अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय |

खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
"३९३७. कौडीकौडीसाठी फोडीताती शीर । काढूनी रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारती आरोळी धैर्यबळें ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचे ॥ ३ ॥"
.
"३९८७. देवाचिये पायी वेचू सर्व शक्ती । होतील विपत्ति ज्याज्या कांही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे माझी वाचा पुढें कांही वाव । आणी दुजे भाव बोलायाचे ॥ ॥ [त. दे. मनािे.] मनाची वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥ २ ॥ तुका ह्मणे घेईं विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥ ३ ॥"
.
"३९८८. पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्ती भय वाटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाही आइकलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भेडसाविलें [दे. भडसाचवलें.] ॥ ॥ विष्णुदासां गती नाही तरावया । [पां. ह्मणतील वांयां.] ह्मणती गेले वांयां [त. पां. कष्टत ही ॥ २ ॥ धिक्कारती मज करीतां कीर्तन । काय सांगों शीण ते काळीचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥ ४ ॥"
.
संदर्भासाठी फोटो अधिकृत प्रतीचे फोटो जोडत आहे. (आणि नवगाथेचे पण जोडत आहे)
.
आता संतांचे अभंग सुद्धा आपल्या मतलबासाठी बदलून खपवणारे हे "नवईतिहासकार " हे सर्व कशासाठी करत आहेत हे सर्व सुज्ञ जाणतात.
.
आता असा बदल करून ते पुस्तक प्रकाशित करणे याला कायद्यात काय शिक्षा आहे माहीत नाही .........परंतु मिठाच्या पाण्यात भिजवलेला पोकळ बांबू किंवा ओला फोक ........आणि त्यांचा मऊ पार्श्वभाग यांची गाठभेट होणे हेच उत्तम असं निदान मला तरी वाटतं. बाकीचं तुम्ही ठरवा.
.
.
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/33482559...
.
gatha
.
gatha
.
gatha
.
gatha
.
gatha

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेख महंमद नावाचा संत जर विठ्ठलाची भक्ती करू शकतो, आणि त्याने जर विठ्ठलाच्या अंगाला भोके पडत नाहीत, तर मग तुकाराम नावाच्याच संताने अल्लाची भक्ती केल्याने अल्लाच्या अंगाला तरी भोके काय म्हणून पडावीत?

आणि, अल्लाला जर काही आक्षेप नाही, (आणि तुकारामालाही नाही,) तर अडविणारे तुम्ही कोण? (तुमच्याच अंगाला भोके का बरे पडतात?) अल्ला आणि तुकाराम पाहून घेतील ना आपापसात, काय ते!

——————————

@संपादक: ही असंबद्ध, लांबलचक, निरर्थक, भिकार दर्जाची, द्वेषमूलक घाण आजपावेतो इथे नक्की काय म्हणून टिकून आहे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो पण ते अभंग तुकारामाचे नाहीतच ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुकारामांचेच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भा‌ऊ कदम ह्यांनी घरात गणपती उस्तव साजरा करण्या वर लोकांना आक्षेप.
सलमान खान नी आरती म्हटली म्हणून लोकांना आक्षेप.
तुकाराम नी (अभंग खरा की खोटा माहीत नाही पण एक वृत्ती) अल्ला चे अभंगात नाव घेतले म्हणून लोकांना आक्षेप.
कोण असतात है धर्माचे ठेकेदार .
आणि सर्व धर्मात हे ठेकेदार आहेत.धर्म रक्षक.
पण ह्या प्रवती मुळे खळखळत वाहणारा प्रवाह थांबतो आणि डबके बनत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सलमान खान नी आरती म्हटली म्हणून लोकांना आक्षेप.

एक ज़माना असा होता, की आमच्या मंगलसमारंभांत बिस्मिल्ला खाँसाहेबांची सनई ही नुसती चालतच नसे, तर लागत असे; नव्हे, आमच्या मंगलसमारंभांचा अविभाज्य घटक – ‘अटूट अंग’ – असे. आजमितीस लोक बहुधा त्यालासुद्धा आक्षेप घेतील.

