chat gpt-4: भाग २ .

डिसेंबरात "कोण हा चॅट जीपीटी" म्हणणारे लोकही आता चॅ.जी च्या अस्तित्वाला रूळले आहेत.
(आमच्या ओळखीच्या गुडमॉर्निंग मेसेज सेप्शलिस्ट काकूंनी मागच्या आठवड्यात एक चॅ. फॉर्वर्ड पाठवलं.)

मायक्रोसॉफ्टने ओपनएआयशी संलग्न करार करून बिंग सर्चात चॅ. आणला आहे.
गूगल बार्ड आणतं आहे.
मेटाने नवी काहीतरी घोषणा केली आहे.
थोडक्यात, हे सगळं आता इथेतिथे पसरेल आणि नॉर्मलाईझ होऊन जाईल.
त्याचा प्रवास नोंदण्यासाठी हा धागा.
तुम्ही काही कामांसाठी चॅ.जी. वापरला तर नोंदवा!

≠========
मार्च 15 2023 ला चॅ जीपीटी 4 आला आहे.
धागा सुधारतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आतापर्यंत केलेले वापर:

१. वेळ वाचवण्यासाठी बेसिक कोड्स लिहून घेणे, मग कमी वेळात स्वतः फक्त कस्टमायझेशन करणे.
२. म्युझिकल नोट्स (चित्ररूपात नव्हे, अक्षर रुपात देतो) उदा. बीथोवन सिंफनीज
३. आवडत्या गाण्याची संपूर्ण माहिती, पार्श्वभूमी, मूळ गायक, कव्हर व्हर्जन हिस्ट्री, लिरिक्स आणि अर्थ हे एकत्र.

फक्त पहिल्यांदा एक दोन वेळा मुद्दाम उत्सुकता म्हणून मराठी प्रश्न , कथा सांग वगैरे विचारून पिडले. पण नंतर फक्त कामासाठी आणि क्वचित वापर.

उपयोगी सिस्टीम आहे आणि एकूणच कोणतीही सिस्टीम अब्युज करणे नको वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्युझिकल नोटस हे रोचक आहे Smile वापरून पहातो.

खरं आहे- नव्याची नवलाई संपल्यावर आता अधिकाधिक उपयुक्ततेकडे वापर सुरू झालाय.
मी सध्या विशेषत: वाक्यांचं "टोनिंग" जमवायला चॅ. वापरतो - एकच परिच्छेद व्यावसायिक, खेळकर, गंभीर अशा अंगाने लिहायला मदत होते.
अर्थात काही महिन्यांनी मायक्रोसॉफ्ट वर्डमधे हे येईलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मला एक विचारायचं आहे -
युरेनस ग्रह हर्शेलने बघून शोधला. त्याच्या कक्षेतील भ्रमणावरून {गणिताने}अंदाज केला गेला की त्यापलीकडे सूर्यमालेतला एखादा ग्रह युरेनसच्या गती/दिशेवर परिणाम करतोय तो(नेपच्यून) अमुक ठिकाणी सापडेल. ते गणित काय होते हे सापडेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Herschel did not actually use an equation to try to determine the existence of Neptune. Herschel himself did not believe that there was an undiscovered planet beyond Uranus, and he did not make any significant attempts to search for one.

It was actually Urbain Le Verrier, a French mathematician, who used calculations based on Newton's law of gravitation to predict the existence of Neptune. Le Verrier's calculations led him to predict the location of the unknown planet, which was subsequently observed by Johann Galle and Heinrich d'Arrest in 1846.

Le Verrier used complex mathematical equations to determine the position of the unknown planet, based on the observed perturbations in the orbit of Uranus. His calculations were based on the assumption that the perturbations were caused by the gravitational pull of another planet, and he used the observed positions of Uranus to narrow down the possible location of this planet.

Although Herschel did not directly contribute to the discovery of Neptune, his earlier observations of Uranus were crucial in establishing the need for further investigation into the outer solar system, which ultimately led to the discovery of Neptune.

