ब्राउझर बदलाने हे थांबेल का?

आपण नेमके आंतरजालावर काय काय करतो याचा दुवा घेऊन आपला फोन आपल्यावर पाळत ठेवतोय हे एवढं आता सगळ्यांना माहीत झाले आहेच, परंतु एकमेकात सुरू असलेले बोलणे ऐकून त्या संदर्भातल्या जाहिराती किंवा गुगल फीडस आपोआप येतात हे नव्यानेच मला समजले .थोडक्यात मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय याविषयी खात्री पटू लागली आहे.
आपलं स्वातंत्र्य आपल्या नकळत हिरावून घेऊन ,आपल्याला गृहीत धरून वागणारा ब्राउझर आपण का बदलत नाहीये हे एक कोड आहे.. परवा त्यानिमित्ताने ब्रेव ब्राउझर ची ओळख (ब्रेव ) झाली.आपण जर मनाई केली तर हा ब्राउझर आपली आयडेंटिटी गुप्त ठेवतो.. म्हणजे आपण कुठे कुठे काय काय क्लिक केले इत्यादी माहितीचा अभ्यास करून तो आपल्याला काही सुचवत नाही, जाहिरात येत नाही.. इत्यादी.. शिवाय जर आपण वेब ब्राउझिंग करतानाच्या जाहिराती पाहण्याचा पर्याय निवडला तर आपल्याला त्याची टोकन्स मिळतात.. थोडक्यात जाहिराती पाहण्याचे पैसे मिळतात.. हे टोकन्स.. बेसिक अटेंशन टोकन्स.. आपण आपल्या चलनात रूपांतरित करू शकतो नंतर.
सगळीकडेच आमचा डाटा चोरला जातोय, आमचा डाटा चोरला जातोय, फोन आमचा ऐकतोय अशी आरडाओरड सुरू असताना सदर प्रकारचे ब्राउझर लोक का वापरत नाहीत? का त्यातही काही तांत्रिक कमतरता आहेत?अशा स्वरूपांच्या ब्राउझरचा जोमदार प्रसार न होण्याची कारणे काय असावीत?

field_vote: 
0
No votes yet

परंतु एकमेकात सुरू असलेले बोलणे ऐकून त्या संदर्भातल्या जाहिराती किंवा गुगल फीडस आपोआप येतात हे नव्यानेच मला समजले .थोडक्यात मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय याविषयी खात्री पटू लागली आहे.

फोनवर बोलताना एकमेकांशी फक्त ‘च’च्याच भाषेत बोलण्याने हा प्रश्न (निदान काही काळापुरता तरी) सुटेल का?

(की, जाहिरातीसुद्धा ‘च’च्याच भाषेत येऊ लागतील?)

प्रयोग करून पाहण्यासारखा आहे!

एकमेकात सुरू असलेले बोलणे ऐकून त्या संदर्भातल्या जाहिराती किंवा गुगल फीडस आपोआप येतात हे नव्यानेच मला समजले .थोडक्यात मोबाईल आपलं बोलणं ऐकतोय याविषयी खात्री पटू लागली आहे.

फोन आपलं बोलणं ऐकत नाही. आपणच चिकार इतर क्लू सोडून ठेवतो! आत्याचा सल्ला वाचा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपला आय पी पत्ता - गेम ओवर.
भरमसाठ परमिशन मागणारी अप्लिकेशन - आठवा 100 वर्षांनी तुम्ही कसे दिसाल हे दाखवणार ऍप लोकेशन/फोन contact लिस्ट च्या परवानग्या मागत असतं.(ह्यात कधी कधी गेम्ससुद्धा येतात)
Default settings of most of the things encourage us to share more and more stuff about us.

(अर्थात अलेक्सा/गूगल होम घरात असेल तर ते काही काही ऐकेलच)

फोनवरचं बोलणं ऐकण्यापेक्षा इतर ठिकाणी आपणच आपला ऑनलाइन ठसा आपसूक ठेवत असतो. फक्त तो नीट बघितल्याशिवाय सापडत नाही.

इतर ब्राऊसर म्हणजे tor वगैरे वापरले तर बरीच बंधनं असतात ना..

(अर्थात अलेक्सा/गूगल होम घरात असेल तर ते काही काही ऐकेलच)

त्यातही आपलं बोलणं ऐकणं निराळं आणि त्याचा वापर करण निराळं. अलेक्सा, गूगल, बिक्सबी वगैरेंना हाक मारेस्तोवर ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत - असं थेट गृहीत धरायला काही हरकत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अलेक्सा, गूगल, बिक्सबी वगैरेंना हाक मारेस्तोवर ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत - असं थेट गृहीत धरायला काही हरकत नाही.

असं गृहीत धरता येत नाही!

सगळे वर्च्युअल असिस्टंट्स आपले सगळे बोलणे सदा सर्वकाळ ऐकत असतात.

कानांवर काही पडणं आणि ऐकणं यांत फरक आहे - तोच फरक अलेक्स, गूगल, बिक्सबींना हाक मारेस्तोवर असणाऱ्या बोलण्यात आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी ब्राउजर बदल वगैरे प्रकार फारसे उपयोगाचे नाहीत.

वापरकर्त्यांच्या विदा अधिकाधिक वापरणे हाच त्या कंपन्यांचा मुख्य धंदा आहे, त्याला काही इलाज नाही.

तिने चिखलात डुंबायचं नाही.

चिखलात कमीत कमी डूबणारी म्हैस जर उपलब्ध असेल तर बघावा प्रयत्न करून... पण तुमचे दिलेले उदाहरण फारच भारी बुवा!!