भारतीय शिक्षा बोर्ड

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे. उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.

ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट करून मैकाले शिक्षण भारतात आणले. शिक्षणाचे मुख्य उद्देश्य होता, भारतीयांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, त्यांच्यात हीन भावना भरणे आणि ब्रिटीशांसाठी चाकर निर्मिती करणे. या व्यवस्थेत 11/12 वर्ष शालेय शिक्षण घेऊन ही, पारंपरिक ज्ञानापासूनही वंचित झालेले, अधिकान्श विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हते. भारत स्वतंत्र झाला. पण शालेय शिक्षणात बदल झाला नाही. आपल्या इतिहास, परंपरा आणि मुळांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आजची भारतीय शिक्षा म्हणजे 'बिना नींव की इमारत'. आज देशातील सीबीएससी समेत अधिकान्श शैक्षणिक बोर्डांचा उद्देश्य, '"इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो" अर्थात सर्वांना पास करून 12वी पास प्रमाणपत्र देण्या इतका राहिला आहे. 12 वर्ष शिकूनही अर्जित ज्ञांनाच्या मदतीने विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आपल्याच मुळांशी नाते तुटल्यामुळे तो आत्म सम्मानरहित हीनभावनेने ग्रस्त ही असतो. परिणाम आज देशात डिग्रीधारिच सर्वात जास्त बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यापाशी अर्थार्जन करण्याचे ज्ञान नाही आणि सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही.

देशात अनेक सरकारी बोर्ड आहेत. मग भारतीय शिक्षा बोर्डाची आवश्यकता कशाला. देशाच्या लोकांशी नाळ मुळांशी जोडून त्यांच्यात आत्मसम्मांनाची भावना भरण्याचे शिक्षण आजच्या व्यवस्थेत दिले जात नाही. सरकारी नौकरशाही आणि राजनीति मुळे शिक्षणात बदल काळानुसार होणे शक्य नाही. त्यासाठी गैर सरकारी बोर्डाची आवश्यकता आहे. या शिवाय सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च ही कमी होईल.

भारतीय शिक्षा बोर्डाचे गठन झाले आहेत. भारत सरकारने ही या बोर्डाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची नाळ आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. प्रत्येक भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही असू शकते. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले जाईल. गणित, विज्ञान ,इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले जाईल. ज्ञान विज्ञानात होणारे बदल वेळोवेळी समाविष्ट केले जातील. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले जाईल. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य जवळपास पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आशा आहे, हा बोर्ड शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांति घडवून आणेल.

अधिक माहिती यू ट्यूब वर सहज मिळू शकते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

अरे थेरड्या,
स्वातंत्र्यदिवसाच्या आदल्यादिवशी एका कोवळ्या पोराची मुख्याध्यापकाच्या माठातलं पाणी प्याला म्हणून हत्या झाली. कारण काय तर तो पोरगा दलित होता. ही परवाची गोष्ट आहे आणि तू काय बाता मारत आहेस?

तुला कुणी सांगितलं बाळा की 1850 च्या आधी एक दलित विद्यार्थी एका बनियाच्या मांडीला मांडी लावून शिकत असे? अरे भामट्या आता तरी डोळे उघड.

तू कुठल्या जगात राहतोस? त्या whatsapp uni मधून बाहेर पड. आणि जग उघड्या डोळ्यांनी बघ. पेन्शन खात फुकटच्या कथा रंगवू नकोस.

जस्ट शट द फक अप.

तुझे नुसते वय वाढलेले आहे, बुद्धी तर अडीच वर्षाच्या बाळाची देखील नाही. ते सुद्धा असल्या भंपक बंडला मारत नाही.

 • ‌मार्मिक5
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

आपल्या भावनांशी सहानुभूत आहे.

