झोनरिजम
झोनरिजम म्हणजे विज्ञानातील (वा इतर कुठल्याही क्षेत्रातील) वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनसामान्यांची दिशाभूल करणे.
महाभारत युद्धातील एका प्रसंगात नरो वा कुजरोवा असे अधांतरीचे विधान करून द्रोणाचार्य यांना मारण्यात आले. कदाचित हाच आपल्याला ज्ञात असलेला झोनरिजमचा पहिला विधान असू शकेल. आताच्या इंटरनेट व समाजमाध्यमाच्या जमान्यात या प्रकारे विपर्यास्त व दिशाभूल टीका-टिप्पणी करून वाचकांचे मत आपल्या मताशी जुळवून घेण्याचे प्रयत्न होत असताना या झोनरिजमची आठवण येत राहते.
अमेरिकेतील इडाहो राज्यातील एका माध्यमिक शाळेतील नाथन झोनर या १४ वर्षाच्या विद्यार्थ्याने शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात ‘डायहायड्रोजनमोनॉक्साइड (DHMO) या रसायनाचे धोकादायक परिणाम’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील काही महत्वाचे मुद्दे असे होतेः
डायहायड्रोजनमोनॉक्साइड (DHMO) या रसायनाचे धोकादायक परिणाम
● रसायन पोटात गेल्यास काही वेळा जास्त घाम व वांती येण्याची शक्यता असते.
● याचे रासायनिक गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याच्या हायड्रॉक्सिल अॅसिड स्थितीत तो प्रोटॉनचा डोनर असतो, तर हायड्रोजन
हायड्राक्सॉइड अवस्थेत प्रोटॉनचा रिसिपंट असू शकतो.
● या रसायनाची द्रव, घन वा वायु कुठलीही स्थिती असली तरी त्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
● घनरूपातील हे रसायन जास्त काळ शरीरावर ठेवल्यास त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
● या रसायनाचे वायुस्वरूप वा जास्त तापमानातील द्रवस्वरूप अंगावर पडल्यास तो भाग भाजण्याची शक्यता असते.
चुकून श्वासावाटे हे रसायन फुफ्पुसात गेल्यास गुदमरून मृत्यु येण्याचा संभव असतो.
● काही धातूवर जंग चढण्यास हे रसायन सहाय्यभूत ठरते.
● या रसायनामुळे दर वर्षी जगभरातील हजारो-लाखो लोकांचा मुत्यु होतो.
● अॅसिड रेनमधील सर्वात जास्त वाटा या रसायनाचा असतो.
● जगभरातील प्रत्येक नदी-नाल्यामध्ये, समुद्रात व महासागरात हे रसायन नेहमीच आढळते. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या टोकावरील
आर्क्टिक व अंटार्क्टिक महासागरातही हे रसायन सापडते.
● स्वयंचलित ब्रेक्सची परिणामकारकता हे रसायन कमी करते.
● कर्कग्रस्त रुग्णांच्या गाठीत हे रसायन नेहमीच आढळते.
● राजकीय लागेबांधे असलेल्या औद्योगिक कंपन्या हे रसायन त्या त्या औद्योगिक वसाहतीतील नदी-नाल्यामध्ये टाकून प्रवाह प्रदूषित
करतात व संभाव्य शिक्षेपासून स्वतःचा बचाव करून घेतात.
● धूम्रपान करणारे त्यांच्या उच्छ्वासाद्वारे हे रसायन हवेत सोडत असल्यामुळे जवळपास असणाऱ्यांमध्ये सेकंडरी कॅन्सर होण्याचा
धोका असतो.
● एचआयव्हीग्रस्त सर्व रुग्णाच्या रक्तांमध्ये हे रसायन हमखास सापडते.
● स्वस्त परदेशी वस्तू देशात येण्यासाठी हे रसायन मदत करत असल्यामुळे त्या त्या देशातील आर्थिक व्यवस्थेवर व रोजगारावर
परिणाम होण्याची शक्यता असते.
