आमचं लफडं

नवरा अनेकदा शून्यात बघत एक स्वगत म्हणतो.
माझ्या ओळखीतला अमका, त्याची कशी दोन सायमल्टेनियस लफडी चालू आहेत. अजून कुणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर. त्याचंही लफडं आहे. मीच कसा एकपत्नीव्रता, सरळ मार्गी, सोज्ज्वळ वगैरे. नवऱ्याला असे 'फोमो1'चे अटॅक येतात अधूनमधून. तेव्हा तो डायनिंग टेबलवर कोपरं ठेऊन, हाताच्या बोटांचा पाळणा करून त्यात स्वतःची जिवणी जोजवत असे विचार करत बसतो.

"करायचंय का तुला लफडं?", मी त्याला विचारलं. लॉकडाऊन नुकताच संपला होता. आणि इतके दिवस घरात जोडीने धुणीभांडी करून आम्हांला एकमेकांचा पुरता वीट आला होता.

"बोलणं सोपं असतं."

"अरे? बायको तुला विचारते आहे तुला लफडं करायचंय का? तुझं ८० % काम इथेच झालंय.."

"पण कशी करतात सुरवात? कुणीतरी लफडं करणारी तरी पाहिजे!"

"तुझ्या ऑफिसमध्ये कुणी आहे का?"

"नाही."

"मग एखाद्या प्रोजेक्टवर, जिच्याशी तुझं नेहमी बोलणं होतं अशी?"

"नाही. सगळे लफडी करणारे पुरुषच माझ्याशी फोनवर बोलतात."

"मग तुला फेसबुकवर शोधायला पाहिजे."

"सापडली तर पुढे काय करू?"

"सगळं मीच सांगू का तुला? काय करू काय? तिच्या इनबॉक्समध्ये2 जा. आणि तिला मेसेज कर."

"काय मेसेज?"

खरंतर इतक्या अरसिक आणि आळशी माणसाशी आपणच का लग्न केलं आहे हा प्रश्न इथे मला पडला. पण आता त्याला पूर्ण शहाणा केल्याशिवाय त्याची सुटका होऊ देण्यात अर्थ नव्हता.

"तुला आठवतंय, लग्नाआधी तीन महिने मी तुला व्हाट्सअ‍ॅप डाऊनलोड कर कारण ते फुकट असतं असं सांगितलं होतं? तेव्हा, व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक वगैरे कंपन्या आपल्यावर पाळत ठेवतात म्हणून तू बाणेदारपणे 'मी एसएमएसच करणार' असा पवित्रा घेतला होतास?"

"अब वो सब क्यूँ निकाल रही हो?" नवरा चिडला, की मातृभाषेत बोलू लागतो.

"निकाल मतलब क्या. उस टाइम याद हैं तुम्हारा एसएमएस का बिल दो हजार आया था?"

"हाँ, तो?"

"तर दोन हजार रुपये फक्त मेसेजेससाठी टिकवलेस तेव्हा तू मला काय मेसेज केले होतेस तसेच मेसेज करायचेत लफड्यात. फक्त या वेळी फेसबुक वापर. फुकट असेल."

"काय केले होते मेसेज. आता मला आठवत नाही."

"नंतर कधीही आठवणार नाहीत असेच मेसेज करायचे आहेत तुला."

"ओके. समझ लो, मुझे ऐसी कोई कँडिडेट मिल गयी.. और मान लो मैंने उसको फेसबुक पे मस्का लगा के तयार किया.. उस में मैंने अपना टाइम दिया भी, तो आगे क्या? कहाँ मिलेंगे अफेअर करने के लिये?"

लफडी करण्याकडे 'स्वतःच्या वेळाची गुंतवणूक' अशा दृष्टीकोनाने बघणारा हा थोर गुंतवणूकदार आपल्याशी लग्न करताना नक्की काय बघत होता अशी एक जिज्ञासा माझ्या मनात जागी झाली. गेले अनेक महिने तो गॅससिलेंडरचे रेट आणि पाईप गॅसचे रेट असं एक्सेल ठेवत होता. झालंच तर आम्ही एसीबीआय सोडून कुठल्या बँकेतून किती वर्षांसाठी गृहकर्ज घेतलं असतं तर आज आम्ही किती तोट्यात असतो असले तक्तेसुद्धा आमच्याकडे तयार असतात. यात एचडीएफसी ते स्विस बँक या सगळ्यांचे व्याजदर वेगवेगळ्या रंगाने रंगवून ठेवलेले असतात. आमचं लग्न नवीन नवीन होतं, तेव्हा माझ्या माहेरच्या कुणीतरी त्याला 'घरातली कामं कशी वाटून घेता?' असा भोचक प्रश्न विचारला होता. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता, 'ही लाईट, फॅन ऑन करते आणि मी ते ऑफ करतो' असं धडाकेबाज उत्तर दिलं होतं. तेव्हा तो किती मिश्किल आहे याचं कौतुक झालं होतं पण ते वाक्य विनोदाने अजिबातच आलेलं नव्हतं, हे आज सात वर्षांनी सूर्यासारखं लख्ख दिसतं आहे मला.