मात्र, श्री. विवेक पटाईत ही व्यक्ती तथा प्रवृत्ती (तथा एकंदरीतच पारंपरिक हिंदू थेरडेशाही) यांजबद्दल कितीही कमालीचा वैयक्तिक तिटकारा मला असला, तरीसुद्धा, तो व्यक्त करण्याकरिता सार्वजनिक संकेतस्थळाच्या सभ्यतेच्या (अलिखित) मर्यादांचे उल्लंघन मला उचित वाटत नाही.

सबब, तुमच्याकरिता नाही, माझ्याकरिता तर नाहीच नाही, परंतु किमान ‘ऐसी’करिता तरी अशा प्रकारची अभिव्यक्ती टाळावी (भले खुद्द ‘ऐसी’ला जरी त्याची पर्वा नसली, तरी), अशी कळकळीची विनंती.

(अवांतर: धर्मो रक्षति रक्षितः।, )

जस्ट शट द फ* अप.

(स्टारीकरण माझे.)

पुन्हा, भावनेशी सहानुभूत असलो, तरीही, सार्वजनिक ठिकाणी अशी भाषा योग्य आहे काय? हा पायंडा उचित आहे काय?

——————————

दुवा.

दुवा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे वाक्य म्ला लेखांत कुठे सापडले नाही.

1850 च्या आधी एक दलित विद्यार्थी एका बनियाच्या मांडीला मांडी लावून शिकत असे?
केवळ या वाक्या मुळे असांसदीय शब्दांचा वायु उत्सर्ग झाला काय ?

विवेक पटाईत, नील लोमस ई. लोक ऐसी वरचे माहीतगार, वंदनीय लोक आहेत. असले विचार वाचवत नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिट्टो! यू सेड इट! माझ्याकडून दहा हजार मार्मिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्राथमिक शिक्षण

भाषा,इतिहास,नागरिक शास्त्र ,भूगोल, हे सर्व शिकवले जाते.
मुल भाषा लीहण्यास आणि वाचायला शिकतात.
गणित मुळे आकडेमोड शिकतात.
नागरिक शास्त्र मुळे आपली सरकारी यंत्रणा कशी चालते ह्याचे बेसिक ज्ञान मिळते.
भूगोल मुळे.
हवामान,निसर्ग चक्र,अन्न चक्र ह्याची थोडीफार माहिती होते.
मानवी शरीराचे कार्य कसे चालते हे ढोबळ पने माहीत पडते.
हे सर्व तर घडतेच.
मग आताची शिक्षण पद्धती चुकीची कशी.
टक्केवारी ची स्पर्धा मात्र चुकीची आहे.
परीक्षा पद्धती चुकीची आहे असे मला वाटत.

शिक्षित बेरोजगार.
ह्याला शिक्षण जबाबदार नाही.
आपल्या कडे काही कामना हलक्या दर्जा चे समजले जाते.
तसे काम करणाऱ्या लोकांना इज्जत दिली जात नाही.
म्हणून फक्त खोट्या प्रतिष्ठा पायी शिकलेले कोणतेही काम करण्यास तयार होत नाहीत.
म्हणून ते बेरोजगार असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विवेक पटाईत ह्यांनी व्य्क्त केलेली मते धरमपाल ह्या गांधीविचाराच्या लेखकाने The Beautiful Tree ह्या आपल्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेली आहेत. हे पुस्तक https://archive.org/details/TheBeautifulTree-Dharampal/page/n273/mode/2up येथे उपलब्ध आहे. धरमपाल ह्यांचे लिखाण १८२०च्या सुमारास दक्षिण भारतात ब्रिटिशांनी केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे.