Urbain Le Verrier used complex mathematical equations to predict the existence and position of Neptune based on observations of the perturbations in the orbit of Uranus. Le Verrier's calculations involved the use of Newton's law of gravitation, which states that the force of gravity between two objects is proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them.

Le Verrier's equations involved solving a system of simultaneous equations that described the gravitational interactions between Uranus, Neptune, and the other known planets in the solar system. Specifically, he used the observed positions of Uranus over a period of several years to determine the location and mass of the unknown planet that was causing the observed perturbations in Uranus's orbit.

The specific equations used by Le Verrier were quite complex, involving numerical methods such as iterative techniques and series expansions. However, the main result of his calculations was the prediction of the location of Neptune, which was subsequently confirmed by observations made by Johann Galle and Heinrich d'Arrest in 1846.

Overall, Le Verrier's contributions to the discovery of Neptune were groundbreaking, and his work played a critical role in advancing our understanding of the outer solar system

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि इंटरनेटावर हे - https://archive.org/details/explanationobse00Adam/page/n3/mode/2up?view=...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

It's like Shakespeare – Sounds impressive, but does not mean a thing. (वुड्डहौससाहेबाकडून साभार.)

नव्याची नवलाई संपल्यावर आता अधिकाधिक उपयुक्ततेकडे वापर सुरू झालाय.

उपयुक्तता वगैरे ठीक आहे, परंतु, दिलेले उत्तर सविस्तर आणि व्यापक आहे (आणि म्हणून छाप पाडणारे आहे), म्हणून ते बरोबर आहे हे कशावरून?

नाही म्हणजे, तुम्ही गंभीर प्रश्न विचारलात. चटगपटाने सविस्तर उत्तर दिले. तुम्ही प्रभावित झालात नि म्हणून विश्वास ठेवलात. पण ते सविस्तर, मुद्देसूद (आणि गंभीर) भासणारे उत्तर बरोबर आहे काय, हे तुम्ही तपासले आहेत काय? ते तपासण्याचा काही मार्ग तुमच्याजवळ आहे काय?

आणि, चटगपटाने दिलेले उत्तर दर वेळेस (दुसऱ्या एखाद्या विश्वसनीय स्रोताजवळ) तपासून जर पाहावे लागत असेल, तर मग चटगपटाचा उपयोग काय? (त्यापेक्षा मग सरळ त्या दुसऱ्या विश्वसनीय स्रोताकडेच का जाऊ नये?)

----------

मी चटगपटाला एक गंभीर प्रश्न विचारला. इंग्रजीतून विचारला. की बाबा रे, झेलम एक्स्प्रेस काय आहे? (हा अगदी काऊचिऊची गोष्ट-छाप प्रश्न नव्हे. ही माहिती उपयुक्त असू शकते.)

चटगपटाने उत्तराची सुरुवात अशी केली:

Jhelum Express is a train service operated by Indian Railways, which runs between Pune Junction in Maharashtra and Jammu Tawi in Jammu and Kashmir.

हे म्हणणे बरोबर आहे. अचूक आहे. (ही प्रगती आहे. पहिल्या धाग्याच्या वेळेस हाच प्रश्न विचारला असता, झेलम ही रावळपिंडीहून श्रीनगरला जाणारी गाडी आहे, की असेच कायसेसे सांगितले होतेनीत्.)

The train is named after the Jhelum River, which flows through the Indian state of Jammu and Kashmir. Jhelum Express is a popular train among passengers traveling from Maharashtra to Jammu and vice versa.

इथवर ठीकच वाटते.

The train covers a distance of approximately 1,787 km and operates on a daily basis.

इथे किंचित गोची आहे. म्हणजे, हे उत्तर बरोबर असायला हरकत नाही, परंतु, हाच प्रश्न अनेकदा विचारला असता, कधीकधी अंतराचे वेगवेगळे आकडे मिळाले. आत्ता या वेळेस कन्सिस्टंटली हेच आकडे ठोकतोय. काही तासांपूर्वी प्रत्येक खेपेस वेगवेगळे आकडे ठोकीत होता.

