सॉफ्ट पॉर्न? ओके प्लिज.
"सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.
सनी लिओनीचा ज्या वर्षी बिग बॉस मध्ये प्रवेश झाला त्या वर्षी गुगल सर्चमध्ये तिचे स्थान पहिल्या क्रमांकावर होते. पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे त्यानंतरच भारतात रुजू लागली. घराघरातली तरुण मुलं आता सनी लिओन पासून मिया खलिफा, अंजली कारा, माया बाझीन, शाझिया सहारी, गया पटल, उर्फी जावेद इ. पर्यंत सगळे पॉर्न स्टार्स ओळखू लागली. राज कुंद्रा नावाचा भारतीय पॉर्न फिल्म डिरेक्टर पण उदयाला आला. सनी लिओनीच्या मागे, ती जिथे जाईल तिथे हजारोंच्या संख्येने मुलेच काय तर अगदी पन्नाशीचे लोकही गर्दी करायला लागले. त्याचा परिणाम म्हणजे आज टिकटॉक आणि रिल्सच्या नादी लागून शॉर्ट्स बनवणाऱ्या भरकटलेल्या मुली आणि मुले. टिकटॉक, शॉर्ट्स आणि रिल्स आता नॅशनल ऑब्सेशन झाले आहे. वडीलच त्यांच्या मुलींसोबत टिकटॉकमध्ये नाचतायत. रिॲलिटी शो सारख्या वाह्यात कार्यक्रमात पालकच त्यांच्या लहान मुलींना (४ -५ वर्षांच्या) शरीर हलवायला सांगून टाळ्या वाजवतात. इंस्टावर आल्यावर तर हे सगळे इतके चेकाळतात कि "बेशरम रंग"ला पण एखादा नवा रंग शोधून द्यावा लागावा.
आपल्या तरुण पिढ्या वाचवणे दिवसेंदिवस कठीण होत असताना खोल गर्तेत जाणाऱ्या अशा नैतिकतेचे अधःपतन होत चाललेल्या समाजाकडे आपण कसे वाटचाल करत आहोत, हे दिसतच आहे. पाश्चिमात्य देशातली कुटुंबे उद्ध्वस्त, निराश, एकाकी होऊन मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. आता तर ते फेंटानिलचे दिवाने झाले आहेत .
आजकाल मेट्रो, रस्ते, सिग्नल, पार्किंग एरिया अशा ठिकाणी मुली अर्ध विवस्त्र स्थितीत रील्स बनवतात. नग्नता हा प्रसिद्धी मिळवण्याचा आणि रातोरात पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हे मुलींना समजले आहे. या कारणास्तव, इंस्टाग्राम सॉफ्ट -पॉर्नचा अड्डा बनला आहे. आपली मुलगी सेलिब्रिटी झाल्याचा आनंद पालकांना आहे. मुलं नग्न होऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा शॉर्टकट माचो इमेज दाखवणे, शिवीगाळ करणे आणि अश्लीलता दाखवणे आहे. वेस्टर्न समाज जे करतोय ते कॉपी करायचे. तिथे निप्पल शो होत आहेत, नितंब दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे येथेही लहान मुलांना खाऊ घालण्याच्या किंवा आंघोळीच्या बहाण्याने एखाद्याच्या शरीराच्या अवयवांचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. गावातल्या मुली चुलीवर चपात्या बनवण्याच्या बहाण्याने आपली क्लीवेज दाखवत आहेत. थोडे अजून पुढे जाऊन काही जण किसिंग व्हिडिओ पोस्ट करत आहेत. एवढेच काय ओन्ली फॅन अँप्लिकेशन वर स्वतःचा समागम दाखवून पैशाची मागणी करत आहेत. इन्स्टाची मालकी असलेल्या फेसबुकने तर आता स्तनाग्रे किंवा नितंब दाखवण्याची परवानगी दिली आहे. तुमच्या आयडीवर अश्लीलता पसरवत असल्याची तक्रार देखील करता येणार नाही अशी सोय केली आहे. ऍनिमल चित्रपटाने सॉफ्ट पॉर्न बॉलीवूडची पायाभरणी केली.
