आमचा गिनीपिग - अल्फान्चु
डेलावेअर मध्ये घराभोवती खूप झाडी होती, वेलींच्या जाळी अन अनेक प्रकारचे पक्षी होते. या ठीकाणी एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती की वसंत ऋतुनंतर मेटींग होऊन पुढे जेव्हा त्या पक्ष्यांची पिल्ले उडायला शिकत तेव्हा खूप पिल्ले तर खालीच पडत. रॉबिनची सुंदर डोळे अन लहानशी भुवई असलेली बाळे, मैनेची बाळे, लालबुंद कार्डिनलांची फिक्कट अजुन रंग भरास न आलेली पिल्ले. त्यां पिल्लांचे चे आई-वडील पिल्लांना उडण्यास गोड आवाजात प्रोत्साहन देत. एकदा तर २ वेगवेगळ्या प्रजातीची पिल्ले एकमेकांपासून केवळ ४ फूट अंतरावर उडावयास शिकत होती. तेव्हा पक्ष्यांचा एक गंमतीशीर धूर्तपणा लक्षात आलेला होता. मी एका पिल्लाकडे पहायला लागले, की त्याचे आई वडील दुसर्या पिल्लाभोवती उडत चिवचिवाट करीत ज्यायोगे माझे लक्ष त्यांच्या बाळावरुन विचलीत होऊन अन्य पिल्लाकडे वेधले जावे. हा प्रकार मला फार गंमतीचा वाटला होता.
.
एके दिवशी घरापाशी एक मैनेचे इवलेसे पिल्लू दृष्टोत्पत्तीस पडले. त्याचे घरटे जास्त वरती असावे. कारण वरुन कुठुनतरी पडल्याने त्याच्या एका पायाला जबरदस्त मार बसून ते अधू झाले होते. आम्हाला त्याच्या जवळ जाताना पाहून अर्थातच आमच्या डोक्यावर त्याच्या आईवडीलांचा आक्रंदत भिरभिराट सुरु झाला. पण मला वाटले की सोसायटीत मुक्त विहार करणार्या बोके-मनींपासून हे पिलू काही वाचणार नाही. केव्हाच ते गपापा होऊन जाइल. शिवाय त्याला उडता येणे शक्य दिसत नव्हते कारण ते फारच लहान होते. या सर्व निष्कर्षांप्रती मी ते पिल्लू घरी न्यायचे ठरविले. त्याला पुठ्ठ्याच्या कार्टनमध्ये कापसात ठेवले व नाव ठेवले "रघु". रघुच्या काळ्या मण्यांसारख्या डोळ्यात फार गरीब, पोरकी झाक होती. पण वयाच्या अन लहान मेंदूच्या आकाराच्या मानाने बरच हुषार होतं ते. एकदाच पाण्याच्या वाटीत त्याची चोच बुडवावी लागली, त्यानंतर मात्र रघु आपण होऊन वाटीतील पाणी, दूध पिऊ लागला. खायला मात्र नेहमी भरवावे लागे कदाचित त्याला त्याचे आई-बाबा आणत त्या अळ्या आणि किडे आठवत असावेत. दुधात भिजवलेली मऊ पोळी, वरण-भात-मटार वगैरेसारख्या मऊ भाज्या व भिजवून कुस्करलेली कडधान्ये आदि त्याला पचत होते. मधे मधे तो क्षीण आवाजात किलबिल करुन त्याच्या आई-बाबांना शोधे, बोलवे Sad
.
पुढे एका शनिवारी आमचा लाँग ड्राइव्हला, न्यु जर्सीस जाण्याचा बेत ठरला. खरं तर रघु १०-१२ तास राहील का हा प्रश्नच होता. भरवून, अन वाटी (पाणी व वरणाची) कार्टनमध्ये ठेऊन आम्ही निघून गेलो.दिवसभर अधून्मधून त्याची आठवण येत होती. तो भुकेला असेल का या विचाराने कससच होत होतं. रघुने फार लळा लावला होता अन कुठेतरी त्याच्याशी हृदयाच्या तारा जुळल्या होत्या.
.
घरी आलो ते मी लगबगीने घरात शिरले. पहाते तो कार्टन टेबलवर तसाच पण रघु मात्र खाली निपचित पडला होता. माझी चाहूल लागल्यावर त्याने डोके वर केले. मात्र तेवढी हालचालही त्याच्यासाठी मुष्कील होती. मी त्या पिल्लाला ओंजळीत घेतले व चमच्याने पाणी पाजले. पाणी त्याने गटागट प्याले अर्थात तो बराच वेळ तहानलेला होता. व पाणी पिऊन त्याने खरच माझ्या डोळ्यात डोळेभरुन पाहील, अगदी स्ट्रेट डोळ्यात पाहीले. अन जी मान टाकली. अक्षरक्षः ती भेट म्हणजे कुणी जीव परलोकात पोचलेला फक्त माझ्या शेवटच्या भेटीकरता घुटमळत होता. त्याचे डोळे मी पुढे विसरुच शकले नाही. यावेळेस त्यात कारुण्य नव्हते तर एक प्रकारचा समजूतदारपणा अन ओळख होती. ख-र-च होती!!
