दिनवैशिष्ट्य
११ नोव्हेंबर
जन्मदिवस : लेखक फ्योदोर दोस्तोयव्हस्की (१८२१), व्हीटी आणि मुंबईतल्या अनेक इमारतींचे वास्तुरचनाकार फ्रेडरिक स्टीव्हन्स (१८४७), पुरोगामी विचारवंत व भारतीय समाज-संस्कृतीचे अभ्यासक राजारामशास्त्री भागवत (१८५१), चित्रकार पॉल सिन्याक (१८६३), शाहीर पठ्ठे बापूराव (१८६६), गायक व किराणा घराण्याचे संस्थापक उ. अब्दुल करीम खाँ (१८७२), स्वातंत्र्य चळवळीतले नेते मौलाना अबुल कलाम आझाद (१८८८), गांधीवादी नेते आचार्य कृपलानी (१८८८), सिनेदिग्दर्शक रने क्लेअर (१८९८), लोककवी मनमोहन (१९११), लेखक कर्ट व्हॉनेगट (१९२२), क्रिकेटपटू रूसी मोदी (१९२४), अभिनेता जॉनी वॉकर (१९२६), लेखक कार्लोस फ्यूएन्तेस (१९२८), अभिनेत्री माला सिन्हा (१९३६), गायक तलत अझीझ (१९५६), क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा (१९८५)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ सोरेन किर्कगार्द (१८५५), शिल्पकार अलेक्झांडर काल्डर (१९७६), पॅलेस्टिनी स्वातंत्र्य चळवळीचे नेते यासर अराफत (२००४)
---
राष्ट्रीय शिक्षण दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : पोलंड, अंगोला
१६७५ : गणितज्ञ लाइबनित्झने इंटिग्रल कॅलक्युलसचा y = ƒ(x) वक्राखालील क्षेत्रफळ (area under the curve) काढण्यासाठी प्रथम वापर केला.
१९१८ : पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.
१९९२ : चर्च ऑफ इंग्लंडची स्त्री धर्मगुरुंना मान्यता.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- जवाहरलाल नेतान्याहू