निकिता

आज सकाळची गोष्ट.

मह्याचा नऊ वाजताच फोन आला, "भेंजो सद्गुरू स्टाॅलला ये पटकन. अर्जंट बोलायचंय."

"आई डोसे करतेय; खाऊन येतो. अर्ध्या तासात पोचतो."

मह्या पालीसारखा चुकचुकला. डोसा म्हणजे त्याचा वीक पॉइंट आहे.

एनीवे, मी डोसे हादडले आणि मग सद्गुरू स्टाॅलला पोचलो. मह्या लगेच बोलू लागला,

"ते बाजूचं रेस्टाॅरंट बघ. मी अर्धा तास काउन्ट करतोय. स्विगी आणि झोमॅटोचे एकोणीस जण येऊन गेले."

"बव्वं मग?" मी चहा पितापिता विचारलं.

"आता असा विचार कर. समज तू स्टेशनजवळ राहतोस आणि राबोडीच्या रेस्टाॅरंटमधून तू तंदूरी चिकन मागवलंस झोमॅटोनी."

"ओके.." हा मह्या काय विचार करतोय त्याचा ॲन्गल मला अजून कळत नव्हता.

"आणि समज मी राबोडीला राहतो आणि मी स्टेशनजवळच्या रेस्टाॅरंटमधून दालखिचडी मागवली. स्विगीवरनं."

मह्यानी डीप कश मारला आणि कन्टिन्यू झाला.

"म्हणजे झोमॅटोवाला ऑलदवे राबोडीवरून स्टेशनला येणार आणि स्विगीवाला ऑलदवे स्टेशनवरून राबोडीला जाणार. परत त्याच्या आधी तो कुठे होता आणि नंतर कुठला पिकअप येणार हे वेगळंच."

"ओके. पण यात आपला काय संबंध?"

"ऐक ना भेंजो. ते काय म्हणतात आंत्र .."

"आंत्रपुच्छ?"

"नाय रे भेंजो! आंत्रप्रेन्यरशिप! तर त्याची व्हिजन नाय तुला. तर हे एवढे स्विगी, झोमॅटो आणि बाकी वीफास्ट वगैरे लोक एवढा एक्स्ट्रा प्रवास करणार म्हणजे वेळपण जाणार, पेट्रोलपण आणि पैसापण. तर त्यांच्यासाठी आपण मेटा-ॲग्रेगेटर डिलिव्हरी ॲप बनवायची."

"मेटा-ॲग्रेगेटर? म्हंजे?"

"आता तू स्विगीवरनं मागवतो तर ते जेवण स्विगी बनवत नाय. स्विगी फक्त वेगवेगळ्या हाॅटेलातनं पिकअप करतं आणि वेगवेळ्या लोकांना डिलिव्हर करतं. राईट?"

"राईट."

"मग आपलं ॲप स्विगी आणि झोमॅटोवाल्या लोकांना एकमेकांकडे डिलिव्हर करायला सांगणार. म्हणजे स्विगीवाला आत्ता राबोडीला आहे आणि स्टेशनवरून पिकअप करायचंय तर स्टेशनजवळ असलेला माणूस - मग भले तो झोमॅटो नायतर वीफास्टचा असला तरी - पिकअप करणार आणि स्विगीवाल्याला रस्त्यात मधे कुठेतरी देणार. म्हणजे वेळ, पेट्रोल आणि पैसे सगळं वाचणार. आणि किती वेळ वाचला त्याप्रमाणे आपलं ॲप त्या लोकांमधे फी शेअर करणार आणि आपल्याला दहा टक्के कमिशन देणार."

मह्यानी दम खाल्ला आणि कश मारला.

"भेंजो आयडीया झकास आहे. पण तुला सुचली कशी?" मी अवाक होऊन विचारलं.

"अरे परवा रद्दीच्या दुकानात सहज पुस्तकं चाळत होतो तर चक्क निकिताचं एक पुस्तक सापडलं. तिनी तिच्या मोत्यासारख्या हस्ताक्षरात नाव लिहिलं होतं पहिल्या पानावर."

"मग?" मह्या जास्त शायर व्हायच्या आधी मी त्याला थांबवला.

"अरे ऑपरेशन्स रिसर्च नावाचं कायतरी आहे. तर त्यात पहिलाच टाॅपिक ट्रान्सपोर्टेशन म्हणून होता. तो वाचला आणि हे मेटा-ॲग्रेगेटर ॲपचं सुचलं."

मह्यानी पाॅझ घेतला आणि चक्क लाजत बोलला, "ॲमेझोनचं अलेक्सा असतं तसं आपल्या ॲपचं नाव निकिता ठेऊया. काय?"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही आयडिया थोर आहे!
खरंच असं मेटा ॲप बनवता यायला हरकत नाही!
डिलीव्हरी सर्व्हीसेसचं "ट्रिव्हागो" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात, ऑनलाइन डब्बावाला एक्स्चेंज शिष्टम?

कॉन्सेप्ट जुनीच असावी. फक्त, तिचा ऑनलाइन/ॲप आविष्कार कदाचित २१व्या शतकातला म्हणता येईल.

@देवदत्त: बादवे, निकिता कोण? (बोले तो, अॅप नव्हे. अॅपमागली बाई.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ठाणे प्रिमियर लीग" - ऐसीवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त निकिताचं नाव लिहिण्यासाठी एवढे कष्ट घेतले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ख्रुश्चेव्हची कृपा, दुसरं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै पण रश्यनात 'निकिता' वगैरे नवे पुरुषांची असतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ॲप स्टोअर मधे निकीता आली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||