धरमपाल ह्यांच्या बाजूने आणि विरोधात बरेच लेखन शोधल्यास सहज सापडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्रजांनी केलेल्या सर्वेचा रिपोर्ट इथे पहाता येईल. दोनवेळ सर्वे केले गेले, १८२४ आणि १८२८ मध्ये. या चार वर्षातल्या काही आकड्यांमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे ते आकडे फारसे विश्वासार्ह नाहीत. दुसरे म्हणजे हे नुकतेच पेशवाई संपल्यावर नवीन राज्यकर्त्यांनी केले आहे. पेशवाईत असे कुठले सर्वे पेशवाईने केलेले असते तर ते जास्त विश्वासार्ह असते. आणि सगळ्यात मह्त्त्वाचे म्हणजे ब्रिटीशांचा (आणि एकंदर युरोपिअनांचा) "क्रिश्चन सिव्हिल सोसायटी" बनविण्याचा हेतू काही लपून राहिलेला नव्हता. मी नुकतेच डार्विनचे "ओरिजिन ऑफ स्पिशिज" वाचले. त्यावर कुतूहल चाळावले म्हणून डार्विनने पाच वर्षे केलेल्या १८३१ मधल्या वेगवेगळ्या खंडातल्या सागरी सफरीवर आधारीत "व्हॉएज ऑफ बीगल" हे पुस्तक वाचतोय. अशा सफरीत एखाद चित्रकार, पाद्री आणि डार्विनसारखे त्या त्या प्रदेशाचा भूगोल, जीवशास्त्र इ. ची शास्त्रीय पद्धतीने वर्गवारी करणारे, वेगवेगळ्या प्रजातींचे नमूना गोळा करणारे नॅचरलिस्ट वा शास्त्रज्ञ यासारखी माणसे असायची. सांगायचा मुद्दा इतकाच की, ख्रिश्चन सोसायटी बनविण्यासाठी शाळा - चर्च बनविणे यासाठी फंडिंग होत होती. शिवाय "परदेशी" जाउन पैसे कमविणे हा अधिकार्‍यांचा स्वार्थ असायचा. त्यामुळे रिपोर्ट बनविण्यामागचा हेतू लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

हरारीने सेपिअन्स मध्ये विज्ञानयुगाची सुरुवात कशी झाली यावर केलेले टिपणी पटते. या युगात मानवाच्या (समाजाच्या) दृष्टीकोनात बदल झाला. यापूर्वी, असा दृष्टीकोन कुठल्याही राज्यसंस्थेत वा संस्कृतीत नव्हता. असलाच तर तो एखाद दुसरा वैयक्तिक पातळीवरचा अपवाद असावा. १) अज्ञान खुल्या मनाने मान्य करणे (कारण यापूर्वीचा दृष्टीकोन जे काही आहे ते बायबल मध्ये / कुराणात / वेदात वा अजून कुठल्या ग्रंथात आहे, आणि नव्याने शोधण्याची गरज नाही) २) निरिक्षणांच्या नोंदी करणे आणि सांख्यिकी पद्धतीने त्याचे विश्लेषण करणे ३) आणि या मधून जे नवीन हाती लागेल त्यातून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. याची सुरुवात नक्कीच युरोपात झाली. ते मान्य करण्यात काहीच कमीपणा नाही.

मूळात अशी शिक्षणक्षेत्रातली (वा इतर कुठल्याही क्षेत्रातली) माहिती गोळा करण्याचा अवहाल केला गेला पाहिजे, अशा सांख्यिकीची नोंद केली गेली पाहिजे या दृष्टिकोनाचाच अभाव यापूर्वी होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आणि प्रतिसाद यातून बुद्धी आणि संस्कार यांचे रम्य दर्शन जाहले ! याच साठी केला होता अट्टाहास, एकतरी दिस गोड व्हावा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याकडे असलेली अपार लोकसंख्या पाहता शिक्षणाचं हेच होणं स्वाभाविक होतं.
त्यात इंग्रजांचा कितपत सहभाग आहे माहित नाही. इंग्रज कसं शिकवतात शाळांत?

