अर्थ समजून सांगा ना

ऐसिअक्षरेवर एक नवीन सोय आहे. श्रेणी देण्याची. ती संपादनासाठी उपयोगी आहे असे मॉडरेटर्स म्हणतात. ते एकवेळ मान्य करू. पण आणखी एक प्रॉब्लम आहे त्यावरून ऐसिअक्षरेवर श्रेणी फक्त प्रतिसादाशी संबंधित नाही. सदस्यांमध्येही आहे. म्हणजे काही समजले नाही तर 'फलाणे फलाणे यांनी अर्थ समजून सांगावा' असे वाचनात येते. पुर्वी वेदबिद म्हणजे काय आहेत ते समजवुन सांगणारे उच्चवर्णिय ठरले. इथे कविताबिविता समजून सांगणारे नवीन भाट निर्माण होत आहेत असे वाटते का? हे अर्थभाट म्हणजे नवी वर्णव्यवस्थाच नाही का?

हा धागा कवितांचा अर्थ सांगणार्‍या सदस्यांना हिणवण्यासाठी नाही पण उठसूठ अर्थ विचारणार्‍या वृत्तीविषयी आहे. या वृत्तीमुळे समाजाला कायम वर्णव्यवस्थेची गरज असते असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

धागालेखकाला पडलेल्या चिंता का बरे पडल्या असाव्यात हा प्रश्नाचे उत्तर मला काही कळत नाही. बहुतेक या चिंता अवास्तवच असाव्यात असे दिसते.

पहिल्या परिच्छेदात व्यक्त केलेल्या वर्णव्यवस्थेच्या उगमाला श्रेणी देण्याची सुविधा कारणी भुत आहे असे लेखकाला का वाटते? कोणतीही कविता कुठेही वाचली आणी तिचा अर्थ कळला नाही तर निर्माण होणारी अस्वस्थता मी सगळीकडेच अनुभवली आहे. कवितेची पुस्तकं वाचतानाही, काव्यवाचन ऐकतानाही आणी इंटरनेटावर काव्य वाचतानाही. त्यानंतर कवितेचा अर्थ शोधण्याची, काढण्याची प्रकीया वेगवेगळी असते. जर कवीलाच मी विचारू शकत असेन तर ते करण्यात मला कोणतेही लहानपण येईल अशी भिती मला वाटत नाही.

कविला अर्थ विचारावा का हा वेगळा मुद्दा. श्रेणी सुविधेमुळे असे काही झाले आहे याबद्दल स्पष्ट असहमती. असा अर्थ विचारल्याने श्रेणीव्यवथा निर्माण होते याच्याशीही स्पष्ट असहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चा सिरियसली घेतल्याबद्दल धन्यु.

१. चिंता का पडल्या?
उत्तर: चिंता पडलेल्या नाही. प्रश्न पडले आहेत.

२. पहिल्या परिच्छेदात व्यक्त केलेल्या वर्णव्यवस्थेच्या उगमाला श्रेणी देण्याची सुविधा कारणी भुत आहे असे लेखकाला का वाटते?
उत्तर: श्रेणी देण्याची सुविधा हे कारण आणि वर्णव्यवस्थेचा उगम हा परिणाम असा दावा केलेला नाही.

आता तुमचे मुद्दे-
कविता न समजल्यास अस्वस्थता वाटणे चांगली गोष्ट आहे. कविता समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे. न समजल्यास कवीला विचारावे. कवी प्रत्यक्ष असतांना इतरांना अर्थाचे ब्रोकर का करावे असा माझा प्रश्न आहे. स्वतः विचार करून पहावा. कविता आवडलेली असेल म्हणजे शब्द, नाद, लय तर थोडा वेळ द्यायला पाहीजे. लगेच कॉलिंग ह्यांव न त्यांव कशाला?

श्रेणीसुविधेमुळे काही झाले आहे असे म्हटलेले नाही. सदस्यांमध्ये श्रेणी असणे ही एक आपसूक निर्माण झालेली व्यवस्था आहे. तिच्याविषयी भाष्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लगेच कॉलिंग ह्यांव न त्यांव कशाला?

