महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण
महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते. याचा परिणाम दोन्ही वेळा लोकसभेत सात ही जागा भाजप ने जिंकल्या. ज्या राज्यांत अल्पसंख्यक मतदाता 10 टक्के पेक्षा जास्त आहेत त्या राज्यांत जास्त मतदानाचा फायदा भाजपला होतो. दिल्लीत जर आगामी विधान सभा निवडणूकीत जर महाराष्ट्र प्रमाणे 66 टक्के मतदान झाले तर भाजप दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकू शकते. निष्कर्ष एकच -महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत अर्धा टक्के मतांचा परिणाम एनडीएला लोक सभेत भोगावा लागला होता. विधानसभेत मतदान 5 टक्के जास्त झाल्याने महाराष्ट्रात त्सुनामी येणारच होती.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 2019 पेक्षा 5 लाख मते जास्त पडली होती. महा विकास आघाडीला (राऊंड फिगर) 2.50 कोटी मते मिळाली होती तर महायुतीला 2.48 कोटी मते मिळाली होती. मतांचे अंतर 2 लक्षपेक्षा कमी होते. भाजपला 2019च्या लोकसभा निवडणूकीत 1.49 कोटी मते मिळाली होती जवळपास तेवढीच मते 2024 लोकसभा निवडणूकीत मिळाली होती. भाजपा लोकसभेच्या निवडणूक निकालात विधानसभेच्या 83 जागांवर पुढे होती. शिंदे सेनेला 73.77 लक्ष मते मिळाली आणि ती विधानसभेच्या 38 जागांवर पुढे होती. अजित दादांच्या एनसीपीला 20.53 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 6 जागांवर पुढे होती. महायुती विधानसभेच्या 128 जागांवर पुढे होती. अर्थात फक्त बहुमतापेक्षा 17 जागा कमी होत्या.
कॉंग्रेसला लोकसभेत 96.40 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 63 जागांवर पुढे होती. शरद पवारच्या एनसीपीला 58.50 लक्ष मते मिळाली ती विधानसभेच्या 32 जागांवर पुढे होती. ठाकरे सेनेला 95.23 लक्ष मते मिळाली होती. ती 56 जागांवर पुढे होती. अर्थात लोकसभा निवडणूकेनुसार विधानसभेत 151 जागांवर महा विकास आघाडी पुढे होती. बहुमत पेक्षा फक्त 7 जागा जास्त.
विधानसभा निवडणूकीत भाजपला 1.73 कोटी अर्थात 24 लक्ष मते जास्त मिळाली. शिंदे सेनेला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा जवळपास 6 लक्ष जास्त मते मिळाली. इथे मजेदार बाब अशी की शरद पवारांच्या एनसीपीला ही जवळपास 73 लक्ष मते मिळाली. तिला लोकसभेपेक्षा जवळपास 14 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ कांग्रेस आणि उद्धव सेनेच्या अधिकान्श समर्थकांची मते शरद पवारांच्या एनसीपीला मिळाली. अजित पवारांना 58 लक्ष मते अर्थात तब्बल 38 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ भाजप आणि शिंदे समर्थकांनी आपली 100 टक्के मते दादांच्या कडे वळवली. भाजप मतदार पक्षा प्रति किती एकनिष्ठ आहेत, याची कल्पना येते. दादा आणि शरद पवारांना मिळालेल्या मतांच्या आधारावर माझा निष्कर्ष - बहुतेक दादांच्या मतांमध्ये 50-60 टक्के मते भाजप आणि शिंदे समर्थकांची असण्याची शक्यता जास्त. युतीत राहणे दादांना जास्त फायद्याचे आहे.
मग मते कुणाला कमी मिळाली, हा प्रश्न समोर येणारच. कॉंग्रेस पक्षाला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा 16.40 लक्ष मते कमी मिळाली. उद्धव सेनेला 64.43 मते मिळाली, लोकसभेपेक्षा तब्बल 30 लक्ष मते कमी मिळाली.