Jhelum Express offers various classes of travel, including sleeper class, AC three-tier, and AC two-tier, among others.

हे ठीक असू शकेल. तपासायला हवे.

The train is known for its punctuality and comfort, and it provides an efficient mode of transportation for passengers traveling between these two states.

इथे एक तर चटगपटाने लोणकढी ठेवून दिलेली आहे, किंवा चटगपटाची विनोदबुद्धी उच्चकोटीची असावी. झेलमचा वक्तशीरपणा हा विनोदाचा विषय आहे. सरासरी बारा-तेरा-चौदा तास उशिराने धावणे हा झेलम एक्स्प्रेसचा गर्वबिंदू आहे. किंबहुना, कधी चार तासांहून कमी उशीर केल्यास ड्रायव्हरला बडतर्फ करीत असावेत. (ही माहिती गेल्या काही दशकांत बदलली असल्यास चूभूद्याघ्या, परंतु, I seriously doubt it.)

बाकी, efficient mode of transportation for passengers traveling between these two statesचे म्हणाल, तर, efficientपेक्षा only आणि (two) statesपेक्षा (two) cities ही शब्दयोजना अधिक सयुक्तिक ठरेल.

----------

चटगपटाला मी पुढचा प्रश्न (इंग्रजीतून) विचारला, की बाबा झेलमचे वेळापत्रक काय? (हा प्रश्न गंभीर आहे, याबद्दल दुमत नसावे.)

The timetable of Jhelum Express is subject to change, and it is advisable to check the latest schedule before making travel plans. However, here is the general timetable of Jhelum Express:

Jhelum Express departs from Pune Junction at 19:10 and arrives at Jammu Tawi at 13:10 on the third day of its journey.

ही माहिती तपासून पाहिली. अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे ही माहिती चुकीची आहे. (अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे, झेलम पुण्याहून संध्याकाळी ५ वा. २० मि. सुटते, आणि जम्मूस प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. ४५ मि. पोचते. अर्थात, झेलम एक्स्प्रेस ही कधीच अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे न धावता, वाटेल त्या वेळेस धावत असल्याकारणाने, या चुकीच्या माहितीमुळे कोणाचे काही बिघडू नये. परंतु, प्रश्न तत्त्वाचा आहे.)

The train passes through several major stations on its route, including Solapur Junction, Gulbarga, Wadi Junction, Secunderabad Junction, Nagpur Junction, Bhopal Junction, Jhansi Junction, New Delhi Railway Station, and Pathankot Junction, among others.

हम्म्म्म्... भोपाल, झाँसी, नवी दिल्ली, पठानकोट, हे ठीक आहेत. बाकी, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, सिकंदराबाद, नागपूर या गावांच्या जवळपाससुद्धा ही गाडी फिरकत नाही. (ही स्टेशने या मार्गावर असण्याचे काहीच कारण नाही.)

(तरी बरे, आत्ता या क्षणी हाच प्रश्न अनेकदा विचारला असता हीच स्टेशनांची यादी देतोय. काही तासांपूर्वी ही स्टेशनांची यादीसुद्धा वेगवेगळी देत होता. मुंबई-दिल्ली पश्चिम रेल्वेमार्गावरली स्टेशनेसुद्धा दिलीनीत् एका खेपेस.)

Jhelum Express operates on a daily basis and provides a convenient mode of transportation for passengers traveling between Maharashtra and Jammu and Kashmir. However, please note that train schedules are subject to change, and it is always advisable to check the latest timetable before making any travel plans.

ही वाक्ये मोघम आहेत, नि केवळ पादपूरणार्थ आहेत, हे उघड आहे. सबब, त्यांबद्दल कोणतीही टिप्पणी नाही.