'लक्ष्मीनारायणाचा महिमा.' हा धागा आल्या-आल्या मी तेथे 'कॉलिंग घासू - चिंतु' असं लिहिलं आहे. मी त्याविषयी ठाम आहे. तुम्हाला ते कळलं नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या प्रतिसादाच्या आधारावरून सार्वत्रिकीकरण करत हा धागा काढला असेल तर...
असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक प्रतिसाद.

>>त्या प्रतिसादाच्या आधारावरून सार्वत्रिकीकरण करत हा धागा काढला असेल तर... तसा नाही काढलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात कै च्या कै काय?

चर्चा सिरियसली घेतल्याबद्दल धन्यु.

१. चिंता का पडल्या?
उत्तर: चिंता पडलेल्या नाही. प्रश्न पडले आहेत.

२. पहिल्या परिच्छेदात व्यक्त केलेल्या वर्णव्यवस्थेच्या उगमाला श्रेणी देण्याची सुविधा कारणी भुत आहे असे लेखकाला का वाटते?
उत्तर: श्रेणी देण्याची सुविधा हे कारण आणि वर्णव्यवस्थेचा उगम हा परिणाम असा दावा केलेला नाही.

आता तुमचे मुद्दे-
कविता न समजल्यास अस्वस्थता वाटणे चांगली गोष्ट आहे. कविता समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे. न समजल्यास कवीला विचारावे. कवी प्रत्यक्ष असतांना इतरांना अर्थाचे ब्रोकर का करावे असा माझा प्रश्न आहे. स्वतः विचार करून पहावा. कविता आवडलेली असेल म्हणजे शब्द, नाद, लय तर थोडा वेळ द्यायला पाहीजे. लगेच कॉलिंग ह्यांव न त्यांव कशाला?

श्रेणीसुविधेमुळे काही झाले आहे असे म्हटलेले नाही. सदस्यांमध्ये श्रेणी असणे ही एक आपसूक निर्माण झालेली व्यवस्था आहे. तिच्याविषयी भाष्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता जर दुर्बोध असेल तर एखाद्याला विचारण्यात काही तोटा आहे अस मला वाटत नाही
त्याने नवी वर्णव्यवस्था निर्माण होईल हा मुद्दा गैरलागू आहे
एखादा माणूस त्या क्षेत्रात प्रवीण असतो तेव्हा आपल्याला त्यातल जे काही अडत ते विचारतोच ना

उगाच काहीएक कळल नसताना केवळ शोऑफ करण्यासाठी वा चान असे प्रतिसाद देणं हा मूर्खपणा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

जरा विचार करून अर्थ विचारावा. कविता येऊन तासही होत नाही तेवढ्यात अर्थ सांगाचा ओरडा सुरू होतो.

कला आस्वादाच्या क्षेत्रात सगळेच प्रविण आहेत हो ताई.

कळत नसतांना चान चान करणं मूर्खपणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार करुनही अर्थ लागत नाही तेव्हाच विचारला जातो
जिथे अर्थ लागतो तिथे तशी कबुली दिली जाते
प्रतिसाद नीट वाचलेत तर लक्षात येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

थोडक्यात "गप्प रहा" ही संस्कृती जोपासायला सांगताहेत हे एकोळी संत...तुम्हा लोकांना ना सांगितल्याशिवाय मेलं काहीच कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री.एकोळी यांच्या विषयधाग्यातील एक भाग "पण उठसूठ अर्थ विचारणार्‍या वृत्तीविषयी आहे" असा आहे. या विषयावर मला काही मत मांडायचे असेल तर त्यातील '...अर्थ विचारणार्‍या वृत्तीविषयी' लिहावे असे म्हणेन. 'उठसूठ' च्या प्रयोजनामागे 'कुणीतरी काहीतरी चुकीचे करत आहे...' असा एक दडलेला स्वर प्रतिबिंबीत होत असल्याने ते मी टाळतो.

