chat gpt-4: भाग २ .

डिसेंबरात "कोण हा चॅट जीपीटी" म्हणणारे लोकही आता चॅ.जी च्या अस्तित्वाला रूळले आहेत.
(आमच्या ओळखीच्या गुडमॉर्निंग मेसेज सेप्शलिस्ट काकूंनी मागच्या आठवड्यात एक चॅ. फॉर्वर्ड पाठवलं.)

मायक्रोसॉफ्टने ओपनएआयशी संलग्न करार करून बिंग सर्चात चॅ. आणला आहे.
गूगल बार्ड आणतं आहे.
मेटाने नवी काहीतरी घोषणा केली आहे.
थोडक्यात, हे सगळं आता इथेतिथे पसरेल आणि नॉर्मलाईझ होऊन जाईल.
त्याचा प्रवास नोंदण्यासाठी हा धागा.
तुम्ही काही कामांसाठी चॅ.जी. वापरला तर नोंदवा!

≠========
मार्च 15 2023 ला चॅ जीपीटी 4 आला आहे.
धागा सुधारतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आतापर्यंत केलेले वापर:

१. वेळ वाचवण्यासाठी बेसिक कोड्स लिहून घेणे, मग कमी वेळात स्वतः फक्त कस्टमायझेशन करणे.
२. म्युझिकल नोट्स (चित्ररूपात नव्हे, अक्षर रुपात देतो) उदा. बीथोवन सिंफनीज
३. आवडत्या गाण्याची संपूर्ण माहिती, पार्श्वभूमी, मूळ गायक, कव्हर व्हर्जन हिस्ट्री, लिरिक्स आणि अर्थ हे एकत्र.

फक्त पहिल्यांदा एक दोन वेळा मुद्दाम उत्सुकता म्हणून मराठी प्रश्न , कथा सांग वगैरे विचारून पिडले. पण नंतर फक्त कामासाठी आणि क्वचित वापर.

उपयोगी सिस्टीम आहे आणि एकूणच कोणतीही सिस्टीम अब्युज करणे नको वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्युझिकल नोटस हे रोचक आहे Smile वापरून पहातो.

खरं आहे- नव्याची नवलाई संपल्यावर आता अधिकाधिक उपयुक्ततेकडे वापर सुरू झालाय.
मी सध्या विशेषत: वाक्यांचं "टोनिंग" जमवायला चॅ. वापरतो - एकच परिच्छेद व्यावसायिक, खेळकर, गंभीर अशा अंगाने लिहायला मदत होते.
अर्थात काही महिन्यांनी मायक्रोसॉफ्ट वर्डमधे हे येईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मला एक विचारायचं आहे -
युरेनस ग्रह हर्शेलने बघून शोधला. त्याच्या कक्षेतील भ्रमणावरून {गणिताने}अंदाज केला गेला की त्यापलीकडे सूर्यमालेतला एखादा ग्रह युरेनसच्या गती/दिशेवर परिणाम करतोय तो(नेपच्यून) अमुक ठिकाणी सापडेल. ते गणित काय होते हे सापडेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Herschel did not actually use an equation to try to determine the existence of Neptune. Herschel himself did not believe that there was an undiscovered planet beyond Uranus, and he did not make any significant attempts to search for one.

It was actually Urbain Le Verrier, a French mathematician, who used calculations based on Newton's law of gravitation to predict the existence of Neptune. Le Verrier's calculations led him to predict the location of the unknown planet, which was subsequently observed by Johann Galle and Heinrich d'Arrest in 1846.

Le Verrier used complex mathematical equations to determine the position of the unknown planet, based on the observed perturbations in the orbit of Uranus. His calculations were based on the assumption that the perturbations were caused by the gravitational pull of another planet, and he used the observed positions of Uranus to narrow down the possible location of this planet.

Although Herschel did not directly contribute to the discovery of Neptune, his earlier observations of Uranus were crucial in establishing the need for further investigation into the outer solar system, which ultimately led to the discovery of Neptune.

Urbain Le Verrier used complex mathematical equations to predict the existence and position of Neptune based on observations of the perturbations in the orbit of Uranus. Le Verrier's calculations involved the use of Newton's law of gravitation, which states that the force of gravity between two objects is proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them.

Le Verrier's equations involved solving a system of simultaneous equations that described the gravitational interactions between Uranus, Neptune, and the other known planets in the solar system. Specifically, he used the observed positions of Uranus over a period of several years to determine the location and mass of the unknown planet that was causing the observed perturbations in Uranus's orbit.

The specific equations used by Le Verrier were quite complex, involving numerical methods such as iterative techniques and series expansions. However, the main result of his calculations was the prediction of the location of Neptune, which was subsequently confirmed by observations made by Johann Galle and Heinrich d'Arrest in 1846.

Overall, Le Verrier's contributions to the discovery of Neptune were groundbreaking, and his work played a critical role in advancing our understanding of the outer solar system

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि इंटरनेटावर हे - https://archive.org/details/explanationobse00Adam/page/n3/mode/2up?view=...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It's like Shakespeare – Sounds impressive, but does not mean a thing. (वुड्डहौससाहेबाकडून साभार.)

नव्याची नवलाई संपल्यावर आता अधिकाधिक उपयुक्ततेकडे वापर सुरू झालाय.

उपयुक्तता वगैरे ठीक आहे, परंतु, दिलेले उत्तर सविस्तर आणि व्यापक आहे (आणि म्हणून छाप पाडणारे आहे), म्हणून ते बरोबर आहे हे कशावरून?

नाही म्हणजे, तुम्ही गंभीर प्रश्न विचारलात. चटगपटाने सविस्तर उत्तर दिले. तुम्ही प्रभावित झालात नि म्हणून विश्वास ठेवलात. पण ते सविस्तर, मुद्देसूद (आणि गंभीर) भासणारे उत्तर बरोबर आहे काय, हे तुम्ही तपासले आहेत काय? ते तपासण्याचा काही मार्ग तुमच्याजवळ आहे काय?

आणि, चटगपटाने दिलेले उत्तर दर वेळेस (दुसऱ्या एखाद्या विश्वसनीय स्रोताजवळ) तपासून जर पाहावे लागत असेल, तर मग चटगपटाचा उपयोग काय? (त्यापेक्षा मग सरळ त्या दुसऱ्या विश्वसनीय स्रोताकडेच का जाऊ नये?)

----------

मी चटगपटाला एक गंभीर प्रश्न विचारला. इंग्रजीतून विचारला. की बाबा रे, झेलम एक्स्प्रेस काय आहे? (हा अगदी काऊचिऊची गोष्ट-छाप प्रश्न नव्हे. ही माहिती उपयुक्त असू शकते.)

चटगपटाने उत्तराची सुरुवात अशी केली:

Jhelum Express is a train service operated by Indian Railways, which runs between Pune Junction in Maharashtra and Jammu Tawi in Jammu and Kashmir.

हे म्हणणे बरोबर आहे. अचूक आहे. (ही प्रगती आहे. पहिल्या धाग्याच्या वेळेस हाच प्रश्न विचारला असता, झेलम ही रावळपिंडीहून श्रीनगरला जाणारी गाडी आहे, की असेच कायसेसे सांगितले होतेनीत्.)

