आ ए गा तो मो दी ही

कितीही आपटा, आएगा तो मोदीही हे लक्षात घेतलेलं बरं. आणि पहिल्या दोन त्रिफळाचीत केल्यानंतर तिसरी विकेट एलबीडब्ल्यू असली तरीही हॅटट्रक ही हॅटट्रिकच असते, हेही लक्षात घ्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणुकींतल्या विजयाबद्दल अभिनंदन.

हे धत्तड तत्तड,धत्तड तत्तड!

मोदी विजय मिरवणूक
फोटो न्यू यॉर्क टाईम्सवरून.

field_vote: 
0
No votes yet

४०० पार च्या ऐवजी २८९ (नक्की ना? माहिती नाहीये) म्हणजे आश्चर्य हे खरं.

नेहरूंनंतर काँग्रेस राजवट गेली नाही. पण काँग्रेस बदलली पुष्कळ. तसं होईल बहुदा.

एक नॅरेटिव्ह सेट केलं म्हणजे बदलता येणं अवघड आहे ह्याचं प्रत्यंतर. २००४ ला त्यांना नॅरेटिव्ह सेट करता आलं नाही. ("ईंडिया शायनिंग" अपुरं पडलं.) ते आता बरोबर केलंय.

मुख्य म्हणजे विधिनिषेध न बाळगता वेगवेगळ्या राज्यातल्या बंडखोरांना पैसे देऊन विकत घेऊन राज्याराज्यांमधे खिंडारं पाडणे आणि तिथला भुस्सामाती घेऊन भर घालणे आणि येनकेनप्रेकारेण सत्तासुंदरी मिळवणे हे तंत्र जमले.

केंद्रसरकारच्या यंत्रणा वापरून राज्यसरकारचे पाय कापणे वगैरे गोष्टी जमल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लहानपणापासूनच मला पिलिभीत हे नाव फार आवडायचं. तिथून मनेका गांधी निवडून यायच्या. या वर्षी तिथून वरुण गांधींना तिकिट मिळालं नाही; पण भाजपाचे जितेन प्रसाद जिंकले हे बरं झालं. कारण सुलतानपूरमधून मनेका गांधी पडल्या.

स्मृती इराणी अमेठीमधून पडल्या हे वाईट झालं; तिथून त्यांनी रागांना हरवलं होतं. पण किमान कंगना राणावत मंडीमधून निवडून आल्या. आता कंगना राणावत यांचा उल्लेख एकेरीत करायची गरज उरलेली नाही.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जिंकल्या आणि त्यांच्या चुलत वहिनी सुनेत्रा पवार पडल्या; याबद्दल बरं वाटायचं का वाईट, हे ठरवता येत नाहीये.

तुमची काय मतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बारामती येथे सुप्रियाताई सुळे जिंकणार होत्याच. पण लीड किती हे बघणं गरजेचं होतं. त्या लीडवर अजित पवारांचे पुढच्या राजकारणातले भवितव्य अवलंबून आहे. मी मूळचा दौंड चा. त्यामुळे बारामतीचा विकास म्हणजे मतदारसंघातील विकास नाही हे चांगलेच ठाऊक आहे. दौंड ते पाटस आणि दौंड ते बारामती व्हाया कुरकुंभ हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून चांगला नव्हताच मुळी. तो चांगला झाला गेल्या काही वर्षांत. या आधी कॉंग्रेस राष्ट्रवादी चे सरकार दोन्हीकडे होते तरीही दौंड सारख्या तालुक्यातील चांगले रस्ते होण्यासाठी मोदींचा काळ यावा लागला. असाच कारभार अन्य तालुक्यातील रस्त्यांचा पण आहे.

बारामती मतदारसंघात बारामती, दौंड, इंदापूर, खडकवासला, भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघ येतात. या सहाही मतदार संघातील सहकारी क्षेत्रातील संस्थावर या शरद पवारांची मजबूत पकड आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मतदान करण्यासाठी दुसरा पर्याय नसतो शरद पवारांच्या व्यतिरिक्त. ग्रामीण भागात सहकारी क्षेत्रातील बड्या संस्थानिक कुटुंबाचा वचक असतो. शहरीकरण कितीही झालं तरी मूळ मतदार गावातील सगळे निकाल ठरवत असतो. ग्रामीण भागात जनतेला ठाऊक आहे की आपल्या घरात येणारं वार्षिक उत्पन्न हे बाजार समिती, दूधसंघ, साखर कारखाने, सहकारी सोसायट्या आणि सहकारी बँक ठरवते. हीच साधनं जर पवारांच्या इशाऱ्यावर चालत असतील तर कोण त्यांच्या विरोधात जाईल? गंमत खरी अशी आहे की शरद पवारांनी एकही सहकारी साखर कारखाना आणि सहकारी बॅंक उभी केली नाही. मात्र कॉंग्रेसच्या काळात जे सहकारी साखर कारखाने उभे राहिले, सहकारी बॅंका बहरल्या त्या काबीज केल्या सत्तेवर असताना सामदामदंडभेद वापरून. नंतर सहकारातले चालणारे उद्योग तोट्यात काढून विकत घेतले. या वर खूप लिहिता येईल. थांबतो.

बारामती मतदारसंघातून शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे यांना हरवणं सोपं नाही जोपर्यंत थोरले साहेब आहेत तोपर्यंत. शरद पवारांच्या नंतर काय होणार हे बघावे लागेल.

अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

ठाण्यातली आमची गल्ली एरवी बरी असते. पण थेंबभर पाऊस झाला की पाणी साठतं. एकदोनदा ड्रेनेजचं पाणीही तुंबलं होतं. संघिष्टांचा बालेकिल्ला. युती केली तेव्हा गल्लीतले लोक नाराज झाले होते. तरीही शिवसेनेला मत नाही द्यायचे, पण भाजपचे राम कापसे निवडून यायचे.

आता ठाण्यातून उबाठा-सेनेचे राजन विचारे पडले. शिंदेसेनेकडे गेली सीट. आता तिसऱ्या मोदीकाळात प्रश्न सुटतील का, तुमच्या भागातले रस्ते सुधारले तसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुंबलेल्या गल्लीतल्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार आहेत. विधानसभेत वा लोकसभेत कोणीही आले तरी काही फरक पडणार नाही. ठाणे महापालिकेत कैक वर्षे सेना भाजप युतीची सत्ता आहे. कॉंग्रेसच्या लोकांना सत्ता द्या एकदा ठाणे महापालिकेत. बघा ते तरी सोडवतात का समस्या?

नाही सोडवल्या तर समस्या सहन अरत रहायची तयारी ठेवावी तुंबई मधील इतर लोकांसारखी.

ठाणं फार बकाल झाले आहे गर्दीनं. मी स्वतः दोन वेळा वसई खाडी पार करण्यासाठी घोडबंदर रोडवर ट्रॅफिक मध्ये बेक्कार अडकलो होतो. हॉटेल फाऊंटन ते काठीयावाडी हॉटेल क्रॉस करायला पाच तास लागले होते..... हॉरिबल होता तो अनुभव. ती ट्रॅफिक बघितल्यावर हिंजवडीची ट्रॅफिक मला किरकोळ वाटायला लागली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आता हेच तुमच्या भागातल्या रस्त्यांबद्दलही म्हणून पाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राष्ट्रीय महामार्ग १६० बद्दल इथे वाचता येईल

अहमदनगर दौंड पाटस बारामती या रस्त्याच्या कामांबाबत इथे (पान क्रमांक १३, १४) वाचता येईल
ही कामे गेल्या दहा वर्षांत झाली.

