वृध्दाचे वीर्य गोठवून ठेवण्याचा आदेश

कृत्रिम गर्भधारणेने मूल जन्माला घालण्याच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रांच्या वापराचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कायद्यातील वयोमर्यादेसंबंधी तरतुदीच्या वैधतेचा निकाल होईपर्यंत या तंत्राने अपत्य जन्माला घालू इच्छिणाºया एका वृद्धाचे वीर्य प्रयोगशाळेत गोठवून जतन करून ठेवण्याचा लक्षणीय असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
६१ वर्षांचा पुरुष व त्याची ३९ वर्षांची पत्नी अशा दाम्पत्याने केलेल्या अर्जावर न्या. व्ही. जी. अरुण यांनी हा अंतरिम आदेश दिला. या वृद्ध पतीला ‘Permanent Artrial Fibrillation’ नावाचा हृदयाचा विरळा आजार आहे. या आजाराने त्याचे हृदय सध्या फक्त ४० टक्के क्षमतेने काम करीत असून त्याचे हृदय दिवसेंदिवस अधिक कमकुवत होत आहे. या याचिकाकर्त्याच्या प्रकृतीची ही परिस्थिती लक्षात घेता, नजिकच्या भविष्यात त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्याने केलेली याचिका निरर्थक ठरू नये, यासाठी हा आदेश देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या वृद्धावर हृदयाच्या आजारासाठी जेथे उपचार सुरु आहेत त्याच इस्पितळाने त्याचे वीर्य काढून घेऊन ते प्रयोगशाळेत गोठवून जतन केले जावे. मात्र या गोठविलेल्या वीर्याचा वापर कृत्रिम गर्भधारणा तंत्राने मूल जन्माला घालण्यासाठी करायचा की नाही हे याचिकेवरील अंतिम निर्णयावर अवलंबून असेल, असेही न्यायमूर्तींनी नमूद केले.
कृत्रिम गर्र्भधारणा तंत्रांचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ‘Assisted Reproductive Technology (Regulation) Act’ हा कायदा केला. या कायद्याच्या कलम २१(जी) मध्ये या तंत्रांचा वापर करून अपत्य जन्माला घालू इच्छिणाºयांसाठी कमाल वयामर्यादा निश्चित केली आहे. पुरुषासाठी ही कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे तर स्त्रीयांसाठी ५० वर्षे अशी आहे. कायद्याने ठरविलेली ही वयोमर्यादा घटनाबाह्य व अवैध ठरवून रद्द करावी, यासाठी या दाम्पत्याने रिट याचिका केली आहे. याचिकाकर्त्या पुरुषाच्या प्रकृतीची सद्यस्थिती पाहता, याचिका प्रलंबित असताना त्याचे काही बरोवाईट झाले तर याचिका निरर्थक ठरेल. तसे होऊ नये म्हणून याचिकेवर अंतिम निकाल होईपर्यंत वीर्य गोठवून जतन करून ठेवण्याची मुभा द्यावी, असा अंतरिम अर्ज या याचिकेत केला गेला होता. तो न्यायालयाने मान्य केला.
हे दाम्पत्य निपुत्रिक आहे. त्यांना कृत्रिम गर्भधारणा तंत्राने अपत्य जन्माला घालण्याची इच्छा आहे. दाम्पत्यामधील पुरुषाच्या हृदयाच्या आजारावर सन २०१९ पासून उपचार सुरु आहेत. आधीच ४० टक्के क्षमतेने काम करणारे त्याचे हृदय आणखी क्षीण होऊ नये, यासाठी प्रामुख्याने हे उपचार आहेत.मात्र ‘कोरोना लॉकडाऊन’मुळे त्यात खंड पडला. भविष्यात हृदय आणखी कमकुवत झाले तर जतन करून ठेवण्यसाठी त्याचे वीर्य काढून घेणेही शक्य होणार नाही. तसे झाले तर याचिका अंतिमत: मंजूर होऊनही काही उपयोग होणार नाही, असे प्रतिपादन या दाम्पत्याने न्यायालयात केले.
--------------
अंतिम निकाल देणेच योग्य
न्यायालयाने या प्रकरणात असा अंतरिम आदेश देण्याऐवजी याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेऊन अंतिम निकाल देणेच अधिक न्यायाचे झाले असते, असे मला वाटते. इस्पितळांमध्ये जसा अतिगंभीर आजारी रुग्णांना अग्रक्रम दिला जातो तशीच न्यायालयानेही अशी प्रकरणे तातडीने निकाली काढायला हवीत. याचिकेवर अंतिम निकाल होण्याआधी त्या वृद्धाचे निधन झाले किंवा तो हयात असताना याचिका अंतिमत: फेटाळली गेली तर आताच्या निकालाने त्या वृद्धाचे गोठवून जतन केले जाणारे वीर्य फेकून द्यावे लागेल. याचिका प्रलंबित असताना वृद्धाचे निधन होऊन याचिका अंतिमत: मंजूर झाली तरी गोठविलेले वीर्य वापरून कदाचित मूल जन्माला घालता येईल. मात्र तो वृद्ध जीवंतपणी अपत्यप्राप्तीच्या आनंदास मुकेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुल जन्माला घालणे हा मुळातच वैयतिक प्रश्न नाही.
रोग ग्रस्त मुल जन्म ने हा सामाजिक प्रश्न आहे..त्या रोग ग्रस्त माणसाचा त्रास पूर्ण समाजाला होतो.
देशाची संपत्ती त्या वर खर्च होते.
देशाच्या प्रगती वर परिणाम होतो.
निरोगी आयुष्य हवं असेल तर आई बाप योग्य निवडा.
हा एक टोमणा आहे आणि तो अगदी योग्य आहे.

पुनरुत्पादन करण्यास माणूस जर 18 vya वर्षी सक्षम असेल तर फक्त वयाच्या तिशी पर्यंत च तो निरिगी मुल जन्माला घालू शकतो
.आणि ह्याला नक्की शास्त्रीय आधार असेल.
फक्त तो मान्य करणे धोकादायक आहे म्हणून काही ही करणे सांगून नाकारला जातो.
त्या वृद्ध व्यक्ती चे वीर्य लगेच नष्ट करावे.
संतती जन्माला घालण्याचा त्या व्यक्ती लं बिलकुल अधिकार नाही.
असा कोर्टाचा निर्णय हवा होता.
तरी कोर्टाने सुवर्ण मध्य साधला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

समाजात राहणाऱ्या,व्यवस्थेचे फायदे घेणाऱ्या लोकांचे व्यक्ती म्हणून काहीच अधिकार असू शकत नाहीत
व्यक्ती स्वतंत्र हवं असेल तर समाजाचे फायदे घेता येणार नाहीत .व्यवस्थेचे फायदे घेता येणार नाहीत.
ह्या केस शी च हे मत आहे.
व्यक्ती स्वतंत्र कोणत्या बाबतीत दिले गेले पाहिजे त्या बद्दल T आनी c जागतिक स्तरावर निश्चित करणे गरजेचे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

संतती la जन्म देण्या अगोदर त्या couple मध्ये काही आनुवंशिक दोष आहे का?
ह्याची शास्त्रीय चाचणी झाली पाहिजे त्या नंतर च त्या कपल la मुल जन्माला घालू देण्याचा अधिकार दिला पाहिजे.
मानवाला निरोगी उत्तम संतती हवी आहे.
नीतिमत्ता काही कामाची नाही..
कोणतेच आनुवंशिक rogit गुणसूत्र नसणाऱ्या स्त्री पुरुषांना च फक्त मुल जन्माला घालण्याचा अधिकार असावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1