प्रत्येक नागरिकाकडे लक्ष देणं, भारताच्या कोणत्याही व्यवस्थेला सर्वथा अशक्य आहे. विद्यार्थ्यांकडेतर त्याहूनही. शिक्षण हा संस्कार कधीच नव्हता, ते नेहमीच अर्थार्जनाचं साधन होतं. शिक्षण शिक्षण करून आरडाओरडा करणाऱ्या यच्चयावत राजकारण्यांची मुले आंतरराष्ट्रीय/कॉन्व्हेंट शाळांत शिकतात.
जवळपास १००पट पैसे भरून इंडिव्हिज्युॲलिटी विकत मिळते. कोणताही शिक्षक म्हणावं तितकं विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नव्हता. ते जुने एखाददुसरे शिक्षक विरळा. तेव्हा इतका लोकसंख्या विस्फोटही नव्हता.

रेडिटवर (पहा r/indianacademia) सरळ 'रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट'च्या बाता होतात. १० लाखाचं विंजनेरींग आणि २० लाखांचं एम्बीए करावं का, त्यातून कुठल्यातरी परदेशी फर्ममध्ये स्वस्त वेठबिगारीचं काम मिळेल का इतकंच लोकांचं नळीस्वप्न आहे. ते नाही जमलं तर सीएफे लायसन्स. तेही नाही तर सीए-सीएस. नाहितर युपेश्शि यम्पेश्शि.
इथे मॅस्लोच्या त्रिकोणाचा पायाच इतका पोकळ आहे की शिक्षणपद्धती, त्यातून होणारे संंस्कार इ. वर चर्चा करायची लायकी नाही आपली. मेकॉलेचा बकरा बनवणं सोप्पंय.

आणि ते आपल्याकडे सारं ज्ञान होतं वगैरे सुरू करूच नका. ते ज्ञान पुढे नेण्याऐवजी तेच कित्तीकित्ती ग्रेट म्हणण्यात आपण १००० तरी वर्षं वाया घालवली. मेकॉलेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आपण नसत्या लढाया करत आणि भजनं रचत बसलो होतो. जितके कवि लेखक झाले त्याप्रमाणात किती शिक्षक आणि वैज्ञानिक झाले?

बाबासाहेब पुरंदरेंचं एक जबरदस्त वाक्य आहे रा. शि. छ. मध्ये. (नेमकं नाही, पण ह्या धर्तीवर - महाराज सुरत लुटत असताना इंग्रज वखार जराही बधत नाही, उलट एक मार्च काढतात आणि परत जातात त्यावेळी बहुधा-) "बारक्याशा देशांमधून येणाऱ्या इंग्रजांमध्ये इतकी हिम्मत येते कुठून? हळू आवाजात त्यांचे कौतुक करावेसे वाटते. हळू का? कारण लाज वाटते!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

योग्य तेच तुम्ही lihaie आहे.

ग्रंथात लिहाले आहे म्हणजे तेच सत्य म्हणजे त्या पुढे विचार नाही करायचा.
राजे,महाराजे,साधू,संत ,संशोधक सांगतात ते च सत्य आपण प्रश्न च विचारायचे नाहीत
ह्या असल्या फालतू पणं मुळेच भारत मागे राहिला.
शिक्षण का घ्यायचे तर नोकरी मिळावी म्हणून.
हे सूत्र आहे.
असे विचार करणारा समाज काही भव्य दिव्य करेल हे शक्य च नाही.
ज्ञान कोणाला नको आहे.
फक्त नोकरी हवी आणि फिक्स पगार हवा.
उद्योगपती पेक्षा नोकरदार लोकांची संख्या खूप प्रचंड आहे.
हा त्याला पुरावा आहे.
डार्विन काही बोलला असेल ,आईनस्टाईन काही बोलला असेल किंवा कोणताही संशोधक काही बोलला असेल मी तरी त्या वर विश्वास ठेवत नाही जो पर्यंत मला ते पटत नाही.