अवांतर: व्यक्तीशः मी दौंड पुणे नगर बारामती या रस्त्यांवर खूपदा बाईक वर प्रवास केला आहे. जेव्हा बकवास रस्ते होते तेव्हा पण. जेव्हा रस्त्यांची कामे चालू होती तेव्हा पण आणि आता रस्त्यांची सगळी कामं झाल्यावर कमी वेळा प्रवास झाला आहे आधीच्या तुलनेत. त्यामुळे आपण आपली उमेदीच्या ज्या ओबडधोबड रस्त्यावर तासनतास प्रवास केला होता त्याच रस्त्याने जेव्हा कमी वेळात प्रवास होतो तेव्हा जाणवतं हीच कामे जर आधी झाली असती तर नक्कीच फरक पडला असता. असो. माझं तरी मत आहे की मी ज्या मतदारसंघात लहानाचा मोठा झालो, शिक्षण घेतले तिथल्या रस्त्यांची भाजपा सरकार येण्याआधी ची अवस्था आणि आताच सुधारलेली परिस्थिती खूप वेगळी आहे.
असो
.

अति अवांतर: भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांना सरकार मध्ये घेणे मला मनापासून अजिबात पटलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

स्वयंभू, तुम्हाला स्थानिक परिस्थितीची काहीही माहिती दिसत नाही. मी इंदापुरचा आहे आणि स्थानिक लोकांशी सतत संपर्कात असतो. अजित पवार गेल्यावर जवळजवळ सगळे स्थानिक कार्यकर्ते, छोटेमोठे नेते, सहकारातले लोक, गावपुढारी अजित पवाराबरोबर गेले. दौंडमध्ये कुल- थोरात दोघेही अजित पवारबरोबर होते, आमच्या इंदापुरात सुप्रिया सुळेंना सभा आयोजित करायलादेखिल स्थानिक कार्यकर्ते मिळत नव्हते. बचत गटाच्या महिलांचे जाळे मात्र सुप्रिया सुळेंच्या मागे राहिले. हे यश जनतेने पदरात घातले आहे, कार्यकर्ते, स्थानिक संस्थांचे संचालक, कारखानदार यांना 'हो हो मत वहिनींनाच की..' असं झुलवत! शरद पवारांना चांगली दणकट मदत फक्त भोर मध्ये मिळाली. हा विजय सरळ सरळ सुप्रिया सुळेंचा आहे. या निवडणुकीने अजित पवाराचे भय संपवले, टगेगिरी संपवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

शरदराव पवार यांनी जे जे केले त्याचा ऑपरेटिव्ह फेस अजित पवार होते.

साखर कारखान्याचे कसे व्यवहार झाले सत्तेवर असताना ह्या विषयावर माणिकराव जाधव यांनी एक मुलाखत दिली होती. https://youtu.be/0aEUY7fS-Pg?si=ttVgtB36L2CVjWXr

शरद पवारांच्या बारामतीत जर अजित पवारांना निवडणूक जड जाणार हे माहिती होतेच. त्यातही अजित पवारांच्या टगेगिरी ला कंटाळलेले लोक होतेच. उदाहरणार्थ हर्षवर्धन पाटील हे लोकसभेत सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी प्रचार करायचे. विधानसभेत राष्ट्रवादी भरणे यांच्या पाठीशी असायची. थोपटे यांच्या सोबत पण नेहमी असेच व्हायचं. पण पवारांनी कार्यकर्ते लोकांना व्यवसायिक संबंधात ज्या पद्धतीने बांधून ठेवले आहे की पवारांना बारामतीत हरवणं शक्य नाही सहजासहजी. जेव्हा ९०% च्या आसपास मतदान होईल तेव्हा पवारांच्या साम्राज्याला दणके बसतील. तुम्ही इंदापूर चे आहात म्हणजे उजनीच्या बॅकवॉटर वर फुलणारी शेती पण बघितली असेल.. कॅनलला पाणी मिळाले नाही म्हणून दुष्काळ पण बघितला असेल. इंदापूर मध्ये एकीकडे डाळींब पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे एकगठ्ठा क्रेट कसे भाव पाडून व्यापारी उचलतात हे पण माहिती असेल. तीच गत द्राक्ष लागवड करणाऱ्या बागायतदार शेतकरी लोकांची. खुद्द दौंड तालुक्यातील तेवीस गावे रोटी सुपे या भागातील पवारांना विरोध करतात पण सरतेशेवटी मतदान पण त्यांनाच करतात. बारामती मध्ये ज्या पद्धतीने पाणी आणण्यासाठी आयुक्तांपासून एरिगेशन मधल्या अधिकारी लोकांना कामाला लावलं जात तुम्हाला चांगले माहिती असेल. दौंड मध्ये तर कुल गटाला बाजार समिती मिळाली की थोरातांना आमदारकी मिळते. नाहीतर ह्या गटाला झेडपी तर त्या गटाला चेअरमन वगैरे ह्याचा बॅलन्स खूप वर्षांपासून राखला गेला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बेभरवशाच्या राजकारणाचे अनुभव सगळ्यांना आहेत.

राहिला प्रश्न अजित पवार यांच्यासोबत आहोत हे दाखवण्यासाठी भले मातब्बर मंडळी असतील. शेवटी इमोशनल ड्रामा कामी आला निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना अजित पवारांनी बऱ्याच लोकांशी खुन्नस घेतली होती. त्या मंडळींना ह्या निवडणुकीत संधी मिळाली धडा शिकवण्यासाठी. याचा अर्थ असा होत नाही की अजित पवार यांच्या राजकारणाचा शेवट झाला. बारामती मतदारसंघात बागायतदार, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजग, डॉक्टर, कारखानदार यांच्यावर जेवढा शरद पवारांचा वचक आहे तसा वचक अजित पवरांचा नाही हे ह्या निवडणुकीत सिद्ध झाले.

दुसरा ऍंगल मराठा आरक्षणाचा मुद्दा असू शकतो महायुतीची पिछेहाट होण्यासाठी. तसंही मराठा समाजाला आरक्षण नाही याची जाणीव फक्त आणि फक्त मराठेतर नेतृत्व महाराष्ट्रात जेव्हा असते तेव्हाच होते. कधीकाळी शरद पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मतं ऐकली की समजतं पवार साहेबांनी मराठा समाजाला बहुजन म्हणून कसे वापरले आहे ते.

थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार होते तोपर्यंत टगेगिरी नव्हती का?
अजित पवार यांची टगेगिरी सगळ्यांना परिचित आहे. इंदापूर तालुक्यातील खूप मोठा मतदार लोकसभेत सुप्रियाताई सुळे यांच्या मागे तर विधानसभेत उभा असतो. तेच भोर आणि पुरंदर तालुक्यातील. खडकवासला विधानसभा प्रामुख्याने पुण्यात सिंहगड रोड, काही कोथरूड चा भाग, बावधन ह्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात मतदान करतात. मुळशी, वेल्हे आणि भोर तालुका भोर मतदार संघाचे भाग आहेत. इथे राष्ट्रवादी पेक्षा कॉंग्रेसचा प्रभाव जास्त असतो लोकसभेत. हा भाग नेहमी भाजपाच्या विरोधात राहिला आहे. कारण इकडं असणारं गावपातळीवरील राजकारण. त्यामुळे मोदी स्वतः बारामती मध्ये उभे राहिले असते तरीही पडले असते. कारण बारामती मतदारसंघ हा बारामतीतील काटेवाडी पासून ते मुळशीच्या हिंजवडी, मारुंजी, नेरे पर्यंत शरद पवारांनी मजबूत करून ठेवलाय. त्यात पाणी, शेती जमीन, सेझ आणि एमआयडीसी या मध्ये शरद पवारांचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळे यांना हरवणं कठिणच होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

<< ग्रामीण भागात जनतेला ठाऊक आहे की आपल्या घरात येणारं वार्षिक उत्पन्न हे बाजार समिती, दूधसंघ, साखर कारखाने, सहकारी सोसायट्या आणि सहकारी बँक ठरवते. हीच साधनं जर पवारांच्या इशाऱ्यावर चालत असतील तर कोण त्यांच्या विरोधात जाईल? गंमत खरी अशी आहे की शरद पवारांनी एकही सहकारी साखर कारखाना आणि सहकारी बॅंक उभी केली नाही. मात्र कॉंग्रेसच्या काळात जे सहकारी साखर कारखाने उभे राहिले, सहकारी बॅंका बहरल्या त्या काबीज केल्या सत्तेवर असताना सामदामदंडभेद वापरून. नंतर सहकारातले चालणारे उद्योग तोट्यात काढून विकत घेतले. या वर खूप लिहिता येईल. थांबतो.>>

अहो, हे सगळे लोक अजित पवाराबरोबर गेले होते. भरणे, कुल, यशवंत माने, थोरात, शिवतारे, हर्षवर्धन पाटील, सोनाईचा माने हे सगळे सगळे भाजपच्या फुल्ल सपोर्टमध्ये शरद पवाराच्या विरोधात लढत होते, चंद्रकांत पाटील आम्ही शरद पवारांना संपवायला आलो आहोत असे स्पष्ट म्हटले होते. भाजपाने आपले सगळे रिसोर्सेस अजित पवाराबरोबर दिले होते. ते पण अजित पवाराचे सगळे घोटाळे पचवून.
या वयात सगळे संपले असताना विजय खेचून आणणे सोपे नसते. शहरी भाजपवाल्यांच्या प्रचाराबाहेर जमिनीवरची परिस्थिती पहा असे सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बिंदीबाईला आता '४ cm त्रिज्येचे कुंकू' असल्याशिवाय बिझनेस करणार नाही अशी मोहीम सुरु करा म्हणावं आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

४ cm त्रिज्येचे कुंकू

"४ cm त्रिज्येचे कुंकू" आपलं ते हे
"४ सेमी त्रिज्येचे कुंकू" आपलं ते हे
"४ अंगुळे त्रिज्येचे कुंकू" आपलं ते हे
"४ अंगुळे व्यासाचे कुंकू" आपलं ते हे
"४ अंगुळे व्यासांचे कुंकू" आपलं ते हे ...

नाही म्हटलं, विश्वगुरुंच्या सांस्कृतिक, पारंपरिक, वैचारिक, वैश्विक, अध्यात्मिक $%&इक... विचारसरणीशी जुळवून घ्यायला हवे, नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदरणीय मोदींजींचे तिसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
कदाचित त्यांना खासदारांची अपेक्षित संख्या आली नसेलही. पण सत्ता हातातच राहिली हे महत्वाचे. नन्तर खासदारांची संख्या वाढवता येतेच. ऑपरेशन कमळ, आपदधर्म इत्यादी संविधानिक मार्ग एकदा सत्ता हातात असली उपलब्ध असतातच. त्यामुळे चारसो पार तर काळाच्या ओघात होईलच.
हिंदू अजूनही जागृत नाही, हिंदूंनी 'त्या' लोकांप्रमाणे एकगठ्ठा मतदान न केल्यामुळे भाजपच्या सीट्स कमी झाल्या असे मत माझ्या
नमो सपोर्टर मित्राने लिहिले तर अर्णब गोस्वामीने परकीय हस्तक्षेप हे कारण चॅट जीपीटीच्या निर्मात्यांचा हवाला देऊन सांगितले.
असो जे काही असेल ते असो.
आदरणीय मोदींजींचे पुनश्च एकदा अभिनंदन.
विवेक पटाईटकाका, स्वधर्म वर्धेकर इत्यादी प्रचारकांचेही अभिनंदन
तिसऱ्या टर्म साठी सर्वांना शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वधर्म वर्धेकर

स्वधर्म नव्हे. स्वयंभू.

विवेक पटाईटकाका

प“टाईट”काका???

त्यांची ही बाजू ठाऊक नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारसो पार न झाल्याच्या दुःखात काल विषण्ण मनोवस्थेत मी उशिरा झोपी गेलो.
त्यामुळे ही चूक अनावधानाने झाली माझ्याकडून.
वर्धेकर व पटाईत हे मोठ्या मनांने मला माफ करतील अशी अपेक्षा.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारसो पार न झाल्याच्या दुःखात

जौद्याहो! एवढे कुठे मनाला लावून घेता?

अगली बार चारसोबीस…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल मग गोड धोड खाल्ले का नाही अण्णा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

महाराष्ट्रात भाजपाला फटका बसणार हे अपेक्षित होते.

भाजपा सत्तेत आली आहे. बहुमताचा आकडा पार केला नाही म्हणून मोदींना जनतेने नाकारले असे होत नाही. विरोधकांनी एकत्र येऊन किमान एक वर्षं आधी रणनीती ठरवली असती तरीही भाजपा सत्तेतून बाहेर फेकला गेला असता. विरोधकांनी एकीने लढावे तरच भाजपाचा पराभव शक्य होईल. प्रादेशिक पक्षांचे वजन विरोधकांमध्ये वाढलेले आहे.

भाजपाला ही निवडणूक चांगली धडा शिकवणारी आहे. एनडीए म्हणून जर जनतेने स्विकारले तर एनडीए म्हणून कारभार चावला पाहिजे.

मोदी सरकार, भाजपा सरकार ही बिरुदावली यापुढे वापरली जाणार नाही. कारण जनतेला बहुमताने निवडून दिले नाही भाजपाला हे कायमस्वरूपी लक्षात ठेवतील.

तिसऱ्यांदा सत्तेवर येणं साधं सहज नाही
एनडीए ने करून दाखवलं. भाजपाला आता मित्र पक्षांची कुचंबणा करून चालणार नाही. यातून भाजपा नक्कीच धडा घेतील.

धर्माच्या नावाखाली राजकारण करणं आणि जातीपातीच्या भिंती उभ्या करून राजकारण करणं यात सगळे पक्ष माहीर असतले तरीही जनता जनार्दन आहे.

यंदा मात्र ईव्हीएम बदनाम होण्यावाचून राहिले. कोणत्याही पक्षाने वा नेत्यांनी ईव्हीएम ला दोष दिलेला नाही. म्हणजे ईव्हीएम हे रडीचा डाव खेळण्यासाठी निमित्त असते हे सिद्ध.

भाजपाची टिम या निवडणुकीत झालेल्या घडामोडींवर योग्य ते चिंतन करून भविष्यात त्या चुका करणार नाही. विरोधकांनी एकत्र राहून भाजपाला धडा शिकवणं गरजेचे आहे. फक आपल्याकडील विरोधक एकत्र राहतील का ह्याची शाश्वती नाही.