उद्धव सेनेला विधानसभा निवडणूकीत लोकसभेपेक्षा 30 लक्ष मते कमी मिळाली. लोकसभा निवडणूकीच्या वेळी उद्धवला शिवसैनिकांची सहानभूती मिळाली. अधिकान्श शिवसैनिकांना वाटत होते, भाजपला धडा शिकवून, उद्धव पुन्हा भाजप सोबत युती करतील. लोकसभेत भाजपला पाठिंबा देतील. पण असे काही घडले नाही. आपल्या सैनिकांच्या मनात काय आहे, हे उद्धवला कळले नाही. अधिकान्श हिंदुत्ववादी शिवसैनिक निराश झाले. विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेस आणि अल्पसंख्यक मतांची साथ मिळाली नसती तर शिवसेनेचे 5 आमदार ही निवडून आले नसते.
कांग्रेस भाजप विरुद्ध 74 जागांवर लढत होती. त्यातल्या फक्त दहा जागा कांग्रेस ने जिंकल्या. याचा एकच अर्थ होतो,अधिकान्श जागांवर उद्धव सेनेच्या समर्थकांची मते काँग्रेसला मिळाली नाही. त्यांनी पूर्वी प्रमाणे भाजपला मतदान केले. माझा निष्कर्ष- महाराष्ट्रात कांग्रेसने पुढे स्वबळावर निवडणूक लढवावी. उद्धव सेनेसोबत युती करण्याचा काहीही फायदा कांग्रेसला मिळणार नाही.
या वेळी मतदान जास्त होण्याचे कारण मौलवींचे फतवे, त्यांच्या 25 कलमी मागणीवर कांग्रेसचा सकारात्म्क प्रतिसाद. याशिवाय बंगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते मौन राहिले. योगींच्या "एक रहा, सेफ रहा" चा प्रभाव ही मतदारांवर पडला. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात एक गठ्ठा मतदान केले. यावेळी शिक्षित मतदारांनी ही मतदानात भाग घेतला. माझ्या अनेक पुणेकरी मित्रांनी प्रथमच मतदान केले.
महाराष्ट्राचा हा निकाल अनेपक्षित नव्हता, हा निष्कर्ष आकड्यांवरून सहज काढता येतो.
प्रतिक्रिया
निष्पक्ष???
Prediction is difficult, especially about the future --- Niels Bohr
Confirmation bias (also confirmatory bias, myside bias, or congeniality bias) is the tendency to search for, interpret, favor, and recall information in a way that confirms or supports one's prior beliefs or values.
Availability heuristic
An availability heuristic is a mental shortcut that relies on immediate examples that come to a given person's mind when evaluating a specific topic, concept, method, or decision. As follows, people tend to use a readily available fact to base their beliefs on a comparably distant concept.
आकडे बाजूला ठेवा
It सेल नी गाईड केलेला युक्ती युक्ती वाद बाजूला ठेवा.
लोकांना evm वर विश्वास नाही तर मत पत्रिकेवर मतदान घ्या.
Bjp ला कशाची भीती वाटत आहे.
पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिका ह्यांच्या निवडणुका मत पत्रिकेवर घ्या.
Bjp किती लोकप्रिय आहे ते माहित पडेल.
लोकांची शंका पण दूर होईल
सकाळी सिरिज पाहून स्थानीय
सकाळी सिरिज पाहून स्थानीय प्रेस मते कागदांवर मत पत्र छापल्या जाऊ शकतात. प्रशासनाची साथ असेल किंवा रस्त्यात गाडी थांबून तीनपेटि उघडून मतत्र बदलता येतात. evm मध्ये हे शक्य नाही. म्हणून evm विरोध.
वंचितमुळे मविआला २० जागांचा फटका
वंचितमुळे मविआला २० जागांचा फटका
'ट्रम्पेट'मुळे शरद पवार राष्ट्रवादीचे ९ उमेदवार पराभूत
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लोकसभा निवडणुकीत
वंचित वेगळीच लढली होती, मनसे तळ्यात मळ्यात च होती.