एक ज़माना असाही होता, जेव्हा यूसुफ महंमदबक्ष पठाण नावाचा एक प्रोफेसर संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास करून त्यावर पांडित्यपूर्ण लेख, प्रवचने वगैरे देऊ शकत असे. ही खरे तर गौरवाची बाब असावयास हवी होती; नि त्या जमान्यात होतीही. आजमितीस लोक कदाचित त्याच्याही नावाने खडे फोडतील.

नाही, सलमान खानची तुलना बिस्मिल्ला खाँसाहेबांशी किंवा डॉ. पठाणांशी करण्याचा इरादा अर्थातच नाही, परंतु… ‘हिंदुत्व’ हिंदूंना इतके दळभद्री बनवीत आहे काय, की ज्यातत्यात – चांगल्यातसुद्धा! – आम्हाला वाकडेच दिसू लागावे?

असो चालायचेच!

आणि सर्व धर्मात हे ठेकेदार आहेत.धर्म रक्षक.

अगदी! हिंदू धर्म (‘हिंदुत्व’?) हासुद्धा याला अपवाद नाही.

पण ह्या प्रवती मुळे खळखळत वाहणारा प्रवाह थांबतो आणि डबके बनत..

नेमके! हिंदुधर्माचे डबके बनायला हिंदूंमधीलच (वाढू घातलेल्या) (राजकीय?) प्रवृत्ती जबाबदार आहेत. उगाच इतरांच्या नावांनी खडे का फोडायचे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‘हिंदुत्व’ हिंदूंना इतके दळभद्री
हा दळभद्री शब्द खरा एखाद्याच्या अवस्थेचे योग्य वर्णन करणारा शब्द आहे. पण गेल्या ५० वर्षांत तो एका अतिरेकी हिप्नॉटिस्ट नेत्याच्या तोंडी इतक्या वेळा आला की तो त्याचेच पेटंट बनला. आता ऐकवत नाही तो शब्द!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

…खूपखूप पूर्वी, आमच्या आजोबांच्या जमान्यात, ‘प्रभात’ चित्रपटकंपनीने ‘संत तुकाराम’ नावाचा सुप्रसिद्ध सिनेमा काढलेलानीत्. त्या सिनेमामध्ये, तुकारामाची भूमिका, शाहू मोडक नावाच्या सुप्रसिद्ध ख्रिस्ती नटाने साकार केलेलीनीत्.

आमच्या आजोबांच्या जमान्यात हे चालून गेले; नव्हे, आमच्या आजोबांच्या पिढीने त्या सिनेमालाही डोक्यावर उचलून धरलेनीत्, नि त्या नटालाही. आज बहुधा हाणून पाडतील. कालाय तस्मै नमः! दुसरे काय?

बाकी, तुकाराम जर ख्रिस्ती चालतो, तर त्या तुकारामाने अल्लाची भक्ती केल्याने नक्की काय बिघडते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्हाला फक्त विष्णुपंत पागनीसांचा तुकाराम माहीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माय ब्याड!

तुकारामात नि ज्ञानेश्वरात गल्लत झाली. चालायचेच!

(बाकी, अशी गल्लतसुद्धा आजकाल मार खाण्यास कारणीभूत होऊ शकतेच, म्हणा. आमच्या आजोबांच्या जमान्यात असल्या गलतीबद्दल फार फार तर आमची इज्जत, फारच झाले तर आमची लायकी काढली गेली असती. (ती तशीही फारशी नसल्याने आम्हांस फरक पडत नाहीच.) कालाय तस्मै नमः, दुसरे काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... आता वर शाहू मोडकांना 'हिंदू' नाव घेऊन लोकांची फसवणूक करतात, म्हणूनही त्रास देतील. आशिष नंदींबद्दल अशी वाक्ताडनं फेसबुकवर वाचलेली आहेत. दुदैवानं आणि सुर्दैवानंही, ते लोकप्रिय व्यवसायांत नाहीत. त्यामुळे त्यांचं लेखन फार कुणी वाचत नाहीत, फार कुणी नावंही ठेवायला जात नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवगाथेतील ते अभंग तुकाराम महाराजांचेच आहेत ना? कुणा दुसऱ्याचे लेखन तर त्यांच्या नावे खपवले नाहीये ना?
मग हरकत काय आहे?
अनुक्रम वर खाली झाला असेल... पण हे काही नविन नाही. काही वेळा असे बघायला मिळते. अनेक शतके जुनी गाथा, मूळ हस्तलिखित असणार. तिच्या सुरूवातीच्या आवृत्त्या देखिल हस्तलिखित असणार. त्यामुळे असा फरक असणे काही अगदीच अशक्य नाही.

