आजचे दिनवैशिष्ट्य
३० ऑक्टोबर
जन्मदिवस : नाटककार रिचर्ड शेरिडन (१७५१), चित्रकार अल्फ्रेड सिसले (१८३९), लेखक पॉल व्हॅलेरी (१८७१), कवी एझ्रा पाउंड (१८८५), बंगाली बालसाहित्यकार सुकुमार राय (१८८७), सिनेदिग्दर्शक लुई माल (१९३२), शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा (१९०९), समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे (१९३०), संगीतकार त्रिलोक गुर्टू (१९५१), फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (१९६०)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ समाजसुधारक दयानंद सरस्वती (१८८३), स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय (१९२८), लेखक कॉनरॅड रिक्टर (१९६८), 'मलिका-ए-गझल' बेगम अख्तर (१९७४), विचारवंत व लेखक जोसेफ कॅम्पबेल (१९८७), सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम (१९९०), लेखक भाऊ पाध्ये (१९९६), लेखक विश्राम बेडेकर (१९९८), व्यंगचित्रकार वसंत हळबे (१९९९), तत्त्वज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ क्लोद लेव्ही-स्ट्राऊस (२००९), संगीतकार यशवंत देव (२०१८)
---
१९२५ : जॉन लोगी बेयर्डने पहिला दूरचित्रवाणी संच बनवला.
१९३८ : एच.जी. वेल्सची कादंबरी 'वॉर ऑफ द वर्ल्ड्स'चे ऑर्सन वेल्सने केलेले रूपांतर रेडिओवरून प्रसारित; मंगळवासियांची स्वारी खरेच आली असे समजून अमेरिकन जनता भयभीत.
१९४५ : भारताचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६० : मायकेल वूडरफने एडिंबा येथे पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.
- 1 view