आमचा पाषाणचा फ्लॅट लॉकडाऊनमध्ये भाडेकरूमुक्त झाला होता. तेही दुःख नवरा उराशी बाळगून होता.

"आपला फ्लॅट रिकामाच आहे की! तिकडे भेटा! डिनरला बोलाव तिला एखाद्या शुक्रवारी. पिझ्झा मागव, म्हणजे भांडी घासावी लागणार नाहीत (भांडी काय काय खाल्ल्यावर घासावी लागत नाहीत या विषयावर आमचं बरंच संशोधन आधीच झालं होतं). येता येता सुलाची 'दिंडोरी रिझर्व्ह' घे, बाल्कनीत मेणबत्त्या लाव, तिच्यासाठी फुलं आण!"

हे ऐकून नवरा गप्प झाला आणि विषय मिटला. कदाचित त्याला सगळ्याची उत्तरं आणि बायकोची परवानगी मिळाली म्हणून त्याच्या कल्पनेतल्या लफड्याची हवा गेली असावी. मग आम्ही परत आमच्या सांसारिक जबाबऱ्या पार पाडू लागलो.

साधारण आठवड्याभराने मला फेसबुकवर नवऱ्याचा मेसेज आला.

'वुड यू लाईक टू जॉईन मी फॉर डिनर अ‍ॅट माय प्लेस धिस फ्रायडे? माय वाइफ इज आऊट ऑफ टाऊन.'

आपल्या नवऱ्याचं असंही डोकं चालू शकतं हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. तिथे त्याला, "वाह! हा बरा शॉर्टकट आहे!" असा टोमणा मारायची इच्छा दाबून मी 'येस व्हाय नॉट? ॲड्रेस?' असं उत्तर दिलं.

तर मला व्हाट्सअ‍ॅपवर 'इतना नाटक नही होगा मेरे से' असा मेसेज आला. तेव्हापासून फेसबुकवर आम्ही लफड्यासंदर्भात आणि व्हाट्सअ‍ॅपवर लफड्याच्या व्यवस्थापनासंदर्भात निरोप पाठवू लागलो. फेसबुकवर मला कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं अशी विचारणा झाली. आणि लगेच व्हाट्सअ‍ॅपवर 'वायरलेस स्पीकर कुठे आहेत' असा प्रश्न आला. फेसबुकवर 'कुठला पिझ्झा आवडतो' असं विचारण्यात आलं आणि माझं उत्तर ऐकून व्हॅट्सअ‍ॅपवर त्या पिझ्झ्याचा ब्रँड बदलण्यात आला. असले अनेक फालतू प्रयोग चाललेले असताना आमच्या त्या घरात कुठल्याही प्रकारचा पलंग किंवा गादी नाही हे नवऱ्याच्या अचानक लक्षात आलं.

"तरी मी तुला सांगत होते, तिथे फर्निचर करून घेऊ."
मला माझं मत रेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. ती मला या लुटुपुटुच्या लफड्यापेक्षा जास्त रोमांचक वाटली.

"आपण एक सिंगल गादी घेऊन येऊ घरून. आणि एक जण जाजम पसरून झोपेल."

असल्या वैवाहिक तडजोडी करायला माझा कडाडून विरोध होता. त्यामुळे नेलीच तर आमच्या घरातली क्वीन गादी, नाहीतर काही नाही असा पवित्रा मी घेतला.

अखेर एकदाचा तो दिवस उगवला!
गादी सकाळीच गाडीत ठेवून मी दिवसभर ती घेऊन फिरायचं आणि नंतर त्याला भेटायचं असं ठरलं. गादी नवीन आणि कापसाची असल्यामुळे गुंडाळायला आणि एकूणच वागवायला तापदायक होती. माझ्या दोन ओढण्या दोरीसारख्या पसरून त्यावर ती गादी फेकली. गुंडाळी झाल्यावर दोन्हीकडून जिवाच्या आकांताने त्या ओढण्या आवळल्या. नंतर नवऱ्याने एकीकडून उचलून ती गादी उभी धरली.

