नारळी पाव

दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे.

आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.

अत्यंत सोपी आणि झटपट होणारी हे आहे नारळी पावाची पाककृती -

साहित्य -

कोकोनट पावडर - १०० ग्रॅम्
अंडी - २
बटर - ४-५ चमचे
बेकींग पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार

वरील सर्व पदार्थ एकत्र करा. ओवन १८० डिग्रीवर गरम करून घ्या. ज्या भांड्यात बेक करणार त्या भांड्याला आतून बटरचा हलका हात फिरवून घ्या. मिश्रण भांड्यात ठेवून १८० तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या.

छायाचित्रे -

https://drive.google.com/drive/folders/1jn7GbXwpPvsYQ_amA34uOIjrv3onHq4u...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(प्रस्तुत पदार्थ मी स्वतः बनवून पाहण्याची शक्यता सुतराम् नाही, परंतु तरीही, निव्वळ जनहितार्थ…)

ओवन १८० डिग्रीवर गरम करून घ्या.

१८० तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या.

‘ऐसीअक्षरे’वरील सदस्यांपैकी बऱ्यापैकी जनता ही अमेरिकेत वास्तव्यास असल्याकारणाने, हा १८०चा आकडा म्हणजे डि.से. की डि.फॅ., ते स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. (आपल्याला बहुधा १८० डि.से. म्हणायचे असावे. (चूभूद्याघ्या.))

(वस्तुतः, १८० डि.फॅ (साधारणतः ८२ डि.से.) म्हणजे पाण्याच्या उत्कलनबिंदूहूनही कमी तापमान… या तापमानास प्रस्तुत नारळीपावच काय, परंतु कोठलीही वस्तू बेक काय होणार कपाळ! हे तर्काधिष्ठित विचार केल्यास कोणालाही लक्षात येणे सहज शक्य आहे. परंतु तरीही, Common sense being increasingly uncommon, especially in America… चालायचेच!)

((अमेरिकास्थित) जनहितार्थ घोषणा: १८० डि.से. म्हणजे ३५६ डि.फॅ. सबब, ओव्हनचे तापमान साधारणतः ३५०-३६०च्या रेंजमध्ये ठेवण्यास हरकत नसावी. (चूभूद्याघ्या.))

—————

(अतिअवांतर: हा नारळीपाव किरिस्तांव लोक नारळीपौर्णिमेस खात असावेत काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादी किंचित तृटी ठेवली की नबा प्रतिसाद द्यायला हमखास येतात हे पुनरेकवार सिद्ध झाले!

बाकी तापमान सेल्शियसमध्येच आहे गरजूंनी फॅरनहाईटमध्ये बदलून घ्यावे अन्यथा कच्चा पाव खावा लागेल.

यात अंडे असलयामुळे हिंदू मंडळी नारळीपौर्णिमेच्या दिवशी खायचा शक्यता कमीच. पुढील महिन्यात वसई भागात जाणे होणारच आहे. तेव्हा किरिस्ताव मंडळी खातात किंवा कसे, हे विचारून घेईन!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धाग्याचं शीर्षक बघून आधी प्रश्न तोच पडला होता, की तुम्ही पुन्हा कार्बोहायड्रेट्स खायला लागलात का काय!

मी आळशी आहे. भाजी किंवा उसळ खाऊन पोट भरलं नाही तर वाटीभर दही खाते. तसंही दीड महिन्यापूर्वी केलेल्या एका सर्जरीमुळे वजन दीडेक किलो कमी झालं. ही बॅरियाट्रिक सर्जरी नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कार्ब्स पूर्ण सोडणे शक्य नाही पण कमी केले आहे म्हणून वजन अद्याप ६० किलोवर स्थिर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0