बलात्कारावर ८० लाखांचे पांघरुण!

फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यात ८० लाख रुपयांचा समझोता झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने बिनॉय कोडिेयेरी या केरळमधील धनाढ्य व्यक्तीविरुद्ध मुंबईत नोंदविलेला बलात्काराचा गुन्हा व त्यातून सत्र न्यायालयात दाखल झालेला फौजदारी खटला रद्द केला आहे. ३९ वर्षांचे बिनॉय केरळचे माजी गृहमंत्री व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे माजी सरचिटणीस कोडियेरी बालकृष्णन यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. केरलमधील ‘देशाभिमानी’ हे मल्याळी वृत्तपत्रही कोडियेरी कुटुंबाच्या मालकीचे आहे.
बिनॉय कोडियेरी यांनी केलेली याचिका मंजूर करून न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. योगायोग असा की, कर्करोगाने आजारी असलेल्या बिनॉयच्या वडिलांचे या निकालानंतर चार दिवसांनी निधन झाले.
मुळच्या बिहारच्या असलेल्या व सध्या मुंबईत वास्तव्य करणाºया ३३ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून बिनॉय यांच्याविरुद्ध सन २०१९ मध्ये ओशिवरा पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला होता. त्याच्या तपासानंतर बिनॉयविरुद्ध लग्नाचे खोटे आमिष दाखवून १० वर्षे वारंवार बलात्कार करणे व धमकावणे या गुन्ह्यांबद्दल भादंवि कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०४ व ५०६ अन्वये दिंडोशी येथील सत्र न्यायालयात फौजदारी खटलाही दाखल केला गेला होता. उच्च न्यायालयाने आता हा गुन्हा व त्यातून उभा राहिलेला खटला रद्द केला आहे.
या फिर्यादी महिलेस बिनॉयपासून एक मुलगा झाला असून तो आता १२ वर्षांचा आहे. हा मुलगा नेमका कोणाचा हे ठरविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करून घेण्याच्या अटीवर सत्र न्यायालयाने बिनॉय यांना जामीन मंजूर केला होता. परंतु त्या चाचणीचे निष्कर्ष येण्याआधीच बिनॉय यांनी त्या मुलाचे पितृत्व मान्य केले. त्या मुलाचे कल्याण व्हावे या उद्देशाने बिनॉयने त्या फिर्यादी महिलेस ८० लाख रुपये दिले. या बदल्यात बिनॉयविरुद्धची फिर्याद मागे घेण्यास ती महिला तयार झाली. त्यासंबंधी दोघांमध्ये रीतसर लेखी समझोता झाला. त्यात त्या महिलेने बिनॉयशी आपण स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले होते, असे नमूद केले. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने बिनॉयविरुद्धचा गुन्हा व खटला रद्द केला.
ही महिला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिची नऊ भावंडे आहेत. बिहारमधील घरी खायची भ्रांत पडू लागली तेव्हा व खास करून वडिलांच्या निधनानंतर ही महिला सन २००७ मध्ये तिच्या विवाहित बहिणीकडे मुंबईत राहायला आली. तेथे ती नृत्य शिकली व चरितार्थासाठी दुबईला जाऊन तेथील एका डान्स बारमध्ये काम करू लागली. बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने बिनॉयचे वास्तव्यही त्यावेळी दुबईत होते. डान्स बारमध्ये त्याची या महिलेशी ओळख झाली. बिनॉयने तिला लग्नाचे आश्वासन दिले. ती महिला गरोदर राहिल्यावर बिनॉयने तिला मुंबईत आणले व तिला राहण्यासाठी एक भाड्याचा फ्लॅट घेऊन दिला. सन २००९ ते २०१९ अशी तब्बल १० वर्षे बिनॉय लग्नाचे आश्वास देत तिच्याशी शरीरसंबंध ठेवत राहिला. शेवटी बिनॉय विवाहित आहे व त्याला मुले आहेत हे त्या महिलेला कळल्यावर दोघांचे संबंध बिघडले व त्यातूनच तिने बिनॉयविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली.
खरे तर कायद्यानुसार पत्नी नसलेल्या स्त्रीशी पुरुषाने केलेला शरीरसंबंध बलात्कार न ठरण्यासाठी तो शरीरसंबंध त्या स्त्रीच्या संमतीने झालेला असावा लागतो. ही संमती तिने शरीरसंबंधांपूर्वी दिलेली असायला हवी. परंतु प्रस्तूत प्रकरणात आरोपीशी समझोता करून फिर्यादी महिलेने आरोपीने तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांस एका परीने पश्चात संमती दिली आहे. एरवीही बिनॉयवर खटला चालून त्याला शिक्षा झाली असती तरी तिला मानसिक समाधानाखेरीज काहीच मिळाले नसते. त्याऐवजी तिने समझोता करून निदान मुलाच्या उज््ज्वल भवितव्याची सोय केली. एका अर्थी आरोपीस रीतसर शिक्षा होण्याऐवजी फिर्यादी महिलेस त्याच्याशी समझोता करणे अधिक सोयीचे वाटावे, हे एका अर्थी फौजदारी न्यायव्यवस्थेचे तोकडेपण आणि अपयशही म्हणावे लागेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Money is a means of exchange.
It makes everything fair.
Makes transactions easier.
A person gets what he strives for.​
"Money is a great leveller. It makes things fair."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्नाचे आमिष दाखवून तत्कालीन संमतीने शरीर संबंधांना बलात्कार कसे काय म्हणतात? फसवणुक म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अमिश दाखवून शरीर संबंध हा बलात्कार होवू च शकत नाही.

जर त्या मध्ये सहभागी असणारी स्त्री 18 वर्षाच्या पुढील वयाची असेल तर.
अशा गुन्ह्यात अटक करण्याची पण गरज नसावी.

शरीर हे एक उत्तम मशीन आहे.
प्रतेक घटनेची नोंद शरीरात नक्कीच होत असणार.
त्या मुळे शरीर संबंध इच्छेने झाले की इच्छा नसताना ह्याची नोंद पण शरीर वेळ, काळ ह्या नुसार करत च असणार.
फक्त ते tech अजून माणसाकडे नाही.
तसा शोध जेव्हा लागेल तेव्हा बलात्कार विषयी कायद्याला पूर्ण बळ मिळेल.
आणि फ्रौड ,ब्लॅक mailing पूर्ण बंद होईल.

शरीर प्रतेक गोष्टी ची नोंद करत च असणार.
आणि आज नाही तर उद्या त्या टेस्ट अस्तित्वात येतीलच.
म्हणून आज पासूनच इच्छा नसेल तरी स्त्री सेक्शुअल
दृष्ट्या उत्तेजीत होवू शकते .हा फसवा विचार पसरवला जात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

दोन मिनिटांचा मोहाचा क्षण ची किंमत 80 लाख .

80 लाखात काय काय केले असते ह्या माणसाने .नको ते उद्योग करायची काय गरज होती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1