राहुलचे सल्लागार : गुजरात आणि दिल्ली निवडणूक
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते. निवडणुकीच्या काळात तर त्यांचा अंगात भूत संचारत असे. अनेक बूथांची व्यवस्था ते जातीने बघत असे. त्यात ते भरपूर कमिशन ही बनवत असे, असे लोक म्हणतात. ते स्वतः अनेकदा मला म्हणत जोपर्यंत त्यांच्या अंगात दम होता या भागातून काँग्रेस कधीच हरली नाही. त्यांचे म्हणणे ही खरे होते. मुकेश शर्मा सलग तीन वेळा या भागातून विधायक निवडल्या गेले होते.
औपचारिक विचारपूस झाल्यावर मी त्यांना छेडण्यासाठी म्हणालो आता तर आपने एमसीडी मध्ये ही झाडू लावला. शर्माजी म्हणाले पटाईत, खरे म्हणाल तर यावेळी काँग्रेसला पुन्हा दिल्लीत वापसीचा बढ़िया मौका होता, पण मौका हातचा गेला. मी म्हणालो कश्यावरून?? ते म्हणाले भ्रष्टाचाराच्या आरोपात सत्येंद्र जैन समेंत अनेक आपिये जेल मध्ये आहे. दिल्ली दंग्यात आप नेत्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात ही अनेक आपिये जेल मध्ये आहे. आपच्या या कृत्यामुळे दंगा ग्रस्त भागातील विशेषकरून मुस्लिम समाज हा आपपासून नाराज आहे. दिल्लीत १५ टक्याहून जास्त मुस्लिम समाज आहे. काँग्रेसचे जिंकणारे ९ पैकी ७ मुस्लिम उम्मीदवार आहेत. अर्थात जिथे काँग्रेसचा थोडा बहुत प्रचार होता तिथे मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली आहे. भारत जोडो यात्रा ८ डिसेंबर नंतर ही सुरू करता येत होती. लोकसभा निवडणूकीला भरपूर वेळ आहे. त्या ऐवजी राहुल गांधींनी ऑक्टोबर पासून एक महिना दिल्लीत पदयात्रा केली असती आणि रोज फक्त एक सभा घेतली असती तरीही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता. काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार पुन्हा परतला असता. विशेषकरून मुस्लिम मते पुन्हा काँग्रेस कडे वळली असती. काँग्रेस जिंकली नसती तरी दुसऱ्या क्रमांकावर निश्चित राहिली असती. ज्या राज्यांत काँग्रेस आणि भाजपात संघर्ष असतो तिथे काँग्रेसला पुन्हा सत्तेत येते. जसे आता हिमाचल आम्ही (जोर देऊन) पुन्हा जिंकला. आपला तिथे 1 टक्का मते ही मिळाली नाही. पण ज्या राज्यांत तिसरी पार्टी सत्तेत येते तिथे भाजप तिथे नंबर दोन होते. काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे शक्य होत नाही. जसे उत्तर प्रदेश बिहार आणि बंगाल इत्यादी ठिकाणी झाले. गुजरात मध्ये ही महिनाभर राहुलजी फिरले असते आणि रोज सभा घेतल्या असत्या तर तिथे ही काँग्रेसला ५० हून जास्त जागा मिळाल्या असत्या. आपला तिथे 9 टक्के मते मिळाली नसती. राहुलची २०२४ची दावेदारी ही मजबूत झाली असती. 2024च्या युतीसाठी ही काँग्रेसचे परडे जड झाले असते. राहुलजी मोदींना टक्कर देऊ शकतात हा विश्वास निर्माण झाला असता. शेवटी दोन चार आई बहिणींच्या शिव्या खरेगे इत्यादींना देत, शर्माजी म्हणाले, या संघींनी निवडणुकीचे रणांगण सोडून आमच्या सेनापतीला भारत जोडो यात्रेच्या हनिमून मध्ये पाठवून दिले. काँग्रेसच्या दारुण पराभवाचे शर्माजींना किती दुःख झाले हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शर्माजींच्या बोलण्यातले तथ्य मलाही पटत होते. दिल्ली गुजरातचा मोर्चा लढविणे भारत जोडो यात्रापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते हे कॉँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना कळत होते पण सल्लागारांना का कळले नाही, हा प्रश्नचिन्ह आहे. बाकी यात्रेचे म्हणाल तर यात्रा कौरव पांडव पर्यन्त पोहचली आहे. शर्माजींच्या भाषेत राहुलचे भाषण लिहाणारे निश्चित संघी आहेत. बाकी सहज आठवले त्याकाळचे गुजराती अडाणी(सोन्याची द्वारकेचा राजा कृष्ण) पांडव सोबत होते.