"मला तू दिसत नाहीयेस", नवरा गादी पलीकडून म्हणाला.
ही नक्की माझ्या ‘बुटकीची’ टिंगल होती की मी अजूनही गादीपलीकडून न दिसण्याइतकी बारीक आहे याचं कौतुक होतं असा स्वकेंद्रित विचार करून झाल्यावर माझ्या लक्षात आलं, की मी न दिसल्यामुळे गादीची ने-आण जटिल होणार होती.

त्यानंतर ती गादी तिच्यासोबत बॉल डान्स केल्यासारखी फिरवत न्यायची की दोन टोकाच्या दोन ओढण्या हॅन्डलसारख्या वापरून दोघांनी उचलून न्यायची हे ठरवण्यासाठी आम्ही काही प्रयोग केले. नवऱ्याकडे बॉल डान्स करण्यासाठी लागणारी उंची होती पण तो अगदीच कूर्मगतीने तिला नाचवू लागला. त्याला 'वेग वाढव' असं सुचवल्यावर त्याने फणकाऱ्याने 'हे दोघांचं काम आहे तसंही' असा सूर काढला. मग आम्ही ती गादी आडवी करून, तो पुढे आणि मी मागे अशी लिफ्टपर्यंत नेली. तिथे ती सरळ करता करताना आम्हां उभयतांना धाप लागली. आणि गादीच्या गुंडाळीच्या दोन्ही बाजूला भालदार चोपदारांसारखे उभे राहून आम्ही खालच्या दिशेने प्रवास करू लागलो.

माझ्या मनात एक विचार येत होता, जो मी प्रयत्नपूर्वक दाबत होते. तेवढ्यात नवरा पलीकडून पचकलाच,

"ऐसा लग रहा हैं किसी की लाश ठिकाने लगा राहे हैं"

"ये हमारा बेड हैं यार! इसको लाश बोलोगे तुम?" मी चिडून विचारलं.

"तुझ्याही मनात आत्ता तेच चाललंय. मला माहिती आहे."

"ये आयडिया पेहलेसे ही फेल था.. अफेअर किसी अनजान के साथ ही करना चाहिये!"

मला कुठल्याही मोहिमेच्या मध्यावर असे पराभवाचे विचार करायला फार आवडतं. त्यामुळे विजयी होण्याचा मनावरचा ताण कमी होतो. हे मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य कारण मला सोडून इतर कुणालाही पटत नाही.

नवरा गादीच्या कमरेवर हात ठेऊन माझी वाट बघत उभा होता. मी गाडी घेऊन आले. एव्हाना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पाच-सहा मास्कधारी बघे नवऱ्याच्या आसपास जमले होते. लांबून मला पुरुषांचा भोंडला चालला आहे असं वाटून हसू आलं. गाडी लावून तिचे मागचे दोन्ही दरवाजे मी उघडले. नवऱ्याने मला एका दारातून गादी ढकलायचे आदेश दिले आणि दुसऱ्या दारातून तो ती त्याच्या दिशेने खेचणार होता. या कल्पनेत अनेक अडचणी येऊन मी अबला सिद्ध होऊ लागल्यावर जमलेल्या बघ्यांमधून मला नेहमी मदत करणारे काही पुरुष पुढे आले. नवऱ्याने स्वतःच्या स्त्री-दाक्षिण्यावर जराही शंका न घेता तो सगळा सोहळा थंड डोक्यानं बघितला. ती गादी थोडी तिरकी करून शिताफीनं नवऱ्यानं गाडीचं दार लावलं. कपड्यांचे बोळे कपाटात फेकून प्रकाशाच्या गतीनं तो त्याच्या कपाटाचं दार लावतो तसंच काहीसं. आमची झटापट उरकल्यानंतर बघ्यांमधून करोना-सतर्क देशपांडे आजोबांनी चौकशा सुरु केल्या.

"कुठे चालला गादी घेऊन?" त्यांनी नवऱ्याला विचारलं.
"आमच्या दुसऱ्या घरी."
"पार्टी आहे वाटतं!"
"हो."
"किती लोक येणार आहेत?"
"काही नाही. आम्ही आणि अजून दोन जोडपी आहेत."
"करू नयेत अशा पार्ट्या. हे दिवस नाहीत पार्टीचे." त्यांनी नेहमीप्रमाणे टेप सुरु केली.

