Skip to main content

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास
.

जेथे स्त्रीच्या शरीराची आदर्श मोजमापे जाहीरपणे उगाळली जातात, आदर्श (ideal) सुंदर स्त्रीच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाचे उदा. बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे, थोडेसे पुढे वाकलेले खांदे असे वर्णन ठरवले जाते. शयनेषु रंभा, अमुक अमुकेषु दासी अशा तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात.

मात्र यासाठी फक्त पुरुषच जबाबदार आहेत का याचाही विचार केला पाहिजे.

अनेक जाहीर समारंभांमध्ये बापे थ्रीपिस सूट मध्ये दिसतात व तथाकथित सेलिब्रिटी स्त्रिया उतु जाईल एवढे अंगप्रदर्शन करण्यात आघाडीवर असतात. एवढेच नव्हे तर अनेक आधुनिक आया वस्त्रप्रावरणाच्या बाबतीत आपल्या मुलींशी स्पर्धा करताना दिसत असतात. स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बाबतीत कमीत कमी वस्त्रे परिधान करणे हेच जरी एकमेव कारण नसले, तरी त्यातून निर्माण होणारी अनिर्बंधतेची संस्कृती जबाबदार असते हे नजरेआड करून चालणार नाही. मुले बहकली आहेत असे आपण म्हणतो, तसे मुलींचेही आदर्श भ्रष्ट झालेले आहेत हे वास्तव का नाकारावे?

काळानुरूप स्त्रियांचा पेहराव बदलत गेला असे सांगितले जाते. तो जाणारच. विविध संस्कृतींचा एकमेकांवर परिणाम होणारच. पण इतिहासाकडे पाहून आजचे निष्कर्ष काढणे योग्य नाही. आपण कितीतरी गोष्टी इतिहासाच्या विरूद्ध करतो. याच बाबतीत कोणी काही करू शकत नाही असे म्हणत पळवाट काढू नये. कारण कधी नव्हे ते जग इतके जवळ आले आहे. दोष कपडे घालणा-याचा नव्हे तर पाहणा-याचा असतो, किंवा बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.

वरील युक्तीवादाला मला आठवते त्याप्रमाणे माझ्या एका पोस्टवरील कमेंटमधून स्त्रीवर्गातीलच कोणीतरी सडेतोड उत्तर दिले होते. ती कमेंट अशी की तोकडे वा कामुक वस्त्रपरिधान करणा-या स्त्रीवरच बलात्कार होईल असे समजण्याचे कारण नाही. अशा स्त्रीच्या अशा देहाकडे पाहणा-या व्यक्तीच्या वासनेची बळी कोणी वेगळीच परिचयातील, जवळची, अनोळखी अशी कोणतीही मुलगी/स्त्री व केव्हाही होऊ शकते. तेव्हा सनी लियोनेसारख्या व्यक्तींना केवळ त्याच उद्देशाने लोकांसमोर आणण्यामुळे लोक चेकाळण्याची व त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारांमध्ये वाढ होण्याचीच शक्यता असते. निव्वळ देहप्रदर्शनाने आपल्यासमोर वर्षानुवर्षे तग धरणा-या व जितके पैसे अधिक तेवढे अधिक कपडे कमी करणा-या सिनेनट्यांकडूनही वेगळे काही घडत नसते हे लक्षात घ्यायला हवे. एरवी चित्रपटातील दृश्याची मागणी असते असा लटका युक्तिवाद करणा-या अशा 'अभिनेत्री' (?) एरवी विविध मासिकांना व वर्तमानपत्रांमध्ये छापु देण्यासाठी उत्तान-कमी कपड्यांमधील छायाचित्रे का घेऊ देतात? हा एक प्रकारचा शरीरविक्रयाचा प्रकार नाही का? मग अशा व्यक्तींविरूद्ध कोणी ओरड केली की त्यांना संस्कृतीरक्षक म्हणून हिणवायचे. खरे तर अशा स्त्रियांच्या पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी त्या असे वागतात व त्याला ब-याचदा बळी पडतात समाजातल्या सामान्य मुली-स्त्रिया. पूर्वीपासूनच ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, पण आता त्यांचा इतका मारा होत आहे की मुला-मुलींचे लहानपण फारच मर्यादित झालेले आहे हे मी आधीही मांडले होते. परंतु आपण या गोष्टी इतक्या गृहित धरल्या आहेत की त्यामुळे हा धोका किती प्रमाणात वाढला आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. उलट वर म्हटल्याप्रमाणे अनिर्बंधतेचा पुरस्कार व आग्रह धरणारेच पुढे आहेत. आनि मग सोयीप्रमाणे व सवडीप्रमाणे मुलांचे बालपण हरवत चालले आहे हे आपणच म्हणायचे.

स्त्रीशरीराचे नको तेवढे प्रदर्शन या विषयावर स्त्रियांची मोठी चळवळ का उभी रहात नाही? आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातीत ज्यापद्धतीने स्त्रियांचा वापर केला जातो त्यावर निव्वळ चवीपुरते बोलायचे. कृती मात्र काही करायची नाही. काही आठवड्यांपूर्वी सॅनिटरी नॅपकीन जेथे बसवतात तेथे पिसासारखी वस्तु जाऊन बसते असे दाखवणारी एक 'कल्पक' जाहिरात दाखवली गेली तेही चालवून घेतले गेले. काही दिवसात वास्तवतेच्या आग्रहापोटी निळ्याचे लाल झाले तरी आश्चर्य वाटायला नको. हे थोडे विषयांतर झाले असे वाटले, तरी जागरूक स्त्रियांची या समाजात फार कमतरता आहे हे वास्तव विसरायला नको.

मोबाईल फोनच्या कंपन्या सनि लियोने, शेर्लिन चोप्रा यांच्यासारख्याचे फोटो त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात, तेव्हा हे फोटो कोणाच्या म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांच्या हातात पडत असतील याबद्दल कोणाला काळजी वाटते का? परफ्युम स्प्रेसारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये एका पुरूषाच्या मागे अनेक तरूणी बेभान होऊन जात आहेत अशा दृश्यांमधून कोणत्यामानसिकतेला खतपाणी घातले जाते या व अशा गोष्टींबाबत कोणी आवाज उठवलेला पाहण्यात आलेले आहे का? अशी

एकीकडे ही वस्तुस्थिती तर दुसरीकडे भगवी वस्त्रे लेयलेल्यांच्या समाजशुचितेच्या व योनीशुचितेच्या भलत्याच टोकाच्या कल्पना. अर्थात त्या मात्र सर्वांनीच हाणून पाडायच्या हे नेहमीचे ठरलेले.

स्त्रीच स्त्रीची वैरीण असे म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्त्रीही स्त्रीची वैरीण आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.

मला सांगा, उत्तानतेचे जाहिर प्रदर्शन करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरी याबाबातचा शेवटचा गुन्हा केव्हा नोंदवला गेला व त्याबद्दल कोणाला शेवटची शिक्षा झाली?

स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचार करणार्‍यांच्या मानसिकतेचे समर्थन करण्याचा येथे अजिबात हेतु नाही. पण समाजात जे चालले आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, या समस्येच्या मुळाशी जी कारणे आहेत त्यांच्यापर्यंत न पोहोचता असे अत्याचार हा जो अंतिम परिणाम दिसतो आहे व वरचेवर दिसतो आहे आहे, त्याविरूद्ध दिशाहीन आरडाओरडा करण्यात समाधान मानणार आहोत का हे आपणच ठरवायचे आहे.

परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा निर्भया ज्योती सिंगच्या अल्पवयीन गुन्हेगाराला थोड्याशा शिक्षेनंतर सोडून देण्याबद्दल तावातावाने बोलत होत्या. कोणते व कसे कपडे घालावेत हे ठरवणे हा स्त्रिचाच हक्क आहे असे म्हणत आयोगाच्या त्यांच्या आधीच्या अध्यक्षाच पेहरावाबाबतच्या अशा अनिर्बंधतेचे समर्थन करत होत्या, याची नवीन अध्यक्षांना कल्पना आहे काय? तेव्हा वर मांडलेली दुसरी बाजुही त्यांच्यापर्यंत कधी पोहोचते, तिचे गांभिर्य त्यांच्या कधी लक्षात येते हे पाहू. त्यांच्याव्यतिरिक्त स्त्रियावरील अत्याचाराला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी काही अशा वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या कारणांकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देते का ते पाहू.

स्त्रीदेहाचे माध्यमांमधील ओंगळ व अनवश्यक दर्शन याविरूद्ध काही दमदार पावले उचलली गेली तरीदेखील या दिशेने काही योग्य होत आहे असे समजता येईल. मी वर म्हटले तसे लैंगिक अत्याचारांना आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र येथे उहापोह केलेली कारणे मुळात त्यास जबाबदार नाहीच असे म्हणत हे वास्तव नाकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, त्यामुळे कोणाचे कसे भले होणार आहे हा प्रश्न आहे.

नाकी नऊ Sat, 26/12/2015 - 10:31

राकु, आता तुमचं काही खरं नाही. मंडळी धू धू धूणार तुम्हाला. गेला बाजार दारावर निषेध मोर्चा तरी येणारच. पळा, पळा.... :P

सुचिता Sat, 26/12/2015 - 12:10

१००% सहमत.
अतिशय योग्य मुद्दा आहे. लहान मुला वर होणारा परीणाम फार च चिन्ताजनक आहे.
पण परीस्थीती निराशाजनक आहे.

सुचिता Sat, 26/12/2015 - 12:10

१००% सहमत.
अतिशय योग्य मुद्दा आहे. लहान मुला वर होणारा परीणाम फार च चिन्ताजनक आहे.
पण परीस्थीती निराशाजनक आहे.

सुचिता Sat, 26/12/2015 - 12:10

१००% सहमत.
अतिशय योग्य मुद्दा आहे. लहान मुला वर होणारा परीणाम फार च चिन्ताजनक आहे.
पण परीस्थीती निराशाजनक आहे.

चिंतातुर जंतू Sat, 26/12/2015 - 15:05

>> समाजात जे चालले आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, या समस्येच्या मुळाशी जी कारणे आहेत त्यांच्यापर्यंत न पोहोचता असे अत्याचार हा जो अंतिम परिणाम दिसतो आहे व वरचेवर दिसतो आहे आहे, त्याविरूद्ध दिशाहीन आरडाओरडा करण्यात समाधान मानणार आहोत का हे आपणच ठरवायचे आहे.

खूपच उदात्त हेतूनं केलेलं लिखाण. स्त्रिया अंगप्रदर्शन करतात; झालंच तर जाहिराती, सिनेमे, फोटो वगैरे माध्यमांतून पुरुषांना भूल घातली जाते. असं सगळं होतं म्हणून अखेर नाईलाजास्तव किंवा अपघातानं वगैरे पुरुष बलात्कार वगैरे करतात - म्हणजे त्या कॉईटस अ‍ॅक्सिडेंटसच्या केससारखंच. बिच्चारे पुरुष शेवटी शरीरधर्माचे आणि परिस्थितीचे बळी होतात. काय वाईट दिवस आलेत त्यांना नाही? आज या नाताळच्या शुभ आणि पवित्र काळात आपण ख्रिस्ताचं वचन आठवू या की देवा त्यांना माफ कर कारण ते काय करताहेत ते त्यांचं त्यांना कळत नाही. ("Father, forgive them; for they do not know what they are doing.")

राजेश कुलकर्णी Sat, 26/12/2015 - 15:36

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही जो भाग कोट केला आहेत, त्याच्या बरोबर अाधीचेच वाक्य त्यातून गाळलेले आहे. असे का केलेत? तुम्हालाच माहित.'बिच्चारे पुरूष', वगैरे.

मेघना भुस्कुटे Sat, 26/12/2015 - 16:52

तुम्ही काहीशा गोंधळलेल्या परिस्थितीत आहात, असं हे वाचून वाटलं.

काही प्रश्नही पडले.

समजा - मला माझ्या अंगाचं प्रदर्शन करण्यात रस आहे. प्रदर्शन म्हणजे शोषण असं मला वाटत नाही. तर - मी प्रदर्शन करीन, मात्र माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यावर कुणीही आक्रमण करणार नाही, असा समाज अस्तित्वात असावा - हे इतकं स्वप्नवत आहे का? जर ते स्वप्नवत असेल, तर ते तसं का आहे? याचा अर्थ अनावृत देह पाहिला रे पाहिला की आमचा आमच्या लैंगिक इच्छांवरचा ताबा संपून आम्ही जंगलातले प्राणी होतो, असं समाजातल्या काही लोकांचं म्हणणं आहे का? तसं असेल, तर त्यात काही मूलभूत चुकीचं नाही का? त्यावर काही काम करायचं सोडून अनावृत देह झाकायला धावणं आणि बुरख्यात बाईला दडवणार्‍या धर्मावर टीका करणं किंवा त्या धर्माच्या लोकांना काहीएक सामाजिक नियम शिकवायला जाणं या दोन्हीमध्ये जी विसंगती आहे, ती समजून घेण्याला नक्की किती बुद्ध्यांकाची आणि जबाबदारपणाची गरज असते? ती समजता आली, तर ती दूर करावी असं वाटण्यासाठी जी सदसद्विवेकबुद्धी लागते ती आपण विकून आलो आहोत का? तिचे किती पैसे मिळतात? त्यातून किती वार कापड खरेदी करता येतं आणि त्यात काय काय झाकता येतं? वगैरे वगैरे.

नितिन थत्ते Sat, 26/12/2015 - 19:02

In reply to by मेघना भुस्कुटे

डिस्क्लेमर: अंगप्रदर्शनामुळे बलात्कार होतात (अशा महिला बलात्कार ओढवून घेतात) या थिअरीचा मी ग्राहक/समर्थक नाही.

--------------------------------------
>>याचा अर्थ अनावृत देह पाहिला रे पाहिला की आमचा आमच्या लैंगिक इच्छांवरचा ताबा संपून आम्ही जंगलातले प्राणी होतो, असं समाजातल्या काही लोकांचं म्हणणं आहे का? तसं असेल, तर त्यात काही मूलभूत चुकीचं नाही का?>>

का बरं !! स्त्रीचा अनावृत्त देह पाहिल्यावर पुरुषाला लैंगिक इच्छा न होणे हे अनैसर्गिक नाही? जंगलातले प्राणी असोत की समाजातले. जनरली स्त्रीचा अनावृत देह पाहिल्यावर नैसर्गिकपणे पुरुषांनी तिला 'वू' करणे आणि त्यातल्या आवडेल त्या पुरुषाशी तिने रत होणे हे नैसर्गिक असायला हवे ना? . फीलिन्ग कन्फ्यूज्ड.