मी आजतागायत (पन्नाशीचा आहे) एकही कविता लिहिलेली नाही आणि लिहिण्याची सुतराम शक्यताही नाही (कारण काव्य ही एक जन्मजात देणगी असते या सूत्रावर माझा विश्वास आहे). पण "कविते" मुळे (आणि कवितेविषयीच्या घडामोडीमुळेही) मी फार भारावून जातो, इतकेच नाही तर कॉलेजजीवनात ग्रंथालयात 'सत्यकथा' अंक आल्याआल्या अधाशीपणाने मी कविता विभाग चाळत असे. जी कविता भावत असे तिचे पारायण करणे क्रमप्राप्त असतेच पण जिच्या छुप्या अर्थाने कविता हुलकावणी देत असे तिच्याबद्दल समवयस्क समानधर्मी मित्रांसमवेत रूमवर चर्चाही झडत. इतकेच काय पण जी कविता सर्वार्थाने उमगली नाही त्या कवीचा पत्ता शोधून (यासाठी "प्रकाशन डायरी" आणि "ललित" उपयोगी पडे) त्याला/तिला आवर्जून पत्र पाठविले जात आणि मग कवितेचा अर्थ त्यांच्याकडून प्राप्त झाल्यावर परत त्यावर मित्रांनी एकत्र येऊन चर्चा करणे हा नित्यनेम होता आणि मला वाटते ही 'वृत्ती' साहित्याच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त समजली जावी.

असे म्हटले जाते की कवीविषयी केवळ कवीनीच लिहिले तर ते दोघांच्या साहित्यनिर्मितीला पोषक असे असते. पण जर मला 'मर्ढेकर, खानोलकर, रेगे' भावतात आणि मी कवी नाही म्हणून मी त्यांच्यावर काही लिहायचे/बोलायचे नाही असा अलिखित नियम असेल तर मग तो माझ्या अभिरूचीवरच घाला आहे. तोच सूर पुढे नेऊन असेही म्हणेन की, उद्या मला "दुसरा पक्षी" नीटसा समजला नाही तर मी इथल्या एका कविताप्रेमी सदस्याला त्या कवितेच्या नादाविषयी, गूढ अर्थाविषयी विचारले तर मी काही चुकीचे करतो असे कुणी म्हणणार नाही.

कविताच नव्हे तर एकूणच साहित्याच्या कोणत्याही अंगाचा वेध घेताना त्यानुसार आपल्या जडणघडणीत ते संस्कार झाले आहेत का याकडे लक्ष द्यावे लागतेच. अर्थात हा अनुभव व्यक्तीसापेक्ष असतो. मला नामदेव ढसाळ भावतात पण म्हणून त्यामुळे अरुण कोलटकर समजतील या भ्रमात मी राहाणार नाही. त्यासाठी समजुतीचे 'जनुक' पैदा करणे निकडीचे असते आणि तसे ते मिळविण्यासाठी 'कविता' अर्थही समजणे त्या वृत्तीसाठी पोषक ठरणार असल्याने एखादी कविता समजली नाही तर तिचा अर्थ समजावून सांगण्यासाठी बाह्य मदतीला हाक देणे मला तरी गैर वाटणार नाही.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक आणि रोचक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ऐसिअक्षरेवर श्रेणी फक्त प्रतिसादाशी संबंधित नाही. सदस्यांमध्येही आहे. म्हणजे काही समजले नाही तर 'फलाणे फलाणे यांनी अर्थ समजून सांगावा' असे वाचनात येते. पुर्वी वेदबिद म्हणजे काय आहेत ते समजवुन सांगणारे उच्चवर्णिय ठरले. इथे कविताबिविता समजून सांगणारे नवीन भाट निर्माण होत आहेत असे वाटते का? हे अर्थभाट म्हणजे नवी वर्णव्यवस्थाच नाही का?

