हलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात
पर्वणी काळात साधु आणि जनतेची पापं, अंग, हात आणि पाय, काहींचे फक्त डोळे आणि बोटांनी डोक्यावर पाणी शिंपडण्यासाठी धरणात साठवलेले पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी नाशिककरांना ४० दिवस पुरेल एवढे होते. सध्याच्या अवर्षण स्थितीत पाणी येत नाही म्हणुन ओरड करणारे नाशिककर आणि सर्व भोळेभामटे आणि भाबडे पुण्यसंकलन सोहळ्याचा आनंद डुबकी मारून, नदीवर नुसताच फेरफटका मारून, आंघोळ करणार्यांना बघुन नेत्रसुख घेत, गर्दी मधे कोपराने धक्काबुक्की करत, हाथ कि सफाई दाखवत घेत आहेत. यात पोलिस, काॅर्पोरेट स्वयंसेवक, मेळ्यासाठी आलेल्या निधीचं तुप आपल्या पोळीवर ओढणारे कार्यसम्राट आणि त्यांचे पंटर, बगलबच्चे, हे पण आपली स्वार्थी अन् निःस्वार्थी या दोन्ही प्रकारची सेवा बहाल करत आहेत. यांसोबत काही खरेखुरे कार्यकर्ते देखिल आहेत. जे फारच हाय ब्रो, नास्तिक, (माझ्यासारखे) दांभिक किंवा गेलाबाजार विज्ञाननिष्ठ वगैरे असतील ते फक्त बातम्या आणि फोटो पाहुन बोटं मोडतायत. या सर्वांत एक गोष्ट समान आहे कि त्यातले बरेच सेल्फीवीर आहेत.
आता सगळ्या शाही स्नानांचे विधी ऊरकल्यावर पाणीटंचाई म्हणुन बोटं मोडायला परत सगळे तयार होतील. परत दुष्काळाच्या नावाने रड..
गेल्या काही दिवसातल्या गोंधळातुन एक गोष्ट नक्की जाणवतेय कि स्वतःची ओळख धर्म, जात, पक्ष, भाषा अशा वेगवेगळ्या लेबलांखाली बनवता बनवता "माणुस" ही ओळख पुसत चालली आहे.
च्यायला यांना पाहीजे म्हणुन पाणी टंचाई सोसा, भोंगे ऐका, डी.जे. भोगा, ट्राफिक जाम सोसा, मटण खाणं सोडा.. किती ते रंगित धार्मिक बलात्कार? रंगित यासाठी की कोणी भगवा, कोणी हिरवा, कोणी निळा तर कोणी शांततेचा रंग पांघरूण. सध्या या बलात्कार्यांचं प्रमाण वाढलंय आणि त्यांना राजकिय अभय पण मिळतंय.
या धार्मिक बलात्कार्यांना ३५४अ, ३७५, ३७६अ आणि जे काही आणखी कलमं असतील ते लावायला पाहीजे. पण लावणार कोण?
काहींना हे वाचुन फार गुदगुल्या होत असतील. मी किती हतबल आहे असं वाटत असेल. पण त्यांचा हा भ्रमाचा भोपळा येत्या काही दशकांत नक्कीच फुटणार आहे. कारण या सगळ्या चुझ्पाला कंटाळलेला वर्ग वाढतोय.. वेगाने.. आणि लवकरच या धार्मिक बहुसंख्यांना तो मागे टाकणार आहे.
तेव्हा प्यायला मुबलक पाणी असेलच पण डुबकी मारायला सुद्धा शुद्ध पाणी मिळेल
त्यावेळी हलाल पावभाजी आणि कांदा, आले, लसुण नसलेलं चिकन कोशर वरणभातासोबत सुखाने एकत्र नांदतील.
काहींना हे वाचुन फार
काहींना हे वाचुन फार गुदगुल्या होत असतील. मी किती हतबल आहे असं वाटत असेल. पण त्यांचा हा भ्रमाचा भोपळा येत्या काही दशकांत नक्कीच फुटणार आहे. कारण या सगळ्या चुझ्पाला कंटाळलेला वर्ग वाढतोय.. वेगाने.. आणि लवकरच या धार्मिक बहुसंख्यांना तो मागे टाकणार आहे.