----------

त्यानंतर मग, सोलापूर या झेलमच्या मार्गावर नसलेल्या स्टेशनाचा चटगपटाने उल्लेख केला, म्हटल्यावर, पुढचा (खवचट) प्रश्न म्हणून सोलापूरला येण्याजाण्याच्या झेलमच्या वेळेबद्दल (इंग्रजीतून) विचारले. म्हटले, सोलापूरहून झेलम पकडू पाहणाऱ्या कोणा होतकरू प्रवाशास ही माहिती पुढेमागे उपयुक्त ठरेल; अगदीच काऊचिऊछाप प्रश्न नाही. आणि, एकदा नव्हे, तीनदा विचारले.

पहिल्या खेपेस:

I'm sorry, but I cannot provide real-time information on train schedules as they are subject to change and can vary depending on various factors such as weather, maintenance work, and other unforeseen circumstances.

However, you can visit the official website of the Indian Railways, www.indianrail.gov.in, to check the schedule of Jhelum Express and get the latest information on its arrival and departure times at Solapur station. You can also check on third-party websites or apps that provide live train tracking information.

हा शुद्ध पळपुटेपणा झाला! आणि, प्रामाणिकसुद्धा नव्हे. ('मी ही माहिती देऊ शकत नाही.' का? तर, 'मला माहीत नाही' म्हणून नव्हे, तर 'वेळापत्रके बदलू शकतात; रुळांवर पाणी झालेले असू शकते; रेल्वेखात्याने वाटेत रूळ खोदून ठेवलेले असू शकतात' म्हणून! 'त्यापेक्षा रेल्वेखात्यालाच तुम्ही का विचारीत नाही?' मग @#*च्या, तुझा काय उपयोग?)

दुसऱ्या खेपेस:

As an AI language model, I don't have access to real-time train schedules. However, I can suggest you check the Indian Railways official website, www.indianrail.gov.in, to get the latest information on the schedule of the Jhelum Express train passing through Solapur. You can also call the Indian Railways inquiry number at 139 to get more information on the train's timing and schedule.

हे जरा तरी ठीक आहे. म्हणजे, फारसे उपयोगी नाहीच; परंतु, निदान प्रामाणिक आहे. (आणि, रेल्वेचा चौकशीनंबर बहुधा बरोबरच असावा.)

आणि, तिसऱ्या खेपेस: (ढॅण ट ढॅऽऽऽऽऽऽण!)

As an AI language model, I don't have access to real-time train schedules or live train tracking information. However, according to the Indian Railways timetable, Jhelum Express (train number 11077) departs from Pune Junction at 19:10 and arrives at Jammu Tawi at 13:10 on the third day of its journey. The train passes through Solapur Junction at around 01:10 AM (early morning) on the second day of its journey. However, train schedules are subject to change, so it's always advisable to double-check the timings before making any travel plans.

ठोकुनि देतो ऐसा जे... (फक्त, झेलमचा गाडी नंबर बरोबर आहे. हेही नसे थोडके!)

====================

परंतु, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची माणसाची गरज असते, की केवळ प्रवृत्ती असते, हा संशोधनाचा विषय ठरावा. आमच्या आजोबांच्या काळी छापील शब्दावर विश्वास ठेवण्याची पद्धत होती. ('पेप्रात छापून आलेय, तर ते खोटे कसे असेल?') थोड्या नंतरच्या जमान्यात तो मान रेडियोचा असावा. (आमची साक्षर परंतु अशिक्षित आजी, रेडियोवरच्या (मुंबई 'ब'वरच्या) 'भगिनीमंडळा'त बोलणाऱ्या डॉक्टरांच्या वक्तव्यांचे दाखले द्यायची. किंवा, सुशिक्षित मंडळींत 'बीबीसी'चा शब्द खरा मानण्याची प्रथा होती.) आताच्या जमान्यात आंतरजालावरचा (त्यातसुद्धा गूगललेला/विकीवरचा) शब्द प्रमाण असतो. यापुढे चटगपटचा शब्द (सारखा बदलत असला, तरी) प्रमाण असेल; चालायचेच.

