि

बिच्चारी लेक.. मिसेस कोठारींची.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

बिच्चारा कोल्हा

कोल्ह्याच्या दुःखात तुमच्याप्रमाणेच मीही सहभागी आहे. मात्र,

बिच्चारी लेक.. मिसेस कोठारींची.

त्यापेक्षा, असा विचार करा:

कोलंबस हिंदुस्थान शोधायला म्हणून निघाला, परंतु उलट्या दिशेने गेला, नि अमेरिकेस पोहोचला. तद्वत, मिसेस कोठारी सॅनिटोरियमला जायला म्हणून निघाल्या, नि मध्ये भलताच रस्ता पकडल्यामुळे पुन्हा लेकीकडे पोहोचल्या.

यात तुम्हाला लेकीचे दुर्दैव दिसते. पुन्हा, आणखी काही महिने म्हातारीत तूपरोटी सारावी लागणार म्हणून. तुपाचे नि आट्याचे वाढीव भाव लक्षात घेता, ते समजण्यासारखेच आहे म्हणा. परंतु, यातून होणारे फायदे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाहीत. चालायचेच; प्रत्येकाचा नजरिया असतो.

दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.

- म्हातारी ज्या दुसऱ्या रस्त्याने जाऊन पुन्हा लेकीकडे पोहोचली, त्यावर तिला कोल्हा किंवा अन्य कोणतेही श्वापद भेटले नाही.
- सॅनिटोरियमपासून लेकीकडे जाण्याच्या तिच्या मूळ रस्त्यावर, सॅनिटोरियमपासून ते त्या फाट्यापर्यंतच्या सेक्शनमध्ये तिला कोल्हा किंवा अन्य कोणतेही श्वापद भेटले नव्हते.

युरेका! २ + २ = ४!!!

म्हातारीच्या त्या छोट्याश्या चुकीमुळे, तिला (आणि मानवजातीला) सॅनिटोरियमपासून ते लेकीच्या घरापर्यंत जाण्याकरिता एक नवा, पर्यायी (आणि कोल्हा- वा अन्य श्वापद- मुक्त!) रस्ता लाभला! A small mis-step for म्हातारी, a giant leap for humankind!!!

हा पर्यायी रस्ता थोडा लांबचा असेलही; परंतु, श्वापदमुक्त असल्याकारणाने, लेकीचा दर वेळेस म्हातारीस परतताना (कढईत नव्हे!) एकएक नवीन भोपळा देण्याचा खर्च वाचेल. (तसेही, कोल्हा दर वेळेस पुन्हापुन्हा त्याच ट्रिकला थोडाच बळी पडणार आहे?)

- हा पर्यायी रस्ता/फाटा मानवजातीच्या कल्याणाकरिता तथा वापराकरिता (एखाद्या ४- किंवा ६- लेन हायवेमध्ये) डेव्हलप करता येईल. (वाटल्यास त्यावर टोलही बसविता येईल.) तेवढेच बिल्डरांच्या घशांत पैसे!
- जुना (कोल्हा असलेला) फाटा सीलबंद करून तेथे राष्ट्रीय कोल्हा सँक्च्युअरी उभारता येईल. तेवढेच संवर्धनही झाले!
- नवा रस्ता लांबचा असल्याकारणाने, मिसेस कोठारींना लेकीकडे पोहोचण्यास अधिक वेळ लागेल. पर्यायाने, त्या लेकीकडे कमी वेळ राहतील. तेवढाच लेकीचा तूपरोटीवरील खर्च कमी! (शिवाय, नव्या रस्त्यावर टोलही बसविलेला असलास, लेकीकडे वारंवार जाण्यास मिसेस कोठारींना तेवढेच डिसइनसेंटिव! लेकीचा तूपरोटीचा खर्च तेवढाच वाचला. एन्व्हायरनमेंटल इंपॅक्ट, कार्बन फूटप्रिंट, मिथेन एमिशन्स वगैरे भानगडी मला नीटश्या कळलेल्या नसल्याकारणाने, (यातून होणाऱ्या) तत्संबंधी फायद्यांविषयी मी भाष्य करणार नाही, परंतु, तोही अँगल एकदा तपासून पाहण्यालायक आहे.)

पाहिलेत, किती फायदे आहेत ते!