तस्लिमा नसरीनने डाव्यांना अगदी जवळून पाहिले होते. समाजात डाव्या विचारसरणीचा शिरकाव कशा प्रकारे होतो होतो हे तिले ठाऊक होतं कारण डाव्या चळवळीशी ती संबंधित होती . क्रांतीच्या नावाखाली डावे मुलींना MBMC चे बाळकडू पाजवून मुक्त सेक्सच्या नावाखाली सामुहिक बलात्कार करतात आणि कायद्याच्या दृष्टीने हा बलात्कार ठरत नाही कारण आता तू सज्ञान आहेस, माझे शरीर माझी मर्जी आहे, हे सांगून तिचे शोषण करतात. मग ती मुलगी एक प्रकारची वेश्या बनली की, समाज तिला तुच्छ लेखू नये, म्हणून सगळ्यांनीच एस्कॉर्ट सर्व्हिसचा बिजनेस करावा असं तिला वाटतं.
इन्स्टा अशा गेमचे सर्वात सोपे माध्यम तर इंटरनेट या CulturalCrusade चे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. तुम्ही त्यावर बंदी घातली तर VPN आहेच . टिकटॉक वर बंदी घातली तेव्हा इन्स्टा आला. इन्स्टा वर बंदी घातली तरी हे थांबवता येणार नाही. पॉर्नवर बंदी घालायला गेलात तर " हा आमच्या गोपनीयतेवर हल्ला आहे " अशा बोंबा मारतील.
आपल्या तरुण पिढ्या वाचवणे दिवसेंदिवस कठीण होत असताना खोल गर्तेत जाणाऱ्या अशा नैतिकतेचे अधःपतन होत चाललेल्या समाजाकडे आपण कसे वाटचाल करत आहोत, हे दिसतच आहे. आपल्याला हजारोंच्या लाईक्स आणि ओळख मिळावी म्हणून बऱ्याच आचरट आणि विक्षिप्त आदी बायका आणि मुली इन्स्टा वर रील्स बनवतात. हे चांगले नाही असा त्यांना उपदेश केला तर त्याची ऐसी कि तैसी म्हणून खिल्ली उडवली जाते. अशा मुलींच्या मानसशास्त्राची ही नवी बाजू बघून पालक चिंतातुर होऊन गेले तर नवल वाटायला नको.
पाश्चिमात्य देशातली कुटुंबे उद्ध्वस्त, निराश, एकाकी होऊन मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. आता तर ते फेंटानिलचे दिवाने झाले आहेत.
भारत थोड्या दिवसांनी सॉफ्ट पॉर्न नेशन या नावाने ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको.
....
ललित लेखनाचा प्रकार
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे.
लेखिका नी अगदी योग्य लिहिले आहे.
सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध होण्यासाठी.
प्रसिद्ध होण्यासाठी
नोकरी व्यवसाय मिळवण्यासाठी.
स्त्रियांना शरीराचा वापर करावा लागत असेल तर ही आधुनिक समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे..
पण उदारमतवादी, डावे विचाराचे,नास्तिक स्त्रियांच्या शरीराचा बाजार मांडण्यासाठी अगदी उस्ताहित असतात.
कारण.
नागडे फिरण्या पासून वैश्या व्यवसाय, अगदी बारबाला च्या आडून स्त्रियांचे शोषण होते हे त्याला शोषण समजत नाहीत तर .
स्त्रियांचे व्यक्ती स्वतंत्र समजतात
स्त्री शरीराचा व्यावसायिक व्यापार म्हणजे स्त्री स्वतंत्र नक्कीच नाही.
स्त्री आणि पुरुष ह्यांची चांगल्या,नीतिमान,शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता ,सामाजिक हक्क , आर्थिक हक्क ह्या मध्ये स्त्री पुरुष समानता म्हणजेच स्त्रियांचा आदर.
स्त्री शरीर च वापर करण्यास कोणत्या ही कारणाने प्रोत्साहन देणे हे स्त्रियांचे शोषण च आहे.