मला वाटते ते असे: एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला फारसे काही कळत नसले तर काही प्रकारचे प्रतिसाद संभवतात. एका प्रकारच्या प्रतिसादाला मी माझ्यापुरता 'पुलं' प्रतिसाद म्हणतो. 'ते आधुनिक कला वगैरे आपल्याला काही कळत नाही ब्वॉ. मी काढलेली गाय पाहून आमच्या मास्तरांनी...' अशा प्रकारचे पुलंचे लिखाण वाचून मला हे नाव सुचले. अशा प्रकारच्या प्रतिसादांनी किरकोळ रंजन होऊ शकते खरे, पण खर्‍या जिज्ञासूंना अर्थातच याचा काही फायदा होत नाही. दुसर्‍या प्रकारचा प्रतिसाद: स्वतः कष्ट घेऊन ती गोष्ट कळून घेण्याचा प्रयत्न करणे. जर एखादे क्षेत्र माझ्या विशेष आस्थेचे अथवा त्या क्षेत्रातला व्यावसायिक या नात्याने जवळचे असल्यास मी असे करणे अपेक्षित असते, पण न कळणार्‍या प्रत्येक गोष्टीबद्दल असे करणे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही आणि तसा आग्रहही नसावा. अशा वेळी इतरांची मदत मागण्यात कमीपणा वाटू नये. माझ्या घरातली प्रत्येक वस्तू मी बनवत नाही. तसे करायला गेलो तर त्या बनवण्यात मी तज्ज्ञ नसण्यामुळे मला निकृष्ट वस्तू सहन कराव्या लागतील अन उदरनिर्वाहासाठीही मला वेळ मिळणार नाही ते वेगळेच.

आता प्रश्न राहिला तो भाटगिरीचा आणि वर्णव्यवस्थेचा. 'भाट' या शब्दात 'स्तुतिपर वर्णन करणे' असा अर्थ अभिप्रेत आहे असा माझा समज आहे. 'मला उमजले ते असे आहे' असे म्हणून अर्थ समजावून देण्यात कुणाची स्तुती होते का, याविषयी मी साशंक आहे. विविध शब्दकोशांत 'भाट' या शब्दाचा काय अर्थ दिलेला आहे, अथवा साहित्यात त्याचा कसा वापर केलेला आहे हे सांगून त्यावर आपण काही भाष्य कराल, तर ते सर्वांना उद्बोधक ठरेल असे मी इथे म्हणतो. आता असे म्हणण्यामुळे मी आपणाला कोणत्याशा वर्णव्यवस्थेत उच्च स्थानावर नेऊन बसवतो का? निदान माझ्यापुरते बोलायचे झाले, तर सामान्यतः कोणत्याही त्रयस्थाविषयी जितका आदर बाळगणे अपेक्षित असते, तेवढाच आदर मला यात अपेक्षित आहे असे मी इथे नोंदू इच्छितो. आपणास मात्र यात काही विशेष बहुमान दिसल्यास तो योगायोग समजावा.

>>हा धागा कवितांचा अर्थ सांगणार्‍या सदस्यांना हिणवण्यासाठी नाही पण उठसूठ अर्थ विचारणार्‍या वृत्तीविषयी आहे. या वृत्तीमुळे समाजाला कायम वर्णव्यवस्थेची गरज असते असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

आपल्याला जे कळत नाही त्याला 'पुलं प्रतिसाद' देणे हे मला एक प्रकारे वर्णव्यवस्थेसारखे वाटते, कारण 'मला हे कळत नाही ब्वॉ' असे म्हणताना त्यात काहीसा 'तरीही आमचं उत्तम चाललंय की! थोडक्यात, हे न कळल्यानं जगात कुण्णाचं काही अडत नाही' असा काहीसा छद्मी सूर आढळतो. याउलट 'माझ्या आस्थेच्या विषयात मी विचार प्रकट करेन अन इतरांच्या आस्थेच्या विषयांत त्यांनी विचार प्रकट करावेत' ही अपेक्षा मला काहीशी लोकशाहीवादी वाटते. उदा: ज्याला पाककृती बनवाव्याशा वाटतात त्याने त्या बनवाव्यात अन ज्याला त्या खाव्याशा वाटतात त्याने त्या खाव्यात. ज्यांची घ्राणेंद्रिये उत्तम आहेत ते कदाचित निव्वळ वासाने त्याविषयी मत व्यक्त करतील, अन ज्यांची जीभ तयार आहे ते पदार्थांची चव घेऊन त्यांतल्या घटकपदार्थांविषयी, त्यांच्या सांगडीविषयी आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या रसास्वादाविषयी चर्चा करतील; पण स्वतः काही बनवणार मात्र नाहीत, किंवा बनवतीलही. यात पदार्थ बनवणारे उच्च श्रेणीचे किंवा त्यावर साधकबाधक चर्चा करणारे उच्च श्रेणीचे असे काही अभिप्रेत नसावे.

