Skip to main content

एक कॉन्डोम मिळेल का?

कविता काँडोम कॉंडोम

एक कॉन्डोम मिळेल का?

- स्वप्निल शेळके

एक कॉन्डोम मिळेल का ?
एक पर्मनंट कॉन्डोम मिळेल का ?
करपलेल्या इछांचा बांध फुटण्यासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?
कुढणार्‍या भीतीची गरळ झेलणारं
एक कॉन्डोम मिळेल का ?
ब्लोंड मिल्फ एमा स्टार्रच्या
टोकदार नाकाच्या शेंड्यासाठीसुद्धा
एक कॉन्डोम मिळेल का ?

एक कॉन्डोम हवंय पर्मनंट
ओलं होऊन सुकणार्‍या डायपरसारखं
फिट करून घेता येईल लिंगाच्या चहुबाजुने
ठोकूनठाकून मस्त असं
एक कॉन्डोम मिळेल का ?

दिवसभराचे थकवे गाळून
चैतन्य मिळवून देणारं
एक कॉन्डोम मिळेल का ?
डाग पडलेल्या अंडरवेअरच धुणं
आता रोज रोज आपटून नको वाटतय
मेंदुपासून पायापर्यंत फ्लो होतोय
विचारांचा झरा
त्याचा निचरा करण्यासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?

बिनाफ्लेवरचं
रिब्ड नसलेलं
थिन थिक डॉटेड
कसंही चालेल
पण लोंगलास्टच असणारं
एक कॉन्डोम मिळेल का ?

बस स्टँड
रेल्वे स्टेशन
एअर पोर्ट
वर्गातला तास
एकांतातील चकमक
कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो आपला डॉन जॉन
त्यासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?
न फाटनारं
एक कॉन्डोम मिळेल का ?
सतत
अव्याहत
चालू द्यावा म्हणतो
वासनेचा प्रवाह
शोषून घेणार्‍या कॉन्डोमच्या प्लास्टीकमध्ये
आणि
चालू राहू द्यावी ही
विपश्यनेची मुक्तीही
गाळ बाहेर टाकता टाकता

खरंच विचारतोय
एक कॉन्डोम मिळेल का ?
गरमी , एचआयव्ही
यापासून शतप्रतिशत बचावासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?
आणि जमलं तर
पर्मनंट संततीनियमनासाठीसुद्धा
एक कॉन्डोम मिळेल का ?

होता होईल तो
थोडं आधुनिक असावं कॉन्डोम
माझ्या आदिम नैसर्गिक चिकट वीर्याला
शोषून घ्यावं त्यानं ड्रायरच्या ताकदीनं
माझ्यातुन विलग करावं म्हणतोय
त्या अश्लील वीर्याला
यासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?
अगदी
स्टीम्युलस न येताच काढून घ्यावा त्यानं
वीर्याचा उरलासुरला प्रत्येक थेंब
लिंगातून मिटवून टाकावी
योनीची एकूणएक आठवण
कडकजवाहीरी आंतरपाट धरावा
योनी आणि माझ्या झपाटलेल्या लिंगात
असं
एक कॉन्डोम मिळेल का ?

ध्यानातून विचारांचं ऑब्जर्वेशन करून पाहिलं
विचार आले
विचार गेले
विचार न थांबवता आले
विचार न थांबवता गेले
यापेक्षा सरळ उकळवतच ठेवूया विचारांचा धबधबा
हा धबधबा झेलण्यासाठी
एक कॉन्डोम मिळेल का ?

***

कवीच्या सौजन्याने फेसबुकावरून पुनर्प्रकाशित

विशेषांक प्रकार

.शुचि. Thu, 02/06/2016 - 19:16

करपलेल्या इछांचा बांध फुटण्यासाठी

ह्म्म्म्म ..... इच्छेची fierce savage पराकोटीची तीव्रता बर्‍यापैकी पकडली आहे. कविता अजुन टोकदार आणि compelling हवी होती.

मेघना भुस्कुटे Tue, 14/06/2016 - 09:26

या कवितेची जातकुळीही अजिंक्य आणि वंकूकुमारच्या कवितेचीच आहे.

सगळं जगणंच मुळी एका सावधगिरीच्या-सुरक्षिततेच्या टोकापाशी येऊन फ्रीज झालेलं. हव्यास आहे, पण त्यालाही आकारात बांधून घ्यायचं आहे. रिस्क नको आहे कसलीच. संततिनियमन हवं आहे, मेंटेनन्स नको आहे कसलाच, विचारांचा धबधबाही झेलायचा नाहीय, 'उकळत' ठेवायचाय.

आणि कहर म्हणजे आंतरपाटासारखी प्रतिमा कॉन्डोमसाठी वापरून या सुरक्षिततेच्या कोंदणात कोंडलेल्या हव्यासाला आणि लग्नसंस्थेला एका पातळीवर आणून ठेवणं! आवडलीच कविता.