यातील ३९३४ ते ३९३९ क्रमांकाचे अभंग आजही किती यथार्थ आहेत? दांभिकपणाचे अचूक वर्णन केले आहे त्यांनी.
राम जोशी चित्रपटातील हे गीत तेच सांगते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

मला असे वाटते की लेखकाचा मुद्दा असा आहे:
तुकारामांच्या गाथेची शासकीय प्रत अधिकृत आहे. त्यात तुकारामांचे अभंग (गृहीतक: जे त्यांनीच लिहिले आहेत अशी शहानिशा करून) प्रकाशित केले गेले आहेत.
परंतु काही प्रकाशक त्यात इतर ओळी घुसडून (गृहीतक: ज्या तुकारामांनी लिहिल्याचा पुरावा नाही) त्यांची वेगळी आवृत्ती प्रकाशित करत आहेत.
तुकारामांनी अल्लावर अभंग लिहावे किंवा लिहू नये हा मुद्दा नसून, जे अभंग तुकारामांनी लिहिलेच नाहीत ते त्यांच्या नावावर खपवून इतिहासाचा अपलाप करणे हा मुद्दा आहे.
म्हणजे ही केस intellectual dishonesty ची दिसते. त्यातून ह्या जास्तीच्या ओळी नेमक्या इतर धर्माशी संबंधित आहेत, आणि त्या धर्माशी संबंधित खटक्यांचा इतिहास आणि राजकीय वर्तमानसुद्धा खूप आहे. तर असे करण्यामागे malice आणि राजकीय हेतू असू शकतात असा मुद्दा आहे. जर कोणी अशा खोट्या ओळी घुसडत असेल तर ते चुकीचेच आहे.
टीप: गृहीतके जर बरोबर नसतील तर निष्कर्षही बरोबर नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला असे वाटते की लेखकाचा मुद्दा असा आहे:
तुकारामांच्या गाथेची शासकीय प्रत अधिकृत आहे. त्यात तुकारामांचे अभंग (गृहीतक: जे त्यांनीच लिहिले आहेत अशी शहानिशा करून) प्रकाशित केले गेले आहेत.
परंतु काही प्रकाशक त्यात इतर ओळी घुसडून (गृहीतक: ज्या तुकारामांनी लिहिल्याचा पुरावा नाही) त्यांची वेगळी आवृत्ती प्रकाशित करत आहेत.
तुकारामांनी अल्लावर अभंग लिहावे किंवा लिहू नये हा मुद्दा नसून, जे अभंग तुकारामांनी लिहिलेच नाहीत ते त्यांच्या नावावर खपवून इतिहासाचा अपलाप करणे हा मुद्दा आहे.
म्हणजे ही केस intellectual dishonesty ची दिसते. त्यातून ह्या जास्तीच्या ओळी नेमक्या इतर धर्माशी संबंधित आहेत, आणि त्या धर्माशी संबंधित खटक्यांचा इतिहास आणि राजकीय वर्तमानसुद्धा खूप आहे. तर असे करण्यामागे malice आणि राजकीय हेतू असू शकतात असा मुद्दा आहे. जर कोणी अशा खोट्या ओळी घुसडत असेल तर ते चुकीचेच आहे.
टीप: गृहीतके जर बरोबर नसतील तर निष्कर्षही बरोबर नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला मुद्दा कळला , खूप खूप आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तुम्ही शासकीय गाथा नीट तपासली नाही आणि उगाच कांगावा केला त्याचं काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अभंग तुकारामांचे नाहीत. तरीही काय फरक पडतो? तुकारामांच्या नावावर चिकार लोक आपली ठिगळं खपवत असतात; त्यातल्या त्यात ह्यांतून ध्रुवीकरण कमी होणार असेल तर काय अडचण आहे?