याउलट, विविध संकेतस्थळांवर अनेक वर्षे वावरणारे कित्येक सदस्य तर एकमेकांना मित्रत्वाच्या नात्याने अशी मदतीची हाळी अर्थात हक्काने घालू शकतात; पण ज्यांच्यात असे हक्काचे नाते नाही अशा सर्वांनाही या संकेतस्थळावर सहज वावरता यावे अन एकमेकांना हक्काने हाळी मारता यावी असे वातावरण निर्माण होण्यासाठी सदस्यांनी झटावे असे वाटते. असे वाटण्यात कोणतीशी वर्णव्यवस्था अभिप्रेत आहे असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मार्मिक आणि रोचक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो एकोळीताई/भाऊ, किती बादरायण संबंध लावायचे?? तुम्ही तर अगदी सुतावरून स्वर्गच गाठलाय!

ऐसी अक्षरेचा छोटासाच असलेला इतिहास पाहता ज्या लोकांना कवितेचा अर्थ समजवून सांगा असं म्हटलंय त्यांनी या पूर्वीही बर्‍याच वेळा जरा अवघड, क्रिप्टीक कवितांचा अर्थ समजावून सांगितला होता. अर्थातच अनुभवातून निर्माण झालेल्या विश्वासाने जर कोणी कुणाला मदतीची हाक दिली तर त्यात वर्णव्यवस्था कुठून आली??

अलाने फलाणे यांचे नाव जरी तेथे असले तरी ते प्रतिनिधीक समजावे आणि ज्याला कोणालाही कवितेचा अर्थ समजावून सांगता येत असेल त्याने सांगावा, एवढाच साधा अर्थ आहे. आता कोणी कोणाला कवितेचा अर्थ विचारूच नये अशी अपेक्षा करणे हा दुराग्रह वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

मार्मिक आणि रोचक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री पाटील, चिजं, स्मिता यांच्याशी सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

सर्वसाधारण पण प्रातिनिधिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांना श्रेण्या देऊन झाल्याने प्रतिसाद देणे सुरू करतो.

१. सगळे सगळ्या क्षेत्रात तज्ञ नसतात. मग न समजलेले विचारण्यात काय कमीपणा?
=> मला समजा माझ्या कंप्युटरच्या आत काय चालते ते माहीत नाही. ते काय आहे हे विचारण्यात अजिबात कमीपणा नाही. चर्चा त्याविषयी नाही.

२. भाट आणि अर्थ सांगणे यात काय संबंध?
=> काहीच नाही. अनेक कवितांचे अर्थ विचारण्याचा ओरडा मसंवर केला जातो. काहीच कवितांचा त्यांना लागलेला अर्थ सांगतात. अर्थसांगे प्रतिमांमध्ये पाहीजे ते अर्थ शोधू शकतात. कवितांचा अर्थ सांगताना दाखवलेली निवडकता आणि स्वत:च्या हिशोबाने शोधलेला अर्थ यामागे कवी-कवितेचा गौरव करण्याचा हेतू दिसतो. म्हणून भाट. मोल्सवर्थवर empty chatterer असा अर्थही आहेच.

३. ढसाळ समजतात, कोल्हटकर नाही. मग विचारले तर काय बिघडले? कवितेविषयी कवींनीच लिहावे का वगैरे.
=> कवितेविषयी कोणीही लिहावे. विजया राजाध्यक्षांनी मर्ढेकर दत्तक घ्यावेत. आणखे कोणी आणखी कोणाला घ्यावे. वाचकांनी वाचावे. आक्षेप नाही. पण वाचकाने राजाध्यक्षांचीच पुस्तके वाचावीत आणि मर्ढेकरांची कविता वाचूच नये याला काय म्हणाल. तसेच इथे आहे. कविता जरा वाचावी तर. अगदीच आयुष्य घालवायचे नसले तरी काही तास तरी मनात ठेवावी. मग विचारा अर्थ. इथे तर कविता पडली रे पडली की अर्थ पाडा असे होते.