The train is named after the Jhelum River, which flows through the Indian state of Jammu and Kashmir. Jhelum Express is a popular train among passengers traveling from Maharashtra to Jammu and vice versa.

इथवर ठीकच वाटते.

The train covers a distance of approximately 1,787 km and operates on a daily basis.

इथे किंचित गोची आहे. म्हणजे, हे उत्तर बरोबर असायला हरकत नाही, परंतु, हाच प्रश्न अनेकदा विचारला असता, कधीकधी अंतराचे वेगवेगळे आकडे मिळाले. आत्ता या वेळेस कन्सिस्टंटली हेच आकडे ठोकतोय. काही तासांपूर्वी प्रत्येक खेपेस वेगवेगळे आकडे ठोकीत होता.

Jhelum Express offers various classes of travel, including sleeper class, AC three-tier, and AC two-tier, among others.

हे ठीक असू शकेल. तपासायला हवे.

The train is known for its punctuality and comfort, and it provides an efficient mode of transportation for passengers traveling between these two states.

इथे एक तर चटगपटाने लोणकढी ठेवून दिलेली आहे, किंवा चटगपटाची विनोदबुद्धी उच्चकोटीची असावी. झेलमचा वक्तशीरपणा हा विनोदाचा विषय आहे. सरासरी बारा-तेरा-चौदा तास उशिराने धावणे हा झेलम एक्स्प्रेसचा गर्वबिंदू आहे. किंबहुना, कधी चार तासांहून कमी उशीर केल्यास ड्रायव्हरला बडतर्फ करीत असावेत. (ही माहिती गेल्या काही दशकांत बदलली असल्यास चूभूद्याघ्या, परंतु, I seriously doubt it.)

बाकी, efficient mode of transportation for passengers traveling between these two statesचे म्हणाल, तर, efficientपेक्षा only आणि (two) statesपेक्षा (two) cities ही शब्दयोजना अधिक सयुक्तिक ठरेल.

----------

चटगपटाला मी पुढचा प्रश्न (इंग्रजीतून) विचारला, की बाबा झेलमचे वेळापत्रक काय? (हा प्रश्न गंभीर आहे, याबद्दल दुमत नसावे.)

The timetable of Jhelum Express is subject to change, and it is advisable to check the latest schedule before making travel plans. However, here is the general timetable of Jhelum Express:

Jhelum Express departs from Pune Junction at 19:10 and arrives at Jammu Tawi at 13:10 on the third day of its journey.

ही माहिती तपासून पाहिली. अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे ही माहिती चुकीची आहे. (अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे, झेलम पुण्याहून संध्याकाळी ५ वा. २० मि. सुटते, आणि जम्मूस प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वा. ४५ मि. पोचते. अर्थात, झेलम एक्स्प्रेस ही कधीच अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे न धावता, वाटेल त्या वेळेस धावत असल्याकारणाने, या चुकीच्या माहितीमुळे कोणाचे काही बिघडू नये. परंतु, प्रश्न तत्त्वाचा आहे.)

The train passes through several major stations on its route, including Solapur Junction, Gulbarga, Wadi Junction, Secunderabad Junction, Nagpur Junction, Bhopal Junction, Jhansi Junction, New Delhi Railway Station, and Pathankot Junction, among others.

हम्म्म्म्... भोपाल, झाँसी, नवी दिल्ली, पठानकोट, हे ठीक आहेत. बाकी, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, सिकंदराबाद, नागपूर या गावांच्या जवळपाससुद्धा ही गाडी फिरकत नाही. (ही स्टेशने या मार्गावर असण्याचे काहीच कारण नाही.)

(तरी बरे, आत्ता या क्षणी हाच प्रश्न अनेकदा विचारला असता हीच स्टेशनांची यादी देतोय. काही तासांपूर्वी ही स्टेशनांची यादीसुद्धा वेगवेगळी देत होता. मुंबई-दिल्ली पश्चिम रेल्वेमार्गावरली स्टेशनेसुद्धा दिलीनीत् एका खेपेस.)

Jhelum Express operates on a daily basis and provides a convenient mode of transportation for passengers traveling between Maharashtra and Jammu and Kashmir. However, please note that train schedules are subject to change, and it is always advisable to check the latest timetable before making any travel plans.

ही वाक्ये मोघम आहेत, नि केवळ पादपूरणार्थ आहेत, हे उघड आहे. सबब, त्यांबद्दल कोणतीही टिप्पणी नाही.

----------

त्यानंतर मग, सोलापूर या झेलमच्या मार्गावर नसलेल्या स्टेशनाचा चटगपटाने उल्लेख केला, म्हटल्यावर, पुढचा (खवचट) प्रश्न म्हणून सोलापूरला येण्याजाण्याच्या झेलमच्या वेळेबद्दल (इंग्रजीतून) विचारले. म्हटले, सोलापूरहून झेलम पकडू पाहणाऱ्या कोणा होतकरू प्रवाशास ही माहिती पुढेमागे उपयुक्त ठरेल; अगदीच काऊचिऊछाप प्रश्न नाही. आणि, एकदा नव्हे, तीनदा विचारले.

पहिल्या खेपेस:

I'm sorry, but I cannot provide real-time information on train schedules as they are subject to change and can vary depending on various factors such as weather, maintenance work, and other unforeseen circumstances.

However, you can visit the official website of the Indian Railways, www.indianrail.gov.in, to check the schedule of Jhelum Express and get the latest information on its arrival and departure times at Solapur station. You can also check on third-party websites or apps that provide live train tracking information.

हा शुद्ध पळपुटेपणा झाला! आणि, प्रामाणिकसुद्धा नव्हे. ('मी ही माहिती देऊ शकत नाही.' का? तर, 'मला माहीत नाही' म्हणून नव्हे, तर 'वेळापत्रके बदलू शकतात; रुळांवर पाणी झालेले असू शकते; रेल्वेखात्याने वाटेत रूळ खोदून ठेवलेले असू शकतात' म्हणून! 'त्यापेक्षा रेल्वेखात्यालाच तुम्ही का विचारीत नाही?' मग @#*च्या, तुझा काय उपयोग?)

दुसऱ्या खेपेस:

As an AI language model, I don't have access to real-time train schedules. However, I can suggest you check the Indian Railways official website, www.indianrail.gov.in, to get the latest information on the schedule of the Jhelum Express train passing through Solapur. You can also call the Indian Railways inquiry number at 139 to get more information on the train's timing and schedule.

हे जरा तरी ठीक आहे. म्हणजे, फारसे उपयोगी नाहीच; परंतु, निदान प्रामाणिक आहे. (आणि, रेल्वेचा चौकशीनंबर बहुधा बरोबरच असावा.)

आणि, तिसऱ्या खेपेस: (ढॅण ट ढॅऽऽऽऽऽऽण!)

As an AI language model, I don't have access to real-time train schedules or live train tracking information. However, according to the Indian Railways timetable, Jhelum Express (train number 11077) departs from Pune Junction at 19:10 and arrives at Jammu Tawi at 13:10 on the third day of its journey. The train passes through Solapur Junction at around 01:10 AM (early morning) on the second day of its journey. However, train schedules are subject to change, so it's always advisable to double-check the timings before making any travel plans.

ठोकुनि देतो ऐसा जे... (फक्त, झेलमचा गाडी नंबर बरोबर आहे. हेही नसे थोडके!)