● वातावरणात हे रसायन पसरलेले असल्यास सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोचण्यास अडथळा निर्माण होतो. व त्यामुळे ऋतुमानात बदल
होऊन काही आजार येण्याची व औदासिन्य वाढण्याची शक्यता असते.
● मद्यपान करणारे मद्याबरोबर या रसायनाचे मिश्रण करून पितात. जास्त प्रमाणात याचे मिश्रण केल्यास मद्याच्या नशेवर परिणाम
होऊ शकतो.
● या रसायनाच्या अती सेवनामुळे मूत्र विकार व मूत्रपिंडविकाराशी संबंधित समस्यामध्ये वाढ होऊ शकते.
● सौदी अरेबिया, कुवेत, ब्रुनाइ यासारख्या देशातील वातावरणात या रसायनाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात
इतर देशांच्या तुलनेने वाढ झाल्याचे दिसते.
या रसायनावर पूर्ण बंदी घालावी असे आपल्यालाही वाटत असल्यास अमुक अमुक नंबरवर संपर्क करावे ही विनंती.
हा अहवाल त्याने आपल्या वर्गात वाचून दाखविले. त्याच्या वर्गातील ५०पैकी ४३ मित्र/मैत्रिणींने (८६ टक्के!) या रसायनाच्या विरोधात चळवळ उभे करण्यास पाठिंबा दिला. या संबंधातील वेबसाइट्सना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. पुढील काही वर्षात न्यूझिलँड, कॅनडा, कॅलिफोर्निया स्टेट इत्यादी ठिकाणच्या प्रशासनाने या रसायनाच्या विरोधात ठराव पास केले.
यावरून ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आपल्यातील चिकित्सक वृत्ती वाढविल्यास अशा फसव्या धोक्यापासून (कदाचित!) आपण आपले रक्षण करू शकू.
परंतु रिचर्ड फेनमान या नोबल पारितोषक विजेत्याने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ‘तुम्ही स्वतःची फसवणूक कधीही करून घेवू नये या तत्वाचे पालन करा. त्याचप्रमाणे तुम्हाला फसविणे हा अगदी सर्वात सोपा उपाय असू शकतो याचीही आठवण ठेवा.’ फ्रेंच तत्वज्ञ, व्होल्टेर यानीसुद्धा ‘मूर्खपणावर विश्वास ठेवण्यास उद्युक्त करणारे तुमच्यावर अन्याय व अत्याचार करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.’ असे म्हटले आहे. त्यामुळे झोनरिजमपासून स्वतःला वाचविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
प्रतिक्रिया
विज्ञान शिक्षकांनासुद्धा कळले नाही?
-ताराबाई
टिप टिप चांदणी
विज्ञान शिक्षकांनासुद्धा कळले नाही?
-ताराबाई
टिप टिप चांदणी
ह्याच्यात खिल्ली उडवण्यासारखे
ह्याच्यात खिल्ली उडवण्यासारखे काय आहे? एखादी व्यक्ती इतके संशोधन करून लिहीत असेल तर त्याचे कौतुक नका करु पण खुसपट तर नका काढू?!
?
खिल्ली कुठे? दाद दिली
-ताराबाई
टिप टिप चांदणी
खिल्ली उडविलेली आहे ना!
खिल्ली तर उडविलेली आहेच! परंतु, ती तुम्ही नव्हे, तर त्या 'इतके संशोधन करणाऱ्या'ने. त्या 'इतक्या संशोधना'वर, त्याचा अर्थ समजून न घेता, बिनडोकपणे, डोळे झाकून विश्वास ठेवून, त्या 'इतक्या संशोधना'चे समर्थन करणाऱ्यांची. (थोडक्यात, मस्त मामा (मावशी?) बनविला(ली) आहे.)
सगळ्यात भारी भाग म्हणजे, केलेले दावे (अगदी टोकाचे दावेसुद्धा!) हे बहुतांशी तथ्यास धरूनच आहेत. परंतु अर्थात, त्यांचा अर्थ कसा लावावा, हे त्या अर्थ लावणाऱ्याच्या नजरेवर आहे, नाही काय?