मेघना भुस्कुटे Sat, 26/12/2015 - 19:17

In reply to by नितिन थत्ते

इच्छा होण्याबाबत असहमती वा धिक्कार नाही. इच्छा झाल्यावर दुसऱ्या व्यक्तीची संमती नसताना आक्रमण करण्याला विरोध आहे.

गवि Sat, 26/12/2015 - 19:28

In reply to by मेघना भुस्कुटे

+१

नेमके.

(संमती नसताना आक्रमण निखालस दुरितच. त्या बाबतीत सहमती नोंदवून ते क्लोज करुन दुसरा मुद्दा..

तशी संमती आहे किॅवा नाही यात स्पष्टता आणू पाहणार्यावरही इतर तुलनेत कमी सौम्य कलमं लावून आत टाकतातच. उदा. फक्त संमतीनेच पुढचं पाऊल टाकायचंय, तर ते टाकूया का? असं रँडम पुरुषाने विचारण्याला किती स्त्रिया ऑफेन्स / हरॅशमेंट / चळ मानणार नाहीत?)

मेघना भुस्कुटे Sat, 26/12/2015 - 19:34

In reply to by गवि

माझ्या मते त्यात काही छळ नाही, जोवर personal space वर अतिक्रमण होत नाही तोवर. आणि माझ्या माहितीनुसार शुद्ध आणि केवळ विचारणा हा कायद्यानेही छळ मानला जात नाही.

आदूबाळ Sat, 26/12/2015 - 22:40

In reply to by मेघना भुस्कुटे

टु समराईज:

"बाई, वाड्यावर या" = गुन्हा
"बाई, वाड्यावर येता का?" = नो गुन्हा

(ह घ्या. उगाच वात्रटपणा...)

मेघना भुस्कुटे Sat, 26/12/2015 - 23:37

In reply to by आदूबाळ

हो! 'बाई, वाड्यावर येता का?' यात परवानगी घेणं आहे. सत्ता गाजवणं नाही, गृहीत धरणं नाही, भोगवस्तू समजणं नाही. सो, प्रॉब्लेम इल्ले. उलट 'पाटील, तसल्या गमतीत गम्य नाही. तुमच्यासोबत तर नाहीच नाही. पण कधी वाटलं तर सांगेन. याचा अर्थ तुमचं काम करीनच असा मात्र घेऊ नका.' असं स्वच्छ, विनाभीती सांगता येईल आणि त्याचा परिणाम म्हणून बाईला कोणत्याही चिरडणीकरणाला सामोरं जाण्याची सुतराम शक्यता नसेल, असा दिवस आला तर हवाच आहे!

Nile Wed, 06/01/2016 - 23:34

In reply to by नितिन थत्ते

नागडं वावरणं हे सुद्धा नैसर्गिक आहे, पण म्हणून तुम्ही वावरता का? (हा र्हेटॉरिकल प्रश्न आहे. ऐसीवरील नमुने पहाता एखादा हो ही म्हणायचा!) 'शिष्टाचार' हा मानवी गुणधर्म आहे, कोणते शिष्टाचार तुम्ही पाळता, पाळत नाही, ते तुम्हाला कळतात, कळत नाहीत यावरून तुम्ही किती मॅनरलेस-असंस्कृत वगैरे आहात हे ठरते.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 00:09

In reply to by मेघना भुस्कुटे

"प्रदर्शन म्हणजे शोषण असं मला वाटत नाही. तर - मी प्रदर्शन करीन, मात्र माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यावर कुणीही आक्रमण करणार नाही, असा समाज अस्तित्वात असावा "

याबाबतीत काही कायदाही आहे. तो तपासून पाहता येईल. त्याप्रमाणे कपडे घालण्यातले किंवा कमी घालण्यातले अनिर्बंध स्वातंत्र्य म्हणजे काय असते किंवा तसे असते का हेदेखील लक्षात यावे.

मेघना भुस्कुटे Sun, 27/12/2015 - 08:06

In reply to by राजेश कुलकर्णी

मला कायदा माहीत आहे. सध्या जे प्रदर्शन तुम्हांला खटकत आहे त्यातलं कोणतं बेकायदा आहे त्याचे तपशील मिळाले तर बरं होईल.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 15:08

In reply to by मेघना भुस्कुटे

कायद्याचा उल्लेख मी कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू (हक्क व कर्तव्य) असतात या अनुषंगाने केला होता. स्वातंत्र्याचा उोउदो करताना त्याबाबतच्या कर्तव्याची सीमा ओलांडली की कायदाही लागू होतो या अर्थाने. स्त्रीवरील अत्याचाराला पुरूषी मानसिकताच (केवळ) जबाबदार आहे (ती जबाबदार आहे यात वाद नाही) असे म्हणताना कपडे घालण्याच्या अनिर्बंध स्वातंतर्याचाच केवळ पुरस्कार केला जातो हे तुम्हाला पटते काय ते पहा.
बाकी ही पोस्ट केवळ तोकड्या कपड्यांपुरती नाही हेही तुमच्या लक्षात यावे.
येथे जुन्या अभ्यासांची उदाहरणे देऊन (तुम्ही नव्हे) जणू काही मला त्या गोष्टी माहित नाहीत असे समजून या मुद्द्यांमध्ये नवीन काही नाही हे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मेघना भुस्कुटे Sun, 27/12/2015 - 15:28

In reply to by राजेश कुलकर्णी

परत परत तेच तेच गोल गोल बोलण्यात मला स्वारस्य नाही. जर बेकायदा असं कोणतंही कृत्य होत नसेल, तर तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे? उदाहरण देऊन सांगितलंत, तर चर्चा शक्य आहे. एरवी नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/12/2015 - 21:13

अनभ्यस्त, बिनधास्त आणि बेताल विधानांमधून बरीच करमणूक झाली.

या विधानांमागे एकमेव कारण असावं असं वाटतं. राकु म्हणतात म्हणजे खरंच असणार.

स्त्रियांवर होणा-या अत्याचारांच्या बाबतीत कमीत कमी वस्त्रे परिधान करणे हेच जरी एकमेव कारण नसले...

(स्त्रियांवर नक्की काय अत्याचार कमी कपडे घालण्यामुळे होतात आणि त्यात कमी कपड्यांची जबाबदारी काय/किती?

... अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.

इतिहासाकडे पाहून आजचे निष्कर्ष काढणे योग्य नाही.

याच बाबतीत कोणी काही करू शकत नाही असे म्हणत पळवाट काढू नये

(ही पळवाट का, आणि याच बाबतीत काय घोडं मारलंय?)

स्त्रीच स्त्रीची वैरीण असे म्हणण्यापेक्षा आजच्या जगात स्त्रीही स्त्रीची वैरीण आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.

अशी चिकार विधानं काढता येतील... पण कंटाळा आला. कमी कपडे, उत्तानता म्हणजे नक्की काय हे राकु सांगत नाहीत. सानिया मिर्झा स्कर्ट/स्कॉर्ट्स घालून खेळते म्हणून तिच्याविरोधात फतवा काढणाऱ्या इमामांपेक्षा राकु एक पायरी वरचे. कारण मी कमी कपडे घालून फिरते म्हणून मला नावं ठेवून, इतर स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांची जबाबदारी माझ्या अंगावर ढकलून ते थांबले, फतवा काढला नाही, माझ्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली नाही, वगैरे.

छातीठोकपणे अशी विधानं करण्यासाठी "मर्दानगी" गरजेची ... आपल्याकडे नाय ब्वॉ तसं काय! आपल्याकडे फक्त शॉर्ट्स आणि स्पगेटी टॉप्स हेत.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 00:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यादी केलेली विधाने मूळ संदर्भाच्या विधानांपासून वेगळी काढून कोत करून त्यांना अनभ्यस्त, बिनधास्त आणि बेताल म्हणणे खरोखर दुर्दैवी आहे. मी खेळाडुंच्या कपड्याबद्दल बोललेलो नाही, तरी तुम्ही तो मुद्दा काढावा हे आश्चर्यकारक आहे.
कमी कपडे म्हणजे काय हे समजून घ्यायचे असल्यास याबाबतीत एक कायदा आहे. तो समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल. तेही करायचे नसल्यास व मला काय म्हणायचे आहे समजत नसल्यास कमी कपड्यांची तुमची कल्पना काय ते तुम्ही सांगू शकला असतात, तेही केलेली दिसत नाही.
कपडे घालण्यामधले किंवा कमी कपडे घालण्याबाबतचे अनिर्बंध स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या लेखी काय आहे किंवा कोठपर्यंत आहे तेदेखील कळू देत.
येथे उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ वस्त्रपरिधानापुरतेच नाहीत. विविध माध्यमांमधून होणारे स्त्रीचे अनावश्यक अंगप्रदर्शन व त्याचे परिणाम हाही मुद्दा आहे. कदाचित तुमच्या लेखी त्याचे मह्त्त्व नसावेच.
अत्याचारांना फक्त तशी मानसिकता असणारे पुरूषच पूर्णपणे जबाबदार आहेत, स्त्रियांची मग त्या जाहिर देहप्रदर्शनावरच पोट भरणा-या असोत, रस्त्यावर कमी कपडे घालून जाणा-या असोत किंवा रस्त्यावर अंगप्रदर्शन न करणारे कपडे घालणा-या असोत (यात सगळे प्रकार आले असावेत) त्यांची याबाबतीत काही जबाबदारी नाहीच अशी समजुत असणा-यांपैकी तुम्ही दिसताहात. असे बोलणा-यांविरूद्ध खरोखरच काही बोलता येत नाही.
इतर अनेक गोष्टी आहेत. पण थांबतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/12/2015 - 00:31

In reply to by राजेश कुलकर्णी

कमी कपड्यांबद्दल माझी काहीही कल्पना नाही. फारतर शरीराचा किती भाग झाकला याचं प्रमाण काढता येईल, पण मी त्याबद्दल लोकांना जोखत नाही.
सुरुवात तुम्ही केलीत, धागा तुम्ही काढलात तर जबाबदारी तुमची आहे. लढायला उतरल्यावर, अंगावरचं उतरवून असे पळून जाऊ नका. हे असं अंगावरचं उतरवणं म्हणजे लाक्षाणिक कमी कपडे. माझा त्याला विरोध आहे.

पण तुमचं अर्धवट मांडणी करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्यही मान्य आहे. त्याकडे लक्ष देणं/न देणं माझ्या हातात आहे.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 15:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही तुम्हाला हवी तेवढीच वाक्ये त्यांचा संदर्भ गाळून वेगळी काढता. त्यावरून 'अनभ्यस्त, बिनधास्त आणि बेताल विधानांमधून बरीच करमणूक झाली' असे म्हणता. त्याबद्दल मी लिहिले तर तुम्ही तुमची ज्या बेताल वाक्यांमुळे करमणूक झाली म्हणता, त्याचा मूळ संदर्भ पहात काही उत्तर देत नाही. उलट मीच पळून जातोय असे म्हणता. कमाल आहे की नाही?
स्त्रियांवरील अत्याचारामागे जी पुरूषी मानसिकता जबाबदार आहे, तिला खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरणारे अनेक मुद्दे मांडलेले आहेत. सगळे नाहीत. तरीही केवळ तोकडे कपडे घालण्याच्याच मुद्द्याबद्दल येथे बोलले जात आहे. इतक्या अभ्यासपूर्ण कमेंट्सवर मी काय बोलणार?

ऋषिकेश Sun, 27/12/2015 - 11:28

In reply to by राजेश कुलकर्णी

कपडे घालण्यामधले किंवा कमी कपडे घालण्याबाबतचे अनिर्बंध स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या लेखी काय आहे किंवा कोठपर्यंत आहे तेदेखील कळू देत.

समोर आलेली व्यक्ती ( स्त्री वा पुरूष) पूर्ण नग्नावस्थेत जरी असली (आणि ती व्यक्ती पती वा पत्नी जरी असली) तरी त्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय त्याच्याशी संभोग वा कोणताही लैंगिक दुराचार केला जाऊ नये असे माझे मत आहे!

अरविंद कोल्हटकर Sat, 26/12/2015 - 23:35

हा धागा आणि तशाच प्रकारचे हिंदू-मुस्लिम, मोदीभक्त, श्लील-अश्लील, अंधश्रद्धा, आस्तिक-नास्तिक हे नेहमीचे चावून चोथा झालेले धागे आहेत आणि त्यात काही भर टाकून कोणाची मते बदलावीत अथवा बदलू शकतात असे वाटत नाही. म्हणून असले धागे मी - आणि माझ्यासारखे अन्य बरेच - वाचतच नाहीत आणि त्यावर काही प्रतिक्रियाहि देत नाहीत. पण अलीकडे असले तण येथे जरा जादाच माजते आहे आणि 'ऐसीअक्षरे'ची वैचारिक पातळी घसरत चालली आहे असे वाटणारा एक जुना सदस्य म्हणून माझी काळजी नोंदवण्यासाठी हे लिहीत आहे. पटले तर पहा नाहीतर सोडून द्या...

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 15:29

In reply to by अरविंद कोल्हटकर

कोल्हटकरसाहेब,
चावूनचावुन चोथा झालेले विषय म्हणताहात. येथे ज्या प्रकारच्या कमेंट येताना दिसतात त्यावरून त्या चर्चेचा दर्जा काय होता वगैरेमध्ये मी जात नाही.
तुम्ही 'जुना' सदस्य असल्याचा दाखला मला वेगळ्या कारणासाठी देन्यात आलेला आहे. त्याबद्दल व येथे "अलीकडे असले तण येथे जरा जादाच माजते आहे आणि 'ऐसीअक्षरे'ची वैचारिक पातळी घसरत चालली आहे" असे जे तुम्ही म्हटले आहेत त्याबद्दल सांगतो, की तुम्हे जुने असल्याचा आदर माझ्यासारख्या नव्या सदस्यांना तुमच्या लेखांमधून व कमेंट्समधून दिसू देत. तुमच्या या कमेंटवरून तरी तसे दिसत नाही.
तसेच इतरांच्याही सदस्य असण्याचा आदर करायला शिका. व 'ऐसी अक्षरे' च्या श्रेष्ठत्वाचे अवडंबर माजवू नका. जे श्रेष्ठत्व आहे ते माझ्यासारख्या नव्या सदस्यांना इथल्या अनुभवावरून दिसेलच.
त्यातल्या जाणवणा-या काही चांगल्या गोष्टी मी संपादक मंडळाबरोबर शेअर केलेल्याच आहेत.