====================

परंतु, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची माणसाची गरज असते, की केवळ प्रवृत्ती असते, हा संशोधनाचा विषय ठरावा. आमच्या आजोबांच्या काळी छापील शब्दावर विश्वास ठेवण्याची पद्धत होती. ('पेप्रात छापून आलेय, तर ते खोटे कसे असेल?') थोड्या नंतरच्या जमान्यात तो मान रेडियोचा असावा. (आमची साक्षर परंतु अशिक्षित आजी, रेडियोवरच्या (मुंबई 'ब'वरच्या) 'भगिनीमंडळा'त बोलणाऱ्या डॉक्टरांच्या वक्तव्यांचे दाखले द्यायची. किंवा, सुशिक्षित मंडळींत 'बीबीसी'चा शब्द खरा मानण्याची प्रथा होती.) आताच्या जमान्यात आंतरजालावरचा (त्यातसुद्धा गूगललेला/विकीवरचा) शब्द प्रमाण असतो. यापुढे चटगपटचा शब्द (सारखा बदलत असला, तरी) प्रमाण असेल; चालायचेच.

====================

आमच्या वेळेस दहावीच्या परीक्षेकरिता '२१ अपेक्षित (प्रश्नसंच)' नावाचा एक प्रकार असे. परीक्षेत हमखास त्यातलेच प्रश्न येत. प्रश्नपत्रिका सेट करणारे त्यातूनच डोळे झाकून प्रश्न उतरवून घेत. समजा त्यात चुका असतील (म्हणजे, चुकीचा/निरर्थक प्रश्न, किंवा बहुपर्यायी प्रश्नाकरिता सर्वच्या सर्व पर्याय चुकीचे), तर त्या चुकांसकट प्रश्न परीक्षेत जसेच्या तसे येत.

आता यापुढच्या परीक्षांकरिता बहुधा चटगपटावर फेकलेले प्रश्न आणि त्यावर चटगपटाने ओकलेली उत्तरे अपेक्षित असतील. (कालाय तस्मै नम:!) बरोबर की चूक, कोणास ठाऊक, नि कोणास फरक पडतो? (अडचण एवढीच आहे, की चटगपट एकाच प्रश्नाची वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी उत्तरे ओकतो. कोठले प्रमाण मानायचे?)

====================

आणि आता तर कंपन्यांची सीईओमंडळी, मागचापुढचा विचार न करता, आपापल्या उद्योगांत ओढूनताणून/येनकेनप्रकारेण चटगपट घुसविण्याची दिवास्वप्ने पाहू लागली आहेत, म्हणे. (अमेरिकन भांडवलशाहीइतकी बिनडोक प्रणाली नि अमेरिकन सीईओंइतकी महामूर्ख मंडळी त्रिभुवनांत शोधून सापडणार नाहीत. मागचापुढचा सारासार विचार करण्याची क्षमता या वर्गात असते, यावरचा विश्वास कधीच उडालेला आहे. म्हणजे, नैतिक विचार, सामाजिक बांधिलकी, सामाजिक परिणाम, वगैरे गोष्टींबद्दल अजिबात नाही बोलत मी, परंतु, आपण करतोय काय, कशासाठी करतोय, त्यातून जगाचा किंवा समाजाचा सोडा, आपला स्वत:चा फायदा काय, फायदा आहे की तोटा आहे, कशाकशाचा म्हणून विचार नाही. काहीतरी नवीन बझवर्ड आला, की सगळेजण त्याचाच उद्घोष करणार, नि सगळे झुंडीने त्याच्याच मागे धावणार. बँडवॅगनवर उडी मारणार.) त्यामुळे, for better or for worse, चटगपटाची तात्कालिक चलती आली, तर आश्चर्य वाटू नये. आणि, चांगले असो वा बकवास असो, पब्लिकच्या अंगवळणी पडेलच; न पडून पब्लिक सांगतेय कोणाला? (नि दुसरा पर्याय तरी काय आहे?)

त्यामुळे... चालायचेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच, अचूक उत्तर शोधायला गूगल आहे.
त्यासाठी चॅजी सध्यातरी बाद .

पण दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे.
ईमेल्स फॉरमॅट वगैरे करायची कंटाळवाणी कामं करायला फारच छान - अगदी पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे.

- हे नक्की कसे? समजले नाही. (उदाहरण?)

ईमेल्स फॉरमॅट वगैरे करायची कंटाळवाणी कामं करायला फारच छान - अगदी पर्सनल सेक्रेटरी असल्यासारखं.

- चटगपटाने ईमेल्स फॉर्मॅट नक्की कशी करायची?

- मुळात ईमेल्स फॉर्मॅट करायला चटगपट का लागावे? (घरातल्या झुरळांना मारण्याकरिता आपण घरात एके४७ ठेवतो का? चपला असताना?)

- ईमेल्स फॉर्मॅट करण्याचे काम चटगपटावर जर सोपवून दिले, तर चटगपटास मोकळे रान मिळणार नाही काय? मग त्याने ईमेलमध्ये काहीतरी भलतेसलते लिहिले तर? (अहो, साधा फोनवरचा ऑटोकरेक्ट रोमन लिपीत vahini असे टंकल्यास त्याचे एक तर vagina तरी करतो, नाही तर vaginitis तरी. इथे तर आख्खा चटगपट आहे! काय समजलेत?) ठीक आहे, पाठवण्यापूर्वी तुम्ही प्रूफरीड कराल, म्हणताय. कायकाय नि कितीकिती प्रूफरीड कराल? त्यातूनसुद्धा अशी एखादी चूक नजरेतून सुटू शकतेच! (चटगपटाला सोपविण्याऐवजी स्वतः ईमेल फॉर्मॅट केले, तरीसुद्धा प्रूफरीड तर करावे लागतेच; परंतु तुम्ही स्वतः ईमेल लिहीत असताना निदान इतकी भयंकर चूक तरी करणार नाही?) प्रामाणिकपणे, मला या प्रकाराची युटिलिटी कळत नाही.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेल्या विद्याला (विदा-विद्या.) घासून पुसून सादर करायला ; थोडेफार बदल करून नवा मजकूर बनवायला चॅजी उत्तम आहे

उ.दा काही एक मिटिंगात चर्वितचर्वाण झालं, लोकं सवयीप्रमाणे बोल-बोल बोलले. आपण लिहिलेल्या नोट्स नंतर पुन्हा वाचून त्याचा सारांश काढून त्यातून कुणी काय काम करावं इ.इ. चा मसुदा तयार करण्यात चॅ.जी फार मदत करतो.

किंवा एखादं इमेल जर थोडं कमी "कडक" शब्दांत लिहून हवं असेल तर पर्याय देतो. शब्दांवर हुकुमत आहे - शब्द, वाक्यं इथे-तिथे फिरवून किंवा परिच्छेद छोटामोठा करून देतो.
- अर्थात मायक्रोसॉफ़ट/गूगल हे सगळं काही दिवसांनी आपसूक उपलब्ध करून देणारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापुढे गूगलचे असेच बार्ड, अमेझोनचे ,टेक्सला आणखी कुणी ही पद्धत आणि पर्याय आणतील तरीही बरोबर कुणाचे हा प्रश्न राहतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबाशेठ, मुद्दा अगदी रास्त आहे. ज्याला ज्यात गती अधिक ते काम त्याला द्यावे. ज्यात तो कच्चा, त्यात त्याला गृहीत धरू नये, हे सामान्य तत्व इथेही लागू पडतेच. त्यात सर्वच मोफत कारभार (अद्याप).