लोकसभा आणि आताची विधानसभा.
निवडणुकीत कोणती ही विशेष आघाडी नव्हती.
. same स्थिती होती.
आकडे फसवे आहेत. बुद्धी भ्रम निर्माण करणारे आहेत.
वंचित मुळे हा पडला, मनसे मुळे हा पडला kadi ची ही किंमत नही ह्या davyana.
Evm घोटाळा लपवन्या साठी सर्व चालू आहे.
भारतीय सर्व मीडिया house bjp ची गुलाम आहेत हे नागडे सत्य लोक स्वीकारत नाहीत हे दुर्भाग्य आहे.
इंडी जर्नल चा व्हिडिओ
इंडी जर्नल एपिसोड ७९
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
evm घोटाला शक्य नाही असे
evm घोटाला शक्य नाही असे पृथ्वी बाबा ही म्हणाले. आपण विसरून जातात किमान प्रत्येक विधान सभेत पाच वीवीपेट मोजणे अनिवार्य असते. evm पक्षांचे अजेंट निवडतात. विवीपेट मध्ये कागदांवर प्रिंटेड स्लिप असते. अजून कोणतीही टेक्नॉलजी आली नाही जी आकाशीय सिग्नल सोडून कागदांवर उमटलेले हात चिन्ह कमळात बदलेल. लोकसभेत 17.3 लक्ष evm पैकी 20,526 वीवीपेट मोजले एक ही त्रुटि सापडली नाही. विधान सभा निवडणूकीत एका ही पराजित आमदाराने यावर हरकत घेतलेली नाही.
दुष्प्रचार करण्यामागे एकच कारण त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे. जनतेला मूर्ख बनविणे.
थोडक्यात आकडेवारी
खालील मतांची आकडेवारी नीट अभ्यासली की समजेल.
महाराष्ट्रात विधानसभा २०२४
भाजपा - १,७२,९३,६५० (२६.७७%)
शिंदे सेना - ७९,९६,९३० (१२.३८%)
अजित पवार गट - ५८,१६,५६६ (९.०१%)
महायुतीचे एकूण मतदार - ३,११,०७,१४६ (४८.१६%)
कॉंग्रेस - ८०,२०,९२१ (१२.४२%)
उद्धव सेना - ६४,३३,०१३ (९.९६%)
शरद पवार गट - ७२,८७,७९७ (११.२८%)
महाविकास आघाडीचे एकूण मतदार - २,१७,४१,७३१ (३३.६६%)
महाराष्ट्रात लोकसभा २०२४
भाजपा - १,४९,१३,९१४(२६.१८%)
शिंदे सेना - ७३,७७,६७४ (१२.९५%)
अजित पवार गट - २०,५३,७५७ (३.६०%)
महायुतीचे एकूण मतदार - २,४३,४५,३४५ (४२.७३%)
कॉंग्रेस - ९६,४१,८५६ (१६.९२%)
उद्धव सेना - ९५,२२,७९७ (१६.७२%)
शरद पवार गट - ५८,५१,१६६ (१०.२७%)
महाविकास आघाडीचे एकूण मतदार - २,५०,१५,८१९ (४३.९१%)
यावरून लक्षात येते मतदानाचा वाढलेला टक्का महायुतीकडे झुकलाय.
लोकसभेत भाजपा महाराष्ट्रात तोंडावर आपटले होते तेव्हा भाजपाने रडीचा डाव खेळला नव्हता. अमुक गावात असं झालं, तसं झालं, ईव्हीएम मॅनेज करून हरवलंय आम्हाला वगैरे म्हणून भाजपा कोकलत नव्हते. त्यांनी ते स्विकारले आणि विधानसभेच्या तयारीसाठी कामं करु लागले.
विरोधकांना पचनी पडत नाही की महाराष्ट्रात तीनवेळा विधानसभा निवडणुकीत जनतेने झिडकारले आहे.