जनतेने मोदींना हा सूचक इशारा दिला आहे. एनडीए ला बहुमताने निवडून आणून.

ता.क. विरोधक एनडीएचे मित्रपक्षांना फोडून, आमिषं दाखवून जर सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार असतील तर शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

भारत हा घटक राज्यांचा समूह आहे आणि राज्यांच्या अधिकारावर आक्रमण करणे लोक खपवून घेणार नाहीत ह्याची जाणीव नक्कीच bjp ल झाली असणार

राज्यांच्या आर्थिक इन्कम वर च डल्ला मारण्याचा विचार bjp च्या केंद्र सरकारचा होता .
त्याला आता लगाम लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं बरं आहे, तुंम्ही आनंदात झोपी गेलात, पण भाजपवाले कदाचित तेवढ्या आनंदात नाहीत. अयोध्येबाबत सुधांशु त्रिवेदी, बिंदीवाल्या बाई हिंदूंना शिव्या घालत आहेत. लोक म्हणतात जनतेने भाजपाला जिंकूनही नाराज केलंय, तर इंडिया आघाडीला हरूनही जास्त आनंद दिलाय. आघाडी करावी लागणार असल्यामुळे आंम्ही या विचारात आहोत, की येणारा पंतप्रधान अखेर बायॉलॉजिकल असणार आहे की ईश्वराने पाठवलेलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण भाजपवाले कदाचित तेवढ्या आनंदात नाहीत. अयोध्येबाबत सुधांशु त्रिवेदी, बिंदीवाल्या बाई हिंदूंना शिव्या घालत आहेत.

हिंदूंना शिव्या घालून भाजप भविष्यात अधिक जागा कशा जिंकणार आहे म्हणे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण खूप भाजप समर्थक अयोध्येतील हिंदूंना बोल लावत आहेत. ५०० वर्षात कुणालाही न जमलेले मंदीर तर आहेच, पण ज्यांनी विमानतळ दिला, रेल्वे दिली, अयोध्येला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनवले, त्याच भाजपला तिथल्याच हिंदूंनी नाकारले…
सुधांशू त्रिवेदी यांनी ट्विटरवर हे राम दुबारा मत आना, यब यहा लखन हनुमान नही हि अत्यंत करूण कविता टाकून झोपलेल्या हिंदूंना जागे करण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. बघा जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

…माजलेत म्हणानात!

(नाही म्हणजे, मतदारांना अगोदर एक तर गृहीत धरायचे, नि मग त्यांनी आपल्या बाजूने मते दिली नाहीत, तर त्यांना शिव्या घालायच्या, याला नाहीतर दुसरे काय म्हणणार मग?

मतदार आपल्याला काही देणे लागतात, ही वृत्ती माजाचे लक्षण नाही, तर आणखी कशाचे?)

हे राम दुबारा मत आना, यब यहा लखन हनुमान नही

उलटपक्षी, अयोध्येत भाजप हरली हे कदाचित (१) (अयोध्येत) राम आहे, (२) तो चांगला पॉवरबाज देव आहे, नि (३) त्याला (असल्या) दलालांची गरज नाही, याचे द्योतक मानता येईल काय?

आणि, आज हे हिंदूंना शिव्या घालताहेत; या रेटने उद्या हे खुद्द रामालाच शिव्या घालणार नाहीत कशावरून? बोले तो, आमच्याकडून ती मशीद पाडवून तिथे आपले मंदिर बांधवून घेतलेनीत्, नि आता आपले काम झाले तर आम्हालाच निवडणुकीत पाडलेनीत्!

अरे, पण, (१) मशीद पाडायला, नि (२) त्या जागी आपले मंदिर बांधायला, रामाने यांना सांगितले होते काय? आँ! उगाच आपले अजेंडे रामाच्या माथी मारायचे ते!

(आणि, मशीद पाडण्यात सक्रिय असणाऱ्यांपैकी खुद्द अयोध्यावासी कितीसे होते नि बाहेरचे उपटसुंभ किती होते? नक्की काय म्हणून देतील अयोध्यावासी यांना मते?)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे, म्हणूनच प्रचारक नाही. सेक्युलर पक्ष पराभूत झाले तर ते जनतेचा कौल, जनमताचा आदर, आमच्या काही चुका झाल्या इ. इ. बोलतात. पण भाजपा? सरळ मतदारांनाच बोल लावत आहे. काहींची मजल तर म्हणूनच परकियांनी यांच्यावर इतकी शतके राज्य केले, आता यांना कोणीही वाचवू शकत नाही असे गळे काढत आहेत.
कविता बघा पण तुंम्हाला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे त्यांना समजेल तडजोडी कशी करतात ते. सध्या दिल्लीतून स्थानिक पातळीवर सगळे निर्णय लादले जात होते. आता ते होणार नाही.
गेली बावीस तेवीस वर्षे मोदी बहुमताचीच सरकारे चालवत होते. विरोधात कधीच बसले नाहीत. कदाचित इंडिया आघाडी ने चंद्राबाबू यांना सोबत घेऊन नितिश कुमारांना पंतप्रधान पद दिले तर मोदींना विरोधात बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

नितीश कुमार यांना पद मिळवण्यासाठी पलटी मारायचा तसा दांडगा अनुभव आहे. चंद्राबाबू नायडू तसे नवखे या बाबतीत. ते बऱ्याच वर्षांनी आंध्रप्रदेश मध्ये सत्तेवर आले बहुमताने. आधी तेलंगणा हैद्राबाद सकट अखंड आंध्रप्रदेश होता. आता फक्त उर्वरित आंध्रप्रदेश आहे. ज्यांची केंद्रात सत्ता तिकडेच चंद्राबाबू नायडू यांना जावे लागेल. स्पेशल स्टेटस मिळवण्यासाठी.

या अशा बेभरवशाच्या राजकारणात मोदींना नेतृत्व सिद्ध करावे लागेल. कळू दे की त्यांना पण अडवाणी वाजपेयींनी काय काय दिव्यं पार केली आहेत ती.

राहिले प्रश्न कट्टर हिंदुत्ववादी लोकांचे तर त्यांचा संघर्ष सृष्टीच्या विनाशापर्यंत चालत राहणार आहे. कारण तिकडे पलिकडे जेवढं सेक्युलॅरिझम वगैरे म्हणून मुस्लिम व्होट बँक भक्कम होईल तेवढे कट्टर हिंदुत्ववादी चळवळे आक्रमक होतील. वेळ पडली तर मोदी हटाव योगी लाव वगैरे आंदोलनं होतील भविष्यात. लय लय मजा येणार आहे.

जे जे होईल ते ते पहावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

ओपन एआयला कुठून ही बातमी मिळाली, की परकीय शक्तींनी भारतीय निवडणुकांत हस्तक्षेप केला, कोण जाणे! एरवी पत्रकार लोक आपट, आपट, आपायात; तेव्हा कुठे दोनचार क्षुद्र बातम्या मिळतात की गेल्या दोन-चार वर्षांत सरकारनं भाजपविरोधी पोस्टी कशा फेसबुक किंवा ट्विटरवरून गायब केल्या वगैरे.

ट्विटरच्या मस्कचं आणि ओपन एआयचं आता तर फाटलंच आहे.