मला इथे 'अहो काका! तो तिकडे लफडं करायला चाललाय. मी फक्त त्याला मदत करतेय. आणि तिथे त्याला भेटणारी त्याची मैत्रीणसुद्धा मीच आहे' असं सांगून कन्फ्युज करायची फार इच्छा झाली होती. पण सोसायटीमध्ये नाकासमोर बघून चालणारी अशी माझी प्रतिमा मला मलीन होऊ द्यायची नव्हती.

इथवर घडामोडी घडेपर्यंत आमचे चिरंजीव त्यांच्या खोलीत निजले होते. आम्ही गादी गाडीत बसवून वर येईपर्यंत ते डोळे चोळत बाहेर आले होते.

"कुठे गेला होतात?"
"गादी गाडीत टाकायला."
"का?"
"आम्ही आज दुसऱ्या घरी राहायला जाणार आहोत."
"आणि मी?"
"तू आजी-आजोबांकडे."

इतर वेळी त्याला आजी-आजोबांकडे पाठवायला कुरकुरणारे आईवडील आज इतके उत्सुक असल्याचं दिसल्यामुळे अर्थातच पोराच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. लहान मुलांना आई-बाबांपेक्षा आजी-आजोबा आवडतात हे वैश्विक सत्य असलं, तरी आपल्याला आजी-आजोबांकडे पिटाळून आई-बाबा आपला प्रतिस्पर्धी तर तयार करणार नाहीत ना, याकडेही मुलांचं बारीक लक्ष असतं. त्यांचे निरागस विचार इतके स्पष्ट नसले, तरी आई-बाबा आपल्याला कुठेतरी सोडून अधिक आनंदी होतात हे लहान मुलांना आवडत नाही. त्याचा बेत बदलेल या भीतीनं मी त्याला सांगितलं, की दुसऱ्या घरात माझ्या हाताच्या पंजाएवढं एक अशी अनेक झुरळं झाली आहेत. ती मारायला मी आणि बाबा रात्रभर तिथे राहणार आहोत. एरवी अतिशय तल्लख बुद्धी असलेल्या माझ्या मुलानं हे लगेच मान्य कसं काय केलं, की त्याला आमची दया आली कोण जाणे!

गाडीतून पाळणाघरात जाताना, मुलानं मला ती मागची गादी कशी चुकीची ठेवली आहे यावर सूचना दिल्या. आणि पंजाएवढ्या झुरळांचे फोटो काढ नक्की असं साधारण एकशे पासष्टवेळा सांगितलं. फोटोसुद्धा त्याला 'बिफोर आणि आफ्टर' असे अपेक्षित होते. आणि जमल्यास झुरळ मरतानाचा एक व्हिडियोसुद्धा हवा होता. त्याला 'हो-हो' करून पाळणाघरात सोडल्यावर मी ऑफिसला आले. केबिनमध्ये शिरल्यावर साधारण शून्य मिनिटात आमचा एक ड्रायव्हर आला.

"म्याडम, ती मागच्या शिटावरची गादी विकायची आहे का?"

**

संध्याकाळ झाली. पोरगा आजीबरोबर तिच्या घरी गेला. आणि मी आमच्या रांदेवूकडे रवाना झाले. मी बरेच दिवसांत त्या भागात गेले नसल्यामुळे मला त्या भूभागाची कॉर्पोरेशननी कशी वाट लावली आहे हे लक्षात आलं नव्हते. त्यामुळे मी आधी वळायचे तिथून वळल्यावर समोरचा पूल पत्र्याच्या फळ्यांनी बंद करून ठेवलेला दिसला. वैतागून गूगल मॅप उघडावं म्हणून फोन घेतला तर नवऱ्याचा एक आधीच पाठवलेला सिन्सिअर मेसेज होता. त्यात नवीन पद्धतीने घराकडे जाण्याच्या सगळ्या सूचना होत्या. पण त्या लिखित सूचना वाचताना माझे अनेक गोंधळ झाल्यामुळे मी मुंबई-पुणे महामार्गाच्या एका भागाला दोन प्रदक्षिणा घातल्या. शेवटी एकदाचं घर आलं आणि मी सुस्कारा टाकला.

नवरा आणि नवनिर्वाचित वॉचमन माझी वाट बघत पार्किंगमध्ये उभे होते.
मी गाडीतून बाहेर आल्यावर क्षणाचाही विलंब न लावता नवऱ्यानं वॉचमनला 'ये मेरी मिसेस' अशी ओळख करून दिली.