४. कविता कळली नाही तर काय बिघडले, मला काडीचाही फरक पडत नाही आणि वरणव्यवस्था वगैरे.
=> हे खरेच आहे. कविता कळली नै तर कळली नै. कळली नै हेही कवितेचे एक इंटर्प्रिटेशन आहे. यातून कसली वर्णव्यवस्था निर्माण होते असे वाटत नाही. 'वेदात काय लिहिले आहे यामुळे मला झ्या* फरक पडत नाही.' आणि 'वेदात लई भारी लिहिले आहे आणि ढमके शास्त्री ते लै भारी सम्जुन सांगतात' या दोन्ही विधानातले कुठले वर्ण निर्माण करते? ऐतिहासिक पुरावा काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे बाबा खालचा प्रतिसाद लोकांना वाचू दे. मधल्या काळात निरर्थक काय ते तरी सांग.

सर्वांना श्रेण्या देऊन (Score:0 निरर्थक)
एकोळी

सर्वांना श्रेण्या देऊन झाल्याने प्रतिसाद देणे सुरू करतो.

१. सगळे सगळ्या क्षेत्रात तज्ञ नसतात. मग न समजलेले विचारण्यात काय कमीपणा?
=> मला समजा माझ्या कंप्युटरच्या आत काय चालते ते माहीत नाही. ते काय आहे हे विचारण्यात अजिबात कमीपणा नाही. चर्चा त्याविषयी नाही.

२. भाट आणि अर्थ सांगणे यात काय संबंध?
=> काहीच नाही. अनेक कवितांचे अर्थ विचारण्याचा ओरडा मसंवर केला जातो. काहीच कवितांचा त्यांना लागलेला अर्थ सांगतात. अर्थसांगे प्रतिमांमध्ये पाहीजे ते अर्थ शोधू शकतात. कवितांचा अर्थ सांगताना दाखवलेली निवडकता आणि स्वत:च्या हिशोबाने शोधलेला अर्थ यामागे कवी-कवितेचा गौरव करण्याचा हेतू दिसतो. म्हणून भाट. मोल्सवर्थवर empty chatterer असा अर्थही आहेच.

३. ढसाळ समजतात, कोल्हटकर नाही. मग विचारले तर काय बिघडले? कवितेविषयी कवींनीच लिहावे का वगैरे.
=> कवितेविषयी कोणीही लिहावे. विजया राजाध्यक्षांनी मर्ढेकर दत्तक घ्यावेत. आणखे कोणी आणखी कोणाला घ्यावे. वाचकांनी वाचावे. आक्षेप नाही. पण वाचकाने राजाध्यक्षांचीच पुस्तके वाचावीत आणि मर्ढेकरांची कविता वाचूच नये याला काय म्हणाल. तसेच इथे आहे. कविता जरा वाचावी तर. अगदीच आयुष्य घालवायचे नसले तरी काही तास तरी मनात ठेवावी. मग विचारा अर्थ. इथे तर कविता पडली रे पडली की अर्थ पाडा असे होते.

४. कविता कळली नाही तर काय बिघडले, मला काडीचाही फरक पडत नाही आणि वरणव्यवस्था वगैरे.
=> हे खरेच आहे. कविता कळली नै तर कळली नै. कळली नै हेही कवितेचे एक इंटर्प्रिटेशन आहे. यातून कसली वर्णव्यवस्था निर्माण होते असे वाटत नाही. 'वेदात काय लिहिले आहे यामुळे मला झ्या* फरक पडत नाही.' आणि 'वेदात लई भारी लिहिले आहे आणि ढमके शास्त्री ते लै भारी सम्जुन सांगतात' या दोन्ही विधानातले कुठले वर्ण निर्माण करते? ऐतिहासिक पुरावा काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा धागा आणि लेखक यांचा उद्देश काय आहे हे जालावरील अनेक मुरलेल्या लोकांना माहित आहे. या धाग्यावर, मूळ विषयापेक्षा अवांतर आणि उगीच वाद वाढवणारे आणि आरोप करणारे प्रतिसाद अधिक आहेत. अशाप्रकारच्या प्रतिसादांनी धागाच निरर्थक ठरून गेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमची पापे धुण्यासाठी कोणी पुण्य खर्ची घालतोय या कल्पनेनेच शहारून आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0