आणि असाच वेगळा विचार प्रत्येकाने केला तर च नवीन विचार तयार होतील.
कोणाला श्रेष्ठ मानून डोळे झाकून घेवू नका.

हेच नवीन काही शिकण्या ची हिम्मत देईल.
सातवी मध्ये असताना शिक्षक शिकवत असतात कोणाचे तरी मत वाचून.
झाडांमुळे पावूस पडतो.
अनेक मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होतो .
पृथ्वी वर सर्वात जास्त पाणी आहे मग समुद्रात पावूस कसा पडतो
तिथे एक पण झाड नाही
पण असा कोणी प्रश्न विचारला की शिक्षक बोलणार तुला लय कळतंय बस खाली.
ह्याचा अर्थ शिक्षक तो विषय शिकवण्यास नालायक असतो.
त्याच्या कडे उत्तर नसते
शिक्षण पद्धती मध्ये हीच मोठी कमी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धडे नकोत फक्त अभ्यासक्रम हवा. पाठ केलेली उत्तर नकोत . स्वताच्या मेंदू नी मारलेली भरारी हवी

भारतीय परीक्षा पद्धती पूर्ण बदलणे गरजेचे आहे
माठ बिनडोक आपल्या परीक्षा पद्धती मुळे हुशार समजले जातात आणि हुशार आपल्या परीक्षा पद्धती मुळे नालायक समजले जातात
दृश्य उदाहरण
कमी शिकलेले सर्व उद्योगपती आणि सत्ता धारी आणि जास्त शिकलेले सर्व नोकर आणि आयएएस ,आयपीएस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद वाचले. सर्वच उत्तम होते. ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व्हे 1850 पर्यंतच्या कालखंडाचे आहेत. त्यात तफावत असेल तरी ही लाखो गुरुकुल होते आणि शिक्षण ही होते यात शंका नाही. तिथे साक्षर झाल्यावर कौशल्य युक्त शिक्षणाला महत्व होते. मैकाले शिक्षणासाठी गुरुकुलांची आर्थिक नाडी तोडून त्यांना नष्ट केले. पण त्याजागी फारच कमी शिक्षण केंद्र उघडले. त्यामुळे विशेषकर खेडे गांवात अनेक पिढ्या निरक्षर झाल्या. भारत स्वतंत्र झाल्यावर साक्षरतेची मोहीम जोरात सुरू झाली. आताची परिस्थिति, शाळेत प्रवेश करणार्‍या प्रत्येक विद्यार्थीला 'इधर से आलू डालो, उधर से सोना निकालो प्रमाणे 12वीचे प्रमाण पत्र देणे सुरू आहे. देशातील सर्वोत्तम सीबीएससी बोर्ड परिणाम ही पूरक परीक्षे नंतर 99 टक्के होतात. त्यानंतर स्नातक होणे ही कठीण नाही. परिणामी स्नातक झालेला 22-23 वर्षाचा कुठलीही कुशलता नसलेला तरुण युवक सरकारी नौकरी शिवाय दूसरा कुठलाही रोजगार करण्यास असमर्थ असतो. आपला देश संस्कृती परंपरा याचे ही ज्ञान त्याला नसते. स्वाभिमान आणि कुशलताहीन युवांचा उपयोग अराजकतेसाठी सहज होऊ शकतो. हजारो युवा रस्त्यावर उतरून तोडफोड करताना आपण पाहतोच. या शिवाय सरकारी शिक्षण संस्थांनांत पाठ्य पुस्तकांत सुधारणा करणे ही नौकरशाही मुळे अवघड असते. अश्या वेळी निजी संस्थांना ही पाठ्यक्रम निर्धारित करण्याची शिक्षा मंत्रालयाच्या नियमांनुसार अनुमति दिली पाहिजे. भारतीय शिक्षा बोर्डाचा उद्देश्य ही नौकरी करणारे नाही तर नौकरी देणारे घडविणे आहेत. बघू पुढे काय होते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1