"मी आज तुझी मिसेस नाहीये", मी त्याला लिफ्टमध्ये म्हणाले.
"लेकिन कोई भी होती तो मैं उस को मिसेसही बताता", माझ्या मध्यमवर्गीय नवऱ्याचा सोज्ज्वळपणा बोलला.

आमच्या नशिबानं नवीन वॉचमन आणि त्याच्या बायकोनं आमचं ते धूड आम्हांला आनंदानं वर आणून दिलं.
नवरा फक्त भरपूर वाईन घेऊन आला होता आणि झोमॅटोची वाट बघत आम्ही रिकाम्यापोटीच त्यातली बरीच वाईन घेतली. संध्याकाळी एवढे कार्ब्स खायचे म्हणून मी सकाळपासून दिवेकर पद्धतीनं फक्त नारळपाणी, एखादा चीझचा तुकडा वगैरे खाऊन जगले होते. त्यामुळे सुलाचे पहिले काही घोटच थेट माझ्या डोक्यात गेले. आम्ही पिझ्झाची वाट बघता बघता काय बोललो ते मला फारसं आठवत नाही. पण एवढं नक्की, की त्यातलं काहीही प्रणयसूचक नव्हतं. अगदी ठळकपणे आठवणारं काहीतरी म्हणजे एका बाथरूमचा नळ नीट फिरत नाही ही बाब नवऱ्याच्या लक्षात आली होती आणि 'लाइफटाइम गॅरेंटी' म्हणजे नक्की कुणाचं लाईफ? आपलं की नळाचं? यावर आम्ही बरीच चर्चा केली. त्या भरात 'जॅग्वार' कंपनीचा फोन नंबर शोधून ती लाईफटाइम गॅरेंटी नक्की कशाची हे विचारण्यासाठी नवऱ्यानं नंबर दाबला तर तो जॅग्वार गाड्यांच्या शोरूमला लागला. त्यावर आम्ही.. कदाचित फक्त मीच, अनंतकाळ हसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझं डोकं प्रचंड दुखत होतं. नवऱ्यानं त्याच्या ऑफिसच्या बागेतून एक झिपलॉक काढली.
त्यात डिस्प्रिन, कॉम्बीफ्लाम, बँडेड अशा गोष्टींबरोबरच एक छोटा मूव्हचा स्प्रे होता.
"तू किती 'सुबोध' आहेस! हे सगळं घेऊन तू फिरत असतोस?", मी विचारलं.
"हो. कारण आज ते तुझ्या उपयोगाचं आहे' असं म्हणून त्याने वाईन-ग्लासमध्ये पाणी ओतून त्यात एक डिस्प्रिन फेकली.
"ती विरघळतेय तोपर्यंत माझ्या पाठीवर हा स्प्रे मार", तो म्हणाला. "काल तू गादीवर झोपलेली असताना मी ती हलवायचा प्रयत्न केला, और मेरी पीठ में मोच आ गयी!"

सकाळी सकाळी पोराला आजीकडून घेऊन आम्ही घरी परत आलो.
ती गादी पलंगावर फेकत नवरा म्हणाला, "अब इसके आगे जो भी करना हैं.. घर पे ही करेंगे!"

********

1. FOMO: Fear Of Missing Out - इतर लोक करतायत ते आपण करत नाही त्यामुळे आपण एखाद्या महत्त्वाच्या अनुभवास मुकतो आहोत असं सतत वाटत राहणे.

2. इनबॉक्सात जाणे: सोशल मीडियावर एखादी व्यक्ती आवडल्यास त्याला/तिला मेसेंजरवरून व्यक्तिगत निरोप पाठवणे. आणि खासगी माहितीची देवाणघेवाण करून 'प्रकरण' पुढे न्यायचा प्रयत्न करणे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा मस्त आहे, पण लफड्याचा भाग एकदम सेन्सॉरच करून टाकलाय!

बाय द वे गौरी देशपांडेंची एक कथा आहे. त्यात नवराबायको अचानक कुठेतरी रस्त्यात भेटतात व एकमेकाशी ओळख नसल्याचं नाटक करतात. आणि एकमेकांबरोबर वन नाइट स्टँड करतात. अशी गोग्गोड कथा आहे ती आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःच स्वतःला कितीही गुदगुल्या केल्या तरी होतच नाहीत, तद्वत अधिकृत पतिपत्नी कोणताही अभिनय करूनदेखील खऱ्या अर्थाने लफडे करूच शकत नाहीत.