संगीत नोट्स ताबडतोब वाजवून बघता येतात. कोड ताबडतोब रन करून पडताळता येतो. कोड सोबत तो साधारण कसे केले ते लॉजिक देखील थोडक्यात सांगतो.

जी माहिती व्हेरिफाय करता येत नाही अशा माहितीबाबत तूर्त त्याची मदत घेऊ नये. आपण किराणा दुकानात अँटिबायोटिक मागायला जायचे नाही इतकेच. भले किराणावाला काही का दावे करीत असेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"चटगपटाने सविस्तर उत्तर दिले" - हे चटगपट तुम्ही मुद्दाम लिहिलंत की चुकून माहित नाही, पण वाचायला आणि ऐकायला मस्त आहे; पुन्हा यात "छलकपट" शी यमक चांगलं जुळतंय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

(म्हणजे, तसेही मुद्दामच लिहिले होते, परंतु, आता तुम्हाला आवडलेच आहे, म्हटल्यावर, मुद्दाम लिहिल्याचा दावा करायला आणि/किंवा मुद्दाम लिहिल्याचे कबूल करायला काहीच हरकत नाही. Smile )

"छलकपटा"शी यमक जाणूनबुजून नाही, परंतु, आता आपल्याला आवडलेच आहे, तर (मला) आनंदच आहे. Smile

(बाकी, चटगपटामागे छलकपट दिसून येत असल्यास तो निव्वळ योगायोग आहे. कारण, छलकपट करण्यास जी काही एक किमान अक्कल लागते, ती चटगपटाजवळ असण्याबद्दल निदान मी तरी साशंक आहे. चटगपटाच्या बाबतीत छलकपटापेक्षा अनंत माकडे-अनंत कळफलक-शेक्सपियर प्रमेय लागू पडावे, हे माझे वैयक्तिक मत.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा अंधूक युरेनस. पण पुढचा गणिताने वर्तवला .(हर्षेलने नाही माहिती आहे.) पण
The specific equations used by Le Verrier were quite complex, involving numerical methods such as iterative techniques and series expansions.

तर ते काय गणित केले हेच जाणून घ्यायचे होते.

(आकडेमोडीसाठी संगणक/गणक नव्हते. )

(आणखी एका गणिती माणसाने त्याच वेळी स्वतंत्रपणे हेच वर्तवले तरी त्याचे श्रेय त्यास मिळू शकले नाही कारण तिकडे दुर्बिण रोखायला विनंती केलेल्या संस्थेने दुर्लक्ष केले. असो)

अस्वल, लिंक आणि उत्तरासाठी धन्यवाद.
कधीतरी चटगपट काय उत्तर देतो तेही पाहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चोम्स्कीचा न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख
https://www.nytimes.com/2023/03/08/opinion/noam-chomsky-chatgpt-ai.html?...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Shared with you by a Times subscriber.

You have access to this article thanks to someone you know. Keep exploring The Times with a free account.

चटगपट हा बरीच माहिती एकत्रित करून उत्तर देतो. परंतू लहान मुले भाषा शिकतात तेव्हा एखादी गोष्ट पाहून,ऐकून आणि त्यांच्या बुद्धिने समजून प्रश्नाचे सोपे साधे उत्तर देतात. या दोन उत्तरांत वेगळेपणा आहे.
हा मुद्दा मांडलेला आहे. भाषेच्या शिक्षकाने हा लेख लिहिला आहे आणि पुढे काय घडू शकते ते सुचवले आहे.
लेख आवडला.
_______________
याबद्दल विचार करताना लक्षात आले की लहान मुलांसाठी असलेल्या शब्दकोशातील वर्णन आणि माहिती ही मोठमोठ्या ठोकळेवजा शब्दकोशांतील (दोन लाख+ शब्द) माहितीपेक्षा वेगळी असते. किंबहुना मुलांसाठी शब्दकोश(४-५ हजार शब्द) करणे हे फारच अवघड असते.
विचारणाऱ्याचे वय आणि समज याप्रमाणे उत्तर देणे योग्य ठरते.
____________
अधिकाधिक एआइमदतनीस येतच राहतील तरीही प्रत्येकासाठी जागा आहे याचे कारण हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज 15 मार्चला चॅ4 आला आहे.
आता त्याला चित्र ओळखता येतात, आणि इतरही बरेच नवे पराक्रम करतोय असं दिसतंय.

हे मुद्दाम नोंदविण्याचे कारण म्हणजे - नव्या आवृत्त्या येण्याचा वेग.
पूर्वी मोठमोठ्या ऑपरेटिंग सिस्टीम 3-5 वर्षांनी येत.
एवढंच काय, ब्राऊसरची नवी आवृत्ती यायला महिने- कधीकधी वर्ष लागत.

मग एके दिवशी क्रोमने रोजच नवीन काहीतरी द्यायला सुरुवात केली.
आता एआय च्या प्रांतात हे सुरू होईल का बघायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतंय की ४ साठीचे ट्रेनिंग हे खूप आधीच सुरु झालं होतं.

तरीही ज्या वेगाने हे बदलत जाईल, मला वाटतंय सिंग्युलॅरिटी येईपर्यंत आपण प्रि एआय/ प्रि सिंग्युलॅरिटी जगात राहतोय असं आता पोस्ट मॉडर्न, पोस्ट ट्रुथ या फॅशननुसार म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आज 15 मार्चला चॅ4 आला आहे.
आता त्याला चित्र ओळखता येतात, आणि इतरही बरेच नवे पराक्रम करतोय असं दिसतंय.

ही version सामान्य युझर्ससाठी उपलब्ध आहे का? विशेषत: इमेज फीचर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तरी वेटिंग लिस्ट आहे - पण चॅ+ (प्रिमिअम) आणि एपिआय ह्या स्वरूपात उपलब्ध आहे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आला रे आला... जीपीटी-4 आला.

gpt-4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लगेच प्रो घेऊन टाकीतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

एपिआय (ह्याला मराठीत एपाय म्हणू.) ही फार कुत्ती चीज आहे.
त्यांचा वापर करून एका जागी मिळणारी माहिती भर्र्कन शंभर जागी मिळू शकते.
आणि ज्याला 3rd party plugins म्हणतात ते लोक्स हे एपाय वापरून शंभर ठिकाणची माहिती आपल्याला एकाच ॲपमधे देतात.

तर ओपनएआय कंपनीने असे प्लगिन्स आता बाजारात आणलेत - म्हण्जे तुमच्या आवडत्या ॲप्सना आता ओपनएआयकडे चौकशी करायची सोय आहे.
आजवर हे सगळं सिरी,कोर्ताना, ॲलेक्सा वगैरे ललना करीत (नादेला काकांनी कोर्तानाला जाहीर "मूर्ख" म्हटलं आहे)
पण आता हे अधिक विस्तृत होईल -
अधिक माहिती इथे - https://venturebeat.com/ai/openai-turns-chatgpt-into-a-platform-overnigh...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न विचारून काय विनोदी उत्तर येते का पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Github copilot सारखेच इतर copilot आता चतगपट वापरू लागले आहेत.
विशेष नोंद घेण्याचं कारण म्हणजे security - जे आजकालच्या ऑनलाइन सर्व्हिसेसचे अविभाज्य अंग मानले जाते - त्या सर्व्हिसेसमध्ये आता चतगपट इंजिन वापरलं जाईल-
https://www.theverge.com/2023/3/28/23659711/microsoft-security-copilot-g...