मुळात ओपन एआय लोकशाहीसारख्या क्षुद्र वस्तूंवर काही खर्च करेल अशी शंकासुद्धा का येते? तीसुद्धा भारतातल्या लोकशाहीसाठी?? पण एकदा फेका मारायच्या आणि तळवे वाटायचे असं ठरवल्यावर काय! सगळंच छानछान!!

असो. महुआ मोईत्रांनी ज्यांना हरवलं त्या अमृता राॅय बुद्रुक चेहऱ्याच्या नाहीत. मीही अंमळ चूक केलीच काल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पंकजा मुंडे हरल्याचं बातम्यांमध्ये होतं, पण निवडणूक आयोगाची साईट पंकजाताईंना दिलासा देणारे आकडे दाखवत होती. नवनीत राणामात्र पडल्या.

प्रणिती शिंदे, रक्षा खडसे आणि महुआ मोईत्रा तिघीही जिंकल्या.

पाचही जणी छान दिसतात. त्यांच्या समोर जे सगळे होते ते मात्र बुद्रुक चेहऱ्यांचे होते. सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई पवार यांचं भाग्य या पाचजणींच्या वाट्याला आलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यांनी पण चांगली फाइट दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

वर्षा गायकवाड जिंकल्या. उज्ज्वल 'बिर्याणीफेम' निकम पडले त्यांच्यासमोर. तेही अंमळ बुद्रुकपणा कमी करायचा प्रयत्न करणारे वाटतात. जमेल कधी तरी त्यांना बुद्रुकपणा टाकणं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनोज तिवारी आहे की हो देखणा!!!

अक्षय कुमार अलीकडेच भारतीय झाला नाहीतर तो ही दिसला असता लोकसभेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जितपत चित्रं बघितली त्यात व्यवस्थित न दिसणारी बाई नाही सापडली. बुद्रुकपणाचा मक्ता फक्त पुरुषांकडेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कंगनाला विसरलात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंगना ल लोकांनी का निवडून दिली असेल?
हा सर्वात मोठ्या गहन प्रश्न आहे.
उत्तम दर्जा चे प्रतिनिधी निवडण्या इतकी प्रगल्भता देशाच्या काही भागातील लोकात नाही

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारशे पार झालं नाही. परंतू संख्याबळ मागच्या इतकंच अधिक उणे.

१) भाजप आघाडी निवडून आली. एकट्या भाजपच्या जागा बहुमतासाठी कमी झाल्या.
२) इतर पक्ष ५४३ वजा २८० होते. ते अजूनही तसेच आहे. मोदीला हरवा एकत्र येऊन हे काही साध्य झालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चारशे पार झालं नाही. परंतू संख्याबळ मागच्या इतकंच अधिक उणे.

अहो उन्नीस बीस चालायचेच. उलट आता रथ जमिनीवर उतरला. अधिक सावधपणा आला. आता तुम्ही मज्या बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नायडू व नितीश हे दल बदलू शकतात.

तसं झालं तर पुढचे पं प्र कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) जनतेने मोदींना तिसरी (शेवटची) संधी दिली आहे आजपर्यंत बहुमताचा आकडा पार करून मोदी सरकार, भाजपा सरकार चालवलं आता एनडीए सरकार चावून दाखवा.
२) जनता जनार्दन आहे हे पुन्हा सिद्ध. जे लोक उत्तर प्रदेशातील जनतेला पर्यायाने युपीला गाय पट्टा किंवा गोबर दिमागवाले म्हणून हिणवत होते काल त्यांना एकाएकी साक्षात्कार झाला की तिकडे पण पॉलिटिकल विस्डम वाली जनता आहे. म्हणजे आवडत्या लोकांना धक्का दिला की साक्षात्कार जर नावडत्या लोकांना जनतेने भरभरून मतदान केले असते तर पुन्हा तीच ती बिरुदे मिरवली असती.
३) मोदींना ही सर्वात मोठी नामी संधी मिळाली आहे सर्वपक्षीय सरकार चालवण्याची. आजपर्यंत गुजरात मध्ये बहुमताने भाजपाची सरकारे चालवली, केंद्रीय राजकारणात मोदी वरचढ होतील असाच कारभार केला. आता वाजपेयींनी ज्या पद्धतीने कडबोळे सरकार चावलं होतं ती संधी मोदींना मिळाली. इथे मोदींच्या नेतृत्वाची खरी पारख होईल.
४) जनता जनार्दन आहे हे प्रत्येक वेळी त्या त्या सत्ताधाऱ्यांना दाखवलं होते. यंदा एनडीए चा कारभार ठरवेल भाजपाचे राष्ट्रीय राजकारणात काय स्थान आहे ते.
५) जर नितिश कुमार किंवा चंद्राबाबू इंडिया आघाडीत गेले तर विरोधकांना आनंद होईल. पण एक केक पाच जणांनी वाटून खाणं आणि पंचवीस जणांनी वाटून खाणं यात खूप मोठा फरक आहे. एवढं पॉलिटिकल शहाणपण नितिश आणि चंद्राबाबू यांना नक्कीच आहे.
६) भाजपाला ओडिशा, आंध्र प्रदेश मध्ये सत्तेवर येता आले हे महत्त्वाचे. ओडिशा मध्ये भाजपा बहुमताने सरकार स्थापन करणार ही खूप मोठी गोष्ट आहे भाजपासाठी.
७) केरळमध्ये एक लोकसभा मतदारसंघ जिंकता आला ही सुरुवात भाजपाच्या खूप मोठ्या प्रयत्नांना यश आहे.
८) भारतात बहुमताने सरकार कायमस्वरूपी येऊ शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध. एकेकाळी कॉंग्रेसला याचा फटका बसला आता भाजपाला बसलाय फटका. हे समजण्यासाठी मोठा कालावधी कॉंग्रेसला मिळाला. भाजपाला कमी कालावधीत जनतेने जमीनीवर आणले.
९) प्रादेशिक पक्षांचे वजन हे कायमस्वरूपी वाढत जाणारे आहे. जो राष्ट्रीय पक्ष टिमवर्क चांगले करेल त्याला प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळेल हे नक्की.
१०) २०२४ मध्ये भाजपाला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी खूप विचार करणं गरजेचं आहे. भाजपाचा हुकुमी व्होट बँक अजूनही तयार झाली नाही हे सिद्ध.
११) जातीपातीच्या राजकारणाचे नवे धडे भाजपाला गिरवण्यासाठी यंदा मोठा कॅनव्हास मिळाला आहे.त्याचा उपयोग ते कसा करतील हे बघणं मजेशीर असणार आहे.
१२) भारतातील ५०% हून अधिक जनता ही गेली पंचाहत्तर वर्षे अजूनही दैनंदिन जीवनातील गरजांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून आहे. ही आपल्या व्यवस्थेची हार आहे. गंमत म्हणजे विरोधकांनी याच जनतेला खोट्या नाट्या गोष्टी पटवून जर आंदोलनं करायला भाग पाडले तर सत्ताधारी भुईसपाट होतात हे सिद्ध. थोडक्यात ही खूप मोठी दरी आहे जी कोणतं नेतृत्व कसं भरून काढेल यावर आपल्या लोकशाहीची भिस्त आहे.
१३) भारतात खूप आधीपासून मतदारांचे हुकुमी पॉकेट्स तयार करून ठेवले आहेत ते भाजपाला कधीच समजणार नाहीत कसे आपल्या बाजूने घ्यायचे. कदाचित मोदींच्या ऐवजी दुसरं नेतृत्व जर भाजपाने दिलं तर त्याला हे पॉकेट्स समर्थन देतील का हा यक्षप्रश्न आहे.
१४) भाजपाच्या कार्यकर्ते लोकांना विश्वासात घेऊन जर निवडणुकीत उमेदवार दिले तर खूप मोठा फरक पडला असता हे भाजपाच्या चाणक्यांना समजलं असावं.
१५) विरोधकांना सूर सापडला आहे. फक्त एकी दाखवून ही अशीच लढत पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत दाखवावी लागेल तरच भाजपाला एक भक्कम पर्याय उभा राहिल. भाजपाने जे 'पर्याय कोण' नॅरेटिव्ह सेट केले आहे ते तुटू शकेल.
१६) कॉंग्रेसच्या आणि भाजपाच्या नेत्यांनी प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेणे किती महत्त्वाचे आहे हे या निवडणुकीत समजलं.
१७) मोदींना ही शेवटची संधी आहे ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत. मोदींचे नेतृत्व सर्वसमावेशक होण्यासाठी कमी कालावधी आहे ते कसा उपयोग करतात हे बघणं मजेशीर असणार आहे.
१८) दिल्लीत सातही जागी भाजपाचे खासदार निवडून आले याचा अर्थ तिकडची जनता स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि राष्ट्रीय पातळीवरील समस्या कोण उत्तमप्रकारे हाताळू शकतो याकडे बघतात हे सिद्ध. कधीकाळी केंद्रात कॉंग्रेसला भरभरून दिल्लीने दिलं होतं आता भाजपाला दिलं आहे. ही समज प्रत्येक राज्यात वाढायला हवी. जो समस्या, प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळेल त्यालाच आमचं मत हे महत्त्वाचे आहे.
१९) सर्वात मोठा मोदींचा तोटा आणि मर्यादा यंदा भाजपाला समजल्या.
२०) भाजपाला ही शेवटची संधी मिळाली आहे जनतेमध्ये जाऊन प्रश्न समजावून घेऊन त्यावर उत्तरे शोधण्यासाठी. कार्यकर्ते लोकांना गृहीत धरून काय वाट्टेल ते नेतृत्व स्थानिक पातळीवर लादणे यापुढे भाजपाला खूप अवघड जाईल.