(म्हणूनच, स्वत:ची बुद्धी वापरावी. 'बौद्धिकां'वर अवलंबू नये. पण लक्षात कोण घेतो(ते)?)
काय एक से एक दावे आहेत!
काय एक से एक दावे आहेत!
- चुकून श्वासावाटे हे रसायन फुफ्पुसात गेल्यास गुदमरून मृत्यु येण्याचा संभव असतो.
- जगभरातील प्रत्येक नदी-नाल्यामध्ये, समुद्रात व महासागरात हे रसायन नेहमीच आढळते. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या टोकावरील
आर्क्टिक व अंटार्क्टिक महासागरातही हे रसायन सापडते.
- कर्कग्रस्त रुग्णांच्या गाठीत हे रसायन नेहमीच आढळते.
- एचआयव्हीग्रस्त सर्व रुग्णाच्या रक्तांमध्ये हे रसायन हमखास सापडते.
- मद्यपान करणारे मद्याबरोबर या रसायनाचे मिश्रण करून पितात. जास्त प्रमाणात याचे मिश्रण केल्यास मद्याच्या नशेवर परिणाम
होऊ शकतो.
(इतरत्र कोठे तर हे रसायन एक सर्वसामान्य industrial solvent असल्याबद्दलचासुद्धा दावा आढळला.)
(हे तर सर्वात भारी आहे: "स्वस्त परदेशी वस्तू देशात येण्यासाठी हे रसायन मदत करत असल्यामुळे त्या त्या देशातील आर्थिक व्यवस्थेवर व रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असते.")
गंमत म्हणजे, या दाव्यांच्या सत्यतेबद्दल शंका घेण्यासारखे काहीही नाही. ते पूर्णपणे खरे आहेत. They are all very obvious, आणि सर्वज्ञात आहेत. (किंबहुना, याकरिता 'इतके संशोधन' करण्याचीही गरज नसावी, इतके हे सर्व उघड आहे.)
------------------
(माझ्या कल्पनेप्रमाणे, हे 'इतके संशोधन' हे संशोधन नसून एक मानसशास्त्रीय प्रयोग होता. त्याची निरीक्षणेही (पक्षी: किती जण गंडले) मला वाटते नंतर प्रसिद्ध करण्यात आली होती.)
बरोबर
विकिपीडियावर वाचले. एप्रिल फुलची फसवणूक म्हणून लिहिलेला लेख नंतर social experiment साठी वापरला.
लै भारी प्रकार हाय!
-ताराबाई
टिप टिप चांदणी
अत्यंत रोचक विषय.
अत्यंत रोचक विषय.
हा भाग जरा अविश्वसनीय वाटला. बाकी मजेदार.
.
रोचक तर खराच.
परंतु, तसे पाहायला गेले, तर DHMOच्या संदर्भात वर केलेले प्रत्येक विधान हे तत्त्वतः तंतोतंत खरे आहे. त्यामुळे, लिहिणाऱ्याने काही खोटे लिहिले, आणि वाचणाऱ्यांनी खोट्या विधानांवर विश्वास ठेवला, असे मानायला जागा नाही. (हं, आता, या ‘रसायना’वर बंदी घालावी, किंवा कसे, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा!)
का बुवा? परमेश्वराने (नास्तिकांचा यावर विश्वास नाही, ते सोडून द्या.) दुनियेत जेव्हा गध्यांचे वाटप केले, तेव्हा या देशांतील संकीर्ण प्रशासने ही एकजात एकसमयावच्छेदेकरून परसाकडे गेलेली असल्याकारणाने त्यांना वाटपस्थळी पोहोचण्यास उशीर झाला, नि त्यामुळे they missed out on a good thing, अशी तुमची प्रामाणिक समजूत आहे काय?