ह्यात काय नवीन आहे? सर्वसाधारणपणे जे लोक सॉफ्टवेर मोडायला बघतात त्यांना "red teams" संबोधलं जातं तर जे लोक असे हल्ले थोपवतात त्यांना blue team म्हणतात.
अशा AI enabled सुविधांमुळे blue teams आपलं काम अधिक उत्तम, कार्यक्षम आणि कमी वेळात पार पाडू शकतील.

हे आधीही वेगळ्या स्वरूपात शक्य होतंच, पण आता त्याला अधिकाधिक nlp processing शी जोडता येईल.

Cyber Security सारख्या संवेदनशील आणि गोपनीयतेचा पडदा असलेल्या क्षेत्रात एखाद्या प्रतिथयश कंपनीने चतगपट वापरला - हे महत्त्वाचं स्थित्यंतर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्यच आहे - everyone is jumping on the bandwagon to be "in".

त्यातले किती चूक किती बरोबर ते काही महिन्यांतच कळेल - पण मुद्दा असा आहे की ह्या कृ.बु. (ए.आय) जनरेटरची व्याप्ती वाढतच चाललीये.
आणि तीही काहीच्या काही वेगाने - म्हणून म्हटलं नोंदी करून ठेवूयात.

माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की प्लगिन्समुळे लोकांचा मुख्य वापर "accessible AI" ह्या वर्गीकरणात मोडेल.
कंपन्यांचा मुख्य वापर आपली ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी होईल - त्यातल्या बऱ्याच कंपन्या "काहीच्या काही" करून कृ.बुच्या गंगेत हात धुते करतीलही.
मायक्रोसॉफ्टसारख्या फार थोड्या कंपन्या आपल्या प्रोड्क्टलाईनच्या मुख्य धारेत सामावेश करतील. (main use being productivity improvement)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेदेखील वाचा!

आजकाल शाळकरी पोरे वर्गपाठाकरिता निबंध लिहिण्यासाठी चटगपट सर्रास वापरू लागलेली आहेत. हे लक्षात आल्यापासून, शाळकरी पोरांचे प्लेजियरिझम पकडण्याकरिता शिक्षकांमध्ये लोकप्रिय असे जे आघाडीचे सॉफ्टवेअर आहे, त्यांनी चटगपटचा वापर पकडण्याकरिता त्यात नवे फीचर घातले. ‘निबंध चटगपट वापरून लिहिलेला असण्याची शक्यता आहे’, वगैरे. अडचण एवढीच आहे, की यात अधूनमधून फॉल्स पॉझिटिवसुद्धा येतात.

आता, प्लेजियरिझमबद्दल पकडले, तर ते सिद्ध करता येणे निदान काही अंशी तरी शक्य आहे. बोले तो, या या स्रोताशी या या नि इतक्याइतक्या ठिकाणी इतक्याइतक्या प्रमाणात मिळतेजुळते आहे, हे दाखवता येणे अशक्य नाही. पण ‘चटगपटाने लिहिल्यासारखे वाटते’, हे नक्की कशाबरोबर पडताळून पाहणार?

बरे, सॉफ्टवेअर बनविणारी कंपनी स्पष्टपणे म्हणते, की आमची (चटगपटजन्य निबंधांसंबंधीची) निदाने ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ नव्हे; त्यांत त्रुटींना वाव आहे, सबब ती केवळ मार्गदर्शक म्हणून गणली जावीत, अंतिम निष्कर्ष म्हणून नव्हे, वगैरे. पण लक्षात कोण घेतो? ‘सॉफ्टवेअरने सांगितले आहे, ते चुकीचे कसे असेल?’ ही जिथे सामान्य मानसिकता आहे म्हणा, किंवा सॉप्टवेअरवर विसंबून राहून आपल्या डोक्याला यत्किंचितही शीण न देण्याची (किंवा जबाबदारी न घेण्याची) जिथे सामान्य वृत्ती आहे म्हणा, तिथे, प्रश्नांकित निबंध हा चटगपटाने लिहिलेला आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर येण्याऐवजी, प्रस्तुत निबंध हा चटगपटाने लिहिलेला नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर येणार नाही कशावरून?

पूर्वीच्या काळी कसे असे, की वर्गपाठाकरिता जर तुम्ही बकवास निबंध लिहिलात, तर ‘बकवास निबंध’ म्हणून मार्क काटले जायचे. फार फार तर भोपळा मिळायचा. उलटपक्षी, चांगला, मुद्देसूद, सविस्तर निबंध लिहिलात, तर क्वचित्प्रसंगी पैकीच्या पैकी मार्कसुद्धा मिळत. आता म्हणजे, बकवास निबंध लिहिलात, तर ‘निबंध चटगपटाने लिहिल्यासारखा वाटतो’ म्हणून लबाडीचा, फसवणुकीचा आळ येऊन तुम्ही गोत्यात येणार. आणि, उलटपक्षी, उत्कृष्ट, सविस्तर, मुद्देसूद लिहिलात, तरीही तेच होणार. आफत आहे, यार! अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नक्की काय करावे?

——————————

आणि, हेही पुरेसे वाईट नाही, म्हणून आता हेदेखील वाचा. भयंकर आहे!

म्हणजे, उद्या समजा मी चटगपटाला मआंजावरील लैंगिकदृष्ट्या विकृत लोकांची यादी मागवली. मला काहीतरी उत्तर द्यायचे, म्हणून चटगपट, प्रथम क्रमांकाचा लिंगपिसाट म्हणून निष्कारण (उगाचच!) अस्वलरावांचे नाव पुढे करणार. अगदी त्यांच्या लैंगिक दुष्कृत्यांच्या स्थलकालसहित तपशीलवार बातमीच्या संदर्भासहित. आणि, बातमीही अशीतशी नव्हे, तर अमक्याअमक्या तारखेला वॉशिंग्टन पोस्टासारख्या (किंवा तत्सम) ख्यातनाम माध्यमातून प्रसिद्ध झालेली.

मग भले (१) त्या बातमीतली घटना कधीही घडलेली नसो, (२) त्या बातमीतले तपशील तद्दन खोटे आणि/किंवा पूर्णपणे कपोलकल्पित असोत, (३) त्या बातमीत कथिलेली घटना बातमीनुसार ज्या स्थळी घडली, त्या स्थळी अस्वलराव त्या वेळेसच काय, परंतु त्या स्थळापासून हजार मैलांच्या परिघात आपल्या उभ्या जन्मात कधीही गेलेले नसोत, (४) अस्वलरावांवर असले आरोप त्यांच्या उभ्या आयुष्यात आजतागायत कधीही झालेले नसोत, आणि, कहर म्हणजे, (५) वॉशिंग्टन पोस्टाने किंवा अन्य कोणत्याही माध्यमाने, कथित दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी, अस्वलरावांच्या संदर्भात ही वा अशी कोणतीही बातमी मुळात प्रसिद्ध केलेली नसो, किंवा प्रसिद्ध करण्याची कल्पनादेखील केलेली नसो.