राजेश घासकडवी Sun, 27/12/2015 - 19:03

In reply to by राजेश कुलकर्णी

की तुम्हे जुने असल्याचा आदर माझ्यासारख्या नव्या सदस्यांना तुमच्या लेखांमधून व कमेंट्समधून दिसू देत.

अरविंद कोल्हटकर यांचं सर्व लिखाण इथे वाचायला मिळेल. विचारपूर्ण, अभ्यासपूर्ण लिखाण म्हणजे काय याचा परिपाक आहे. तेव्हा त्यांनी काहीतरी नवीन लिहून नव्या सदस्यांना आदर दाखवावा ही अपेक्षा योग्य नाही. ते दररोज लिखाण टाकत नाहीत कारण महत्त्वाच्या विषयांवर पुरेसा अभ्यास केल्याशिवाय लिखाण करणं त्यांच्या प्रकृतीत बसत नाही. नव्या सदस्यांना त्यांच्या लिखाणातून काही शिकायला मिळेल अशी आशा आहे.

(वाचक) राजेश घासकडवी

त्यातल्या जाणवणा-या काही चांगल्या गोष्टी मी संपादक मंडळाबरोबर शेअर केलेल्याच आहेत.

व्यक्तिगत निरोपांतून होणारी चर्चा जाहीर करणं योग्य नाही. म्हणून इथे उत्तर द्यावं की नाही असा प्रश्न पडलेला होता. मात्र तुम्हीच या चर्चेचा उल्लेख केल्यामुळे काही गैरसमज दूर करणं क्रमप्राप्त आहे. काहीही उद्धृत न करता सांगतो. तुम्ही संपादकांशी केलेल्या चर्चेतला ९० टक्के भाग तरी तुमचे आठदहा ओळींचे धागे 'मनात येणारे छोटेमोठे प्रश्न व विचार' या धाग्यावर हलवणं ही संपादकांची कशी चूक आहे हे सांगण्यात खर्च केलेला आहे. त्यात संपादकांनाच हे ठरवण्याचे अधिकार आहेत याबद्दलही तक्रार आहे. तसंच संपादकांना ऐसी आणि फेसबुक हे कसे सारखेच आहेत हे समजत नाही असंही सांगितलेलं आहे. बरंच लिहिता येईल पण थांबतो.

पुन्हा एकदा, अरविंद कोल्हटकरांचे धागे वाचून पाहा, म्हणजे ते धागे दुसरीकडे हलवले का नाहीत हे समजेल. मान्यवर ऐसीकरांना नाक वर करून सल्ले देण्याआधी ऐसीचे दिवाळी अंक वाचा, ऐसीचा भा. रा. भागवत विशेषांक वाचा म्हणजे दर्जाविषयी काय अलिखित अपेक्षा वाचकांच्या आहेत हेही समजेल.

(संपादक) राजेश घासकडवी

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 19:29

In reply to by राजेश घासकडवी

'तुम्हे जुने असल्याचा आदर माझ्यासारख्या नव्या सदस्यांना तुमच्या लेखांमधून व कमेंट्समधून दिसू देत.' यात मी कोल्हटकराबद्दल कोठेही अनादर व्यक्त केलेला नाही. मी स्वत:हून उगाचच कोणाची टवाळकी करत नाही. तेव्हा याबाबत खात्री बाळगावी.
तुम्ही दुस-या मुद्द्याचा उल्लेख केला नाहीत. त्यांनी 'अलीकडे असले तण येथे जरा जादाच माजते आहे आणि 'ऐसीअक्षरे'ची वैचारिक पातळी घसरत चालली आह' हे जे म्हटले आहे त्यावरील माझ्या प्रतिक्रियेबाबत मात्र मी ठाम आहे.
आणि 'नाक वर करून सल्ला देणे' म्हणजे काय? ते मोठे असतील, म्हणून त्यांना इतरांना असे कच-यात काढण्याचा अधिकार मिळतो की काय? आणि तुम्हीदेखील त्यांचीच री ओढत आहात. कमाल आहे.
आणि मला वाटते नवे सदस्य आणि जुने सदस्य हा प्रकार बंद करावा. नव्या सदस्यांना मान नसतो, जुने सदस्य पीएचडीधारक व नवे सदस्य बालवाडीतले असा एक समज झालेला दिसतो. तो ताबडतोब मनातून काढून टाकावा. हा एक प्रकारे भेदभाव करण्याचा प्रकार आहे हे विसरू नये. जुन्या सदस्यांच्या लेखनाबद्दल आदर असू शकतो, ते जुने आहेत म्हणून नाही. तसेच त्यांना मखरात बसवायचे तर जरूर बसवा, पण मग त्यांनी माझ्यासारख्या खरडणा-याच्या पातळीवर येऊन कमेंटही करू नये. केली तर जे उत्तर दिले आहे ते सहन करण्याची तयारी ठेवावी. बरे त्यात मी काही अनुद्गारही काढलेले नाहीत. तरीही ते तुम्हाला खुपते. तण माजले आहे म्हणजे काय? शरम वाटत नाही असे लिहायला? एक मुद्दा चर्चिला गेलेला असेल तर त्यावर पुन्हा लिहायला बंदी आहे काय? शिवाय वेचारिक पातळी घसरते आहे ही आगाऊपणाची टिप्पणी कशासाठी? हे करण्याबद्दल तुम्ही त्यांना काही ऐकवायचे सोडून वर मलाच 'नाक वर करून' वगैरे म्हणताय याचा अर्थ तुम्हाला कळतो ना?

राजेश घासकडवी Sun, 27/12/2015 - 19:35

In reply to by राजेश कुलकर्णी

नवीन सदस्य हा विषय तुम्हीच मुळात काढला होतात एवढंच बोलतो.

ऐसीवर अनेक चांगले लेखक चांगलं लेखन करतात. ते वाचा ही विनंती.

राजेश घासकडवी Sun, 27/12/2015 - 10:12

जिथे श्रीमंती आणि नेट वर्थ यांचे आदर्श आकडे उगाळले जातात, अंबानी आणि अडाणी वगैरे व्यक्तींचं जगात कितव्या नंबरावर स्थान आहे याची वर्णनं चवीचवीने केली जातात, त्यांचं घर किती कोटींचं आहे आणि त्यांच्याकडे किती किमतीच्या किती कार्स आहेत असे निकष मोठ्या कौतुकाने चर्चिले जातात...

हे सर्व करण्यात गरीबांचीच जबाबदारी आहे की नाही हे तपासून पाहायला हवं.

सर्वसाधारणपणे ऑफिसला जाताना मध्यमवर्गीय लोक शर्ट पॅंट वगैरे घालून रेल्वेतून जातात पण श्रीमंत लोक मात्र मुंबईच्या उकाड्यातही थ्रीपीस सूट घालून आपल्या एअरकंडिशंड बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीजमधून जाताना दिसतात. त्यांच्यावर पडणाऱ्या दरोड्यांमागे त्यांच्या श्रीमंतीचं उतू जाणारं प्रदर्शन हे एवढं एकच कारण नसेल, पण त्यातून निर्माण होणारी अनिर्बंधतेची संस्कृती त्याला जबाबदार आहे.

....(गाळलेल्या जागा भरून काढा)

श्रीमंतीचं ओंगळ व अनवश्यक दर्शन याविरूद्ध काही दमदार पावले उचलली गेली तरीदेखील या दिशेने काही योग्य होत आहे असे समजता येईल. मी वर म्हटले तसे दरोडे पडण्यासाठी आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र येथे उहापोह केलेली कारणे मुळात त्यास जबाबदार नाहीच असे म्हणत हे वास्तव नाकारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, त्यामुळे कोणाचे कसे भले होणार आहे हा प्रश्न आहे.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 15:18

In reply to by राजेश घासकडवी

नाही हो. हसुही आले नाही. बाकी तुम्ही तुमच्या समजात रहा. माझी हरकत असण्याचे कारण नाही.

राजेश घासकडवी Sun, 27/12/2015 - 18:42

In reply to by राजेश कुलकर्णी

नाही हो. हसुही आले नाही.

मी हे विडंबन हसू येण्यासाठी केलेलं नाही. एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी केलेलं आहे. तो तुम्हाला समजला नसला तर सांगतो.
- स्त्रीच्या शरीराचं प्रदर्शन आणि त्यातून 'निर्माण' होणारी त्यावर घाला घालण्याची पुरुषांची इच्छा
- आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन आणि त्यातून 'निर्माण' होणारी त्यावर घाला घालण्याची गरीबांची इच्छा
या दोन्ही समांतर आहेत. मात्र पहिल्या बाबतीत स्त्रियांना 'अहो प्रदर्शन कमी करा, त्यामुळेच तुमच्यावर बलात्कार होतात' असं नाक वर करून सांगितलं जातं. मात्र जर सतत दरोडे पडत असतील तर ती पोलिस यंत्रणा मोडल्याचं चिन्ह मानलं जातं. दोन्ही गुन्हेच. हा फरक का आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

बाकी तुम्ही तुमच्या समजात रहा.

माझे समज नक्की काय आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे का? जरा स्पष्ट कराल का? कारण चर्चेमध्ये काही गैरसमज असणं योग्य नाही.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 19:08

In reply to by राजेश घासकडवी

तुम्ही जे विडंबन केले त्याचा मूळ पोस्टशी संबंध नाही. संपादकमंडळापैकी एकांनी एका जुन्या सदस्याने पोस्टवर केलेली कमेंट ही ती पोस्ट किती बंडल आहे हे सांगितल्याचे निदर्शक असल्याचे सांगितले होते. त्या सदस्याने कमेंटमध्ये 'आम्ही अशा धाग्यांवर वरीलप्रमाणे टीपी करतो' असे लिहिले आहे.
शिवाय मुळात ती पोस्ट एका गंभीर विषयावर आहे. त्याचे विडंबन करण्याच्या कारणाबाबत तुमचा जो काही समज असेल त्यात तुम्ही रहा असे म्हटले होते.
बाकी तुम्ही श्रीमंत/गरीब यांच्याबद्दल व दुस-या उदाहरणाबद्दल जे लिहिलेत, खरे तर त्यात विरोधाभास काही नाही. तुमच्या उदाहरणामध्येही श्रीमंती गरिबांच्या 'डोळ्यावर' न येताही श्रीमंत राहू शकतात.
बलात्कार होत असतील, किंवा दरोडे पडत असतील तर दोन्ही पोलिस यंत्रणा नाकाम झाल्याचं चिन्ह समजलं जातं. यात विरोधाभास काही नाही.

नितिन थत्ते Mon, 28/12/2015 - 09:24

In reply to by राजेश घासकडवी

>>मात्र पहिल्या बाबतीत स्त्रियांना 'अहो प्रदर्शन कमी करा, त्यामुळेच तुमच्यावर बलात्कार होतात' असं नाक वर करून सांगितलं जातं. मात्र जर सतत दरोडे पडत असतील तर ती पोलिस यंत्रणा मोडल्याचं चिन्ह मानलं जातं. दोन्ही गुन्हेच. हा फरक का आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

दरोड्याच्या बाबतीत पब्लिकली लोक पोलीस यंत्रणेचे अपयश असे म्हणत असतील. पण खाजगीत दरोडा पडलेल्याला "काय रे? घराला कुलूप का नाही लावलं? घरचे दागिने काय अंगणात ठेवायचे का?" असे प्रश्न विचारतीलच.

दरोडा पडण्यापूर्वी दागिने अंगणात दिसले तर दागिने घरात ठेव असा सल्लाही देतील.
------------------------
माझ्या आधीच्या प्रतिसादातला डिसक्लेमर इथेही लागू आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/12/2015 - 20:10

In reply to by मेघना भुस्कुटे

दागिने या वस्तू आहेत. स्त्रिया या वस्तू नाहीत. तरीही घरफोडी, चोरी आणि बलात्कार यांची तुलना करून स्त्रियांच्या बाजूने बोलण्याचं नक्की काय करावं हे समजत नाही.

ऋषिकेश Mon, 28/12/2015 - 09:32

In reply to by नितिन थत्ते

तसा सल्ला देणं आणि तसा नियम करणं यात फरक आहे.
तसा सल्ला द्यायला कोणी अडवलेलं नाही. सल्ला कोणी काहीही देऊ शकतो शेवटी स्वतःबाबतचा निर्णय त्या त्या व्यक्तीला घेण्याचे स्वातंत्र्य हवे!

नितिन थत्ते Mon, 28/12/2015 - 09:57

In reply to by ऋषिकेश

>>स्वतःबाबतचा निर्णय त्या त्या व्यक्तीला घेण्याचे स्वातंत्र्य हवे!

ते स्वातंत्र्य आहेच. पण चोरी झाली तर लोक त्या व्यक्तीला 'आता का तक्रार करतोस?' असं म्हणतातच.

ऋषिकेश Mon, 28/12/2015 - 10:28

In reply to by नितिन थत्ते

ते स्वातंत्र्य आहेच.

दुर्दैवाने हे स्वातंत्र्य फक्त घराच्या चोरीच्या बाबतीतच आहे. स्त्रीपुरूषांच्या अनेक प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालायला धर्म, कुटुंबिय, समाज, सरकार सगळेच सतत सरसावलेले असतात.

पण चोरी झाली तर लोक त्या व्यक्तीला 'आता का तक्रार करतोस?' असं म्हणतातच.