आजकाल मेट्रो, रस्ते, सिग्नल,
आजकाल मेट्रो, रस्ते, सिग्नल, पार्किंग एरिया अशा ठिकाणी मुली अर्ध विवस्त्र स्थितीत रील्स बनवतात. नग्नता हा प्रसिद्धी मिळवण्याचा आणि रातोरात पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हे मुलींना समजले आहे. या कारणास्तव, इंस्टाग्राम सॉफ्ट -पॉर्नचा अड्डा बनला आहे. आपली मुलगी सेलिब्रिटी झाल्याचा आनंद पालकांना आहे. मुलं नग्न होऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा शॉर्टकट माचो इमेज दाखवणे, शिवीगाळ करणे आणि अश्लीलता दाखवणे आहे. वेस्टर्न समाज जे करतोय ते कॉपी करायचे. तिथे निप्पल शो होत आहेत, नितंब दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे येथेही लहान मुलांना खाऊ घालण्याच्या किंवा आंघोळीच्या बहाण्याने एखाद्याच्या शरीराच्या अवयवांचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. गावातल्या मुली चुलीवर चपात्या बनवण्याच्या बहाण्याने आपली क्लीवेज दाखवत आहेत. थोडे अजून पुढे जाऊन काही जण किसिंग व्हिडिओ पोस्ट करत आहेत. एवढेच काय ओन्ली फॅन अँप्लिकेशन वर स्वतःचा समागम दाखवून पैशाची मागणी करत आहेत. इन्स्टाची मालकी असलेल्या फेसबुकने तर आता स्तनाग्रे किंवा नितंब दाखवण्याची परवानगी दिली आहे. तुमच्या आयडीवर अश्लीलता पसरवत असल्याची तक्रार देखील करता येणार नाही अशी सोय केली आहे. ऍनिमल चित्रपटाने सॉफ्ट पॉर्न बॉलीवूडची पायाभरणी केली.
..................................
हे सारे करण्या मुळे जर कोनत्या कायद्याचे उलंघन होत असेल तर त्याबद्धल पोलिसात गुन्हा दाखल करायला पाहिजे.
पण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या भारतीय संविधानचा आदर करणे हे जगातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे माझे मत आहे.
'तू खरंच बामनाच्या पोटचा आहे
'तू खरंच बामनाच्या पोटचा आहे का? चल तुज्या सागर बंगल्यावर येतो. तुज्या गांडीत दम आहे ना, थांब तू सागर बंगल्यावर.'
एक युट्युब विडिओ मध्ये मनोज जरांगे पाटील यांचे हे परखड वक्तव्य ऐकयला मिळाले. अजून कोनी हा व्हिडीओ पाहिला आहे काय?
सार्वजनिक ठिकाण आणि स्वतःच्या मालकीच्या जागेत.
सार्वजनिक ठिकाणे आणि स्वतःच्या मालकीच्या जागेत कसे वागावे ह्याचे वेगवेगळे हक्क आणि अधिकार असतात.
अगदी कायद्यात पण तसेच अर्थ असतात.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे,दारू पिवून सार्वजनिक ठिकाणी वावरणे,सर्जनिक ठिकाणी अश्छिल कृत्य करणे .
हे लोकांचे अधिकार अगदी राज्य घटनेत पण नसावेत .
आणि नाहीत च.
खरी कारणे वेगळीच असावीत
बिग बॉस नंतर सनी लिवोनी गूगल सर्च मध्ये एक नंबर ल होती हे सत्य च असेल .
पण नक्की कोणत्या भागात गूगल वर सनी ल लोक शोधत होती ती माहिती खरे तर खूप गरजेची आहे.
समाजापासून,घरापासून मानसिक दृष्ट्या तुटलेली मुल च किंवा माणसं च सनी च्या शोधात असणार.
लेखात वर्णन केलेल्या स्थिती ल माणूस एकटा पडत चालला आहे हे जबाबदार आहे.
एकटेपणा,त्या मुळे येणारे नैराश्य जोडीला आर्थिक पाठबळ, .
ह्या त्रिकोनातून आयुष्य म्हणजे सेक्स,व्यसन, पार्ट्या , असा समज लोक करतात .
आणि काही वेळ विकतच्या सोबतीने एकटेपणा विसरायचं प्रयत्न करतात