महाराष्ट्रात जनतेने बरोब्बर करेक्ट कार्यक्रम केला. लोकसभेत भाजपाची जिरवली. विधानसभेत महाविकास आघाडीची जिरवली.
विरोधकांनी पुढच्या तयारीला लागले पाहिजे. रडत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे नेमकं काय चुकले ते. पुढ्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. अशा निवडणुकीत स्थानिक समस्या, प्रश्न मांडले पाहिजे. उगाचंच गावपातळीवर जाऊन अंबानी अदानी गुजरात मणिपूर वगैरे राष्ट्रीय विषय चघळले तर हाती काहीही लागणार नाही. रस्ते, वीज, पाणी, वाहतूककोंडी आणि सार्वजनिक दळणवळण यावर भर द्यावा.
महाराष्ट्रात जनतेला बरोबर समजतं कोणाची काय लायकी आहे ते.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा वर सगळा राग काढला विधानसभेत महाविकास आघाडीला झटका दिला.
पेपरात नापास झालो म्हणून परिक्षा कशा बकवास असतात बोलून काहीही फायदा नाही. जनता जनार्दन नेहमीच सक्षम, योग्य आणि लायक पक्षाला किंवा उमेदवाराला निवडणुकीत मतदान करते. सगळेच मतदार पैसा घेऊन मतदान करत नाहीत की सगळेच मतदार जातपात धर्म बघून मतदान करत नाहीत.
वास्तव स्विकारा....
शहाणे व्हा...
जनतेचा विश्वास संपादन करा...
नवीन पिढीला नेतृत्व द्या...
जनमानस बदलणारे असते त्या नुसार वैचारिक मंथन करणं गरजेचं आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विचारधारेला राजकीय पाठींब्याची गरज लागते ती विचारधारा लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही. जनमानसावर प्रभाव पाडू शकत नाही.
तूर्तास एवढेच!
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण
swayambhu yanchya matashi sahamat.
उद्धव पुन्हा भाजप सोबत युती
उद्धव पुन्हा भाजप सोबत युती करतील. लोकसभेत भाजपला पाठिंबा देतील. इथे लोकसभा एवजी विधानसभा वाचावे.
युती ला बहुमत मिळूच शकत नही
मी सर्व मीडिया च्या ऑनलाईन सर्वे वर मत नोंदवल आहे आघाडी लाच जास्त लोकांनी पसंती दाखवली होती.
युती ला कसे बहुमत मिळाले.
म्हणजे गडबड आहे.
प्रयेक मराठी लोकांच्या मनात ही शंका आहे.
Bjp it सेल सोडून.
हा निकाल च लोकांच्या पचणी पडत नाही.
इतके बहुमत मिळण्या इतके ह्यांचे काहीच काम नाही.
असे असे लोक निवडून आलेत की हे कसे निवडून आले हा गंभीर प्रश्न लोकांना पडत आहे.
1500 रुपया साठी
1500 रुपया साठी राज्य समोर चे गंभीर प्रश्न न समजण्या इतक्या महाराष्ट् मधील महिला मूर्ख नाहीत.
लाडकी बहीण, 1500 रुपये महिना म्हणून महिलांनी आम्हाला निवडून दिले हा महिला च अपमान आहे.
फेर निवडणूक, मत पत्रिकेवर च झाली तर निवडणूक आयोग वर लोक विश्वास ठेवतील.
मशीन कोणत्याच वाईट नसतात त्या मशीन च वापर करणारी जी यंत्रणा असते ती प्रामाणिक असावी लागते.
Evm मशीन उत्तम च असेल पण त्या मशीन च वापर करणारी यंत्रणा गुलाम असावी अशी लोकांना शंका आहे.
आणि लोकांचे शंका निरसन करणे सरकार ची जबाबदारी आहे
महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण
Looking at this positively, now the results are more representative of the population of maharashtra. So far by creating disinterest in politics some people managed to get into government !