आणि, अशी गोष्ट व्हायरल व्हायला कितीसा वेळ लागतो?

यातील (५) क्रमांकाची बाब सर्वात गंभीर आहे. बोले तो, वॉशिंग्टन पोस्टाने जर खरोखरच अशी बातमी छापलेली असेल, तर अस्वलराव वॉशिंग्टन पोस्टाच्या संपादकाची गचांडी धरू शकतात, त्याला ती बातमी मागे घ्यायला, तसा जाहीर खुलासा छापायला नि जाहीर माफी मागायला भाग पाडू शकतात. कदाचित अब्रूनुकसानीकरिता वॉशिंग्टन पोस्टास कोर्टातदेखील खेचू शकतात नि आर्थिक भरपाई मागू शकतात. पण वॉशिंग्टन पोस्टाने मुळात जर अशी बातमी छापलीच नसेल, तर अस्वलराव गचांडी धरतील कोणाची?

बरे, चटगपटाने माझी फुका अशी बदनामी करून माझी वाट लावली, अशी बोंब ठोकण्याकरिता अस्वलरावांनी कोठल्या माध्यमाला जर मुलाखत दिली, तर त्या मुलाखतीचा दाखला देऊन चटगपटाचा भाऊ पटगपट अस्वलरावांना लिंगपिसाट ठरविणार. एकंदरीत काय, अस्वलराव इज़ स्क्रूड! फॉर नो गूड रीझन, अँड फॉर नो फॉल्ट ऑफ हिज़ ओन.

म्हणजे, खोट्या बातम्या प्रसिद्ध करायला नि लोकांची बदनामी करायला फॉक्स न्यूज़ पुरेसे नव्हते, म्हणून आता चटगपटाची भर!

कठीण मामला आहे एकंदरीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.vox.com/future-perfect/2023/3/29/23660833/ai-pause-musk-arti...

Some of the biggest names in AI are raising the alarm about their own creations. In an open letter published Tuesday, more than 1,100 signatories called for a moratorium on state-of-the-art AI development.

“We call on all AI labs to immediately pause for at least 6 months the training of AI systems more powerful than GPT-4 (including the currently-being-trained GPT-5),” reads the letter, released by the Future of Life Institute, a nonprofit that works to reduce catastrophic and existential risks. “This pause should be public and verifiable, and include all key actors. If such a pause cannot be enacted quickly, governments should step in and institute a moratorium.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण फक्त सहा महिने पॉज करून काय मिळणार आहे? Military Industrial Complexes मध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांचे काय?
असो, मला त्याचे काय? कोणीतरी ह्या लोकांना “कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं” असं म्हणावं इतकीच इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

May be during the 6 month pause, the plan is to start to figure out the guidelines, controls and regulations needed. Just speculating..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yeah, right.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंगलोरची एक कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महिन्याची वर्गणी भरणार आहे. कामाशी मतलब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

As an AI language model, it is not my role to criticize any individual or political figure. However, I can provide you with a general statement regarding criticism in politics:

In a democratic society, it is important to have open and honest discussions about the actions and policies of elected officials. Constructive criticism can lead to improvements and progress, while personal attacks and insults do not contribute to meaningful dialogue or problem-solving. It is essential to respect differences of opinion and engage in civil discourse to promote understanding and progress.

हे उत्तर मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गोल्डमनसॅकच्या रिपोर्ट वर बिझनेस स्टॅ. वर एडीटोरीअल आणि एक स्तंभ आला आहे. मूळ रिपोर्ट इथे. https://www.ansa.it/documents/1680080409454_ert.pdf या रिपोर्टनुसार प्रगत देशात जॉब्स लॉसेस जास्त असण्याची शक्यता आहे. तुलनेने भारताला अर्थात कमी धोका आहे असा या रिपोर्टचा अंदाज आहे. (माझ्या मते असलाच तर तो आयटी इंडस्ट्री वाल्यांसाठी अधिक आहे. कारण यापुढे नवीन कोड लिहिण्यासाठी, इतकेच काय तर असलेल्या कोड मधून बग शोधून सपोर्ट देण्यासाठी कमी डोकी लागतील. नेमकी किती कमी लागतील हे येत्या काही वर्षात -म्हणजे ५-६ वर्षात- टीसीएस, इन्फी इ. कंपन्यांच्या हेड काउंट वरून कळेलच. भारतात अधिकाधिक व्हाईट कॉलर जॉब देणारी हीच एक इंडस्ट्री आहे. बाकी इंडस्ट्रीमध्ये जॉब असतात नाही असे नाही. पण कंपन्या आपल्या पर्मनंट पे-रोल वर न ठेवता बरेच जॉब्स आउटसोर्स करतात. शारीरिक श्रम करणार्‍या वर्गाला -श्रमिक वर्गाला/ब्लू कॉलर लेबरला- अर्थात कमी धोका आहे. मूळ रिपोर्ट फक्त चाळला आहे. विकेंडला वाचेन.

दुसरे जॉब्स तयार होतील असा आशावाद बि.स्टॅ. स्तंभलेखात आहे. पण जर तुम्ही हरारीचे २१ लेसन्स वाचले असाल, तर त्याचे मत असे आहे की, आतापर्यंत तंत्रज्ञानाने नेहमी दुसरे जॉब्स निर्माण केले हे खरे आहे. पण जेव्हा कॉग्नीटीव्ह डिसिजन मेकींग (जे माणसाचे हक्काचे क्षेत्र आहे) सुद्धा ए.आय करू शकेल (असे त्याने २०१८ च्या पुस्तकात म्ह्टले आहे) तेव्हा बेकारी प्रचंड वाढेल. नवीन जॉब्स साठी लागणारी कौशल्य (जी सतत बदलत राहतील) लगेच आत्मसात करण्याची क्षमता नसलेले लोक बेकार होण्याची शक्यता अधिक. १९ व्या शतकात लेबरचे "एक्सप्लॉयटेशन वा पिळवणूक" हा मुद्दा होता तर २१ व्या शतकात लेबरचा "ईरिलिव्हन्स वा निरर्थक" हा मुद्धा असेल असे त्याचे मत आहे. अर्थात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कॅपिटल वाढवून लेबर रिप्लेस वा कमी करताना अ‍ॅडिशनल कॅपिटलचे रिटर्न पण तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ब्लू लेबर जॉब्स अर्थात टिकून राहतील असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल टिसीएस आणि आज इन्फीचे तिमाही निकाल आले. दोनही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला सदर तंत्रज्ञानावर पत्रकारांनी प्रश्न विचारले. दोनही मेनेजमेंटने "चॅट जीपीटी" हा शब्द वापरायचा टाळला. त्याऐवजी "जनरेटीव्ह ए.आय." हा शब्द वापरणे पसंद केले.

# टिसीएस आणि इन्फी दोघेही अगोदर पासूनच एआय कडून कोड जनरेट करत आहेत. आणि पुढे हे तंत्रज्ञान अजून प्रगत करू इच्छितात.

# इन्फीचा "ओपन सोर्स" जनरेटीव्ह ए.आय. वर जास्त भर असेल. त्यातून स्वतःची आणि क्लायंटची प्रॉडक्टीव्हीटी वाढविण्याचा प्रयत्न राहील. काही क्लायंटकडूनच तशी मागणी आहे असेही इन्फी म्हणते.