प्रतिक्रिया
काहीच दर्जा नसणारा लेख
लेखकाने फक्त मिसळपाव ह्या स्पॉन्सर संकेत स्थळावर च लिहावे.
शंभर एक अनुकूल प्रतिसाद मिळतील.
एकच ध्येय आणि एकच विचार धारा .
बाकी सर्व ब्लॉक असे तेच स्थळ आहेइथे तारे तोडू नयेत.
खऱ्या प्रतिक्रिया हव्या असतील तर हाच लेख माय बोली वर टाका
काहीवेळा लढून बलीदान
काहीवेळा लढून बलीदान देण्यापेक्षा, तात्पुरती माघार घेऊन मोठ्या लढाईची तयारी करणे हा शहाणपणा असतो.
भाषण लिहीणारे 'संघी' आहेत म्हणजे चांगले की वाईट?
बाकी सहज आठवले त्याकाळचे गुजराती अडाणी(सोन्याची द्वारकेचा राजा कृष्ण) पांडव सोबत होते.
हे तुम्हाला कशाच्या संदर्भात आठवले काही कळले नाही. द्वारकाधीश श्रीकृष्ण व्यापारी नव्हते, आणि त्यांची यादवसेना आणि ज्येष्ठ भ्राता बलराम कौरवांच्या बाजूने युद्धात सहभागी होते.
अर्थात तुम्हाला पांडव म्हणजे कोण अभिप्रेत आहे हेही कळत नाहीये नीटसे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
हे जमिनीवर कोंग्रेस
हे जमिनीवर कोंग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहेत. माझे नाही. त्यांना वाटते जाणून बुझून असे शब्द राहुलच्या तोंडी टाकल्या जातात. आता पाहच श्रीनगर वर झेंडा फडकविणे म्हणजे मोदींच्या नीतीचे समर्थनच.
राहुल गांधी
Bjp सर्व शक्ती खर्च करून rahul गांधी ना टारगेट करते.
राहुल कसे योग्य नाहीत ह्याचाच प्रचार करण्यासाठी करोडो रुपये bjp नी खर्च केले आहे.
भारतीय जनता त्या मध्ये bjp समर्थक पण आहे त जे सुज्ञानी आहेत आणि आयटी सेल चे सभासद नाहीत ते पण हे मान्य करतात (हा शब्द ठरवून वापरला आहे शिक्षित असू किंवा अशिक्षित बहुसंख्य भारतीय मेंदू चा वापर करत नाहीत.
मेंदू च वापर करत असते तर पहिले मुघल आणि नंतर ब्रिटिश ह्या लोकांनी भारतावर राज्य केलच नसते)
लोकांना ते माहीत आहे.
राहुल जी .
एक योग्य व्यक्तिमत्त्व आहे जे ह्या देशाचे नेतृत्व करण्यास योग्य आहेत.
आयटी सेल जे rahul ल टारगेट करतात ह्या मध्येच त्यांचे मोठेपण आहे
...
हे कदाचित मान्य करता येईलही, परंतु,
हे कसे, ते समजले नाही. (विशेषत: मुघलांच्या बाबतीत.)
यासाठी भाजपला एक पैसा ही गरज
यासाठी भाजपला एक पैसा ही गरज नाही. चुकीचे सल्लागार पुरेसे आहेत.लाल चौक श्रीनगर वर तिरंगा लावणे म्हणजे भाजपच्या काश्मीर नीतीचे समर्थन एवढेही राहुलला कळते नाही. खरे कार्यकर्ते निराश होत चालले आहे.
खरी स्थिती वेगळी आहे
काश्मीर प्रश्न bjp समजते इतका सोपा नाही.
Bjp दिशाभूल करत आहे.
देशाचे स्वतंत्र आणि नंतर विभाजन ही स्थिती खूप कठीण होती.
हे लोकांस खूप चांगले माहीत आहे.
आता फक्त एक च फरक झाला आहे सरकार ची मंडलिक मीडिया काश्मीर मधील खऱ्या बातम्या देत नाही.
दुसरे पाकिस्तान आता कमजोर आहे.
पाकिस्तान नी भारताशी वैर घेवून स्वतःचे खूप मोठे नुकसान केले आहे.
हे त्यांस समजेल तो सुदिन.
राहुल जी ची लायकी काढण्याची पण बीजेपी ची लायकी नाही.
त्या साठी त्यांस स्वतःची लायकी वाढवावी लागेल.
प्रचार बघा
पाकिस्तान भारताला धोका निर्माण करेल, Bangladesh भारताला धोका निर्माण करेल .
असा प्रचार सर्रास होतो आणि बहुसंख्य भारतीय ह्या वर विश्वास ठेवतात.