एक ढूँढो, हज़ार मिलते हैं।
२०००च्या दशकात, आमच्या अटलांटाच्याच एका (आता निवृत्त) अत्यंत लोकप्रिय (म्हणजे, भरपूर श्रोते असलेल्या, अशा अर्थाने) उजव्या/लिबर्टेरियन रेडियो टॉक शो होस्टने, आपल्या कार्यक्रमातून (नक्की खात्री नाही, परंतु, बहुधा प्रँक म्हणून), अटलांटा शहराच्या पाणीपुरवठ्यात मुबलक प्रमाणात DHMO असल्याचे आढळल्याबद्दल काही विधान केले. (आता, तत्त्वतः, या विधानातील तथ्यांश नाकारता येणार नाही.) त्यामुळे, घाबरलेल्या अटलांटावासीयांनी अटलांटा शहराच्या पाणीपुरवठाविभागास फोनावर फोन करून बेजार करण्यास सुरुवात केली. अखेरीस अटलांटा शहराच्या पाणीपुरवठाविभागास, ‘पाणीपुरवठ्यात कायद्याने DHMOचे जितके प्रमाण permissible आहे, त्या मर्यादेचे उल्लंघन’ होत नसल्याबाबत जाहीर विधान करावे लागले.
आता बोला!
(किंचित दुरुस्ती)
अधिक परीक्षणाअंती, I must qualify my statement. “DHMOच्या संदर्भात वर केलेली बहुतांश विधाने ही तत्त्वतः तंतोतंत खरी आहेत” असे म्हणू या.
हे विधान नजरचुकीने नजरेआड झाले होते.
या विधानातील दोन्ही उपविधाने ही स्वतंत्रपणे तंतोतंत खरी असावीत बहुधा (चूभूद्याघ्या.); मात्र, त्यांच्यातील कार्यकारणसंबंधाबाबत किंचित साशंक आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे, (सौदी अरेबिया आणि कुवेतबद्दल फारशी शंका नाही अर्थात, परंतु) ब्रुनेईच्या वातावरणात या रसायनाची कमतरता असण्याचे काही कारण दिसत नाही. (किंबहुना, जरा जास्तच प्रमाणात आढळत असावे, असे प्राथमिक तपासणीवरून लक्षात येते.)
कदाचित, हे विधान पुढीलप्रमाणे लिहिले असते, तर तंतोतंत खरे ठरण्याची शक्यता अधिक होती.
——————————
धूम्रपान करणारे त्यांच्या उच्छ्वासाद्वारे हे रसायन हवेत सोडत असतात, हे अत्यंत खरे आहे. धूम्रपान करणाऱ्यांच्या जवळपास असणाऱ्यांमध्ये सेकंडरी कॅन्सर होण्याचा धोका असतो, हेदेखील तितकेच खरे आहे. मात्र, या दोहोंमध्ये कार्यकारणभाव लावणे हे Correlation does not imply causationचे उत्तम उदाहरण आहे.
असो.
हे तर फारच रोचक आहे.
हे तर फारच रोचक आहे.
बाकी खऱ्या ऐवजी खोटे सांगणे आणि खरे तेच पण वेगळ्या पध्दतीने मांडणे हे दोन वेगळे प्रकार आहेत आणि disinformation आणि misinformation असे काय काय असते म्हणतात. त्यातही सत्याचा सिलेक्टिव्ह भागच मांडणे, चेरी पिकिंग डाटा असे बरेच काही.
अगदीं थोडक्यात
Fair and lovely वापरले की गोरे होते.
ह्या वर विश्वास ठेवणारे जगात करोडो आहेत .
शिक्षण स्व बुद्धी वापंरण्याची क्षमता ह्याचा बिलकुल संबंध नाही
जे मत मी अगोदर पण वापरले आहे.
अगदी १०० ये २०० खूप बुध्छिमन लोक चारशे पाचशे करोड लोकांना आरामात मूर्ख बनवू शकतात.