Map

अवांतर - १: याचे श्रेय मिसेस कोठारींना तर जातेच, परंतु कोलंबसास अधिक जाते. कोलंबस (पर्यायी मार्ग घेऊन, चुकीच्या ठिकाणी पोहोचून, निव्वळ अपघाताने का होईना, परंतु) अमेरिकेचा ‘नव्या जगा’चा शोध न लावता, तर रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकेत जन्माला न येता. पर्यायाने, (पर्यायी मार्ग घेण्याकरिता मिसेस कोठारींना प्रवृत्त करणारी) त्याची कविता नसती. फार कशाला, मुदलातला भोपळासुद्धा नसता! (भोपळा हे कोलंबियन एक्सचेंजमधून ‘जुन्या जगा’त आलेले पीक आहे! आणि, हॅलोवीन जरी कोलंबसाच्या पुष्कळ आधीचे आणि जुन्या जगातलेच असले, तरी हॅलोवीनला भोपळे पोखरण्याची पद्धत अमेरिकेस गेलेल्या युरोपियन इमिग्रंटांनी सुरू केली. कोलंबसापूर्वीचे युरोपियन शेतकरी टर्निपे (शलगम?) पोखरीत.)

अवांतर - २: ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ गोष्टीचा (मूळ आवृत्ती; देवदत्त-व्हर्जन नव्हे.) नक्की vintage काय असावा? (एखादी पारंपरिक नेटिव अमेरिकन कथा वगैरे असल्याखेरीज) ही गोष्ट इ.स. १४९२हून अधिक जुनी नाही, हे उघड आहे. तसेच, ही गोष्ट मराठीव्यतिरिक्त इतरही भाषांत असल्याबाबत ऐकलेले नाही, आणि, त्या काळी मराठी माणसाचा नेटिव अमेरिकनांशी थेट संपर्क नसल्याकारणाने, नेटिव अमेरिकनांकडून कोणत्याही मध्यस्थाविना ती थेट मराठीत येणे दुरापास्त वाटते. याचाच अर्थ, (अ) ही कथा पारंपरिक नेटिव अमेरिकन नाही, आणि, (आ) अस्सल मराठमोळ्या मातीत जन्मलेली आहे. याचाच अर्थ १४९२नंतरची आहे. (किंबहुना, कोलंबस हिंदुस्थानात कधीही आला नाही, आणि अमेरिका सापडल्यानंतर हिंदुस्थानात सर्वप्रथम येणारा युरोपीय व्हास्को द गामा हा १४९८अगोदर आला नाही, या दोन बाबी लक्षात घेता, ही कथा १४९८नंतरची आहे, असेही म्हणता येईल.) याचाच अर्थ, ही कथा साधारणतः पाचशे ते सव्वापाचशे वर्षांहून अधिक जुनी निश्चित नाही. (असलीच तर त्याहून नवीच असेल.) ज्ञानेश्वरांच्या काळात नव्हती; तुकारामांच्या/शिवाजीमहाराजांच्या काळात होती किंवा कसे, ते तपासून पाहावे लागेल.

अवांतर - ३: पुण्यात ‘निवारा’ नावाचा एक प्रसिद्ध (आणि जुना) वृद्धाश्रम आहे. त्याचे लोकेशन पुण्यातल्या तितक्याच प्रसिद्ध (आणि जुन्या) ‘वैकुंठ’ स्मशानभूमीस अगदी लागून आहे. तद्वत, मिसेस कोठारींचे सॅनिटोरियमसुद्धा, कोल्हा असणाऱ्या जंगलाशेजारी स्ट्रॅटेजिकली बांधले असावे काय? (बोले तो, वेळप्रसंगी ‘मोघ्यां’नासुद्धा पाचारण करण्याची आवश्यकता नाही; कोल्हाच काय तो थेट विल्हेवाट लावेल. तेवढेच प्रदूषण कमी!)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात ‘निवारा’ नावाचा एक प्रसिद्ध (आणि जुना) वृद्धाश्रम आहे. त्याचे लोकेशन पुण्यातल्या तितक्याच प्रसिद्ध (आणि जुन्या) ‘वैकुंठ’ स्मशानभूमीस अगदी लागून आहे.
निवारा कडून वैकुंठाकडे जाण्याचा एक शॉर्टकट असावा आणि प्रबा जोगांप्रमाणे एका पाटीवर, तिथे जाण्याचा बाण दाखवून खाली निचरा असे लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्ता विचारल्यावर प्रश्नचिन्ह दिसायचे. मग तिथे जाण्याच्या मार्गाने सगळा उलगडा झाला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाविन्यपूर्ण, संशोधनात्मक लेखन माहितीपूर्ण आहे.

प्रस्तावित प्रकल्पाचा आवाका बघता, तो पूर्णात्वास गेलेला पहाणे बहुदा नशिबात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

कोल्हेपुराण चालूच ठेवा. तुमच्या स्टाईलने ' नाही गं म्हातारे टेरी भाजली' ची स्टोरी पण येऊ द्या.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हातारी कोठारी आवडलेली आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मेकप आणि इतर पर्फ्युम त्याला आवडले नसतील. मग त्याने विचार केला की लेकीकडे जाऊन आल्यावर वेगळा फ्लेवर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली वाचायला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0