अधिक दुर्दैवाने हे (फक्त) घराच्या चोरीच्या बाबतीत तितकेसे सत्य नाही. घरात चोरी झाली तर लगेच पोलिसांना पाचारण केले जाते, गावभर चर्चा होते, प्रसंगी गस्त वाढवली जाते. माझ्या एका नातेवाईकांकडे घरफोडी झाल्यावर त्यांच्या मदतीला अनेक जण सरसावले व त्यांना घरफोडी झाली हे सांगताना (दु:खद व क्लेषकारक वाटले तरी) अजिबात अपमानजनक वाटले नाही! त्याउलट इतर अनेक गुन्ह्यांनंतर विशेषतः लैंगिक गुन्ह्यांनंतर जो बळी पडतो त्याला पोलिसांकडे जाऊ नकोस, वाच्यता करू नकोस, तुझीच सगळी चुक असणार आता "खानदानाची इज्जत" तरी राख वगैरे मौलिक 'सल्ले' दिले जातात. आता असे सल्ले योग्य की अयोग्य हे ठरवायला जो तो समर्थ आहेच!

राजेश घासकडवी Mon, 28/12/2015 - 17:45

In reply to by नितिन थत्ते

खाजगीत दरोडा पडलेल्याला "काय रे? घराला कुलूप का नाही लावलं? घरचे दागिने काय अंगणात ठेवायचे का?" असे प्रश्न विचारतीलच.

प्रदर्शन आणि सुरक्षिततेच्या काळज्या यात किंचित गल्लत होते आहे. अमुकतमुक भागात एकटीने जाऊ नकोस, पार्टीत ड्रिंक घेत असशील तर ते सतत जवळ ठेव नाहीतर कोणीतरी तुझ्या नकळत त्यात डेट रेप ड्रग टाकेल, रात्री विशिष्ट वेळेपलिकडे घराबाहेर राहू नकोस असे सल्ले सर्वच मुलींना मिळतात आणि त्या प्रकारच्या कुठच्या ना कुठच्या काळज्या प्रत्येकच शहाणीसुरती मुलगी घेते. पण प्रदर्शन हे अस्तित्वाचाच भाग असतं.

एखाद्या श्रीमंत माणसाने आपली बीएमडब्ल्यू रस्त्यावर चालवली केवळ, यामुळे एखाद्या चोराची नजर चाळवली आणि सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊनही ती काच फोडून बळजबरीने पळवली तर त्याला 'अरे बाबा, पण तुझी गाडी रस्त्यावर काढण्याची काही गरज होती का? एखाद्या गराजमध्ये ठेवून द्यायची आणि हवं तेव्हा आत बसून ड्राइव्ह करतोय अशी कल्पना करायची' असे सल्ले मिळत नाहीत. किंवा श्रीमंतीच्या निव्वळ प्रदर्शनामुळे चोऱ्या होतात तेव्हा चोऱ्या थांबवण्यासाठी हे मूलभूत कारण आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? असं कोणी म्हणत नाही. पैशाच्या बाबतीत प्रदर्शन वेगळं आणि निष्काळजीपणा वेगळा. शरीराच्या बाबतीत प्रदर्शन हाच निष्काळजीपणा ठरतो असं म्हणणं असतं. (त्यासाठी पुरावे आहेत की नाहीत ही गोष्ट वेगळी)

.शुचि. Mon, 28/12/2015 - 20:08

In reply to by राजेश घासकडवी

पण प्रदर्शन हे अस्तित्वाचाच भाग असतं.

खरे आहे. कपडे, दागिने, टॅटूज, नाक-कान-बेंबी कुठेही घातलेल्या रिंगा हे व्यक्तीचे self-extension म्हणता येइल. काही स्त्रिया घटस्फोटानंतर फुलपाखराचा टॅटू करुन घेतात वगैरे ऐकले आहे.

ऋषिकेश Sun, 27/12/2015 - 11:26

बलात्कार: (गैर)समज आणि तथ्ये

नेह्मी त्याच विषयावर जागृती व शिक्षण करणे सोपे जावे ( ;) ) म्हणून हा धागा काढला होता. त्याचा लाभ घ्यावा. पुढे या प्रतिसादात अश्या प्रकारचा अभ्यास भारतातही झाला आहे व त्यातही तत्समच निष्कर्ष पुढे येताना दिसले आहेत

तेव्हा राजेश कुलकर्णी यांना (व तत्सम विचार करणार्‍य असर्व व्यक्तींना) विनंती करतो की ही तथ्ये वाचून मनातील गैरसमज धुवून टाकावेत व आपल्या परिचयातील स्त्रियांच्या काळजीमुळे (व त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी अक्कल नाही अशा समजातून) त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला येणार नाही इतकी काळजी घ्यावी . सर्वात मुख्य म्हणजे बलात्कारीत मुला-मुलींकडे करुणेने बघणे बंद करावे! बलात्कार झाला त्यात त्यांची चुक आहे किंवा त्याच्यातर्फे काही वाईट/लपवण्यासारखे घडले आहे असेही समजणे बंद करावे! सगळी १००% चुक बलात्कार करणार्‍याची आणि फक्त त्याचीच आहे. ज्या व्यक्तीवर बलात्कार झाला ती व्यक्ती (स्त्री असो वा पुरूष) निष्कलंक समजली जावी.

मेघना भुस्कुटे Sun, 27/12/2015 - 12:14

In reply to by ऋषिकेश

बलात्कार होणे म्हणजे आयुष्याचा अंत - महाभयानक - भीषण - इर्रिवर्सिबल - स्वत:ला / बलात्कार्‍याला संपवण्यास कारणीभूत - महापाप ... असेही समजणे होईल तितक्या लवकर सोडून द्यावे. बलात्कार हा गुन्हाच आहे, पण सर्वस्वाचा शेवट नव्हे. ही मानसिकता योनीशुचितेच्या वेडगळ कल्पनांतून येते.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 14:43

In reply to by ऋषिकेश

माझ्या मनात गैरसमज आहेत हा गैरसमज आधी काढून टाका.
कुलूपबंद घरातही चोऱ्या होतात आणि उघड्या घरातही होतात. चोरी करणे हा गुन्हा आहेच, पण घर उघडे असेल तर चोरी झाली तरी दोष पूर्णपणे चोराचाच असतो हे मला कळते. आता घर उघडे होते हे आपण सहजपणे विसरतो. गुन्हा होणे व गुन्हा टाळणे यातला फरक सांगायची गरज नसावी. मी म्हटले तसे कोणत्याही परिस्थितीत दोष पूर्णपणे चोराचाच असला तरीही.
तेव्हा या बाबतीत सर्व्हे करण्याची गरज नाही हे स्पष्ट व्हावे. तसेच अशा सर्व्हेचे कागद सतत कितपत नाचवायचे हेही ठरवा. आता स्त्रीची योनी म्हणजे घर आहे काय वगैरे युक्तिवाद कोणी केला तर ती व्यक्ती धन्य.
हेच दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर कपडे घालण्यातले अनिर्बंध स्वातंत्र्य कायदाही देत नाही हे आपण सोयीस्करपणे विसरतो. तुम्ही मात्र तुमच्या स्वातन्त्र्याचा गजर करत बसणार. बसा. प्रत्येक गोष्टीत मध्यममार्ग असतो हे याबाबतीतच सोयीस्करपणे विसरा.
प्रश्न केवळ तोकडे कपडे घालणाऱ्या स्त्रीपुरता आहे असेही पोस्टमध्ये कोठे म्हटलेले नाही. किंबहुना इतर अनेक मुद्दे पोस्टमध्ये आहेत.
तोकड्या कपड्यातील स्त्रिया मग त्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या असोत व जाहिरातींच्या सतत होणाऱ्या माऱ्यामुळे दिसणाऱ्या असोत, स्त्रीला भोगवादी ठरवणाऱ्या/दाखवणाऱ्या जाहिरातींमुळे असोत, स्त्रीत्वाचे अवमूल्यन करणाऱ्या नसतात हे सांगा. मग मी पुढे बोलणार नाही. येथे उठसूट पुरुषाच्या मानसिकतेवरच बोट ठेवता (आणि ती मानसिकता जबाबदार आहेच हे सत्य असूनही) या मानसिकतेला यामुळे खतपाणी मिळते हे सोयीस्करपणे विसरता याला काय म्हणायचे तेही ठरवा.

ऋषिकेश Sun, 27/12/2015 - 16:25

In reply to by राजेश कुलकर्णी

तोकड्या कपड्यातील स्त्रिया मग त्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या असोत व जाहिरातींच्या सतत होणाऱ्या माऱ्यामुळे दिसणाऱ्या असोत, स्त्रीला भोगवादी ठरवणाऱ्या/दाखवणाऱ्या जाहिरातींमुळे असोत, स्त्रीत्वाचे अवमूल्यन करणाऱ्या नसतात हे सांगा. मग मी पुढे बोलणार नाही

हात्तीच्या हे घ्या सांगतो.
तोकड्या कपड्यातील स्त्री वा पुरूष दाखवणे म्हणजे स्त्रीत्त्व अथवा पुरूषत्त्वाचे अवमुल्यन नसते!

बघा हा आता सांगितलं आहे आता उत्तरार्धातील वचन पाळा बरे! :प

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/12/2015 - 17:19

In reply to by ऋषिकेश

तोकडे कपडे घालणं म्हणजे मनुष्याचं अवमूल्यन नव्हे.

जर असेलच तरीही ते त्या व्यक्तिचं असेल; इतरांवर अवमूल्यन लादू नका. लादायचंच असल्यास 'व्हीआयपी फ्रेंची'च्या जाहिरातींमुळे स्वतःचं किती अवमूल्यन झालं, (आधी केले मग सांगितले) ते कसं मोजायचं, त्याचं एकक काय हेही सांगा.

द्रौपदीने किती तोकडे कपडे घातले होते म्हणून भर दरबारात दुःशासनाने तिच्या कपड्यांना हात घातला होता?

आणि हे स्त्रीत्त्व म्हणजे नक्की काय? परवाच वाचलेल्या एका पुस्तकात "कमी कपडे, उत्तान नाच, मेकप" इ.इ. म्हणजे स्त्रीत्त्व असं लिहिलं होतं.

थ्री-पीस सूट मिरवूनही पुरुषांवर बलात्कार होतात. पुरुषांना 'चूल आणि मूल'मध्येच कोंडून ठेवायचं का?

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 18:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही भलतेच मुद्दे काढण्यात प्रवीण अाहात.
नको त्या जाहिरातीमधये कमी कपड्यातली बाई दाखवली तर ते महिलांचे अवमूल्यन समजतात. त्याबद्दल आरडाओरडा होतो. कुठल्याशा स्प्रेमुळे एका पुरूषाच्या मागे अनेक बायका दाखवतात धावताना दाखवतात तेव्हा बायकांचे अवमूल्यन होते. हे सगळे पोस्टमध्ये लिहिलेले आहे. तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे ते दिसले नसेलच. कारण संदर्भ सोडून ठराविक वाक्ये दाखवण्याच्या तुमच्या सवयीच्या ते आड येते. या गोष्टी तुमच्या लक्षातच येत नसतील तर सोडून द्या.
व्हीआयपीच्या जाहिरातींना माझा पाठिंबा आहे हा तुमचा समज आहे. विषयाला सोडून भलत्याच गोष्टीबद्दल तुम्ही उलत मलाच जाब विचारू नका.
तुम्हाला मुद्दा समजला नसेल तर सोडून द्या. पण विषयांतर करून उलट मलाच जाब धरण्याचे उद्योग बंद करा.
इथल्या ऐसी अक्षरेवरील चर्चेच्या ज्या तथाकथित श्रेष्ठत्वाला तुमच्या अशा विषयांतरामुळे कमीपणा येतो याचेतरी भान बाळगा. या सगळ्या नाटकांची मला पुरेपूर माहिती आहे. तेव्हा हीच तुमची चर्चेची कल्पना असेल तर ठीक आहे.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 18:29

In reply to by ऋषिकेश

अवमूल्यनाची, स्त्रीला भोगवस्तु ठरवणारी उदाहरणे वर दिली आहेत. मूळ पोस्टमध्येच होती, पण तुम्हाला अमेरिकेतल्या सर्व्हेपुढे, ज्याचा या पोस्टशी काहीही संबंध नाही, काहीच दिसत नाहीसे दिसते. म्हणून पुन्हा सांगितले. जमल्यास बघा. बाकी काय लिहिले आहे न वाचताच लिहायचे ही तुमची पद्धत आहे. तेव्हा तुम्ही जो सर्व्हे नाचवत आहात त्यातल्या निष्कर्षांपलीकडे तुम्ही विचार करू शकला नाहीत तरी हरकत नाही. सर्व्हेचे निकष अभ्यासण्यापर्यंत तुमची मजल आहे हेही अभिनंदनीय आहे. आता पुढची पायरी म्हणून ते कोठे नाचवायचे आणि कोठे नाही एवढी समज येऊ देत यासाठी शुभेच्छा!

ऋषिकेश Sun, 27/12/2015 - 16:29

In reply to by राजेश कुलकर्णी

येथे उठसूट पुरुषाच्या मानसिकतेवरच बोट ठेवता (आणि ती मानसिकता जबाबदार आहेच हे सत्य असूनही) या मानसिकतेला यामुळे खतपाणी मिळते हे सोयीस्करपणे विसरता याला काय म्हणायचे तेही ठरवा.

चाळवल्या चाळवल्या लगेच जाऊन बळजबरीने संभोग करणार्‍या पुरुषाला आमच्याकडे विकृत म्हणतात शिवाय गुन्हेगारही! तुमचं माहित नाही. त्या विकृत गुन्हेगार पुरूषाबद्दल सहानुभुती.. माय फुट!

एक साधा प्रश्न विचारतो शर्टाची बटणे उघडे ठेवणारे पुरूष, लो वेस्ट जीन्स घालणारे, प्रसंगी उघड्याने फिरणारे पुरूष बघताच त्याच्यावर स्त्रीने बलात्कार केला तर चुक कोणाची? पुरूषांनीही सतत आपले कोणतेही अंग दिसणार नाही असे तुम्ही म्हणताना दिसला नाहीत!

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 17:53

In reply to by ऋषिकेश

उगाच आगाऊपणा करू नका. आणि लिहिलेले न समजल्याचा आवही आणू नका. तशी मानसिकता जबाबदार आहे म्हणजे मीदेखील त्यांना गुन्हेगारच समजतो. उगाच भलतेच समज करून घेऊन त्याच्यावर इमले बांधू नका. यात पुरूषांबद्दल सहानुभूती कोठे दिसली तुम्हाला?
शिवाय जे म्हटले अाहे त्याबद्दल बोला की! पुरूषांचया पेहरावाबद्दल तुम्ही बोला की. तुम्हाला कोणी थांबवले आहे? त्याचा उल्लेख केला नाही त्याबद्दल उलट मला कशाला जाब विचारता? जसे काही तुम्ही म्हणता तसे पुरूष फिरतात याला माझे समर्थन आहे. हा चर्चेचा कोणता प्रकार आहे?