माणूस हा स्व बुध्दी नसणारा पृथ्वी वरील एकमेव प्राणी आहे म्हणून रोज करोडो लोक मूर्ख बनत असतात.
माणसं ल मूर्ख सहज बनवता येते पण शूद्र पक्षी कावळ्याला पण मूर्ख बनवता येणार नाही..
पूर्ण पोस्ट ल हेच उत्तर योग्य आहे
आज पण जगावर काही शेच लोकांचे राज्य आहे.
जगाला कोठे घेवून जायचे हे फक्त काही शे च लोक आज पण ठरवतात.
बाकी करोडो तर फक्त मेंढरं आहेत(मेंढर न च अपमान होत असेल तर त्यांची माफी मागावी लागेल)
माझ्या मताच्या सपोर्ट साठी सर्वांना समजेल असे उदाहरण.
मोबाईल आले.
नेट आले.
गूगल मॅप आले.
व्हॉट्स ॲप आले,फेस बुक आले,ट्विटर आले, tiktok आले, .
ईमेल आले.
लोक खुश विज्ञान नी त्यांची काम सोपी केली.
संवाद साधता आला.
मनोरंजन होत आहे.
स्वतःची creativity दाखवायला संधी मिळाली.
पण काहीच हुशार लोकांनी जग भारतील लोकांच्या आवडी निवडी,त्यांची व्यसन, त्यांचे विचार, त्यांची विचार करण्याची क्षमता हा सर्व डेटा जमा केला तो पण फुकट नाही करोडो कमवून.
आणि त्याचाच वापर जगभरातील देश त्यांची जनता ,त्यांचे विचार काय आहेत
हे शे दोनशे लोकांनी सहज माहीत करून घेतले .
आणि त्या नुसार च जगतातील सुपर पॉवर धोरण ठरवते..
कृत्रिम बुद्धिमत्ता वर जी काही यंत्र निर्माण झाली ती ह्याच माहिती वर .
लोक सहज मूर्ख बनली पण त्यांना आज पण माहीत नाही ते मूर्ख आहेत ते .
उद्या कृत्रिम बुध्दी मत्ते वर आधारित यंत्रांनी माणसावर राज्य गाजवले तर त्याला फक्त ही मूर्ख लोक च जबाबदार आहेत.
ज्यांनी एफबी पासून A to z समाज माध्यम वापरली
मला वाटते हा किंचित वेगळा प्रकार आहे
बोले तो, आपल्या माहितीतल्या (किंबहुना, आपल्या रोजच्या वापरातल्या, जीवनावश्यक म्हणता येईल अशा) एका पदार्थाबद्दल काही अचाट (परंतु, पूर्णपणे किंवा बहुतांशी खरे, आणि, सर्वांनाच रोजच्या अनुभवाने आणि/किंवा शुद्ध कॉमनसेन्सने अगोदरच ठाऊक असलेले) दावे करून घाबरवून गंडविण्याचा हा प्रकार आहे.
आणि, असे किती लोक किती सहजपणे गंडले जाऊ शकतात, हे दाखवून देण्याचा ॲट बेस्ट हा मानसशास्त्रीय प्रयोग आहे; ॲट वर्स्ट, ही एक प्रँक आहे.
(अजूनही लक्षात आले नसेल, तर सोडून द्या.)
एकच अडचण
नाही म्हणजे, ठीक आहे, हे DHMO रसायन इतके जर घातक असेल (आणि, घातक आहे, याबद्दल शंका नाही; केलेले दावे शंकास्पद नाहीत.), तर त्यावर अवश्य बंदी घाला. आपले काहीही म्हणणे नाही.
मात्र, एक अडचण आहे. आपल्या शरीराचा जवळजवळ ७०% अंश म्हणजे हे रसायन असते, असे कायसेसे आमच्या शाळेतल्या पाठ्यपुस्तकांतून वाचल्याचे आम्हाला आठवते. (त्यानंतर पाठ्यपुस्तके बदलली असल्यास कल्पना नाही.) त्याचे काय करायचे, तेवढे बोला!