.
प्रचंड वाईट वाटलं. मी असं काय केलं होतं ज्याकरता रघु शेवटच्या क्षणी तगुन राहीला होता? मी तर आई-वडीलांची ताटातूट करुन त्या पिल्लाला पोरकच तर केलं होतं अन मग टाकून स्वतःच्या मजेकरता न्यु जर्सीला चालती झाले होते Sad काय ऋणानुबंध असतात जे पूर्ण करण्याकरता हे लहान जीव ओंजळीत क्षणभराकरता विसावतात? आयुष्यात येतात ते चटका लावून परत कधीच न येण्याकरता. त्या दिवशी तर रडलेच पण अजुनही रघुच्या आठवणीने डोळे भरुन येतात अन कडू आवंढा दाटून येतो.मी पाहीलेला हा पहीला मृत्यु असल्याने असेल, किंवा अतिभावनाप्रधानतेमुळे असेल पण खूप दु:ख होते.
.
हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे परवाच हट्टाने मुलीने गिनीपिग आणलाय - अल्फांचु नाव आहे त्याचे - मुलीला अल्फा नाव ठेवायचे होते व मला पाँचु त्यातून ते अल्फांचु नाव जन्मास आले आहे. अल्फांचु खूप भित्रा आहे, सारखा हाईड-आऊट मध्येच लपून बसतो. शीळ घातली की एक विशिष्ठ इन्टेन्स रिस्पॉन्स देतो. हा रिस्पॉन्स भीतीचा आहे की लाडाचा ते अजुन फिगर आऊट करायचे आहे. त्याचे एक विशिष्ठ प्रकारचे गवत पिंजर्यात ठेवत असताना, अल्फांचु खूप एक्साईट होतो अन आपण जरा दूर झालो की, गवताच्या तुर्यांवर तुटून पडतो. ते खाणे त्याच्या आवडीचे आहे. २ दिवसात हातून मम्मं (भोपळी मिर्चीचे तुकडे) घ्यायला शिकला आहे ज्यातून त्याला सी व्हायटॅमिन मिळते. पेटको च्या पॅम्पलेटमध्ये अल्फांचुस भोपळी मिर्ची, भाज्या व फळे देण्यास सांगीतले आहे.
.
प्रेमात ताटातूटीची प्रचंड भीती असते. प्रेमाचे दुसरे नाव vulnerability आहे.....प्रचंड रिस्क आहे. अल्फांचु वरती प्रेम करण्यात रिस्क आहे.
ललित लेखनाचा प्रकार
आवाज लाडाचे आहेत हे कसं कळतं?
आवाज लाडाचे आहेत हे कसं कळतं? (डोळा मारत)
गेस ;)
त्याला खायला काय देता?
एक प्रकारचं गवत खातो तो. ते वॉलमार्ट मध्ये मिळतं. त्या गवताचे तुरे त्याला विशेष आवडतात, दुसरा एक पोषक खुराक आहे जिकडे तो क्वचितच वळतो.
मात्र तू गिनीपिगाळलेली दिसतेयस
आबाळ होऊ नये एवढच मागणं आहे स्वतःकडून :(
मला खरं तर पिंजर्यात प्राणी नको होते. पण मुलीने हट्ट धरला. अन आमच्याकडे गार्डन पॅचही नाही जिथे कुंपणामध्ये तो स्वच्छंद बागडू शकेल असा. :(
आणि रानपाखरे घरात कधी नाही
आणि रानपाखरे घरात कधी नाही ठेवू. मोकळ्या रानातच ती खुलतात.
+१०० स्नेहांकिता काल फ्रीवेवरुन जाताना तोच विचार करत होते की, जर मुलीची हौस फिटली तर अल्फान्चु ला त्याच्या नैसर्गिक हॅबिटाट मध्ये सोडता येईल का? - तो जगेल का? - त्याच्या नशीबी लहानपणापासून पिंजरा आहे - त्याच्या आईने त्याला जमिनीत बिळ करायला, किंवा व्हाटेव्हर सर्व्हायवल इन्स्टिन्क्ट्स शिकवल्या असतील का? इथे बर्फ पडू लागल्यावर तो कुठे जाईल?
बॅक्षी अन गोगोल कीप इट अप.