ऋषिकेश Sun, 27/12/2015 - 17:58

In reply to by राजेश कुलकर्णी

माझे तर पुरुषांनीही असे कपडे घालण्याला समर्थन आहे.
कोणी कोणते कपडे घालावेत, काय खावे, काय प्यावे यावर बंधने घालायला आम्ही काय सरकार/शासन वाटलो!

अवांतरः मला नऊवारी वा कोणत्याही प्रकारची साडी नेसलेल्या बायका अधिक सुंदर व सेक्सी वाटतात. आता माझ्यासारखे चाळवू नयेत म्हणून त्यांनी साड्याही नेसु नयेत असे तुम्हाला वाटते ना? हो की नै?

.शुचि. Mon, 28/12/2015 - 20:12

In reply to by ऋषिकेश

आता माझ्यासारखे चाळवू नयेत म्हणून त्यांनी साड्याही नेसु नयेत असे तुम्हाला वाटते ना? हो की नै?

=)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/12/2015 - 19:13

धागालेखक - कृपया व्यक्तिगत पातळीवर टीका करणारी भाषा आवरा.

बाकी सर्व प्रतिसादक - नाही तुमचे (आपले) मुद्दे धागालेखकांना समजत तर सोडून द्या. आता "भाषा आवरा" असं म्हणायची वेळ आलेली आहे. तेव्हा दुसऱ्या विषयावरून कीस पाडूया.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 20:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वैयक्तिक पातळीवरील टीका कोठे केलेली दिसली ते क्ृपया सांगाल का? शिवाय जेथे तुम्हाला तसे दिसले तेथे ही कमेंट करण्याऐवजी येथे करून तुम्ही काय साधलेत?

विषय सोडून भलत्याच मुद्द्यावरून पोस्टकर्त्याला जाब विचारण्याची तुमची सवय पुराव्यासह दाखवलेली आहे. कमीत कमी दोन वेळा.
चर्चेच्या नावाखालची तुमची ही घाणेरडी सवय मी अंगिकारू शकत नाही. तुम्ही केलेला हा प्रयत्न सगळेच वाचक पडताळून पाहू शकतात. आनि वर तुम्हीच वाचकांना येथे काही कमेंट करू नका असे आवाहन करत आहात. कमाल आहे तुमची. चांगली प्रतिष्ठा राखत आहात ऐसीअक्षरेची अशा खोडसाळपणाने. सगळे वाचकही तुमचा हा खोडसाळपणा पहात आहेत याचेही भान ठेवा.

बाकीचे वाचक काय करायचे ते करतील. तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्ही यापुढे माझ्या पोस्ट्सकडे कायमचे दुर्लक्ष केलेत तरी चालेल. त्याला माझी अजिबात असणार नाही.

प्रकाश घाटपांडे Sun, 27/12/2015 - 20:50

राकु आपले मुद्दे हे विचार करण्यासारखे असले तरी आपली ती मांडण्याची पद्धत लोकांना खटकते. अगोदर ऐसी च्या वातावरणाशी थोड मिळत जुळत घ्या लोक तुमचही ऐकतील.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 21:14

In reply to by प्रकाश घाटपांडे

धन्यवाद घाटपांडेसाहेब.
मी मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत एवढेतरी तुम्ही म्हणत आहात. येथे तर मी मांडलेल्या मुद्द्यांवरून माझ्यावरच आरोप करणे चालू अाहे. तुम्ही विचार
वातावरणाशी मिळतेजुळते घ्यायचे म्हणजे काय करायचे हा प्रश्न आहे. आदर दाखवा व त्याबदल्यात आदर घ्या इतका सरळ मामला आहे. प्रत्येकाचे सगळेच मुद्दे पटणे
शक्य नाही हे मलादेखील कळते.पण प्रतिवाद करताना कसा करायचा हे अनेक जणांना कळतच नाही की काय असे वाटण्यासारखी स्थिती आहे. पोस्टकर्त्यावरच तुटून पडायचे अशी या लोकांची पद्धत दिसते. अशा नतद्रष्ट लोकांकडून काही ऐकून घ्यायची माझी अजिबात तयारी नाही. त्याची गरजच नाही.
ते न करता येथे जुने सदस्य - नवे सदस्य वगैरे चालू आहे. जसे काही जुने सदस्य म्हणजे पीएचडी होल्डर्स आहेत व नवीन सदस्य बालवाडीत. जे समोर आहे त्यावर कमेंट न करता जे नाही त्यावरून माझ्यावर भलतेच आरोप करणे, जे आहे त्यातलीही सिलेक्टिव्ह वाक्ये निवडून संदर्भ वगळून कमेंट करणे असे प्रकार चालू आहेत.
विक्षिप्त अदिती या संपादकमंडळापैकीच आहेत की काय माहित नाही, पण माझ्या कमेंटकडे दुर्लक्ष करा असा जाहीर सल्ला सर्वांना देत आहेत. त्या स्वत: सदस्यांच्या पोस्टवर कमेंट करताना तद्दन खोडसाळपणा करतात, वर सदस्यांना माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करा म्हणून सांगतात. काय चालले आहे कळत नाही. आणि हेच लोक मला ऐसीअक्षरेच्या इतर मराठी पोर्टल्सपेक्षा असलेल्या वेगळेपणाची महती सांगत आहेत.
तुम्ही येथेच पाहिले असेल, तर मेघना भुस्कुटे यांच्या पहिल्या कमेंटवरून वाटले की त्यांनामाझे काही मुद्दे पटलेले नाहीत. पण कमेंट करताना त्यांनी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत की माझ्या हेतुबद्दल. याउलट विक्षिप्त अदिती यांचे. यांना माझी पोस्ट बेताल वगैरे काय वाटली, त्यांची करमणूकही झाली. पुढे तर त्या आणखी सुटल्यात.
संपादक त्यांना आवरताना दिसत अाहेत का? ते तर फक्त मलाच उपदेश करत आहेत. तेव्हा त्यांनाही अशीच चर्चा अपेक्षित आहे की काय असा प्रश्न पडतो.
असे सगळे चालू आहे.
असो.

अनुप ढेरे Sun, 27/12/2015 - 21:31

In reply to by राजेश कुलकर्णी

तर मेघना भुस्कुटे यांच्या पहिल्या कमेंटवरून वाटले की त्यांनामाझे काही मुद्दे पटलेले नाहीत. पण कमेंट करताना त्यांनी माझ्यावर कसलेही आरोप केले नाहीत की माझ्या हेतुबद्दल. याउलट विक्षिप्त अदिती यांचे.

याच्याशी मात्र सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/12/2015 - 21:43

In reply to by अनुप ढेरे

व्यक्तिगत आरोप, बळी पडण्याचा कांगावा आणि आक्रस्ताळेपणाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. पण अनुप ढेरेंचा तसा लौकिक नसल्यामुळे प्रतिसाद देत आहे. "अनभ्यस्त, बिनधास्त आणि बेताल विधानं" यात व्यक्तीवर आरोप आणि हेतूवर शंका कशी हे अजूनही समजलेलं नाही. हा प्रतिसाद वाचल्यानंतर लेखकाने सदर विषयाचा किती सखोल विचार केला आहे याची कल्पना येते.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 21:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तेवढ्या एका उल्लेखावर थांबू नका. भलत्याच मुद्द्यांवरून टीका करण्यातली तुमची लबाडी व तुमचा खोडसाळपणा कमीत कमी दोन वेळा स्पष्टपणे दाखवलेला आहे.

अनुप ढेरे Mon, 28/12/2015 - 09:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जनरली नवे लोक अनेकदा चाऊन चोथा झालेले विषय पुन्हा उकरतात. त्यात वावगं नाही कारण जालावर ते विषय जुने आहेत हे त्यांना माहिती असणं अवघड आहे. जुने धागे वाचूनच नवीन धागे काढणं हे प्रॅक्टिकल नाही. सो हिट विषय पुन्हा पुन्हा येतात( उदा. वरील विषय, समलैंगिकता, स्त्री-पुरूष समानता, आरक्षण वगैरे वगैरे.) अशांना जुन्या धाग्यांचे संदर्भ देउन "बाबारे, यापेक्षा नवं काही असेल तर मांड" हे सांगणं फ्रेंडली वाटतं.

तुमच्या प्रतिसादातली भाषा थोडी अ‍ॅग्रेसिव होती. ती नवख्याच्या पचनी पडेलच असं नाही. एकदम असं वाचून नी-जर्क रिअ‍ॅक्शन येऊ शकते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/12/2015 - 19:19

In reply to by अनुप ढेरे

त्या प्रतिसादात टिंगल केलेली होती; त्याला आक्रमकपणा म्हणायचं का इतर काही हे वाचणार्‍यांवर अवलंबून आहे. पण बिनधास्त, बिनबुडाच्या विधानांचं स्पष्टीकरण ना जंतूच्या प्रतिसादाला मिळालं, ना माझ्या!

कदाचित काही स्पष्टीकरण देता येणं शक्य नसल्यामुळे धागालेखक डिफेन्सिव झाले असतील. धागालेखक 'बिच्चारे' ठरले म्हणून त्यांचा मुद्दा ग्राह्य ठरत नाही.

राजेश कुलकर्णी Tue, 29/12/2015 - 17:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कमाल अाहे की नाही? तुमचे सगळेच प्रतिवाद भलतेच व मुद्द्याला सोडून. तरी पोस्टकर्ता बिच्चारा. या सर्व प्रकरणात मी डिफेन्सिव्हवर गेल्याचे मला तरी कोठे दिसले नाही.
तुमच्या भलत्याच मुद्द्यांवर स्पष्टीकरन देण्याची कोणाची प्राज्ञा आहे?कारण मुळात कमेंट्स पोस्टला धरून नाहीत.
एवढे सगळे करून वर तुम्हीच सदस्यांना या पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देणार. कमाल आहे खरोखर.
मुळात पोस्टमध्ये तोकडे कपडे हाच एक मुद्दा असल्याचे समजून त्यावर कमेंट्स होत आहेत.

प्रकाश घाटपांडे Sun, 27/12/2015 - 21:57

In reply to by राजेश कुलकर्णी

वातावरणाशी मिळतेजुळते घ्यायचे म्हणजे काय करायचे हा प्रश्न आहे. आदर दाखवा व त्याबदल्यात आदर घ्या इतका सरळ मामला आहे

आदर हा एक त्यापैकी भाग झाला
पण प्रत्येक संकेतस्थळाची एक प्रकृती असते. तिच्यावर चर्चा करणार्‍या लोकांचेही काही विशिष्ट पैलू असतात. एखाद्या समूहात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी त्याची प्रथम ओळख करुन घेतो. काही इतिहास माहिती करुन घेतो. मग हळू हळू आपण संवाद वाढवतो. आणी मग आपण नंतर त्या समूहाचा घटक बनून जातो. मतभिन्नतेसकट सहजीवन जगतो. इथे प्रत्येकवेळी गंभीर पणे चर्चा होते असे नव्हे. थट्टामस्करीही चालते. त्यातून मतभिन्नतेचा ताणही कमी होतो.
मी सकाळी फिरायला जातो. गल्लीतील भूभू मंडळी सगळी आपली मित्र. एकदा एक भुभु नवीन आल. गल्लीतल्या जुन्या भुभु मंडळींनी सुरवातीला त्याला हाकलून लावायचा प्रयत्न केला. भुभु मंडळी आपल्या हद्द व वर्चस्वाविषयी फार संवेदनशील असतात. त्या नवीन भुभुने सुरवातील नमते तर कधी दात विचकावून आपले अस्तित्व टिकवून ठेवले. आता ती सर्व भुभु मंडळी गुण्या गोविंदाने गल्लीत राहतात. थोड्या कुरबुरी होतात. पण तेवढ चालायचच. :)

राजेश कुलकर्णी Tue, 29/12/2015 - 17:28

In reply to by प्रकाश घाटपांडे

लेखन वाचत ओळख झाली तर ठीकच आहे. परंतु ती होईपर्यंत वाटेल त्या कमेंट्स झाल्या तर त्या चालवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याला तसाच प्रतिसाद देणे आवश्यक आहे. येथे तर संपादकच सदस्या-सदस्यांमध्ये भेदभाव करत आहेत, संपादकमंडळाच्या दुस-या एक सदस्य दुस-या सदस्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करा असे आवाहन करत आहेत, पोस्टच्या विषयाला सोडून कमेंट करत आहेत.
मी दुस-याच्या पोस्टवर येऊन वैयक्तिक स्वरूपाची किंवा विषयाला सोडून कमेंट करत नाही किंवा उगाछ पोस्टकर्त्यावर हेत्वाोप करत नाही. दुस-यांनीही तसे करू नये अशी साधी अपेक्षा आहे. त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
वैयक्तिक ओळख होईपर्यंत थट्टा मस्करी करण्यात मलारस वाटत नाही.

गवि Mon, 28/12/2015 - 10:15

कोणीही कोणत्याही रोगाची प्रतिबंधक लस यापुढे घेऊ नये. वैद्यकशास्त्रात अँटिबायोटिक्स, अँटिवायरल आणि अँटीफंगल औषधांचा इफेक्ट इतका असावा की मी हात साबणाने न धुवो, बर्फमिश्रित लिंबाचे वायाळ सरबत पिवो, चायनीज गाडीवर खावो, खोकतशिंकत उभ्या असलेल्या व्यक्तीजवळ मला लोकलमधे उभं रहावं लागो, जंगलातले डास मला चावोत, कच्चे मांस हॉटेलात मिळो.. पण पटकी, हगवण,विषमज्वर, क्षय वगैरे जंतूंची लागण मला होऊच नये अशी यंत्रणा हवी.

रोगी व्यक्तींनी तोंडावर रुमाल बांधावेत, लिंबू सरबतवाल्यांनी पाणी उकळून वापरावं, साथ मुळात येऊच नये.. त्यातून काही झालंच तर रोगपश्चात उपचार कडक असावेत.