लेख मजेदार आहे. गादी नेण्याचे प्रयत्न पाहताना हसू आले. चिंवी जोशींच्या कथेत जिन्यातून म्हैस वरील मजल्यावर नेणे, अवजड कपाट वर चढवताना खाली पडून ते निष्कपाट झाले, इत्यादि आठवून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नवरा और एक बायको कभी दोस्त नही बन सकते. प्रेरणा old Bollywood

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चान चान!
मुख्य तपशील गायब आहे याच्याशी सहमत!

जॅग्वार ऐवजी जाक्वार असे बरोबर शोधले असते तर नळाच्या दुकानातच पोहोचले असते. (पण एक पंच हुकला असता.)

"लेकिन कोई भी होता तो मैं उस को मिसेसही बताता",
यात कोई भी होती असं हवं, नाही तर अर्थाचा अनर्थ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनव्याकुळ मग मी हसले
त्यावेळी नवरा सावध,
नळ पुनश्च फिरवित होता

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविराज तुमच्या कविता फारच दूर्बोध असतात. इथे इथे नळ हे नेमकं कशाचं प्रतीक आहे रूपक आहे ? कारण नायक तर प्रौढ आहे अनुभवी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे इथे नळ हे नेमकं कशाचं प्रतीक आहे रूपक आहे?

फ्रॉइड जिवंत असल्याचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव शिव शिव

औषध न लगे कोणा
औषध नळ गे कोणा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नळ हे सर्व गळक्या आणि रडक्या गोष्टींचं प्रतीक असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नळ हे इथे कशाचेही प्रतीक नसून खरोखरीच बाथरूममधला नळ आहे. Sometimes a नळ is just a नळ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण संपूर्ण स्फुटच एक नळ आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...झुरळांचे बिफोर अँड आफ्टर फोटो नंतर कोठून डाउनलोड केलेत, ते सांगा आधी!

प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे.

(वाटल्यास सीक्वेल काढा त्यासाठी, भरपूर पाणी वाढवून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही झुराळांना घाबरून फोटो काढायला विसरलो असं सांगितल्याने चिरंजीवांनी मोठं भोकाड पसरलं. हा लेख २०२१ साली लिहीला असल्याने त्याकाळी एखादी गोष्ट पटकन विसरून जायची प्रॉपर्टी मुलामध्ये होती. त्याप्रमाणे काही तासांत तो पुन्हा होता तसा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्व प्रकरणात ती गादी हीच व्हिलन आहे. ती जर नेली नसती तर , तुम्हाला दोघांनाही काहीतरी वेगळं वाटलं असतं. गादी नसल्यामुळे तुम्ही फर्शवर झोपल्यामुळे, तुम्हाला 'फर्शसे अर्श तक ' असाही अनुभव आला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गादी ने हमे निकम्मा कर दिया गालिब
वर्ना हम भी मशहुर हो जाते इश्क मे
हिसाब ने ही बिगाड दिया खेल सब
वर्ना बेहिसाब हो जाते हम जुनुन मे
लौ-ए-इश्क को ऐसे जलाते रहेंगे तमाम उम्र हम
के अफसाने बन जाएंगे तारीख ए इश्क मे हम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन
बडे बे आबरु होकर तेरे फ्लॅट से हम निकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक प्रकल्पात काही अडचणी आणि काही अनपेक्षीत मजा असते.

आता हाच प्रकल्प सई परांजपे यांच्यासारख्या निर्माता/दिग्दर्शक च्या हातात पडला असता तर तीन महिन्यांत पडद्यावर झळकला असता. क्षमता (potential) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोळंभट्टा कुठं नेशील... का कोणती तरी मराठी कथा वाचल्याचे आठवलं.
कोणाची होती ते माहीत नाही.

पण हा घरगुती टोळंभट्ट फक्कड जमलाय हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

काही वर्षांनी चिरंजीव आणखी मोठे होतील. आणि तुमची गादी चालवतील?

आम्हां मध्यमवर्गीयांच्या कोमट भीत्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि तुमची गादी चालवतील?

म्हणजे, गादी गाडीत घालून न्यावी लागणार नाही, अशा अर्थाने?

की, ज्ञानेश्वरांनी (आणि आम्हीसुद्धा) भिंत चालवली होती, तशा अर्थाने?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भय इथले संपत नाही. त्यात तुम्ही भर घालता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.