थोड्या दिवसात भावाचे लग्न आहे. कार्यालयात लावण्यासाठी शास्त्रीय संगीताची (वाद्य-संगीत) playlist बनवत आहे.
- उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची सनई (शास्त्र असतं ते!)
- पं हरिप्रसाद चौरासियांचा पहाडी
- पं राम नारायण यांचा मिश्र देस
- शाहिद परवेझ खान यांचा बागेश्री
पारंपरिक मध्यमवर्गीय ब्राह्मणी पद्धतीचं अगदी साधं लग्न आहे. तर तसे संगीत शोधत आहे. काही suggestions असल्यास सुचवावे. कार्यकारी मंडळ आभारी असेल!
विवाह ज्येष्ठ नागरिकांचा आहे का ?
विवाह ज्येष्ठ नागरिकांचा आहे काय ?
कारण तरुण मंडळी या playlist समोर फार काळ तग धरु शकणार नाहीत.
गुरुजी,
कार्यालयात लग्नसमारंभप्रसंगी वाजविण्यासाठी म्हणत आहेत ते; नंतर वरातीत बँडवाल्यांकडून वाजवून घेण्यासाठी नव्हे. (‘संगीत’ कार्यक्रमात वाजविण्यासाठी तर नव्हेच नव्हे.)
(या रेटने, उद्या मंगलाष्टकांकरिता भटजीऐवजी डीजे बोलावाल!)
शुभेच्छा
भावाला आणि त्याच्या उत्तमांगाला भावी जीवनासाठी शुभेच्छा.