पण या सर्वासोबत करण्याच्या काही अन्य उपायांत ट्रिपल- पोलिअो, बीसीजी, टायफॉईड आदि आगाऊ प्रतिरोधकांचा उल्लेखही स्वातंत्र्यावर घाला आहे. कारण सर्व लशी घेऊनही रोग झालेली उदाहरणं दिसतात.

मुळात प्रतिबंधक लस स्वीकारली तर यंत्रणेचा चायनीज गाड्या, सरबतवाले, वैद्यकीय पश्चातोपचार यांतील सुधारणांकडचं लक्ष आणि इंटरेस्ट एकदम नाहीसा होऊ शकतो.

-(जंतुसमर्थक रोगकारक कुठचा मेला..) गवि.

राजेश घासकडवी Mon, 28/12/2015 - 19:55

In reply to by गवि

हा तिरकसपणा रास्त ठरला असता, पण 'प्रदर्शनामुळे बलात्कार वाढतात' किंवा 'प्रदर्शन कमी केल्याने बलात्कार कमी होतात' याबद्दल काही विदा नाही. विरुद्ध विदा भरपूर आहे. उदाहणार्थ, अमेरिकेत गेल्या वीसेक वर्षांत बलात्कारांचं प्रमाण कमी झालं आहे - ८५% नी. आता या काळात मी या देशात हजर होतो (मी काही श्रेय घेत नाही) पण शरीरप्रदर्शन काही कमी झालेलं दिसत नाही. उलट इंटरनेटच्या एक्स्प्लोजनमुळे लैंगिक प्रतिमा अत्यंत सहज उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यांचं कंझंप्शन प्रचंड वाढलेलं आहे. जर या लैंगिक प्रदर्शनाच्या प्रतिमा पाहून बलात्कार करण्याची ऊर्मी निर्माण होत असती तर बलात्कार वाढताना दिसायला हवे होते.

तेव्हा प्रतिबंधक लस असेल तर ती जरूर घ्यावी, सरबतं विकणारांवरही स्वच्छ असण्याची जबरदस्ती व्हावी. पण ते तसं नाही ना...

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/12/2015 - 20:08

In reply to by राजेश घासकडवी

प्रदर्शन म्हणजे लस असं न वाचता, स्त्रियांना समान माणूस समजणे म्हणजे लस असं वाचून बघा.

नितिन थत्ते Mon, 28/12/2015 - 15:41

अ या बाईचे उत्तान दर्शन होऊन चाळवलेल्या पुरुषाकडून ब या जवळपासच उपलब्ध असलेल्या स्त्रीवर बलात्कार होण्याची शक्यता असते का?

ऋषिकेश Mon, 28/12/2015 - 15:55

In reply to by नितिन थत्ते

कल्पना नाही.
पण जर हे कारण पुरेसे असते तर स्त्रियांवर होतात तितक्याच प्रमाणात पुरूषांवर बलात्कार होताना दिसले असते. मात्र तसे दिसत नाही. (कारण स्त्रीयांनाही उत्तान वाटणार्‍या पुरुषांचे दर्शनही तितकेच (किंबहुना अधिकच - पुरुषा स्त्रियांपेक्षा अधिकच सर्रास उत्तान म्हणता येतील असे कपडे/वर्तणूक करत असावेत- असा कयास!) होत असते. मात्र त्या लगेच जाऊन उपल्ब्ध 'ब' या पुरूषावर बलात्कार करताना (गेलाबाजार त्यांच्या मागे लागताना - छेड काढताना) दिसत नाहीत.).

बलात्काराचा संबंध लैंगिक चाळवण्यापेक्षा अधिकार गाजवण्याशी अधिक आहे हे मत जगभरातील बहुसंख्य मानसोपचार तज्ज्ञांनी मान्य केले आहे.

ऋषिकेश Tue, 29/12/2015 - 15:46

In reply to by ऋषिकेश

अश्या बातम्या वाचलल्या की बलात्काराचा संबंध लैंगिक चाळवण्यापेक्षा अधिकार गाजवणे (व त्यात अपयश आल्यास धडा शिकवणे) याच्याशी अधिक आहे याला पुष्टीच मिळते

राजेश कुलकर्णी Tue, 29/12/2015 - 17:16

In reply to by वामन देशमुख

मलाही आश्चर्य वाटले.
दुसरीकडे विक्षिप्त अदिती अशासारखे नाव धारण करणा-्या सदस्य ज्या बहुधा संपादकमंडळावर आहेत, त्याही सदस्यांना या पोस्टकडे दुर्लक्षकरण्याचा सल्ला देत आहेत. सगळाच प्रकार विचित्र आहे.

मनीषा Wed, 30/12/2015 - 06:25

In reply to by राजेश कुलकर्णी

तुमचे विचार वाचल्यावर असं वाटलं ...
कि समजा एखादा चोर असं म्हणाला,--- की चोरी करणं वाईटच ... पण मला चोरी करावी असं वाटू नये म्हणून लोकांनी काळजी ध्यायला हवी .
किंवा कुणी असेही म्हणेल, --- मला तुमच्या घरात डोकवावेसे वाटु नये म्हणुन तुम्ही घराची दारे, खिडक्या सतत बंद ठेवा.

अंमळ विचित्रं कल्पना वाटते ना?

आणि इतके करोडो लोक जे बघतात .. त्यातले काही फक्तं चाळवले जाऊन गैरप्रकार करतात. सगळे सरसकट तसेच वर्तन करत नाहीत. कारण ते थोडेच लोक विकृत असतात. आणि चूक आणि गुन्हा त्यांचाच असतो.

तुम्ही जे कारण सांगता आहात , ते सत्याच्या कसोटीत बाद ठरते आहे.

राजेश घासकडवी Wed, 30/12/2015 - 06:34

In reply to by मनीषा

तुम्ही जे कारण सांगता आहात , ते सत्याच्या कसोटीत बाद ठरते आहे.

त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा करत आहात ही तुमचीच चूक नाही का? त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, की सत्य जुनं झालेलं असल्यामुळे बाद झालेलं आहे.

दोष कपडे घालणा-याचा नव्हे तर पाहणा-याचा असतो, किंवा बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात ही बराच काळ वापरलेली टेप आता निरर्थक झाली आहे.

आणि निरर्थक होण्याचं कारण काय? कारण उघड आहे, ते स्वतः म्हणतात म्हणून. त्याचा सत्याशी काय संबंध?

नितिन थत्ते Wed, 30/12/2015 - 06:57

In reply to by राजेश घासकडवी

>>बलात्कार करणा-यांमध्ये अनेक बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून होतात किंवा अंगभर कपडे घालणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात

त्याचं अल्टरनेट रीझनिंग मी दिलं आहे.

राजेश कुलकर्णी Wed, 06/01/2016 - 22:03

In reply to by मनीषा

येथे विषयाला सोडून अनेक प्रतिसाद मी पाहणे सोडून दिले होते. अाज सहज पाहताना तुमची प्रतिक्रिया वाचली.
अधिकार व कर्तव्य याबद्दल तुमचे काही मत असेल तर तुम्हाला मी काय म्हणतो ते समजेल. तुम्हाला केवळ अधिकाराबद्दलच बोलायचे असेल तर काही म्हणणे. तुम्ही दिलेल्या उदाहरणामधले 'कोणाला तुमच्या घरात डोकवावेसे वाटावे' हे तुम्हाला योग्य वाटते का पहा. कदाचित तुमचे उत्तर मिळेल. काही स्त्रियाही याबाबतीत मध्यममार्गाचा सल्ला देतात हेही पहा. एकीकडे बुरखा व दुसरीकडे अनिर्बंध स्वातंत्र्य.
कारण एकीकडे असते, परिणाम दुरीकडे होऊ शकतो हे पटते का पहा.
शिवाय या पोस्टमध्ये तोकडे कपडे एवढाच मुद्दा नाही, हे पाहिलेत का?
स्त्रीला भोगवादी वस्तु बनवली जात आहे हे न पाहता केवळ पुरूषांची मानसिकता बदला एवढेच सांगितले जात आहे. हे बरोबर वाटते का?
एवढे करून येथे या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे हे येथेच अनेकदा सांगितले गेले. स्त्रियांना अनिर्बंध स्वातंत्र्य हवे, पुरूषांनीच आपली नजर बदलावी यापलीकडे त्या चर्चा गेल्याच नाहीत हे दिसते. तुम्ही 'सत्या'च्या बद्दल जे म्हटले आहे ते उचलून धरणा-या कमेंट्सवरूनही तुम्हाला तेच दिसेल.
असो.

राजेश घासकडवी Tue, 29/12/2015 - 19:26

In reply to by वामन देशमुख

त्यांनी ज्या पद्धतीने सर्वत्र सल्ले दिलेले आहेत, किंवा त्यांच्या लिखाणात जी अरेरावी दिसून येते त्यासाठी 'नाक वर करून' हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. हा असांसदीय शब्द खचितच नाही.

तिरशिंगराव Tue, 29/12/2015 - 18:52

मी पण, मागे एकदा, 'नो एन्ट्री' च्या गल्लीत चुकून घुसलो होतो. गल्लीच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाईपर्यंत, समोरुन येणारा प्रत्येक वाहनचालक माझ्याकडे रागाने का पहात आहे, ते कळलंच नाही. शेवटी गल्लीच्या दुसर्‍या टोकाला, हवालदाराने अडवलंन! म्हणाला," बघता काय असे नाक वर करुन? पावती कितीची फाडू, ते सांगा."

हेमंत लाटकर Wed, 06/01/2016 - 11:49

स्विवलेस व गुडघ्यावरचे ड्रेस, पोट-पाठ दाखवणार्या साड्या घालून प्रदर्शन केले तर कोणत्याही (सज्जन वा दुर्जन) पुरषाची भावना चाळवली जाईल. आेळखितल्या किंवा अनोळखी पुरषाकडून अत्याचार होण्याची शक्यता निर्माण होईल.

ऋषिकेश Wed, 06/01/2016 - 11:55

In reply to by हेमंत लाटकर

स्विवलेस व गुडघ्यावरचे ड्रेस, पोट-पाठ दाखवणार्या साड्या घालून प्रदर्शन केले तर कोणत्याही (सज्जन वा दुर्जन) पुरषाची भावना चाळवली जाईल. आेळखितल्या किंवा अनोळखी पुरषाकडून अत्याचार होण्याची शक्यता निर्माण होईल.

ह्म्म म्हणजे जसे स्लिवलेस बनियन व अर्धीचड्डी (खाकी असेल तर अधिकच) घातल्याने, तसेच लो वेस्ट जीन्सने अंतर्वस्त्र दाखवणारे वा बटणे उघडी ठेऊन छातीवरील केसांचे / पिळदार छातीचे (कितीतरी इंची!) प्रदर्शन केले तर कोणत्याही (सज्जन वा दुर्जन) स्त्रीयांचे भावना चाळवली जाईल तसेच ना?. पण मग आेळखितल्या किंवा अनोळखी स्त्रीकडून अत्याचार होण्याची शक्यता निर्माण होते का?.

अनु राव Thu, 07/01/2016 - 10:15

In reply to by ऋषिकेश

पण मग आेळखितल्या किंवा अनोळखी स्त्रीकडून अत्याचार होण्याची शक्यता निर्माण होते का?.

ऋ - तू नेहमी विषय पुरुषांवरच्या बलात्कारा वर नेतोस ते बघुन तुझी असे काही व्हावे अशी फँटसी आहे का अशी शंका येते.

तू कीतीही थियरॉटीकल प्रूफ द्यायचा प्रयत्न केलास तरी प्रत्यक्षात स्त्रीकडुन पुरुषावर शाररीक बलात्कार होऊ शकत नाही. स्त्री जास्तीत जास्त ब्लॅकमेल करेल, घोळात घेइल, पण पुरुष जसा स्त्री वर बलात्कार करतात तसा शकणार नाहीत. असे घडल्याचे ०.०१% उदाहरण तरी देऊन दाखव.

आणि लॉजिकली पण स्त्री ला जर शरीरसुख हवे असेल तर बलात्कार करायची गरज च नाही रे. नुस्ते इंटेंशन दाखवले तरी लाईन लागेल. तिला कुठला स्पेसिफिक पुरुष पाहीजे असेल आणि तिने नो टॅग्स अ‍ॅट्ट्च्ड असे दाखवुन दिले की तो पुरुष पण एका पायावर तयार होईल.

प्रथमेश नामजोशी Thu, 07/01/2016 - 11:07

In reply to by अनु राव

तिला कुठला स्पेसिफिक पुरुष पाहीजे असेल आणि तिने नो टॅग्स अ‍ॅट्ट्च्ड असे दाखवुन दिले की तो पुरुष पण एका पायावर तयार होईल.

पुरूष सरसकट 'कुठल्याही' बाईसाठी 'एका पायावर तयार' होतात? हो? बळंच काहीही!
(त्या पुरूषानी त्या बाईप्रती तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीये असं गॄहित धरून)

अनु राव Thu, 07/01/2016 - 11:33

In reply to by प्रथमेश नामजोशी

पुरूष सरसकट 'कुठल्याही' बाईसाठी 'एका पायावर तयार' होतात? हो?

नाही, कुठल्याही बाई साठी नक्कीच नाही. पण "चालेल / आवडेल" अश्या बाई साठी. मुद्दा हा होता की, बाई ला बलात्कार करायची वेळ येणार नाही.

आणि "कुठलीही" बाइ असेल तर तिने कीतीही प्रयत्न केले तरी बलात्कार करु शकणार नाही.

प्रथमेश नामजोशी Thu, 07/01/2016 - 17:17

In reply to by अनु राव

परत तेच.

कुठल्याही बाई साठी नक्कीच नाही. पण "चालेल / आवडेल" अश्या बाई साठी.

चालेल/आवडेल अश्या बायका बर्‍याच असू शकतील आजूबाजूला. त्यांच्यापैकी एखादीनं तुम्ही म्हणताय तसे टॅग्स अ‍ॅटॅच्ट्ड नसल्याचं दाखवलं, की लग्गेच पौरुष पुरुष उभे(एका पायावर) असं नसतं हो.

अनु राव Thu, 07/01/2016 - 17:30

In reply to by प्रथमेश नामजोशी

तुमच्या आसपास राकु, हेलाकाका यांच्यासारखी संस्कारी पुरुष दिसतायत.

किंवा तुमचे म्हणणे हे "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" असे ही असु शकेल. खरीच वेळ आली तर काय करतील ते महत्वाचे.