तुमच्या तोंडी साखर पडो.
पण नाही, असं काहीही होणार नाही. उलट गेल्या काही दशकांत हे प्रकार वाढलेलेच दिसताहेत!
हतबलता आणि धार्मिकता यांच माझ्या मते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे!!
राजेश घासकडवी यांचे विश्लेषण
धार्मिक कट्टरता आणि कट्टरतेबरोबरचा हिंसाचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जुन्या काळी भाबडेपणाने धर्माचं पालन केल जात होतं. धर्मबुड्व्यांना बहिष्क्रुत केलं जाई. आता गोळ्या घालतात. हतबलता आणि धार्मिकता यांचा संबध आहेच.
बाकी राजेश घासकडवी यांचे धार्मिकतेबद्दलचे विश्लेषण (जरी अतिमर्यादीत पातळीवरील असले तरी) या प्रमेयाला दुजारा देणारे आहे.
होय ना !
गोसावडे फारच माजलेत ! शिवाय चाळीस दिवस पुरेल एवढे पाणी त्यांच्या अंगाने शोषून घेतले म्हणजे काय ?
आम्ही शहरी लोक एकवेळ सु-शी केली तरी फ्लश करुन एकावेळी ३ ते ६ लीटर पाण्याचा सदुपयोग करतो, धावत्या पाण्याखाली दाढी करतो तेव्हा २-४ लीटर पाणी सहज वापरतो. शेतकरी दादा तर खुपच हुशार ! उस नको लाऊ, ठिबक सिंचन वापर तर म्हणतो, शेरातली येड्यांनो तुम्हाला काय कळतं ? शेतात पाट सोडून दिला की १-२ तास झोप काढायला मोकळा.
सोसायटीत दुपारी २-६ या वेळेत वॉचमेनला पाणी बंद ठेवायला सांगीतले तर बायका वचावचा बोलतात. काल भरुन ठेवलेले पाणी शिळे झाले म्हणून ओतून देतात.
शहरी माणसाला पाऊस म्हणजे एक आपत्ती वाटते. त्याला पाऊस पडायला हवा असतो पण तो तलाव क्षेत्रात नाहीतर रात्री पडला पाहिजे आणि कामावर जाताना बंद झाला पाहिजे.
आणि हो, मला पाण्याचे महत्त्व फक्त पावसाने ओढ दिली की तेवढयापुरते कळते. पण मग मी मुंबईत राहतो याची आठवण येऊन मी निर्धास्त होतो. कारण मला माहित आहे, जर मला पाणी कमी पडले तर माझे सरकार, वाट्टेल त्या धरणातून पाणी ओढून आणेल, वेळच पडली तर आम्ही शेतकर्याचे तोंडचे पाणी पळवू पण मला पाणी मिळेलच.
काय करु मला कायमच दुसर्याच कुसळ दिसतं पण माझं स्वतःचं कुसळ दिसत नाही ? मी काय करु ??
रंगित धार्मिक बलात्कार?
रंगित धार्मिक बलात्कार? आवडला हा शब्द पण शेवटी बलात्कारच तो, त्याला आवडलं तरी कसं म्हणावं... असो.
मागच्याच शनिवारी नाशिकला जाणं झालं, ज्या दिवशी शहरात होतो त्याच्या दुसर्या दिवशी शाही-स्नान पर्वणी होती. शहरात पर्वणी ला लोक येणार म्हणून चोख व्यवस्था होती आदल्या दिवसापासून.
मनातले विचार>
./मनातले विचार>
पण असो....हे असले विचार मनातच केलेलेच बरे. असे अधार्मिक 'तोकडे' विचार खुलेआम केले तर आपल्यावर ही धार्मिक बलात्कार व्हायचा, 'तोकडे' कपडे घातल्यावर होतो तसा.