====================

आमच्या वेळेस दहावीच्या परीक्षेकरिता '२१ अपेक्षित (प्रश्नसंच)' नावाचा एक प्रकार असे. परीक्षेत हमखास त्यातलेच प्रश्न येत. प्रश्नपत्रिका सेट करणारे त्यातूनच डोळे झाकून प्रश्न उतरवून घेत. समजा त्यात चुका असतील (म्हणजे, चुकीचा/निरर्थक प्रश्न, किंवा बहुपर्यायी प्रश्नाकरिता सर्वच्या सर्व पर्याय चुकीचे), तर त्या चुकांसकट प्रश्न परीक्षेत जसेच्या तसे येत.

आता यापुढच्या परीक्षांकरिता बहुधा चटगपटावर फेकलेले प्रश्न आणि त्यावर चटगपटाने ओकलेली उत्तरे अपेक्षित असतील. (कालाय तस्मै नम:!) बरोबर की चूक, कोणास ठाऊक, नि कोणास फरक पडतो? (अडचण एवढीच आहे, की चटगपट एकाच प्रश्नाची वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी उत्तरे ओकतो. कोठले प्रमाण मानायचे?)

====================

आणि आता तर कंपन्यांची सीईओमंडळी, मागचापुढचा विचार न करता, आपापल्या उद्योगांत ओढूनताणून/येनकेनप्रकारेण चटगपट घुसविण्याची दिवास्वप्ने पाहू लागली आहेत, म्हणे. (अमेरिकन भांडवलशाहीइतकी बिनडोक प्रणाली नि अमेरिकन सीईओंइतकी महामूर्ख मंडळी त्रिभुवनांत शोधून सापडणार नाहीत. मागचापुढचा सारासार विचार करण्याची क्षमता या वर्गात असते, यावरचा विश्वास कधीच उडालेला आहे. म्हणजे, नैतिक विचार, सामाजिक बांधिलकी, सामाजिक परिणाम, वगैरे गोष्टींबद्दल अजिबात नाही बोलत मी, परंतु, आपण करतोय काय, कशासाठी करतोय, त्यातून जगाचा किंवा समाजाचा सोडा, आपला स्वत:चा फायदा काय, फायदा आहे की तोटा आहे, कशाकशाचा म्हणून विचार नाही. काहीतरी नवीन बझवर्ड आला, की सगळेजण त्याचाच उद्घोष करणार, नि सगळे झुंडीने त्याच्याच मागे धावणार. बँडवॅगनवर उडी मारणार.) त्यामुळे, for better or for worse, चटगपटाची तात्कालिक चलती आली, तर आश्चर्य वाटू नये. आणि, चांगले असो वा बकवास असो, पब्लिकच्या अंगवळणी पडेलच; न पडून पब्लिक सांगतेय कोणाला? (नि दुसरा पर्याय तरी काय आहे?)

त्यामुळे... चालायचेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणूनच, अचूक उत्तर शोधायला गूगल आहे.
त्यासाठी चॅजी सध्यातरी बाद .

पण दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे.
ईमेल्स फॉरमॅट वगैरे करायची कंटाळवाणी कामं करायला फारच छान - अगदी पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे.

- हे नक्की कसे? समजले नाही. (उदाहरण?)

ईमेल्स फॉरमॅट वगैरे करायची कंटाळवाणी कामं करायला फारच छान - अगदी पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखं.

- चटगपटाने ईमेल्स फॉर्मॅट नक्की कशी करायची?

- मुळात ईमेल्स फॉर्मॅट करायला चटगपट का लागावे? (घरातल्या झुरळांना मारण्याकरिता आपण घरात एके४७ ठेवतो का? चपला असताना?)