सदर विषयात संशोधन करणारे लोक अभंग खरंच तुकारामाचे आहेत का नाहीत, हे बघून घेतील. (किंवा कुणी संशोधक सदर विषयात रस घेणार नाहीत.) इतिहासाचा अपलाप करण्यातूनही इतिहास तयार होतो. आणखी काही संशोधकांना काम मिळेल.

बाकी काही नाही तर सरकारी, अधिकृत गाथा उपलब्ध आहे. आता आणखी कुणी काही घुसडायचा प्रयत्न केला तरी तो किती सफल होणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीन मुद्दे आहेत: १) ध्रुवीकरण कमी होणे: अश्या प्रकारच्या ओळी नव्याने घुसडून काही ध्रुवीकरण कमी होत नाही. उलट अल्लाच्या कवनांमध्ये दारू, तंबोरा वादन वगैरे निषिद्ध गोष्टी घातल्याबद्दल कुणी आग लावू शकतो. मागे एकाने शिवलिंग आणि काबा सारखेच आहे अश्या आशयाचे काही फेसबुकवर टाकले होते तर दंगली झाल्या. उद्या असेच ध्रुवीकरण कमी करण्यासाठी कोणी "विष्णू हा पूजनीय आहे" अशी महंमदाची एखादी हदीस घुसडून प्रसिद्ध करेल तर काय होईल सांगता येत नाही. खोटेपणा करून लोकांची मने जवळ येत नाहीत. उलट खोटेपणा उघड झाल्यावर त्यांना अधिकच राग येतो आणि दरी वाढते. ध्रुवीकरण कमी करण्यासाठी असा अप्रामाणिकपणा करणे हा मार्ग खचितच नाही. त्यासाठी इतर प्रामाणिक मार्ग आहेत.
२) ह्याआधीही असे झालेले आहे: पूर्वी प्रमाणीकरणाच्या सोयी नव्हत्या बरीचशी परंपरा मौखिक होती म्हणून काही अभंग प्रक्षिप्त झाले. पण त्यानंतर संशोधन करून प्रक्षिप्त अभंग identify केले गेले आणि अधिकृत प्रत तयार केली गेली. पूर्वी इलाज नव्हता म्हणून ज्या गोष्टी झाल्या त्याची पुनरावृत्ती आज होऊ देण्यात हशील नाही. Plagiarism ला तर खूप इतिहास आहे म्हणून आपला शोधनिबंध आज कुणी दुसऱ्याचे नावे लावू देईल काय ? इथेच कितीतरी लोक लेख लिहितात तर कुणाचे लेख कुण्या दुसऱ्याच्याच नावाने प्रसिद्ध केले तर ते योग्य होईल काय? पूर्वीपासून चोऱ्या, खून होताहेत म्हणून आज खून करू देणे क्षम्य होईल काय?
३) "इतिहासाचा अपलाप करण्यातूनही इतिहास तयार होतो. आणखी काही संशोधकांना काम मिळेल.": धन्य! ह्या महिन्यात दहाबारा चोऱ्या, दरोडे होईपर्यंत पोलिसांनी ढिम्म बसून राहावं. त्यांना अजिबात पकडू नये. डिटेक्टिव्ह पुस्तकांच्या लेखकांना तेवढंच काम मिळेल. सती प्रथा, अस्पृश्यता ह्यांना सुद्धा इतिहास आहे म्हणून त्या गोष्टी आज सुद्धा करू द्याव्या का? एकविसाव्या शतकातील सती ह्या विषयावर प्रबंध लिहायला इतिहास संशोधक सरसावतील.
जर ते अभंग तुकारामांचे असतील तर कुणाला न घाबरता तसेच प्रसिद्ध करावेत.पण नसतील तर खोटेपणा करून घुसडू नयेत. जे खरे ते खरे, खोटे ते खोटे. खोटेपणाचं समर्थन का करायचं?