लेखनविश्रांती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मला आता मोदीजींना पलटूरामजींबरोबर संसार करताना बघायचं आहे. तेवढं झालं की मी डोळे मिटायला मोकळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला आता मोदीजींना पलटूरामजींबरोबर संसार करताना बघायचं आहे.

१. पलटूरामजी कोण?

२. अगोदर चांगली होती, त्या बायकोबरोबर संसार नाही केलानीत् तुमच्या मोदींनी. हे जे कोण पलटूराम आहेत, त्यांच्याबरोबर कसला करणार आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना सगळे पलटूराम म्हणतात.
इकडून तिकडे उड्या मारायचा असा छान अनुभव गाठीशी असलेली बायको/नवरा मिळाल्यावर सतत आरशात बघून "मी किती छान, मी किती छान. मला छान म्हणा" असं करत बसता येणार नाही.
मोदी पंतप्रधान होण्यासाठी आसुसलेले असताना त्यांना निकरचा विरोध करणाऱ्यांपैकी नितीश होते. आता असं एकत्र यायला लागावं म्हणजे poetic justice वगैरे. Poetic justice ला मराठीत काय म्हणतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरणार्थ, रामाला, खुद्द देवालाच देवळात घेऊन जाण्याची वल्गना करणाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांनी अयोध्येत (फैजाबाद मतदारसंघ) दणका दिला. हा काव्यात्मक न्याय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेच म्हणणार होतो.

(अवांतर:)

मोदी पंतप्रधान होण्यासाठी आसुसलेले असताना त्यांना निकरचा विरोध करणाऱ्यांपैकी नितीश होते.

मोदींनी निकर घातली तर त्याला नितीशांचा काय म्हणून विरोध?

फुकाची नवरेशाही, नि तीही लग्नाअगोदरच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता दुरुस्त करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(असेच चांगले दिसते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चड्डीत राहणे - एक नवीन आकलन

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोदीच येणार असे कायम सांगणाऱ्या यु ट्युब वरच्या सर्व कुडमुड्या(आणि भाजपा धार्जिण्या) ज्योतिष्यांची जी फजिती झालीये ती बघुन मजा वाटली. तरीही कसले तरी लंगडे समर्थन करुन ते आपला पोटापाण्याचा चॅनेल चालवतच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आलेतच ना मोदीजी Smile
सर्व कुडमुड्या(आणि भाजपा धार्जिण्या) ज्योतिष्यांची जी फजिती…
>> अगदी अगदी. ते ऍक्सिस वाले विकास गुप्ता तर रडले इंडिया टुडेवर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम मंदिर जोपर्यंत भारतातल्या हिंदूंचे एकतर्फी प्रेम होते तोपर्यंत त्यात मतं खेचून आणायची ताकद होती.
एखादी गोष्ट मिळत नसेल तेव्हा ती जितकी हवीहवीशी वाटते तितकी ती मिळाल्यावर वाटत नाही. हे मोदींच्याही लक्षात आलं होतं. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी स्कुबा डायव्हिंग करून श्रीकृष्णाची पूजा वगैरे केली होती. पण असं राम, कृष्ण, हनुमान असं मेन्यूकार्ड तयार करणं करुण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मोदींच्याही लक्षात आलं होतं.

मोदींना अधूनमधून अशा गोष्टी (सोयिस्करपणे) लक्षात येत असतात. नि मग ते (तेवढ्यापुरते) त्याबद्दल (तोंडदेखला) आवाज करतात. नि मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न (याचा जो काही अर्थ होत असेल तो). तात्पुरती धूळफेक असते ती. गंभीरपणे घ्यायची नसते.

मागे एकदा म्हणाले होते, “देश को देवालय की नहीं, शौचालय की ज़रूरत है।” काय झाले पुढे त्याचे? बांधलेनीतच ना तिथे देवालय?

त्यापेक्षा तिथे (शब्दास जागून) जर एखादे मोठ्ठे शौचालय बांधले असते, तर? आणि तिथे प्राणप्रतिष्ठा वगैरे करण्याऐवजी, मोदींच्या हस्ते पहिला फ्लश करून त्याचे ‘उद्घाटन’ केले असते तर? कदाचित (निदान काळाच्या ओघात लवकरच पुढे ते शौचालय नादुरुस्त होऊन तुंबून वाहू लागेपर्यंत) अयोध्यावासीयांना त्याचा थोडाबहुत उपयोग तरी झाला असता – आणि, कोण जाणे, अयोध्यावासीयांची थोडी अधिक मतेही मिळून गेली असती. कदाचित!

पण नाही! ते “देश को देवालय की नहीं, शौचालय की ज़रूरत है”वाले वक्तव्यसुद्धा (प्रथेस अनुसरून) तोंडदेखले नि तात्कालिकच होते.

(हं, आता, ‘शौचालयांप्रमाणे देवालये काळाच्या ओघात नादुरुस्त होऊन तुंबून वाहू लागत नाहीत; सबब, तेथे शौचालयाऐवजी देवालय बांधणे हा मोदींच्या दूरदृष्टीचा भाग म्हटला पाहिजे’, असा जर स्पिन यावर कोणाला द्यायचा असेल, तर देवोत बापडे! त्यांना तसेही कोण अडविणार आहे?)

चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी गोष्ट मिळत नसेल तेव्हा ती जितकी हवीहवीशी वाटते तितकी ती मिळाल्यावर वाटत नाही.

आणि, आमच्या अमेरिकन भाषेत म्हणतात, त्याप्रमाणे, रस्त्यावरल्या एखाद्या मोटारीमागे लागलेल्या एखाद्या कुत्र्यास जर का ती मोटार एकदाची गावली, तर त्या कुत्र्याची जी अवस्था होते, तशातली गत भाजपची झालेली आहे, असे म्हणता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदिर ,मशीद सारख्या गोष्टी वर लोक मत देत असतील तर भारतीय लोकशाही अजून बाल्य अवस्थेत च आहे .
अजून चालायला पण लागली नाही असे म्हणावे लागेल..जशी भारतीय मीडिया अजून पाळण्यात च आहे रांगायची पण ताकत भारतीय मीडिया मध्ये अजून आलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘बिंदीवाल्या बाई’ कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मृती इराणी बाई पडल्या ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते, मोदी पंचाहत्तरी गाठल्यावर राजीनामा देतील.
मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून त्यांना भाजपा-बहुमतातील सरकारे चालविण्याचा अनुभव आहे. आघाड्यांवर अवलंबून राहण्याची सवय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हया निवडणुकीतले काही ठळक मुद्दे जे भाजपच्या मूळावर उठले
- इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करणे.
- मोदींचे अत्यंत अप्रभावी भाषणे.
-१० वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदीनी लोकाना भीती घालायचा प्रयत्न केला. जसे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घरी २ म्हशी असतील तर एक ओढून नेईल.
- राहुल गांधीशी डिबेट करायला मोदीनी नकार दिला. ह्याचा सरळ प्रभाव राहुल ह्यांची प्रतिमा सुधारण्यात झाला.
-राम मंदिराचे घाईत उद्घाटन, शंकराचार्याचा विरोध.
- उद्घाटन प्रसंगात एककल्ली पणा, फक्त मोदी आणि मोदीच जे लोकांना रूचले नाही. उद्घाटन प्रसंग हा हिंदूंचा सोहळा न राहता तो भाजपचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे अनेक हिंदू प्रभावित झाले. खासकरून युपीत. राममंदिर हा हिंदूंसाठी खूपच संवेदनशील मुद्दा होता.
- “जो राम को लाये है” हा प्रचार ही लोकाना आवडला नाही. आपल्या देवापेक्षा कुणी व्यक्ती श्रेष्ठ असू शकत नाही असे हिंदू लोक
उघड बोलत होते.
-महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे नडले. २०१९ लाच २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मोदीना महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या नसत्या, सहज २० जागा जिंकल्या असत्या नी त्याच सभा इतर राज्यात घेतल्या असत्या तर २० जागा आणखी जिंकल्या असत्या. एकट्या उद्धव ठाकरेंमुळे ३० ते ४० जागा भाजपच्या कमी झाल्या.
- शरद पवारांना नाव न घेता भटकती आत्मा संबोधने महाराष्ट्रातील लोकाना रूचले नाही.
- मतदार संघात भाजप खासदारांनी ५ वर्षात आपला चेहरा दाखवला नव्हता. मागच्या वेळी दीड ते दोन लाख लिड ने जिंकलो. हया वेळीही जिंकूच त्यामुळे अनेक खासदारांनी मतदारसंघात फिरणे टाळले.
- इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापले राज्य सांभाळले. उगाच बाहेर फिरले नाही. जसे ममता बंगालात, अखिलेश युपीत नी ठाकरे/पवार महाराष्ट्रातच थांबले.
-मागच्या १० वर्षात काय कामे केली हे मोदीनी सांगितलेच नाही तसेच पुढे काय करणार हे देखील सांगितले नाही.
- भाजपचा कोअर मतदार अजित ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे नाराज होता, त्याने मतदान केंद्रात जाणे टाळले किंवा भाजपला धडा शिकवायला सरळ विरोधात मतदान केले.
- शिवसेना फोडणे अनेकांना आवडणे नाही.
- ईडी सीबीआय चा गैरवापर, भ्रष्टाना पक्षात घेऊन पावन करून घेणे इतके उघडपणे सुरू होते की ह्याचा आपल्या मतदारांवर प्रभाव होत असेल ह्याचा भाजपने आजीबातच विचार केला नाही.
-स्थानीक प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश. त्यांची दखल सुधा घेण्यात आली नाही. दिंडोरी की कुठल्यातरी सभेत एका शेतकऱ्याने मोदीना कांदा प्रश्नावर बोला अस सांगितल्यावर मोदीनी त्याला “जय श्रीराम “ असे उत्तर दिले. त्यामुळे त्याभागात संतापाची लाट उसळली होती.
-कांद्याबाबत भेदभाव- गुजरात मधील कांद्याला एक्सपोर्टची परमिशन पण महाराष्ट्रातील कांद्याला नाही असे शेतकरी बोलून संताप व्यक्त करत होते.
- मुसलमानांना विरुद्ध उगाच वक्तव्ये केली. ह्याचा परिणाम मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानात झाले, मुसलमानातील मोदीविरोधी प्रचंड लाट ओळखून mim ने आपले उमेदवार उतरवले नाही. नाहीतर भाजपा सोबत त्यांचाही धुव्वा उडाला असता.
- जरंगे प्रकरण नीट हाताळले नाही. जरांगे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे sit चौकशी लावण्यात आली. ह्यामुळे मराठा समाज प्रभावित झाला.
- भाजपच्या संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे (भाजपनेते उघड बोलत होते) तसेच मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे/ समर्थन करने ह्यामुळे दलित मतदार प्रभावित झाला.
-मोदींची थकलेली देहबोली तसेच मुद्दे सोडून भरकटलेली भाषणे.
- ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे भाजपेयीना खोडून काढता आले नाही. ध्रुव राठीचे व्हिडीओ अतिशय प्रभावशाली होते. ध्रुव राठीला न्यूज़ चॅनल्स ही उत्तरे देऊ शकले नाहीत. राठी चे व्हिडिओ बर्याच राज्यात मोठमोठे फ्लेक्स लाऊन दाखवले जात होते. ध्रुव राठीला प्रभावित होऊन त्याचे सबस्क्रायबर्स २ कोटी झाले. त्याचे व्हिडीओ ३० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.
- ⁠संजय राउत यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता त्यांच्यावर वयक्तिक टीका करणे, ह्यावरून भाजप नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्याना उत्तर न देता त्यापासून पळ काढतात असा मॅसेज सामान्य लोकांत गेला.
- ⁠भाजपच्या काही नेत्यांची शिवराळ भाषा.
- ⁠शिवसेना आणी राष्ट्रवादी फोडून ठाकरे नी पवारांचे चिन्ह नी पक्ष इतराना बहाल केल्याचा महाराष्ट्रात राग होता.
- ⁠महाराष्ट्रात ठाकरे नी पवारांच्या तोडीस तोड नेता भाजपकडे नसणे.
- ⁠राज्यात प्रियंका गांधी ह्यांच्या झालेल्या प्रचंड सभा. (नंदूरबार आणी नांदेड जागा ह्याच सभेने फिरवल्या.)
- ⁠उद्धव ठाकरे ह्यांची आक्रमक भाषणे तसेच सभांना जमलेली प्रचंड गर्दी. तसेच लढाऊ बाणा. सोप्या जागा मित्रपक्षांना देऊन ठाकरेंनी अटीतटीच्या जागा स्वतः कडे घेतल्या.
- ⁠पवार नी ठाकरेंसोबत असलेली प्रचंड सहानुभूती
- ⁠१०० टक्के मोदींवर विसंबून असणे. भाजप नेत्यांनी आपली राज्यातील कामे दाखवलीच नाहीत.
- ⁠चिन पाक निवडणुकीत आणणे. लोकाना ते रुचलेच नाही.
सत्ताबदल झाला नाही हे म्हणणे खोटे आहे. “मोदी” सरकार जाऊन “NDA” चे सरकार आले आहे.
मागच्या दहा वर्षातील नी इंदिरा/राजीव कालखंड पहिला तर एक गोष्ट लक्षात येते. एकहाती सत्ता देऊन देशाचा काहीही फायदा होत नाही. फक्त राज्यकर्त्यांचा अहंकार वाढतो नी येणकेनप्रकारे विरोधकांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळे भारत देशासाठी “गठबंधन” करून आलेले सरकारच बेस्ट. त्यामुळे सत्ता राबवणाऱ्यांवर अंकुश राहतो. एक एकहाती सत्ता नेमकी कशासाठी हवी असते हे कळले नाही. जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?
- अमरेंद्र बाहुबली.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे.