- ईमेल्स फॉर्मॅट करण्याचे काम चटगपटावर जर सोपवून दिले, तर चटगपटास मोकळे रान मिळणार नाही काय? मग त्याने ईमेलमध्ये काहीतरी भलतेसलते लिहिले तर? (अहो, साधा फोनवरचा ऑटोकरेक्ट रोमन लिपीत vahini असे टंकल्यास त्याचे एक तर vagina तरी करतो, नाही तर vaginitis तरी. इथे तर आख्खा चटगपट आहे! काय समजलेत?) ठीक आहे, पाठवण्यापूर्वी तुम्ही प्रूफरीड कराल, म्हणताय. कायकाय नि कितीकिती प्रूफरीड कराल? त्यातूनसुद्धा अशी एखादी चूक नजरेतून सुटू शकतेच! (चटगपटाला सोपविण्याऐवजी स्वतः ईमेल फॉर्मॅट केले, तरीसुद्धा प्रूफरीड तर करावे लागतेच; परंतु तुम्ही स्वतः ईमेल लिहीत असताना निदान इतकी भयंकर चूक तरी करणार नाही?) प्रामाणिकपणे, मला या प्रकाराची युटिलिटी कळत नाही.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे

उ.दा काही एक मिटिंगात चर्वितचर्वाण झालं, लोकं सवयीप्रमाणे बोल-बोल बोलले. आपण लिहिलेल्या नोट्स नंतर पुन्हा वाचून त्याचा सारांश काढून त्यातून कुणी काय काम करावं इ.इ. चा मसुदा तयार करण्यात चॅ.जी फार मदत करतो.

किंवा एखादं इमेल जर थोडं कमी "कडक" शब्दांत लिहून हवं असेल तर पर्याय देतो. शब्दांवर हुकुमत आहे - शब्द, वाक्यं इथे-तिथे फिरवून किंवा परिच्छेद छोटामोठा करून देतो.
- अर्थात मायक्रोसॉफ़ट/गूगल हे सगळं काही दिवसांनी आपसूक उपलब्ध करून देणारच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यापुढे गूगलचे असेच बार्ड, अमेझोनचे ,टेक्सला आणखी कुणी ही पद्धत आणि पर्याय आणतील तरीही बरोबर कुणाचे हा प्रश्न राहतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबाशेठ, मुद्दा अगदी रास्त आहे. ज्याला ज्यात गती अधिक ते काम त्याला द्यावे. ज्यात तो कच्चा, त्यात त्याला गृहीत धरू नये, हे सामान्य तत्व इथेही लागू पडतेच. त्यात सर्वच मोफत कारभार (अद्याप).

संगीत नोट्स ताबडतोब वाजवून बघता येतात. कोड ताबडतोब रन करून पडताळता येतो. कोड सोबत तो साधारण कसे केले ते लॉजिक देखील थोडक्यात सांगतो.

जी माहिती व्हेरिफाय करता येत नाही अशा माहितीबाबत तूर्त त्याची मदत घेऊ नये. आपण किराणा दुकानात अँटिबायोटिक मागायला जायचे नाही इतकेच. भले किराणावाला काही का दावे करीत असेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"चटगपटाने सविस्तर उत्तर दिले" - हे चटगपट तुम्ही मुद्दाम लिहिलंत की चुकून माहित नाही, पण वाचायला आणि ऐकायला मस्त आहे; पुन्हा यात "छलकपट" शी यमक चांगलं जुळतंय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

(म्हणजे, तसेही मुद्दामच लिहिले होते, परंतु, आता तुम्हाला आवडलेच आहे, म्हटल्यावर, मुद्दाम लिहिल्याचा दावा करायला आणि/किंवा मुद्दाम लिहिल्याचे कबूल करायला काहीच हरकत नाही. Smile )

"छलकपटा"शी यमक जाणूनबुजून नाही, परंतु, आता आपल्याला आवडलेच आहे, तर (मला) आनंदच आहे. Smile

(बाकी, चटगपटामागे छलकपट दिसून येत असल्यास तो निव्वळ योगायोग आहे. कारण, छलकपट करण्यास जी काही एक किमान अक्कल लागते, ती चटगपटाजवळ असण्याबद्दल निदान मी तरी साशंक आहे. चटगपटाच्या बाबतीत छलकपटापेक्षा अनंत माकडे-अनंत कळफलक-शेक्सपियर प्रमेय लागू पडावे, हे माझे वैयक्तिक मत.)