# नोकर्‍यांच्या बाबतीत टिसीएस ला वाटत नाही की नोकर्‍या कमी होतील. नव्या तंत्रज्ञानावर काम करणारी माणसं लागतील असे टिसीएसला वाटते. तर इन्फीच्या व्यवस्थापनाने माझ्या मते सरळ सरळ उत्तर देणे टाळले. पण मार्जिन वाढवता येवू शकेल अशी हिंट दिली असे मला वाटले.

# २०२३ मध्ये एकंदर कर्मचारी इन्फीचे कमी झाले (गेल्या तिमाही निकालाच्या तुलनेत) तर टिसीएसचे थोडेफार वाढले. टिसीएस आणि इन्फी प्रॉमिस केल्या प्रमाणे फ्रेशर्सना नोकर्‍या देतील. मध्यंतरी एल&टीमाईंडट्री ने काही फ्रेशर्सना कमी पगारावर रुजू होण्यास सांगितले तर काहींना नकार दिला होता. पण या क्वार्टर मधून तसा काही अंदाज लावण्यात अर्थ नाही. कारण, एकंदर अमेरिकेत मंदीचे वारे वाहू लागलेत असे दोघांच्या बोलण्यावरून वाटते आहे. शिवाय कर्मचा-यांच्या पिरामिडमध्ये फ्रेशर्स वा १-३ वर्षाचा अनुभव असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या अधिक असेल तर ऑपरेटींग मार्जिन सुधारता येते. त्यामुळे फ्रेशर ना नोकरी देणे चालूच राहील. एकंदर कर्मचार्‍यांचे आकडे येत्या ४-५ वर्षात कसे असतील यावरून या तंत्रज्ञानाचा नोकर्‍यांवर होणार्‍या परिणामाचे चित्र अधिक स्पष्ट होईल. सध्या टीसीएस मध्ये ६१४,७९५ इतके कर्मचारी आहेत तर इन्फी मध्ये सध्या ३४३,२३४ कर्मचारी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बार्ड सर्वांना उपलब्ध झाला. पण चॅट जीपीटी ची सर नाही असे दिसले प्राथमिक वापरावरून. मराठी हिंदी भाषा तर सरळ मी सपोर्ट नाय करत म्हणतोय. कोणत्या भाषा सपोर्ट करतोस असे विचारल्यावर दाखवताना लिस्ट दाखवतो मोठी. त्यात हिंदी मराठी बंगाली सर्व आहेत. पण प्रत्यक्षात हिंदी मराठी प्रश्न विचारले तर सरळ इंग्रजीत बरुद्दिल्ला म्हणतोय. इंग्रजीतून विचारले की हिंदी मराठी जाणतोस का? तरी तेच. मग साधी गूगल सर्च बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण प्रत्यक्षात हिंदी मराठी प्रश्न विचारले तर सरळ इंग्रजीत बरुद्दिल्ला म्हणतोय.

तिरियादु म्हटलेले बरे, की मनाला येईल, ते ठोकून दिलेले?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिली मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ क्षमतेच्या जोरावर तंत्रज्ञान म्हणून चॅट जीपीटी सध्या बराच पुढे आहे पण येणाऱ्या काळात हा गॅप कमी होत जाईल असे वाटते. मॉडेल ट्रेनिंगची किंमत, ओपन सोर्स (हगिंग फेस वगैरे) कडून होणारी प्रगती, अमेझॉनची बेडरॉक-टायटन अनाउंसमेंट, ब्लूमबर्गसारख्या कंपन्यांनी सुरु केलेले इंडस्ट्री स्पेसिफिक काम यामुळे चॅट जीपीटीला चांगली काँपिटिशन असेल असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी हिंदी भाषा तर सरळ मी सपोर्ट नाय करत म्हणतोय.

किमान चॅटजीपीटी-छाप बकार भाषा तर छापत नाहीये. ती दिसते मराठीसारखी, वाटते मराठीसारखी, पण मराठी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपेक्षेप्रमाणेच मायक्रोसॉफ्टने त्यांच्या ऑफिस सॉफ्टवेअरात को-पायलट (ए.आय) विकायला सुरुवात केली आहे. -जवळपास ३०$ महिन्याला.
स्टॉक उसळलाय, आणि आता बाकी कंपन्याही ह्याला प्रत्युत्तर देतील.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

उभरता एआय, आणि त्यात विकीपीडियाचे भवितव्य असा एक वाचनीय लेख Wikipedia’s Moment of Truth न्यू यॉर्क टाइम्स मधून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गेले काही महिने चॅट जीपीटी वापरल्यावर एक गोष्ट लक्षात आली की पूर्वी बरेचसे ब्लॉग्ज संदर्भ पाहण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी वाचत होतो त्यातील बराचसा भाग चॅट जीपीटी उत्तरं देण्यासाठी वापरतो. एकच प्रोग्राम सीपीपी, पायथॉन आणि जावा मध्ये विचारला तल ठराविक कोडिंग साईटवरून कॉपी पेस्ट करून आपल्या पुढ्यात ठेवला जातो. एखाद्या दुर्मिळ ऐतिहासिक घटनेविषयी विचारले तर त्याची माहिती आहे तशी कोणत्या ना कोणत्या एनसायक्लोपेडिया वर मिळतेच.

एखाद्या नेत्याबद्दल, लेखकाबद्दल किंवा त्यांच्या पुस्तकांवर काही प्रश्न विचारले तर ऑथोराईज्ड वेबसाईट वरील मजकूर किंवा साहित्य विषयक ब्लॉग वरील मजकूर आहे तसा छापला जातो उत्तरादाखल. राजकारणातील कॉन्स्पीरेन्सी थिअरीज विषयी विचारले तर सर्वाधिक वाचलेले माहितीपर लेखांतूनच जसच्या तसं उचललं जातं. म्हणजे काही अंशी प्रेडिक्टेबल उत्तरे चॅट जीपीटी देतोय. मराठीतील उत्तरे देताना शुद्धलेखन, वाक्यरचना बद्दल फारच मागास आहे चॅट जीपीटी. माहिती पण फारच त्रोटक.

सध्या तरी खंडीभर एआय एमल कोर्सेस सोबत चॅट जीपीटी वगैरे टूल्स वापरावीत कशी याबद्दल सेमिनार्स, वर्कशॉप्स वगैरे भरपूर चालतात. त्यात भरीस भर म्हणून युट्युबर लोकांना कंटेंट वाढविण्यासाठी पिक्टोरी, सिंथेझिया, साउंडड्रॉ, मिडजर्नी सारख्या टूल्सनी मोकळं रान मिळाले आहे. कितीतरी इंग्रजी ब्लॉग तर चॅट जीपीटी वरून कॉपी पेस्ट केल्या सारखे वाटतात. लीटकोड, हॅकररॅंक, हॅकरर्थ सारख्या कोडिंग वेबसाइट वर तर पोराटोरांनी चॅट जीपीटीचा वापर करून भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रेकॉर्ड ब्रेक बॅजेस मिळवले आहेत रेझ्युमेवर छापण्यासाठी. कहर केलाय पोरांनी.