बॅक्षी अन गोगोल कीप इट अप. तुम्ही चुकून तिरकस नसलेला प्रतिसाद दिलात तर आभाळ कोसळेल. मला फरक पडत नाहीच. स्वाभिमान, वाचकांकडून अपेक्षा, बर्या कमेंटस ची अपेक्षा अशा बर्याच गोष्टींना तिलांजली देऊनच इथे येते. तेव्हा लगे रहो. हाथी चले अपनी चाल काय? गोगोल आपली तर मिपापासूनची दोस्ती आहे, ती इतक्या सहजपणे कशी तुटायची?
टेक अ चील पिल
मी जस्ट फेमस स्विचरू केला. ईतक चिडायला काय झाल?
https://en.wikipedia.org/wiki/Switcheroo
http://www.reddit.com/r/explainlikeimfive/comments/17140d/eli5_ol_reddi…
एक बरं आहे छोटासा प्राणी
एक बरं आहे छोटासा प्राणी असल्याने कुठेही तुमच्याबरोबर नेता येईल आणि सलाड वगैरेची पाने,काकडी ,गाजर वगैरे सहज मिळतेच.शिवाय पोट भरल्यावर लाडाने उँ उँ आवाज करेल तेव्हा ज्यांच्याकडे गेला आहात त्यांनाही आनंद होईल.
आताचे माहीत नाही परंतू पाळीव प्राण्यांवर पुर्वी खुप इंग्रजी सिनेमे यायचे.
होय पिंजर्यात ठेवावा लागतो
होय पिंजर्यात ठेवावा लागतो कारण सारखा हाईड आऊट मध्ये जाऊन लपून बसतो. घरी बाहेर ठेवला अन कुठे तरी दडी मारुन बसला तर काय करा? :(
बाहेर काढणं जरा अवघड आहे, पळतो खूप.
पण एकदा बाहेर काढलं अन माडीवर ठेवलं की शांत बसतो.
घाण विशेष करत नाही पण १ आठवडा-२ आठवड्यातून बेडींग बदलावे लागते. नखं कापावी लागतात कारण त्यांना चालता येत नाही. एका कोणीतरी सँड पेपर ठेवला होता वाटतं, त्यांचा अल्फांचु त्या सँड पेपरवर नख घासून इव्हन आऊट करायचा.
______
एक्साइट झाला (उदा पहील्यांदा सफरचंद चाखणे, अनेक लोक गोळा होऊन, तो सेन्टर ऑफ अटेन्शन बनणे :) ) की उड्या मारतो. ज्याला पॉपकॉर्निंग ही संज्ञा आहे. खरच लाह्या तडतडाव्या तशा उड्या मारतो :)
_____
एक विशिष्ठ तुरे वालं गवत हा त्याचा खाऊ झाला. पण वेगळं त्याच्याकरता खाणं मिळतं.
________
बाकी पहीले काही दिवस घरी जाईपर्यंत मी pangs of separation (बेचैनी) अनुभवली आहे. लगेच लळा लागतो त्याचा कारण गरीब प्राणी आहे.
____
जरुर आणा.
_____
खेळणी आवडतात. लहान मुलासारखे एक्साईट होतात. मुलीने टॉइलेट रोल वापरुन झाल्यावर जे पुठ्ठ्याचं आतलं रीळ असतं ते पिंजर्यात ठेवलं होतं बिचारा त्या साध्याशा खेळण्यावरही लट्टू झाला होता. आवाज वगैरे करुन दाखवले, उड्या मारल्या.
बाहेर काढणं जरा अवघड आहे, पळतो खूप.
बाहेर काढणं जरा अवघड आहे, पळतो खूप.
यावरच शंका आहे. खूप पळतो - म्हणजे एकदा सटकला की सशासारखा किंवा कोंबडीसारखा पकडायला अत्यंत अवघड आहे का?
बाकी या प्राण्याच्या झोपायच्या वेळा मानवी आहेत काय? मध्यरात्री किंवा भल्या पहाटे आर्त आवाजात कण्हणे वगैरे?
चावाचावी, नखे मारणे वगैरे हिंस्त्रपणा कितपत करतो?
(आम्ही भारतात मांजर पाळली होती. त्यामुळे पाळीव प्राण्यांचा माफक अनुभव आहे. अर्थात मांजरीचे काहीही बघावे लागत नाही. खायला दिले नाही तरी ती इतरत्र तोंड मारुन येतेच. )
हा पिंजर्यात पळापळ अन फेफे
हा पकडताना, पिंजर्यात पळापळ अन फेफे होते त्याची पण नीट चारी पायांना आधार देऊन बाहेर काढलं की स्वस्थ बसतो.
.
होय झोपतो दिवसा. रात्री ही झोपत असावा. सुर्योदय अन सूर्यास्ताच्या वेळी जरा अॅक्टीव्ह होतो. पण हूं की चूं नाही हं तोंडातून.