या पराभवाने नमो इतके खचून जातील असे वाटले नव्हते. आठवड्याभरातच ते रागांपुढे अगदीच खुजे वाटायला लागलेत.

त्यांनी लवकर संन्यास घ्यावा हेच श्रेयस्कर होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांचा 'निवडणूक निकालाच्या बोधकथा!' हा लेख आला आहे. या निवडणुकीविषयी काही रोचक कथा त्यात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कोणी म्हणत आहे की पुन्हा 'तीच' घोषणा द्या:
अयोध्या सिर्फ झाँकी हैं, काशी मथुरा बाकी हैं |
काय दिवस आलेत गद्दार हिंदूंमुळे ....जगन्नाथा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) मोदी सहेबान मुळे मी निवडून आलो .( ईथे मोदी ह्यांच्या नावा ऐवजी कोणतेही नाव लावा)
विजयी उमेदवार असे व्यक्त होतात.
ह्याचा अर्थ तू स्वतः नालायक आहेस, तुझी लायकी पण नाही निवडून येण्याची .
तरी तू निवडून आलास मोदी मुळे ( मोदी ह्या नावा ऐवजी अगदी राहुल जी न च नाव लावा)
मग मतदान लोकांनी काय विचार करून केले?
म्हणजे अगदी गाढव पण कोणत्या तरी पक्ष कडून निवडणुकीत उभ राहिले तरी लोक गाढवाला पण मत देतील ही अवस्था( गाढव हा प्राणी अतिशय कष्टाळू आहे त्याची क्षमा मागून लिहीत आहे.माणसाच्या जगात गाढवाला मूर्ख समजले जाते ती वेगळी गोष्ट आहे)

हा खूप मोठा प्रश्न माझ्या सारख्या खूप लोकांना पडतो.

गुंड,लबाड,भ्रष्ट , समाज विघातक लोक ,जनता निवडून देते फक्त कोणत्या तरी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व च चेहरा बघून.
खरेच लोकशाही साठी लाजिरवाणे आहे.

प्रगल्भ मतदार भारतात जेव्हा निर्माण होतील तेव्हा खरी लोकशाही भारतात येईल

फक्त चांगली लोक निवडून ध्या पक्ष बघायची काही गरज नाही.
कशाला हवं विशिष्ट पक्षाचे सरकार?
उत्तम, विद्वान लोक लोक्षभेत जाणे महत्त्वाचे आहे.
चांगली लोक लोकसभेत गेली की उत्तम सरकार आणि उत्तम विरोधी पक्ष भारताला लाभणार च.
मग कोणता ही पक्ष सत्तेत किंवा विरोधी असू ध्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. महागाई भरपूर वाढली. २०१९-२०२४ या पाच वर्षात जीवनावश्यक वस्तू जवळपास दुपटीने महाग झाल्या. (https://data.worldbank.org/indicator/FP.CPI.TOTL.ZG?locations=IN)
२. बेकारी वाढली (https://www.forbesindia.com/article/explainers/unemployment-rate-in-indi...)
३. आरक्षण रद्द होईल अशी भिती पसरली.

मन्दिरे बान्धून झाली - त्यामुळे तो मुद्दा असायचे काही कारण नाही आता.

Solving the aforementioned points and succession planning will (or should..) be the primary challenges for the leadership. The leader in command would do well not to be the face of the ruling party in 2029. He will be close to 80 - and the Indian voters have been rejecting leaders that old for PM in the recent past.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंभीर स्थिती भारतात निर्माण होत आहे त्या वर ना विचारवंत बोलत,ना मीडिया, ना लोक,ना सरकार, ना न्याय व्यवस्था.

आयेगां तो मोदी ही.

हे वाक्य साधं सरळ आहे पण
मोदी च का येणार ह्याचे समीक्षण देशातील गंभीर स्थिती चे दर्शन घडवेल.

हल्ली शॉर्ट कट मारण्याचे दिवस आहेत मग ते राजकारण किंवा बाकी क्षेत्र.
पोलिस पण चालाक गुन्हेगार मिळाला नाही की कोणाला तरी सुळावर चढून स्वतःची लाल करून घेतात.

धर्म स्वतंत्र भारतात आहे पण धर्माच्या नावावर दोन धर्मात विष पेरून लोकात उभी फूट पाडण्याचे स्वतंत्र कायद्याला नक्की अपेक्षित नाहि.
तरी bjp बिन्धास्त धार्मिक प्रचार करून समाजात उभी फूट पाडून निवडणुका जिंकत आहेत.
साधे,सरळ,सामान्य हिंदू मुस्लिम त्या मुळे एकमेकाच्या द्वेष करू लागले .
कारण अशी उभी फूट पाडली तर निवडणूक जिंकता येते ,हा रिझल्ट आहे.

जातीय नेते पण आहेत जातीचे हित जपणे हे भारतात स्वतंत्र आहे .
पण जाती जातीत द्वेष निर्माण करून राजकीय फायदा करून निवडून येणे हे कायद्याला नक्कीच अपेक्षित नाही.
तेच भाषा वाद प्रांत वाद ह्या वर लिहिता येईल.

देशात कायद्याचे राज्य असावे ,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन असावे .
इतके झाले तर ना कोणत्या धर्मावर अन्याय होईल,ना कोणत्या जाती वर अन्याय होईल ,ना कोणत्या भाषिक गटावर अन्याय होईल.

देशात आज धार्मिक,जातीय,प्रांतीय ,भाषिक फूट पाडली गेली आहे ना कायद्या ने काहीच कारवाई कोणावर च होत नाही.
धर्माजात, भाषा ,प्रांतवाद है पॉइंट सोडून च भारतात निवडून येण्याची कुवत राजकीय पक्षात आली पाहिजे तेव्हा च देश प्रगती करेल.
फक्त कायद्याचे राज्य,भ्रष्टाचार मुक्त प्रशासन , आणि सरकार ची कार्य क्षमता ह्याच पॉइंट वर निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0