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभंग नक्की तुकाराम ह्यांचाच आहे का किंवा त्याच्या पाठी हेतू काय असेल.
असे अनेक प्रश्न सोडले तर एक बाब मात्र खूप अभिनंदन करण्यासारखी आहे.
अल्ला च नाव अभंगात आहे मुस्लिम लोक हिंदी वापरतात.
म्हणून अभंग पण त्यांना समजेल अशा हिंदी शी साधर्म्य असलेल्या भाषेत च लिहला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अभंग खरेच तुकोबाचे असतील तर त्यांना विरोध करणे महामुर्खपणाचेच. मात्र, कुणी तरी असेच टाकले असतील तर ते ध्रुवीकरण कमी करतील म्हणून क्षम्य कसे ठरतील? उगाच मोझेसच्या नावाने झरथृष्टाच्या स्तुतीची कवणे किंवा कुणा इजिप्शियन कविच्या अश्याच स्तोत्रात विष्णूबद्दलचे काही श्र्लोक टाकून काय फायदा होणारंय?
त्यापेक्षा चांगली उदाहरणं ती पण खरी खुरी आहेत/असतील. तीच प्रचारीत करावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुकोबाच्या नावानं चिकार कवनं खपवण्याचाही दीर्घ इतिहास आहे. तो इतिहास नाकारणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...ती तसली कवने सहसा पौगंडीअश्लील असतात. (शाळकरी पोरांच्या – विशेषेकरून मुलांच्या – टोळक्यांतून वगैरे ऐकावयास मिळतात. शासकीय गाथेत चुकूनसुद्धा सापडणार नाहीत, याची खात्री आहे.) ही तशी वाटत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'बा, अभ्यास कमी पडतोय, एवढंच म्हणून मी बाजूला बसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘तुका म्हणे जगज्जेठी। लागावे पोरीच्या पाठी। जावे नदीच्या काठी। … पोरहि यावे त्याच्या पाठी॥’ हे… हे शासकीय गाथेत आहे???

‘आश्चर्य आहे’ म्हणणार होतो, परंतु… आजकाल कशाचेही आश्चर्य वाटेनासे झाले आहे. (विशेषेकरून शासकीय बाबतींत.)

(आणि, तुम्ही बऱ्या हे वाचायला शासकीय गाथा उघडून बसला होतात… असो चालायचेच.)

----------

पौगंडीअश्लील मजकूर वगळला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्हे, वरवर तुकोबाच्या वाटतील अशा ओळी, असे अभंग घुसडल्याच्या बऱ्याच घटना आहेत. बहुतेक चिं. वि. जोश्यांनी त्यावर जोकही केले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे आजच फेसबुकवर वाचलं. हे तुकोबाचं नाही, आणि तुकोबानं जे लिहिलं त्याच्या अगदी विपरीत आहे हे मलाही समजतं. पण तुकोबाच्या नावावर लोक काहीही खपवतात, ते फक्त बाळबोध पॉर्नच असतं असं नाही.

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील ओळी फेसबुक वर पोस्ट केल्याबद्द्ल कोणा केतकी चितळेला अटक झाली आहे. कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणात या पोस्टचा उल्लेख होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील ‘काव्य’ भिकार तथा तिसऱ्या दर्जाचे आहे, हे आगाऊ मान्य आहे. मात्र, यात अटक करण्याच्या लायकीचे नक्की काय आहे, हे समजू शकले नाही. ‘भिकार लिहिणे’ हा अटकेचा निकष असू नये.

