कला

टीव्ही मालिका 'युद्ध'?

Taxonomy upgrade extras: 

'युद्ध' नावाची मालिका इथे कुणी बघतंय का? अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, तिगमांशु धुलिया, केके, नवाझुद्दिन सिद्दिकी वगैरे बडी नावं असल्यामुळे मालिका चर्चेत आहे, पण लोकांना कशी वाटली ते जाणण्यात उत्सुकता आहे.

सबटायटल्स की डबिंग?

Taxonomy upgrade extras: 

सध्या 'ऐअ' वर टारगेट प्रॅक्टिससाठी वापरल्या जाणाऱ्या 'पुणे-५२' या सिनेमामुळे या विषयावर लिहिण्याचं निमित्त झालं. यू-ट्यूबवर तो पाहात असताना अनेक ठिकाणी मला असं वाटलं की त्याची (इंग्रजी) सबटायटल्स सदोष आहेत, आणि अर्थाचा विपर्यास होतो आहे. (मला मराठी समजत असल्यामुळे सबटायटल्सकडे दुर्लक्ष करणं हा सरळ आणि सोपा मार्ग झाला असता, पण दुर्दैवाने मला ते जमत नाही.) पण 'अमुक शब्द चुकला किंवा तमुक ठिकाणी अर्थछटा ढमुक नसून कामुक आहे' इत्यादि खुसपटं काढत बसण्याचा इथे माझा हेतू नाही.

मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का? - व्यवसायाची सद्यस्थिती

Taxonomy upgrade extras: 

(संपादक : चित्रपट वितरणाच्या रूढ मार्गांनी 'पुणे - ५२'ला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे अखेर निर्मात्यांनी स्वतःच अधिकृतरीत्या चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध करून दिला. त्या निमित्तानं सुरू झालेली मराठी चित्रपटांच्या सद्यस्थितीविषयीची चर्चा 'पुणे - ५२'वरच्या धाग्यात अवांतर होऊ लागल्यामुळे वेगळी केली आहे.)

बॉटबॉय टेस्ट

Taxonomy upgrade extras: 

बॉटबॉय टेस्ट

'बेख्डेल टेस्ट' आणि त्यावरून स्त्रियांना जालावर मिळणारे झुकते माप पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. सगळ्या गोष्टी स्त्रिया आणि स्त्रीवाद्यांना सोयीच्या असणे हे आम्हांस अजिबात मंजूर नाही. या षडयंत्राविरोधात आवाज उठवणे आम्हांस अत्यावश्यक वाटते. "The Demise of Manhood" या प्रसिद्ध निबंधात, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे बहुचर्चित प्राध्यापक फिलीप जिंबार्डो म्हणतात -

"स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन मांडला" - वंदना खरेंशी संवाद

Taxonomy upgrade extras: 

वंदना खरे या 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' मराठी रंगभूमीवर आणणाऱ्या भाषांतरकार आणि दिग्दर्शिका म्हणून आपल्याला माहीत आहेत. या वर्षी, महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत. त्यातून त्यांचं अन्य काम, त्यांची मतं, मराठी रंगभूमीवर झालेला हा नवा प्रयोग याबद्दल आपल्याला काहीतरी नवीन मिळेल अशी आशा वाटते.

"बिंज् वॉचिंग" (Binge Watching)

Taxonomy upgrade extras: 

सर्वात आधी, "बिंज वॉचिंग" म्हणजे काय ? तर माझ्या समजुतीप्रमाणे, "बिंज" हा शब्द "अल्पावधीत अतिरिक्त सेवन करणं" अशा अर्थाने रूढार्थाने अस्तित्त्वात आहे. बहुतांशी तो एकेका रात्री दारूचे "खंबेच्या खंबे" पिण्याला किंवा "तुडुंब" भरून मेजवानी करण्याला वापरला जात होता/अजूनही वापरतात.

तर मग हे "बिंज वॉचिंग" म्हणजे काय तर, एखाद्या प्रदीर्घ मालिकेचे सर्वच्या सर्व भाग एकसलग बघणे. (किंवा, असं एकसलग बघून दोने-तीन सत्रांमधे त्या मालिकेचे अथपासून इतिपर्यंतचे भाग संपविणे!)

आनंद मरते नही...

Taxonomy upgrade extras: 

"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ..." हे गाणं आवडतं?
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....
कभी ये रुलाये...."
हे गाणं ऐकलत?
"कहीं दूर जब दिन ढल जाये...." ह्यातलं भावपूर्ण वातावरण भिडतं मनाला?
मग तुम्हाला "आनंद " माहिती नसणं कठीण आहे.
मुळात तुमच्यापैकी कुणी आनंद पाहिलेला नसणं हेच मुळी अवघड आहे. माझ्यासारखा एक ना एक आनंद प्रेमी तुमच्या परिचयाचा असेलच. त्यानं आग्रहानं आनंद दाखवला असेलच.
.
.
राजेश खन्नाचा "आनंद" माझा अत्यंत आवडता.
खरं तर त्यात राजेश खन्ना नाहिच. त्यात "आनंद"च आहे. राजेश खन्ना आणि आनंद हे पात्र वेगळं काढताच येणार नाही त्यात.

संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का?

Taxonomy upgrade extras: 

पार्श्वभूमी - या धाग्यावर 'इतर कलांचं लोकशाहीकरण झालं त्याप्रमाणे चित्रकलेचं झालं नाही' असा एक मुद्दा मांडला गेला होता. हे लोकशाहीकरण न होण्याची कारणं देताना शुभा गोखलेंनी सदोष शिक्षणपद्धतीचा मुद्दा मांडला होता. त्या अनुषंगाने चर्चा करताना सर्वसामान्य मराठी रसिकाची मनोभूमिका हाही मुद्दा पुढे आला. विशेषतः संगीत ऐकण्यासाठी हौशीने जाणारा मध्यमवर्ग त्याहून अगदी कमी खर्च करूनही चित्रं पाहण्यासाठी जात नाही. आणि या पारंपारिक मनोभूमिकेतून चित्रकलेच्या लोकशाहीकरणाला अडथळा आल्याचा मुद्दाही मांडला गेला.

'जोयानाचे रंग' आणि बालसाहित्य

Taxonomy upgrade extras: 

कविता महाजन यांचे 'जोयानाचे रंग' हे पुस्तक माझे आणि माझ्या पुतणीचे (आता वय ५ वर्षे) अतिशय आवडते पुस्तक आहे. तिला कैक वेळा वाचून दाखविताना जोयाना आणि तिच्यातले साम्य पाहून तिच्यासकट आम्ही आचंबित होतो. जोयाना हे नांव तर खासच. पुतणीचे नांवही 'ख्रिश्चन' वाटणारे असल्याने दोघींतले साम्य अगदी नांवापासूनच आहे :). या पुस्तकाबद्दल तुमचे खूप खूप आभार.
तुम्हांला असे कधी सांगता येईल असे वाटले नव्हते. या प्रतिक्रियेच्या निमित्तने ते साधले, त्याबद्दल तुम्हांला 'ऐसी..'वर आमंत्रित करणार्‍यांनाही धन्यवाद.

===

पाने

Subscribe to RSS - कला