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटचा अंधूक युरेनस. पण पुढचा गणिताने वर्तवला .(हर्षेलने नाही माहिती आहे.) पण
The specific equations used by Le Verrier were quite complex, involving numerical methods such as iterative techniques and series expansions.

तर ते काय गणित केले हेच जाणून घ्यायचे होते.

(आकडेमोडीसाठी संगणक/गणक नव्हते. )

(आणखी एका गणिती माणसाने त्याच वेळी स्वतंत्रपणे हेच वर्तवले तरी त्याचे श्रेय त्यास मिळू शकले नाही कारण तिकडे दुर्बिण रोखायला विनंती केलेल्या संस्थेने दुर्लक्ष केले. असो)

अस्वल, लिंक आणि उत्तरासाठी धन्यवाद.
कधीतरी चटगपट काय उत्तर देतो तेही पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चोम्स्कीचा न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख
https://www.nytimes.com/2023/03/08/opinion/noam-chomsky-chatgpt-ai.html?...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Shared with you by a Times subscriber.

You have access to this article thanks to someone you know. Keep exploring The Times with a free account.

चटगपट हा बरीच माहिती एकत्रित करून उत्तर देतो. परंतू लहान मुले भाषा शिकतात तेव्हा एखादी गोष्ट पाहून,ऐकून आणि त्यांच्या बुद्धिने समजून प्रश्नाचे सोपे साधे उत्तर देतात. या दोन उत्तरांत वेगळेपणा आहे.
हा मुद्दा मांडलेला आहे. भाषेच्या शिक्षकाने हा लेख लिहिला आहे आणि पुढे काय घडू शकते ते सुचवले आहे.
लेख आवडला.
_______________
याबद्दल विचार करताना लक्षात आले की लहान मुलांसाठी असलेल्या शब्दकोशातील वर्णन आणि माहिती ही मोठमोठ्या ठोकळेवजा शब्दकोशांतील (दोन लाख+ शब्द) माहितीपेक्षा वेगळी असते. किंबहुना मुलांसाठी शब्दकोश(४-५ हजार शब्द) करणे हे फारच अवघड असते.
विचारणाऱ्याचे वय आणि समज याप्रमाणे उत्तर देणे योग्य ठरते.
____________
अधिकाधिक एआइमदतनीस येतच राहतील तरीही प्रत्येकासाठी जागा आहे याचे कारण हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज 15 मार्चला चॅ4 आला आहे.
आता त्याला चित्र ओळखता येतात, आणि इतरही बरेच नवे पराक्रम करतोय असं दिसतंय.

हे मुद्दाम नोंदविण्याचे कारण म्हणजे - नव्या आवृत्त्या येण्याचा वेग.
पूर्वी मोठमोठ्या ऑपरेटिंग सिस्टीम 3-5 वर्षांनी येत.
एवढंच काय, ब्राऊसरची नवी आवृत्ती यायला महिने- कधीकधी वर्ष लागत.

मग एके दिवशी क्रोमने रोजच नवीन काहीतरी द्यायला सुरुवात केली.
आता एआय च्या प्रांतात हे सुरू होईल का बघायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतंय की ४ साठीचे ट्रेनिंग हे खूप आधीच सुरु झालं होतं.

तरीही ज्या वेगाने हे बदलत जाईल, मला वाटतंय सिंग्युलॅरिटी येईपर्यंत आपण प्रि एआय/ प्रि सिंग्युलॅरिटी जगात राहतोय असं आता पोस्ट मॉडर्न, पोस्ट ट्रुथ या फॅशननुसार म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

आज 15 मार्चला चॅ4 आला आहे.
आता त्याला चित्र ओळखता येतात, आणि इतरही बरेच नवे पराक्रम करतोय असं दिसतंय.