(महाराष्ट्राची खोमेनीवादाकडे वाटचाल?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्वाच्य भाषा वापर ,शिवीगाळ, समाज माध्यमातून कोणी करत असेल तर त्याला विचार स्वतंत्र समजावे का?
ह्या अशा बेताल बोलण्यावर पण कायदेशीर कारवाई होत नाही असे लक्षात आले तर ही असली प्रवृत्ती साथी च्या रोग सारखी पसरण्याची भीती वाटत नाही का?
माझ्या मध्ये काही निकष ठरवून विचार स्वतंत्र,अभिव्यक्ती स्वतंत्र ह्यांची व्याख्या करण्याची वेळ आली आहे
आणि हे अधिकार कायद्याच्या चोकटित बसवणे नितांत गरजेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त भिकार लिहिण्याबद्दल अटक होत असती तर फेसबुकाचा भारतातला धंदा बंद झाला असता; अर्धी पुस्तकं बाजारात आली नसती. हे पाणी वेगळंच आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विचार स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वतंत्र ह्याचा स्वार्थी अर्थ लावून अर्वाच्य भाषा वापरणे,शिवराल भाषा वापरणे,कोणताच पुरावा नसताना ऐत्यासिक घटनेवर लिहणे,कोणाच्या हि श्रद्धा स्थानावर फक्त वाटते म्हणून नीच पातळीवर जावून लिखाण करणे हा खूप गंभीर गुन्हा आहे.
अशा वृत्ती मुळे हजारो लोकांचे प्राण उन्माद निर्माण झाल्या मुळे जातात
मरे पर्यंत तुरुंगात किंवा मरे पर्यंत फाशी अशी शिक्षा देण्याचा लायकीचा हा गुन्हा आहे....
अशा गुन्हेगार लोकांना विचार स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वतंत्र ह्या पवित्र विचार आड लपता येणार नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- प्रकाशजी साहेब अंबेडकर.
https://www.tv9marathi.com/politics/prakash-ambedkar-criticizes-devendra...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंदिरा जी काळातील गावातील काँग्रेस पुढारी .
इतके जी लावायचे की विचारू नका.

भाषणात.
इंदिरा जी. गांधी जी
नावाला पण जी आणि आडनाव लं जी.
हे काही आदर व्यक्त करण्यासाठी नव्हते.
आदर व्यक्त करायला नावाला जी समजून येते पण आडनाव ल पण जी म्हणजे लाचारी.
सहज आठवले म्हणून लिहले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Fb,you tube, आणि बाकी सर्व समाज माध्यम.

आल्या पासून कट्टरता वाढली आहे.
सर्व समाज मध्यम फ्री मध्ये उपलब्ध आहेत.
इतका दानशूर व्यक्ती आताच्या भांडवलवादी युगात असू शकतं नाही.
फडणवीस ह्यांची मुलाखत बघितली.
आणि त्यांनी खरेच सत्य सांगितले.
ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा कसे वातावरण होते.
कॉलेज निवडणुकीत एक मेका विरुद्ध निवडणूक लढली जायची पण.
निकाल लागल्यावर दोन्ही पक्ष मिळून विजय साजरा करायचे..
मग निवडून कोणी पण येवू ध्या.
त्या काळी तात्विक मतभेद असतं बाकी वैयक्तिक दुष्मनी बिलकुल नव्हती.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना बरोबर खेळी meli चे संबंध होते दोघे बसून चर्चा करत.

आज विरोधी पक्षाच्या मित्राच्या घरी चहा पिण्यास पण जाता येत नाही.मग चर्चा खूप लांब ची गोष्ट.
Fb,you tube किंवा बाकी समाज मध्यम माकडांच्या हाती आहेत ते परिपक्व नाहीत .
काही ही अर्थ काढतात.
म्हणून फडणीस साहेब दुसऱ्याच्या गाडी तून रात्री चे अशा मित्रांना भेटायला जातात.

हिंदू नी मुस्लिम लोकांचा द्वेष केलाच पाहिजे.
मुस्लिम लोकांनी हिंदू चा द्वेष केलाच पाहिजे.
नवबौध्द लोकांनी हिंदू चा द्वेष केलाच पाहिजे.
नास्तिक लोकांनी आस्तिक लोकांचा द्वेष केलाच पाहिजे.
असे काही तरी फालतू नीच विचार समाजात पसरले आहेत
.
या मुळे च ह्या अभंग सारखा चावट पना केला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0