फार शांत प्राणी आहे.
.
हिंस्त्र? आर यु किडींग? अज्जिबात हिंस्त्र नाही.
.
होय मांजर मस्तच असते. बोके तर ग्रेटच.
____
चावत नाही बरं का. अनलेस तुम्ही तोंडातच बोट घालाल. ती पेटको वाली मुलगी फार चुणचुणीत अन गोड होती ती म्हणाली - तोंडात बोट घातलं तर तो काय मीही चावेन =))
गोड आहे हा
गोड आहे हा गिनीपिग.
कुरतडणार्या प्राण्यांच्या ज्या गटात हा प्राणी मोडतो त्या गटातल्या कुरतड्यांचे दात (पुढचे दोन सुळे) आजन्म सतत वाढत असतात. नैसर्गिक हॅबिटॅटमधे कठीण पदार्थ चावत राहून त्यांची लांबी नियंत्रणात ठेवली जाते. जर ते सतत कुरतडत, झिजवत राहिले नाहीत तर ते तोंडाबाहेर पुष्कळ लांब (इन थियरी, गिनिपिगच्या आकारापेक्षा लांब) वाढू शकतात. तेव्हा ते वेळीच झिजत राहण्यासाठी तुम्हाला पेटशॉपवाल्यांनी काहीतरी उपाय दिलाच असेल.
शिट्ट्या मारायला लागलाय आता.
शिट्ट्या मारायला लागलाय आता. एकदा मुलगी उशीरा ऊठली तर शिट्ट्या मारुन उठवलं (बोलावलं) कारण ती गाजर देते, खेळते.
काल मी स्वयंपाकघरात जातच होते , हा मला तिकडून पहात होता, झालं शिट्ट्या सुरु झाल्या.
अतिशय गोड आवाज आहे.
____
अतिशहाणा जी काय निर्णय घेतलात मग? :)
आणा हो बिन्धास्त आणा. जाम क्युट प्राणी आहे.
नवीन गिनीपिग
काल अजुन एक नर गिनीपिग आणला. पिवळसर, मातकट रंगाचे फार गोड, लहान पिल्लू आहे. खरं तर पेटकोवालीला विचारलं की आमच्याकडे वाढ झालेला अॅडॉल्सन्ट नर आहे, तर हे पिल्लू तो पिंजर्यात स्वीकारेल की टेरिटोरीअल होइल? ती म्हणाली की "लक्ष ठेवा. असं सांगता येत नाही. जास्त करुन २ गिनीपिग एकत्र वाढलेले बरे, अशी विजोड जोडी ठेऊ नये. पण सांगता येत नाही."
.
पण मोठा गिनीपिग नव्हता. म्हणून परत करण्याच्या बोलीवर पॉन्चु ला आणले.
.
पहील्यांदा दोघांना मांडीवर ठेवले. व एकमेकांची ओळख होऊ दिली. अल्फान्चु ने तत्काळ एक प्रकारचा आवाज करण्यास सुरुवात केली. तो एक्सायटेड दिसला. सर्च करता सापडले की ते मेटींग बिहेविअर असते. पुढे पिंजर्यात सोडल्यावरती ते पिल्लू , अल्फान्चु ला आई समजून अल्फान्चु च्या मागे मागे जात होते. तर अल्फान्चु was figuring out whether this new playmate is female. अल्फान्चु was humping on पाँन्चु.
.
आम्हाला वाटलं यांची काही मैत्री होणार नाही. पण नंतर नंतर लक्षात आलं की अल्फान्चु त्याचे हाईडाआऊट त्या पिल्लाला वापरु देतोय. मध्यरात्री बघून आले की अल्फान्चु हाइड आऊट च्या वरती (खरं तर सचिंतसा :( आणि झोप न लागल्यासारखा)बसला आहे आणि पिल्लू आत हाईड आऊट मध्ये सुखेनैव क्षोपले आहे. खरं तर त्या पिल्लाकरता एक बुटका हाईड आऊट आहे.
.
आत्ताच काही सांगता येत नाही.Hopefully both of them will gel along well.
.
हे पिल्लू (पॉन्चु) फार डामरट वाटते. अल्फान्चु पिलू असताना त्याला आणले होते तेव्हा, त्याने घाबरुन शू केली होती, तसेच ३-४ दिवस काही न खाता पीता तो फक्त हाईड आऊट मध्ये बसून होता. या पिल्लाने ना घाबरुन शू केली, ना भ्यायला. आल्यापासून मजेतच आहे.
.


खरंच आपण कुठे गेलो की त्या
खरंच आपण कुठे गेलो की त्या प्राण्यांचे काय करायचे हा मोठा प्रश्नच असतो.