आणि बाई ने तयारी दाखवल्यावर उभे ( एका किंवा २ पायावर ) न रहाणारे कसले हो पुरुष. :-)

प्रथमेश नामजोशी Thu, 07/01/2016 - 17:44

In reply to by अनु राव

म्हणजे राकु, हेलाकाका संस्कारी आहेत पण खरी वेळ आली तर काय करतील ते महत्त्वाचे, असे का? काही कळले नाही.

द्राक्ष आंबट नाही हो, अनुभवाच्या मर्यादा असाव्यात.
बाकी तुमचा अनुभव फारच दांडगा वाटतोय.

अनु राव Thu, 07/01/2016 - 18:20

In reply to by प्रथमेश नामजोशी

अहो कोण कसे वागेल हे तशी वेळ आली तर च कळेल ना. नैतिकतेच्या (?) गप्पा मारणारे वेळ आली की तितक्याच आवेशानी अनैतिक कामे जस्टीफाय करतात.

ऋषिकेश Thu, 07/01/2016 - 17:43

In reply to by अनु राव

अनु रावांच्या अज्ञानाची कीव करणे केव्हाच सोडून दिलेय. पण स्मरणशक्तीही अगदीच कीव करण्यालायक आहे हे आज समजले.
इथेच दोन-दोनदा याच बाबतीत बातम्या दिल्यात (कुठे ते तुम्हीच शोधा). तुमचे हे अज्ञान म्हणावे का ... जाऊदे वैयक्तीक बोलायला मी काय अनु राव ए!

तर आता तिसर्‍यांदा बातम्या देतोय. एकदा काय ते नीट शिकून घ्या! दरवेळी तुमची उजळणी घ्यायची म्हणजे.. असो

बायकांनी टॅक्सी ड्रायव्हरवर केलेला बलात्कार

पओंगडावस्थेतील मुलावर त्याच्या आईच्या वयाच्या बाईने केलेला बलात्कार

बाकी, कितीही माहिती मिळालीत म्हणून नगेच वापर करून बघु नका हा! मी फक्त अज्ञान दूर करायच्या हेतूने माहिती देतोय! :प

अनु राव Thu, 07/01/2016 - 18:18

In reply to by ऋषिकेश

बाकी, कितीही माहिती मिळालीत म्हणून नगेच वापर करून बघु नका हा! मी फक्त अज्ञान दूर करायच्या हेतूने माहिती देतोय! (जीभ दाखवत)

ॠ - का नको? लगेच नाही पण कधी तशी वेळ आणि व्यक्ती आली तर काय हरकत आहे प्रयत्न करुन बघायला? बायकांनी पुढाकार घेऊ नये वगैरे मते नाहीत ना तुझी हेलाकाकांसारखी?

ऋषिकेश Thu, 07/01/2016 - 18:24

In reply to by अनु राव

एकाच बाईने काय कितीही स्त्री-पुरुषांनी एकत्रित वा एकेकटा पुढाकार घेऊन परस्परसंमतीने काहीही करण्यास माझी काहीही हरकत नाही. मात्र कोणी काही घातले, कोणी कसेही दिसले किंवा कोणाचे काहीही दिसले म्हणजे ती व्यक्ती माझीच मालमत्ता आहे असे समजून 'बळजबरीने' काहीही करणे मला मान्य नाही.

आता ही माझी मते कोणासारखी आहे हे ठरवायला तुम्ही सक्षम आहतच!

टिन Fri, 08/01/2016 - 09:59

In reply to by मेघना भुस्कुटे

हेलांना समर्थन वगैरे अजिबात नाही, पण एका काळात 'पोलकी' पोठ-पाठ झाकणारी असत. त्यापूर्वीच्या काळात तशी नसत. ;)

टिन Tue, 12/01/2016 - 21:04

In reply to by आडकित्ता

त्या स्त्रीया सत्शील व चारित्र्यवान होत्या तसेच रोजची कामे केल्याने लवचिक होत्या (लव-चिक नव्हे). आत्ताच्या बायकांना नाही जमणार ते.

हेमंत लाटकर Wed, 06/01/2016 - 12:13

शरीर प्रदर्शन करणारे कपडे घालून नवर्याच्या मित्रासमोर वावरले तर त्या मित्राचा गैरसमज होईल की आपले लक्ष वेधण्यासाठी करत आहे. मग एखादे दिवशी नवरा नसतांना धोका होऊ शकतो.

ऋषिकेश Wed, 06/01/2016 - 13:47

In reply to by हेमंत लाटकर

तरीच माझा मित्र त्याच्या बायकोसमोर मला 'शॉर्ट्स' मध्ये येऊ देत नाही. माझी कित्ती कित्ती काळजी ए त्याला. उगाच त्याच्या बायकोचा गैरसमज होऊन माझ्यावर अतिप्रसंग ओढवू नये याची त्याला कित्ती ती काळजी!

हेमंत लाटकर Wed, 06/01/2016 - 12:54

आधी होत्या पण पुर्ण पाठ दाखवणार्या तसेच पिंगा डान्स टाईप नव्हत्या.

नवरा असताना नवर्याची संमती असली तर?

मेघना भुस्कुटे Wed, 06/01/2016 - 14:12

In reply to by हेमंत लाटकर

नवर्‍याची संमती असली किंवा नसली - त्यानं काय फरक पडतो, हेला? बायकोची संमती असेल, तर मुळात तो अत्याचारच नसेल. मित्र आणि बायको धम्माल करून मोकळे होतील. नि नवर्‍याची संमती नसली नि मित्र नवराबायकोहून जास्त तगडा आणि जास्त बेमुर्वतखोर असेल - तर नवरा काय दुर्वा उपटू शकेल, सांगा बरं?

प्रथमेश नामजोशी Wed, 06/01/2016 - 17:07

In reply to by मेघना भुस्कुटे

दुर्वांचा स्पेसिफिक ठिकाणी केलेला वापर बघून खोतांची आठवण झाली. छान वाटले. ;)

मेघना भुस्कुटे Wed, 06/01/2016 - 16:27

In reply to by हेमंत लाटकर

का बुवा? नवर्‍यांना नि बायकांना आपापल्या जोडीदाराचं परक्यापासून संरक्षण करण्यावाचून (आणि/किंवा संरक्षण शक्य नसल्यास लज्जित / मत्सरित / क्रोधित होण्यावाचून) बाकी काही कामधंदे नसतात का काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/01/2016 - 19:47

In reply to by मेघना भुस्कुटे

या धाग्यावर समजून उमजून प्रतिसाद द्यायच्येत का? साॅरी हां, जरा विचार करून प्रतिसाद देते.
(या प्रतिसादाला बूच मारायला हरकत नाही.)

तिरशिंगराव Wed, 06/01/2016 - 19:58

तुमच्या पॉवरफुल्ल लाटण्यांखाली काही मंडळी अगदी लाटली जातायत!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/01/2016 - 21:45

In reply to by .शुचि.

"या धाग्यावर समजून उमजून प्रतिसाद द्यायच्येत का?" असं तिरसिंगरावांचंही झालं असणार. :ड

अस्वल Wed, 06/01/2016 - 23:16

रा.कु,
सॉरी..सगळे प्रतिसाद न वाचताच उत्तर देतोय..
नग्न/ अंगप्रदर्शन ( कसले पकाव शब्द आहेत हे! ) म्हणजे कामुक नव्हे. शर्लिन चोप्राचे मॅगझिनवरचे चाळे आणि एखाद्या मुलीने घातलेला शॉर्ट स्कर्ट एकाच मापात तोलू नका प्लीज!

माझी एक थेरी आहे.
पूर्वी स्त्रिया पूर्ण कपड्यांत वावरत. नख ते शिखान्त टायपात. तेव्हा एखाद्या स्त्रीची पोटरी दिसली तरी पुरूष मंडळी लगेच "तय्यार" होत.
मग स्त्रिया साड्यांमधून ड्रेसमधे आल्या. पुरूषांची नजर जायचा "एरिया" वाढला. तसा त्यांचा स्त्री-देहाकडे बघायचा toleranceसुद्धा वाढला.
नंतर स्कर्ट, मिनिस्कर्ट, मायक्रोस्कर्ट आले.
लेगिंग्स/जेगिंग्स आले-गेले-आले.
हॉट पँट्स आल्या.
आता तर बिकिनी वगैरे प्रकार आपल्याकडे पेप्रातून प्रांतात आले.

अशाप्रकारे पुरूष मंडळींचा "Tolerance" त्यामुळे वाढत गेला. आणि behold- एखाद्या दिवशी एखादी स्त्री संपूर्ण नग्नावस्थेत दिसली तरीही पुरूषांना त्याचं फारसं वावगं वाटणार नाही. - छोटी उत्क्रांतीच म्हणा ना.

----------------------
एक प्रामाणिक प्रश्न- माझ्या ओळखीतल्या एखाद्या मुलीने स्कर्ट घातलाय आणि तिचे पाय (legs!) अतिशय सुरेख दिसतायेत- तर मग त्याला दाद दिली तर बिघडलं कुठे?
आता हाच न्याय एखाद्या मुलीने लो-कट ब्लाऊज घातला तर लावता येईल का, त्याची कल्पना नाही.
----------------------
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत. मात्र त्यासाठी वेगळा धागा काढू नका. मी इथे वाट बघतोय.

आपला,
अस्वल.

राजेश कुलकर्णी Wed, 06/01/2016 - 23:32

In reply to by अस्वल

"माझ्या ओळखीतल्या एखाद्या मुलीने स्कर्ट घातलाय आणि तिचे पाय (legs!) अतिशय सुरेख दिसतायेत- तर मग त्याला दाद दिली तर बिघडलं कुठे"

पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीचा एखादा अवयव छान दिसतो असे म्हणणे हेच स्त्री भोगासाठी असल्याचे वाटत असल्याचे लक्षण आहे असे अनेकजण समजतील. कारण एखादीचे लेग्ज चांगले दिसत नाहीत म्हणजे काय असा प्रतिप्रश्न स्त्रियांकडूनच येऊ शकतो. सेक्सी ही कल्पनाच मुळात तशी आहे. अनेक स्त्रियांनाच त्याबद्दल काही वाटत नाही किंवा अनेकजणी त्याची पर्वा करत नाहीत हे वेगळे.

दुसरे म्हणजे तुम्ही कशाला दाद म्हणता व कशाला वासना म्हणता हे कसे ठरेल?

शिवाय सदर पोस्ट ही केवळ तोकड्या कपड्यांबद्दलची नाही. स्त्रिला भोगाची वस्तु समजण्याचे वातावरण उभे केले जात आहे, आणि आपण स्त्रीवरील अत्याचारांना केवळ पुरूषांची मानसिकता जबाबदार असते असे ऐकतो व म्हणतो.

अस्वल Thu, 07/01/2016 - 00:05

In reply to by राजेश कुलकर्णी

@"स्त्रीला भोगाची वस्तू समजणं" म्हणजे काय ह्यावर आपलं दुमत असावं.

पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीचा एखादा अवयव छान दिसतो असे म्हणणे हेच स्त्री भोगासाठी असल्याचे वाटत असल्याचे लक्षण आहे असे अनेकजण समजतील

तुझे केस/डोळे/पाय/ किती सुंदर आहेत = तुझे केस/डोळे/पाय भोगासाठी आहेत?
हे झेपलं नाही. सेक्सी ही बर्‍याच पुढची गोष्ट आहे हो. एकदम "तू छान दिसतेस" च्या ऐवजी "आती क्या?" म्हणायला आपण शक्ती कपूर आहोत का?

पण माझ्या थियरीबद्दल तुमचं काय मत आहे?
==========
जाहिराती/सिनेमातली आयटम वगैरेचं चित्रण आणि त्यांचा मुलांपर्‍यंत पोचल्याने होणारा संभाव्य परिणाम ह्याबद्दल अंशतः सहमत आहे.

राजेश कुलकर्णी Thu, 07/01/2016 - 00:31

In reply to by अस्वल

तुमची उत्क्रांतीची थियरी बहुतांशी मान्य. ही कोणाला लागू, तर बहुतांशी एकाच स्तरातील लोकांना.
मात्र अलीकडच्या समाजातील विविध स्तरावरील लोकांच्या अभिसरणामुळे ही उत्क्रांती विषम असण्याची शक्यता अधिक. त्यातही स्त्री अधिक उत्क्रांत व पुरूष कमी उत्क्रांत असेल तर. शिवाय जागतिकीकरणामुळे होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणामुळे येणारी असमानताही समाजातल्या अशा गोष्टींवरही प्रभाव टाकतेच.

"तुझे केस/डोळे/पाय/ किती सुंदर आहेत = तुझे केस/डोळे/पाय भोगासाठी आहेत?" मी म्हटले तसे हे कोण म्हणते आहे यावर बरेचसे अवलंबून.

अनु राव Thu, 07/01/2016 - 10:07

In reply to by राजेश कुलकर्णी

पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीचा एखादा अवयव छान दिसतो असे म्हणणे हेच स्त्री भोगासाठी असल्याचे वाटत असल्याचे लक्षण आहे

राकू - शरीर हे भोगासाठीच आहे. त्यामुळे कोणाला दुसर्‍या कोणाचे शरीर भोगवस्तु वाटले तर त्यात काहीही अयोग्य नाही.
बायकांना पण आपण "ऑब्जेक्ट ऑफ डीजायर" वाटायला पाहिजे असे मनापासुन वाटते. आणि तसे फीलींग जर पाहिजे त्या ( प्लीज नोट ) व्यक्तीने दिले नाही तर मानसिक त्रास पण होतो.

मनात कोणाला काहीही वाटो, जो पर्यंत कोणी जबरदस्ती करत नाही, तो पर्यंत काहीही हरकत नाही.

राकु आणि हेला काका. तुम्ही तुमच्या जुनाट एकारलेल्या न्युनगंड युक्त विचारातुन बाहेर या.

राजेश कुलकर्णी Thu, 07/01/2016 - 10:12

In reply to by अनु राव

"राकू - शरीर हे भोगासाठीच आहे. त्यामुळे कोणाला दुसर्‍या कोणाचे शरीर भोगवस्तु वाटले तर त्यात काहीही अयोग्य नाही.
बायकांना पण आपण "ऑब्जेक्ट ऑफ डीजायर" वाटायला पाहिजे असे मनापासुन वाटते."
आपले विचार फारच क्रांतिकारक आहेत. पण त्यांना समस्त स्त्रीवर्गाकडून अनुमोदन मिळेल असे वाटत नाही. बाकी तुमचे असे विचार असताना तुम्ही माझ्या विचारांना जुनाट, न्यूनगंडयुक्त म्हणता हेच मौजेचे आहे.
नमस्कार.