आणि आक्रमक भूमिका न घेता बाचवमत्मक मानसिकता ठेवतात.
आकाराने खूप च लहान.
आर्थिक बाबतीत भारताच्या मानानी किरकोळ.
भारतात मजबूत लोकशाही ते दोन्ही देश अस्थिर.
कोणत्याच बाबतीत बरोबरी नाही.
तेरी भारतीय भीती च्या छायेत असतात.
हीच मानसिकता म्हणजे मेंदू न वापरणे.
आणि खरेच हे दोन्ही देश भारताला बरबाद करण्यास सक्षम असतील तर भारत सरकार नालायक आहे.
भारतात बहुसंख्य हिंदू आहेत.
देशातील सर्व राज्यांचे मुख्य मंत्री हिंदू आहेत.
प्रशासकीय अधिकारी,लष्करी अधिकारी,बहुसंख्य न्यायाधीश.
हिंदू आहेत.
भारताची आर्थिक नाडी फक्त हिंदू च्या हातात आहे.
इतके सर्व असून.
कोणता तरी राजकीय पक्ष हिंदू धोक्यात आहेत असा राजकीय प्रचार करतो.
आणि येथील नागरिक त्या वर विश्वास ठेवतात.
म्हणजे ते मेंदू चा वापर करत असतील असे म्हणताच येणार नाही.
हाच इतिहास आहे
…
म्हणण्यात तथ्य आहे तुमच्या. पण याचा मुघलांनी नि ब्रिटिशांनी राज्य करण्याशी संबंध काय?
खूप वर्ष काँग्रेस च सत्तेवर होती
देशाला स्वतंत्र मिळवून देणे,स्वतंत्र मिळाल्या नंतर योग्य दिशेने देशाला घेवून जाणे,विरोधी मताच्या लोकांची पण योग्य मत विचारात घेवून त्याचा वापर निर्णय घेण्यासाठी करणे.
हे सर्व काँग्रेस नी योग्य रीती नी केले.
धार्मिक उन्माद निर्माण करून अनेक वर्ष काँग्रेस सत्तेवर नव्हती
तर योग्य दिशेने देशाला घेवून जात होती ,सर्व धर्मीय लोकांचा मान राखत होती.
गरीब,वंचित ,कमजोर लोकांचे हित जपत होती म्हणून काँग्रेस खूप वर्ष सत्तेवर होती.
Bjp सत्तेवर आली तिचं मुळी धार्मिक उन्माद निर्माण करून.
लोकांच्या धार्मिक भावना भडकावून.
Bjp कडे कोणतेच विचार नाहीत ह्यांच्या कडे देश हिताचे कोणतेच प्लॅन नाहीत.
धार्मिक उन्माद उतरला की हे सत्ते बाहेर जाणार आहेत.
आता तो उन्माद उतरला आहे.हिंदू vadi Sarkar असून पण हिंदू च भिकेला लागला आहे जो काँग्रेस च्या राज्यात आर्थिक बाबतीत समृध्द होतं
त्याला संधी दिली जात होती.
आता फक्त मित्र समृध्द आहेत.
राहुल जी नी धार्मिक उन्माद निर्माण केला नाही.
राहुल जी नी जातीय,प्रांतीय उन्माद निर्माण केला नाही.
फक्त देशाची प्रगती का थांबलो ते राहुल जी सांगत आहेत.
BJP आज पण पाकिस्तान,मुस्लिम,ह्या मध्येच अडकली आहे
दोघा मध्ये खूप मोठा फरक आहे
लोकशाही साठी सर्वात धोकादायक काय असेल तर
लोकशाही मध्ये लोकशाही सर्वात धोकादायक काय असेल तर सरकारी निर्णय गुप्त ठेवणे.
सरकारच्या प्रतेक निर्णयाची माहिती जनते पडून लपवून ठेवणे.
असे एक ॲप तयार करणे आता काही अवघड नाही.
अगदी वीज कनेक्शन पासून पाणी कनेक्शन.
अनधिकृत वस्त्या, अनधिकृत धंदे , सर्व सर्व काही .
का चालु आहे ,.
आणि कोणाच्या आदेशाने चालू आहे .
हे जनतेला माहीत पडल पाहिजे.
सरकारी सर्व पातळीवर चे निर्णय जनते साठी ओपन पाहिजे.
अगदी तलाठी पडून हवालदार पर्यंत सर्वांचे.
तेव्हाच खरी लोकशाही येईल.
आणि चमचे आपो आप लांब राहतील.
नेते वाट्टेल ती आश्वासन देणार नाहीत.
चुकीचे दावे करायची कोणाला हिम्मत होणार नाही
प्रशासन पासून न्याय व्यवस्था योग्य काम करेल
समविषारी
समविषारी...
भांबड आलं