ही version सामान्य युझर्ससाठी उपलब्ध आहे का? विशेषत: इमेज फीचर्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या तरी वेटिंग लिस्ट आहे - पण चॅ+ (प्रिमिअम) आणि एपिआय ह्या स्वरूपात उपलब्ध आहे -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आला रे आला... जीपीटी-4 आला.

gpt-4

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लगेच प्रो घेऊन टाकीतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

एपिआय (ह्याला मराठीत एपाय म्हणू.) ही फार कुत्ती चीज आहे.
त्यांचा वापर करून एका जागी मिळणारी माहिती भर्र्कन शंभर जागी मिळू शकते.
आणि ज्याला 3rd party plugins म्हणतात ते लोक्स हे एपाय वापरून शंभर ठिकाणची माहिती आपल्याला एकाच ॲपमधे देतात.

तर ओपनएआय कंपनीने असे प्लगिन्स आता बाजारात आणलेत - म्हण्जे तुमच्या आवडत्या ॲप्सना आता ओपनएआयकडे चौकशी करायची सोय आहे.
आजवर हे सगळं सिरी,कोर्ताना, ॲलेक्सा वगैरे ललना करीत (नादेला काकांनी कोर्तानाला जाहीर "मूर्ख" म्हटलं आहे)
पण आता हे अधिक विस्तृत होईल -
अधिक माहिती इथे - https://venturebeat.com/ai/openai-turns-chatgpt-into-a-platform-overnigh...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रश्न विचारून काय विनोदी उत्तर येते का पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Github copilot सारखेच इतर copilot आता चतगपट वापरू लागले आहेत.
विशेष नोंद घेण्याचं कारण म्हणजे security - जे आजकालच्या ऑनलाइन सर्व्हिसेसचे अविभाज्य अंग मानले जाते - त्या सर्व्हिसेसमध्ये आता चतगपट इंजिन वापरलं जाईल-
https://www.theverge.com/2023/3/28/23659711/microsoft-security-copilot-g...

ह्यात काय नवीन आहे? सर्वसाधारणपणे जे लोक सॉफ्टवेर मोडायला बघतात त्यांना "red teams" संबोधलं जातं तर जे लोक असे हल्ले थोपवतात त्यांना blue team म्हणतात.
अशा AI enabled सुविधांमुळे blue teams आपलं काम अधिक उत्तम, कार्यक्षम आणि कमी वेळात पार पाडू शकतील.

हे आधीही वेगळ्या स्वरूपात शक्य होतंच, पण आता त्याला अधिकाधिक nlp processing शी जोडता येईल.

Cyber Security सारख्या संवेदनशील आणि गोपनीयतेचा पडदा असलेल्या क्षेत्रात एखाद्या प्रतिथयश कंपनीने चतगपट वापरला - हे महत्त्वाचं स्थित्यंतर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्यच आहे - everyone is jumping on the bandwagon to be "in".

त्यातले किती चूक किती बरोबर ते काही महिन्यांतच कळेल - पण मुद्दा असा आहे की ह्या कृ.बु. (ए.आय) जनरेटरची व्याप्ती वाढतच चाललीये.
आणि तीही काहीच्या काही वेगाने - म्हणून म्हटलं नोंदी करून ठेवूयात.

माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की प्लगिन्समुळे लोकांचा मुख्य वापर "accessible AI" ह्या वर्गीकरणात मोडेल.
कंपन्यांचा मुख्य वापर आपली ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी होईल - त्यातल्या बऱ्याच कंपन्या "काहीच्या काही" करून कृ.बुच्या गंगेत हात धुते करतीलही.
मायक्रोसॉफ्टसारख्या फार थोड्या कंपन्या आपल्या प्रोड्क्टलाईनच्या मुख्य धारेत सामावेश करतील. (main use being productivity improvement)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0