अनु राव Thu, 07/01/2016 - 10:17

In reply to by राजेश कुलकर्णी

त्यांना समस्त स्त्रीवर्गाकडून अनुमोदन मिळेल असे वाटत नाही.

राकु : तुम्हाला खरेच काही माहीती नाही हो.

राजेश कुलकर्णी Thu, 07/01/2016 - 15:31

In reply to by अनु राव

प्रत्येक स्त्री तशी (मी हे पुरूषांबद्दलही बोलतोय) असते हे तुमचे ग्ृहितक नक्कीच वास्तवाला धरून नाही. समोरच्याच्या नजरेत भरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शरीरप्रदर्शन करणे असा तुम्ही का घेता आहात कल्पना नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/01/2016 - 19:12

In reply to by राजेश कुलकर्णी

सर्वप्रथम मेघनानाला 'मम' म्हणत (भलता विचार इथे नाही करायचा हं!), अनुताई तुमच्याशी सहमती दर्शवत आहे. लवकर काही हालचाली करा बै!

आपले विचार फारच क्रांतिकारक आहेत. पण त्यांना समस्त स्त्रीवर्गाकडून अनुमोदन मिळेल असे वाटत नाही.

कशाला पाहिजे समस्त स्त्रीवर्गाकडून अनुमोदन? सगळ्या (हेटरो) स्त्रियांचं 'कोणता पुरुष सेक्सी वाटतो?' याबद्दल (मिलिंद सोमण वगळता) एकमत होणं शक्य नाही तर राजकीय मतांमध्ये कसं एकमत होईल?

मेघना भुस्कुटे Thu, 07/01/2016 - 10:25

In reply to by अनु राव

(हल्ली अनुताईंशी सहमतीची वेळ आली की मला तितकं दचकायला होत नाही. अनुताई, विचार करा, तुमचा 'टच' जात नाही ना चाललेला? ;-))

बर्‍याच अंशी सहमत आहे. भोगात वाईट काय आहे, ते मला कळत नाही. जबरदस्ती असता कामा नयेच. पण मलाही वाटतं असं काही पुरुष नटांचं शरीर बघून, की त्यांना भोगवस्तू समजावं मनातल्या मनात कधीतरी. कधीतरी इच्छा होण्यात, तशी शक्यता दिसल्यास तसा प्रस्ताव ठेवण्यात, कुणी तसा प्रस्ताव दिल्यास फुकटच्या फाकट तमाशा न करता प्रॅक्टिकली हो किंवा नाही म्हणण्यात - नक्की वाईट काय आहे?

हाच युक्तिवाद आपण थोडा निराळ्या प्रकारे करून बघू या. देहाच्या जागी पुस्तक आणि विशुद्ध, भोगविहीन (म्हणजे काय बोंबलायला काय ठाऊक) प्रेमाच्या जागी ज्ञान. आता जगातली सगळीच्या सगळी पुस्तकं पाहिल्यावर वाचावीशी वाटतात, याचा अर्थ आपल्याला ती वाचायला मिळतात-मिळाल्यास समजतात-समजल्यास दीर्घकालीन ज्ञान/आवड पुरवतात असं थोडंच आहे? पण हे ठाऊक असूनही होते इच्छा वाचायची - हे वाचायला मिळालं तर मजा येईल, असं वाटतं. शक्य झाल्यास पुस्तक चाळून पाहिलं जातं. मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यात काय चूक आहे? पुस्तक हिसकावून घेत नाही कुणाचं, तोवर "प्रॉब्लेम क्या है?"

'न'वी बाजू Thu, 07/01/2016 - 18:01

In reply to by मेघना भुस्कुटे

हाच युक्तिवाद आपण थोडा निराळ्या प्रकारे करून बघू या. देहाच्या जागी पुस्तक आणि विशुद्ध, भोगविहीन (म्हणजे काय बोंबलायला काय ठाऊक) प्रेमाच्या जागी ज्ञान. आता जगातली सगळीच्या सगळी पुस्तकं पाहिल्यावर वाचावीशी वाटतात, याचा अर्थ आपल्याला ती वाचायला मिळतात-मिळाल्यास समजतात-समजल्यास दीर्घकालीन ज्ञान/आवड पुरवतात असं थोडंच आहे? पण हे ठाऊक असूनही होते इच्छा वाचायची - हे वाचायला मिळालं तर मजा येईल, असं वाटतं. शक्य झाल्यास पुस्तक चाळून पाहिलं जातं. मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यात काय चूक आहे? पुस्तक हिसकावून घेत नाही कुणाचं, तोवर "प्रॉब्लेम क्या है?"

रोचक अनालोजी!

हीच अनालोजी तिच्या लॉजिकल कन्क्लूजनाप्रति ढकलण्याच्या प्रयत्नांत, 'लायब्री', 'उर्दू पद्धतीने वाचन' आदि संकल्पनांवर तूर्तास मनन करीत आहे.

(आमची झेप इथवरच.)

(तूर्तास 'रद्दी' ही संकल्पना 'अडवान्स्ड रीडिंग' म्हणून पुन्हा कधीतरी मननाकरिता पुढे ढकलली आहे.)
......................
(ता.क.: 'आपले वाचन खूप दांडगे आहे' या कॉम्प्लिमेण्टीच्या अर्थनिर्णयनाकरिता एक चांगले 'न'वे परिमाण मिळाले. असो.)

नितिन थत्ते Thu, 07/01/2016 - 17:53

In reply to by मेघना भुस्कुटे

मला मागे एकदा लायब्ररीतले एक पुस्तक आवडले. म्हणजे काय की त्याच्या 'कव्हरावर मजकूराविषयी सूचक चित्र' वगैरे होते. आणि 'आतला मजकूर' सुद्धा मला आवडेल असा असावा असा त्याच्या 'सारांशा'मुळे माझा समज झाला. त्यामुळे मला ते पुस्तक हवेसे वाटू लागले. परंतु ते पुस्तक बाहेर दुकानात काही मिळाले नाही.

मग 'अगदीच नाईलाज होऊन' मी ते पुस्तक वाचनालयातून 'घरी आणले' आणि वाचनालयाला 'न विचारता/परवानगी न घेता' ते पुस्तक 'ठेवून घेतले' आणि वाचनालयाला ते परतच केले नाही. नंतर अनेकवेळा त्या पुस्तकाचा 'उपभोग घेतला'
-----------------------------
जिज्ञासूंसाठी- ते पुस्तक रिलेटिव्हिटी थिअरी मराठीतून सांगणारे पुस्तक होते.

ऋषिकेश Thu, 07/01/2016 - 17:51

In reply to by अस्वल

यु टू अस्वल! ;)
बाकी, कशानेही चाळवणं शक्यच नव्हे तर ज्याच्या त्याच्या (वा जिच्या तिच्यासाठी) योग्यच आहे. अगदी पोटरीने नाहीतर कसेही.
प्रश्न चाळवण्याचा नसून चाळवल्यानंतर त्या व्यक्तीच्या भोगासाठी तिच्यावर (त्या व्यक्तीवर) त्या व्यक्तीची परवानगी नसताना बलप्रयोग करण्याचा.

नर आणि माद्यांकडे एकमेकांना आकर्षित करायचे अनेक उपाय आहेत आणि निसर्ग नियमाप्रमाणेच ते त्यांचा वापरही सढळ करतात, उद्दीपित होतात व परस्पर परवानगीने संभोगही करतात.

पण परस्परसहमती इज द की!

तुम्ही असे तथाकथित चाळवणारे कपडे घालता म्हणजे तुम्ही जी जी व्यक्ती त्या कपड्यात तुम्हाला बघेल त्या त्या व्यक्तीसोबत 'मज्जा' करायला तयार असलंच पाहिजेत आणि नसलात आणि त्याने बळजबरी केली तर दोष तुमचा!!!! ही जी काही मानसिकता आहे विरोध त्याचा आहे

इतका आणि हाच मुद्दा आहे

गब्बर सिंग Thu, 07/01/2016 - 23:13

In reply to by आदूबाळ

आहे ना !!! इथेच आहे.

( हम वहा है जहां से हमे कुछ अपनी ही खबर नही आती .... वगैरे डायलॉग जुने झाले. )

---

पण परस्परसहमती इज द की!

यही तो मै कह रहा हूं मालिक !!!

नितिन थत्ते Thu, 07/01/2016 - 18:00

In reply to by ऋषिकेश

तसे कपडे घातल्याने पुरुष चाळवले जाऊ शकतात आणि ते चाळवणे मान्य (अ‍ॅक्सेप्टेबल) आहे इथवर प्रवास या धाग्यावर झाला आहे हे या धाग्याचे मोठेच यश म्हणावे लागेल.

ऋषिकेश Thu, 07/01/2016 - 18:03

In reply to by नितिन थत्ते

हे अमान्य कोणी कधी केल्याचे सहज स्मरत नाही.
आता आमची स्मरणशक्तीही अनुरावजींसारखी (ह घ्या हं) कमी झाली असु शकतेही :प

मात्र यातही बारका मुद्दा असा की नक्की कोणी कशाने चाळवेल यावर कोणाचाही धरबंध नाही. आधी एका प्रतिसादात म्हटल्या प्रकाणे काही स्त्रिया पूर्ण नऊवारी घालूनच बेफाम सेक्सी दिसतात. त्यामुळे ते कपडे म्हणजे कोणते हे कोण ठरवणार?

नितिन थत्ते Fri, 08/01/2016 - 09:34

In reply to by ऋषिकेश

(फेमिनिस्टांच्या संपर्कात असल्याने) अशी मुक्ताफळे ऐकण्यात आली आहेत.

आम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते आम्ही घालणार !!! पुरुषांनी मात्र तिकडे बघायचं नाही.*

*जालावर काही काळापूर्वी एक व्हिडिओ फिरला होता. त्यात इंटरव्ह्यू घेणारा इसम इंटरव्ह्यूला आलेल्या मुलीच्या ड्रेसमधून (अस्पष्ट) दिसणार्‍या अवयवाकडे पाहताना दाखवला होता. आणि मग ती मुलगी बाणेदारपणे झाशीच्या राणीच्या आवेशात "तिकडे काय बघतोस सारखा?" असं विचारते. त्या विचारण्याचे कौतुक म्हणून तो व्हिडिओ शेअर केला जात होता. तेव्हा असे पाहणेसुद्धा चूक अशीच भावना (सज्जन) समाजात असण्याच्या संभव आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 08/01/2016 - 12:19

In reply to by नितिन थत्ते

या सगळ्या धाग्यावर थत्तेचाच्या काही विशिष्ट अवयव निरखून बघण्याच्या समर्थनार्थ बोलताहेत. त्या बघण्याला कुणी आक्षेप घेतला, तर लग्गेच 'बघा कसे दुटप्पी' असा काहीसा सूर त्यांच्या बोलण्यात जाणवतो आहे. म्हणून गंमत आणि खवचटपणा आणि तिरकेपणा बाजूला ठेवून> बघण्या-बघण्यात आपण फरक करतो की नाही? साधारणपणे उत्तरेकडे गेल्यास (दिल्लीमध्ये विशेषतः) पुरुष बायकांकडे ज्या नजरेनं पाहतात त्यात वखवख, हक्क, सत्ता स्पष्ट दिसते. अशा माणसाला उलटा खुन्नस दिला तरी त्याची नजर ओशाळत नाही. "बाई आहेस. आकारउकार दिसताहेत. झाकले नाहीस ही तुझी चूक. बघू नको तर काय करू? गप राहा. जास्त शाणपणा करू नको." अशी झाक त्याच्या नजरेत स्पष्ट दिसते. याउलट मुंबईत, संध्याकाळी एखाद्या महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरून चक्कर टाका. तिथेही लोक एकमेकांना मनःपूत पाहत असतात. पण त्या पाहण्यात ही गुर्मी नसते. कुणी कुणाला टापताना पकडलं गेलंच, तर चटकन नजर चुकवून इकडे-तिकडे पाहण्याइतकी ऋजुता तिथे बरेचदा दिसते. कधी नजरेला नजर दिली गेलीच, तर त्यात वर म्हटल्याप्रमाणे गुर्मी असण्याची शक्यता फारच कमी. नजरानजर सुरूच राहिली, तर त्यात काहीएक देवाणघेवाण-संवाद असतो. तसा नसता, केवळ एकतर्फी आक्रमण असेल, तर त्या बघण्याला काही भविष्य न उरण्याची शक्यता सगळ्या पक्षांना बरोबर माहीत असते.
या दोन्ही ठिकाणांमधला, या दोन्ही बघण्यांमधला फरक आपण लक्षात घेतो की नाही? 'आम्ही आम्हांला कम्फर्टेबल वाटेल ते घालणारच' असं म्हणण्याचा हक्क सगळ्याच समाजाला आहे. पण ते घातल्यानंतर आमच्याकडे पहिल्या प्रकारच्या नजरेनं पाहिलं गेलं, तर एक प्रकारचं आक्रमण आहे. त्या आक्रमणाला कोणीही, कोणत्याही प्रकारचं समर्थन देता कामा नये, यासाठी 'भोगवस्तू', 'उपभोगाची गोष्ट', 'वखवखलेली नजर', 'बुभुक्षित चाळे'... इत्यादी शब्दांना नकारात्मक भावना चिकटलेल्या आहेत. ते योग्यच आहे. या नकारात्मक अभिव्यक्तीचा गैरवापर दुसर्‍या प्रकारासाठी करायचा नाही, ही शहाणी - अलिखित मर्यादा आहे. ती शहाणे लोक जाणून असतात. आता गंमत आणि खवचटपणा आणि तिरकेपणासकट ;-)> थत्तेचाच्या, तुम्ही या दोन प्रकारांमधला फरक न ओळखण्याइतके येडे आहात का? की मुद्दामहून वेड पांघरून पेडगावला जाऊन सैतानाची वकिली करताय? की तुम्हांला आजवर एकही शहाणा फेमिनिस्ट भेटलेला नाही, इतके तुम्ही कमनशिबी आहात?>