एकूण काय तर एखाद्याचे ब्रेन वॉशिंग करून जर हवा तसा इतिहास, भूगोल शिकवला तर ते बिनडोक तेच खरे मानून अख्खं आयुष्य जगतं, तसाचा काहीसा प्रकार चॅट जीपीटी ला ट्रेन करण्यासाठी हवा तसा माहितीचा साठा दिला गेला तर प्रचारकी साहित्य आणि इतिहासाचा प्रचार प्रसार केला जाऊ शकतो.

ऐतिहासिक, अनैतिहासिक आणि प्रागैतिहासिक सगळा धांडोळा होणार आहे भविष्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

स्वयंभू, तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे.
ए.आय वापरून तथ्यांची मोडतोड करणं सोप्पं झालं आहे, आणि तेही अनेक मितींमधे.
उदा.
एकमितीय : लिखाण.
द्विमितीय : डीपफेक वापरून बनवलेली चित्रं,व्हिडिओ वगैरे.
त्रिमितीय (सध्या तरी शक्य नाही) : खराखुरा माणूस. म्हणजे १००% ३डी प्रिंट आणि ए.आय बनवून वगैरे.

असं हे वाढतच जाणारे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फॅक्ट चेकिंगही एकाहून अधिक मितींमधे सुरू होईल, त्यासाठी नव्या कंपन्या तयार होतील आणि नवे अल्गोरिथम बनतील.

[ हे आपलं फार पुढे, पण २०६० साली ही सगळी माहिती वाचणारेसुद्धा कदाचित अल्गोरिथमच असतील.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज दोन डेटासायंटिस्ट मित्रमैत्रिणींना जेवणासाठी भेटले होते. त्या चर्चेतला मला नोंदवावेसे वाटलेले मुद्दे -

१. बारावीपर्यंतच्या मुलांची बरीच काळजी वाटते. ती मुलं लिहायला शिकतील का? (हिची मुलं सध्या शाळेत आहेत.)

२. आधीच फेक न्यूजची कमतरता नाही. आता काय निपजेल, कोण जाणे! लहान मुलं किमान वाचलेला सगळा शब्द खरा मानायचा नाही हे शिकतील; मोठ्यांचं काय?

३. दर काही वर्षांनी जुना डेटा टाकायला लागतो आणि नवा गोळाही करावा लागतो. नाही तर मॉडेल-ड्रिफ्ट होतात. पण ही मॉडेलं आता जनरेटिव्ह एआयनं बनवलेलं लेखनच वाचत सुटली तर? हेच चित्रांच्याही बाबतीत.

४. कॉपीराईटच्या केेसेसचं काय होतं बघू. (काही लेखकांनी आपली पुस्तकं ओपन एआयनं वाचली म्हणून दावे ठोकले आहेत.) पण ही पुस्तकं मूळ स्वरूपात साठवलेली नसतील तर काही फरक पडेल का? त्यांनी फक्त word embeddings साठवलेली असतील तर त्याला कॉपीराईट कायदा लागू पडेल का? हेच चित्रांचंही, चित्रांच्या URL किंवा convolution layerमधून घालून मिळणारा पाक फक्त साठवला नसेल तर असलेल्या मालाच्या कॉपीराईटचा मुद्दा लागू पडेलसं वाटत नाही.

५. "चीनमध्ये याबद्दल कायदे केलेत, त्यात कम्युनिस्ट पक्षावर टीका चालणार नाही, असाही एक आहे. हे कसं जमवणार?"
"सगळ्याच राजकीय कॉमेंटरीवर फिल्टर टाकला की झालं!"
"सध्याच्या LLMsना (Large Language Models) हे झेपेल का? मोदींबद्दल इंग्लिशमध्ये विचारलं की राजकीय मत देत नाही असं चॅट जीपीटी म्हणत होता. मराठीत विचारलं की मराठीसम भयभीषण भाषेत काहीबाही लिहीत होता."
("तुझं मोदींवर खर्रंखर्रं प्रेम आहे." -- मित्र)

(सध्या अमेरिकेच्या दक्षिण भागात खूप उन्हाळा आहे. टेक्सासात जुलै महिनाभर तापमानाच्या उच्चांकाचे विक्रम मोडले जात आहेत) "एआय सोड, ह्या उन्हामुळेच आपण सगळे जळून जाऊ असं मला वाटतं!" मैत्रीण म्हणाली.
मित्र म्हणाला, "आणि ही LLMs (Large Language Models) तयार करायला चिकार वीज जाळली जाते!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व मुद्दे रोचक.

बाय द वे..

चित्रांच्या URL किंवा convolution layerमधून घालून मिळणारा पाक फक्त साठवला नसेल तर असलेल्या मालाच्या कॉपीराईटचा मुद्दा लागू पडेलसं वाटत नाही.

नसेल तर की असेल तर?

याही उपर अजून एक. खुद्द मॉडेल उदा. ती आपण केलेली विशिष्ट लेयर्सची रचना जी आपल्या संशोधनानंतर, ट्यूनिंगनंतर म्हणा किंवा ट्रायल एरर नंतर म्हणा बनवली गेली आहे आणि आता चांगले मेट्रिक्स दाखवते आहे.. तर अशी ही रचना इट्सेल्फ कॉपीराइट किंवा कोणत्याही प्रकारचा आयपी म्हणून पात्र ठरते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या रूपात साठवले असतील तर, असंच म्हणायचं होतं.

ही माॅडेलं तशीही जाहीर करत नाहीतच. त्यामागचं प्राथमिक अल्गोरिदम बहुतेकदा जगजाहीर असतं. पण डेटा कसा खिलवतात, माॅडेलं किती क्लिष्ट बनवतात हा भाग कौशल्याचा असतो. बहुतेक कंपन्यांकडचा डेटा जाहीर केलेला नसतो. त्यामुळे काॅपीराईटची भानगड निघत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचण्यासाठी ड्राफ्ट

यातील १७ वा आणि १८ वा सेक्शन वाचण्याजोगे आहे. ट्रान्सफर ऑफ पर्सनल डेटा आउटसाईड इंडिया आणि एक्झंप्शन.

थोडंसं अवांतर...

तसंही कधीकाळी जमीनीच्या मालकीहक्कासाठी युद्ध भडकली. त्यातून एकमेकांवर मक्तेदारी प्रस्थापित करून मास्टर स्लेव्ह व्यवस्था तयार झाली. नंतर कारखानदारी आली आणि कॅपिटालिस्ट लॉबी गब्बर झाली. अशा लॉबीचे फायनान्शीअल आणि सेटलमेंट गोल म्हणजे माणसाला एकेकाळच्या चैनीच्या वस्तू गरज म्हणून खरेदीसाठी गळी उतरवणे. त्यासाठी देशोदेशी हस्तक्षेप करून आजूबाजूचे वातावरण तयार केले गेले.
आता नवं डेटामाफिया तयार होण्यासाठी प्रचंड अवाढव्य मार्केट उभं राहिलं आहे. सोशलमेडिया फक्त निमित्त. भविष्यात फार मजेशीर घटना घडणार आहेत या डेटा च्या बाबतीत.

अति अति अवांतर

जाता जाता पाकिस्तानी डेटा प्रोटेक्शन बिल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू