स्मरण
गायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)
दिनवैशिष्ट्य
२२ फेब्रुवारी
जन्मदिवस : तत्त्वज्ञ आर्थर शॉपेनहॉवर (१७८८), सिनेदिग्दर्शक लुई ब्युन्युएल (१९००)
मृत्यूदिवस : शोधक अमेरिगो व्हेस्पुच्ची (१५१२), सम्राट हुमायूं (१५५६), चित्रकार कामिय कोरो (१८७५), भाषातज्ज्ञ विचारवंत फेर्दिनांद सोस्यूर (१९१३), लेखक स्टीफन झ्वाईग (१९४२), कस्तुरबा गांधी (१९४४), चित्रकार ऑस्कर कोकोश्का (१९८०), बहुमाध्यमी कलाकार अँडी वॉरहॉल (१९८७)
---
१७५९ : मद्रासचा वेढा : इंग्रज सैन्यापुढे फ्रेंच सैन्याने माघार घेतली.
१९७४ : पाकिस्तानने बांगलादेशाला राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली.
१९९१ : सद्दाम हुसेनने कुवेतमधून आपले सैन्य माघारी घेतले नाही, तर युद्ध करण्याची धमकी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिली.
१९९७ : डॉली मेंढीचे क्लोनिंग यशस्वी झाल्याची घोषणा झाली.
२००२ : श्रीलंकेच्या सरकारने तमिळ वाघांशी युद्धबंदीचा करार केला.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- ..शुचि
- गवि
ऑंंखों के सागर
हे गाणं एकेकाळी बरंच फेमस होतं असं ऐकण्यात आलं आहे.
तरीही, मी हे पहिल्यांदाच ऐकलं आणि अतिशय तरल, हळव्या आवाजाच्या प्रेमात पडलोय. स्लो टेंपो मध्ये आवाज आणि स्वत:चा वेगळा ताल धरणारा ड्रम ऐकताना एक भन्नाट अनुभूती मिळते. कोक स्टुडीओ आवृत्ती झकास.
कोक स्टुडिओ आवृत्ती
मूळ आवृत्ती
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
ऑंंखों के सागर आवडलं असेल त
ऑंंखों के सागर आवडलं असेल तर फुझॉनचं 'खमाज' पण ऐका... नक्की आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=O5-c4a5EkLQ
हे ओरिजिनल गाणं कध्धीच ऐक
हे ओरिजिनल गाणं कध्धीच ऐकलंय... ऑल टाईम फेव्हरिट आहे. त्याचं कोक स्टुडिओ व्हर्शनही अफाट.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
किशोरीताई
माणिक वर्मांवर, किशोरीताई खूप छान बोलल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=I4cnTgPXa58
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
भिन्न षडज्
सुद्धा उपलब्ध आहे यु ट्यूब वर. या फिल्ममुळे "समांतर" सारखा तीव्र बंडल चित्रपट केल्याचा पालेकरांचा गुन्हा माफ केला मी.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
.
.
.
आज चं दिनवैशिष्ट्य "कजरे बदरवा रे" ... गाणं गर्ली आहे. दुसरं म्हंजे आरडीचं आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय.
.
हरिप्रसाद चौरसिया ग्रेट का
हरिप्रसाद चौरसिया ग्रेट का, हे बासरी एकदा तरी हातात धरली असेल तर बरंच लवकर आणि बरंच स्पष्ट कळतं.
जॉन मॅकलॉगलिन, चौरसिया, झाकीर हुसेन ह्यांचं- 'लोटस फीट'
फक्त चौरसियांचं- साऊंड्स ऑफ सायलेन्स
संपादन: लोटस फीट ज्यांनी केलंय, त्या लोकांचा बॅंड 'रीमेम्बर शक्ती.' त्यांची सगळीच गाणी ऐका. त्यातलं 'चंद्रकंस' कुठलंही काम करताना ब्याकग्रौंडला लावायला झक्कास आहे.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
(No subject)
.
.
---------------------------------
.
लताचा कोवळा आवाज आणि जयदेवचं
लताचा कोवळा आवाज आणि जयदेवचं संगीत!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अगदी अगदी. रेडवाईन चा एक
अगदी अगदी. रेडवाईन चा एक ग्लास घेऊन बसा. गाणं संपण्यापूर्वी डोळ्यात नमी येईल. न्याय शर्मा नावाच्या (मला) फारशा माहीती नसलेल्या शायराची शायरी.
दोन्ही गाणी आवडली.
लतादीदी डिजीटल युगात फॉर्मात असायला हव्या होत्या. इतक्या जुन्या गाण्यांत खरखरीतच आवाज ऐकू येतो. म्युझिक जबरी.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
पहिली गाणं आशाबाईंचं आहे.
पहिली गाणं आशाबाईंचं आहे. दुसरं लताबाईंचं.
लता सोलो हा एक भन्नाट प्रकार आहे. १९४० च्या दशकापासूनची गाणी उत्खनन करून ऐकावीत. विशेषत्: अनिल बिस्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली.
" सच हुए सपने मेरे " छान
" सच हुए सपने मेरे " छान आहे.
********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||
आज हे ऐकलं.
रिमझिम के तराने लेके...
गीता दत्त - मुहम्मद रफी
********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||
जन्मदिवस : संगीतकार रोशन
जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मस्तं!
मस्तं!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रोशनविषयी लताबाई
यस्स. रोशनविषयी लताबाई :
रोशन यांची उपेक्षाच झाली!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
याहुन श्रेष्ठ कव्वाली झाली
याहुन श्रेष्ठ कव्वाली झाली नाही. भारतभूषण सोडून सगळंच भन्नाट आहे या कव्वालीत.
इतका ऑर्केश्ट्रा, ३-४ गायक
इतका ऑर्केश्ट्रा, ३-४ गायक आणि १०-१२ मिनिटाचे वेगवेगळ्या टेंपोमधे बसवलेले गाणे. २४ तास रेकॉर्डिंग चालु होते म्हणे.
भारतभूषण सोडून ...
पण, तो उठून पेटीवर जाऊन बसला, म्हणून तर त्यांची पार्टी जिंकली! फक्त मधुबालेच्या घरचा, एक रेडिओ मोडला, इतकंच!
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
तो उठून पेटीवर जाऊन बस
कावळा बसला व फांदी ....
लय भारी हो !!
लय भारी हो !!
पुण्यतिथी - संगीतकार मदनमोहन
पुण्यतिथी - संगीतकार मदनमोहन (१९७५)
.
.
.
.
.
.
या गाण्यात २:१५ ते २:२० च्या आसपास मीनाकुमारीने गळ्यातली माळ ओठात ...... क्या अदा है !!! कलेजा खल्लास !!!
.
.
दीपक देशपांडे
Deepak DeshpandeDeepak Deshpande
उच्च दर्जाची मराठि कॉमेडी.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मस्तच !
मस्तच ! आवडले.
महाराज लंकापुरी
माझी आई तिच्या गोड आवाजात लहानपणी एक गाणं म्हणत असे. त्यातले काही शब्द असे - महाराज लंकापुरी , परी राज्य नगरी, आनंद करिती हो नर नारी, गुढ्या तोरणे, तोरणे घरोघरी, कल्पवृक्ष असे दारी, गुढ्या तोरणे. हे गाणं अत्यंत मधुर आहे नि मी कधी रेडिओ वर पण ऐकलं नाही. कोणाला ठाऊक आहे का हे गाणं? गुगलवर/युत्युब्वर नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बाबुल मोरा ... भिमण्णांच्या आवाजात्...
गब्बु, त्याच भैरवीचे फुल
गब्बु, त्याच भैरवीचे फुल व्हर्जन्. शब्दातित आहे. १७:२५ पासुन पुढची २०-३० सेकंद काटा आणणारी आहेत्.
यांच्या गाण्याबद्दल काय
यांच्या गाण्याबद्दल काय बोलणारा आम्ही पण यांचा आवाज थोडा अग्रेसिव्ह आहे आणि त्यामुळे हे नाजुक गाणं आणि त्यांचा अॅग्रेसिव आवाज थोडं मिस्फिट वाटलं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सिएम्प्रे मे केदारा
हे एक स्पॅनिश गाणं. ह्या गायिकेची बाकी गाणी अजिबात आवडली नाहीत, पण हे जबरदस्त आहे.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
या गाण्यापेक्षा अधिक रोमॅंटिक
.
या गाण्यापेक्षा अधिक रोमॅंटिक गाणं झालं नाही.....
.
.
,
,
.
.
.
च्यायला ..... वहिनी बरोबर रोमॅंटिक राडे करतोय साला.
धोपटला पायजे साल्याला.
.
.
.
व्हाय सो सिरीयस?
हे हलक्या फुलक्या मूड चं सोना महापात्राचं गाणं एकदम झक्कासय
आजा वे...
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
व्हाय सो सिरीयस?
हे हलक्या फुलक्या मूड चं सोना महापात्राचं गाणं एकदम झक्कासय
आजा वे...
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
पुण्यातलं कोणी दगडूशेठ ह
पुण्यातलं कोणी दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या सांस्कृतिक महोत्सवाला जातं आहे का? मी सोमवारी उल्हास कशाळकरांच्या गाण्याला गेलो होतो. गौड मल्हार, मेघ मल्हार आणि भैरवी गायले. पुढल्या आठवड्यात हरि प्रसाद चौरासिया, शिव कुमार शर्मा वगैरे मोठी मंडळींचे कार्यक्रम आहेत.
उल्हास कशाळकर झक्कास
उल्हास कशाळकर झक्कास गातात असं ऐकून आहे.
रोमानियन...
थोडं प्लस मायनस एक्सक्युझावं, पण हे गाणं समजत नसलं तरी आमच्या इंजिनीयरींगच्या ग्रुप्पला पाठ झालं होतं. शब्दांचं कुणाला पडलं होतं, गाण लै आवडलं होतं. एकदा ऐकाच (ऐका म्हणजे बघितलं नै तरी चालू शकेल)
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
जबरी!
तसंच हे गाणं आमच्या फिजीक्स ग्रुपवाल्यांचं आहे. फेस्ट संपला, ट्रेक संपला, चहा संपला, उत्साह संपला, कॉलेज संपलं की हे गाणं लावून खाली आलेले ढग दोन्ही हातांनी परत आकाशात ढकलायची अॅक्शन करत करत नाचायचं.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
राजा काळे
राजा काळेंबद्दल पेप्रांत बरंच कौतुकाने लिहीलं जातं. पयलेछूट हे सांगू द्या, की मला शास्त्रीय संगीतात अजिबात गती नाही. साधे साधे राग ओळखता येतात. तर, फक्त १०० रुपयांत राजा काळे लाइव्ह ऐकायला मिळणार म्हणून मुंबई एनसीपीएला गेलेलो मध्यंतरी. तिथे मिनी मध्ये त्यांची मैफिल होती. थिएटर पाव भरलेलं. गेलो, तेव्हा ते भूप राग आळवत होते. थोडा वेळ मी ऐकायचा प्रयत्न केला पण ते आवडलं नाही. त्यांचा आवाज बसला असल्यासारखा येत होता. एरवी भाटे किंवा बाकी लोक गातात तेव्हा आवाज जसा लागतो तो अजिबात नव्हता. नंतर त्यांनी जो घेतला तो बहुतेक दुर्गा वाटला. नंतर पूरिया धनाश्री. मला वाटलं ते आवाज तापणे वगैरे झाल्यावर हे छान वाटायला लागेल. प्रत्येक राग संपला की एक-दोन, एक दोन लोक्स उठून जात होते. काही काही मध्येचही. शेवटी एकाने फर्माईश 'इतना तो करना स्वामी'ची केली. ते मात्र छान वाटलं, (तौलनिकदृष्ट्या.) नंतर अगदीच दहा बारा लोक राहिले. मग ते म्हणाले, की "गाऊ, की थांबवू?" बाकी आधीची बंदिश संपताना शेवटचे लोक बाहेर जाताना काळेंनी त्यांच्याकडे जसं पाहिलेलं, तेव्हाची त्यांची मुद्रा पाहून मला तरी काही 'गा' म्हणावंसं वाटलं नाही. मैफिल संपली. उरलेले लोक्स जाऊन त्यांच्याशी सलगी वाढवायचा प्रयत्न करु लागले, काहींनी कबड्डी खेळत असल्यासारखं त्यांच्या पायांपाशी केलं. मी सरळ चालू पडलो. दुसऱ्या दिवशी चौरसिया आणि कुरेशींची जुगलबंदी होती, जिची तिकीटं घरी पोहोचेपर्यंत सोल्ड आऊट झालेली. असो. माझा काही उत्साह राहिला नव्हता.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
'बेनी लावा'
गाण्याची भाषा कोणती किंवा खरा अर्थ काय, ते सर्व मरू द्या. बस फक्त शब्द कान देऊन नीट ऐका नि त्याचबरोबर सबटायटल्स वाचा... हॅव फन!
https://youtu.be/sdyC1BrQd6g
आयायायाया.... लै वाईट्ट...
आयायायाया.... लै वाईट्ट...
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
(No subject)
The onion
विश्वावा षंबोर्स्काच्या काही कविता मागे वाचल्या होत्या. त्यातली ही एक आवडली होती. कदाचित आधीही कधी ऐसीवर डकवली असेन मी.
The onion, now that's something else.
Its innards don't exist.
Nothing but pure onionhood
fills this devout onionist.
Oniony on the inside,
onionesque it appears.
It follows its own daimonion
without our human tears.
Our skin is just a cover-up
for the land where none dare go,
an internal inferno,
the anathema of anatomy.
In an onion there's only onion
from its top to its toe,
onionymous monomania
unanimous omninudity.
At peace, of a piece,
internally at rest.
Inside it, there's a smaller one
of undiminished worth.
The second holds a third one,
the third contains a fourth.
A centripetal fugue.
Polyphony compressed.
Nature's rotundest tummy,
its greatest success story,
the onion drapes itself in its
own aureoles of glory.
We hold veins, nerves, and fat,
secretions' secret sections.
Not for us such idiotic
onionoid perfections.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अत्यंत सुरेख आणि अर्थपूर्ण कविता
अत्यंत अर्थपूर्ण कविता। विशेषतः
Our skin is just a cover-up
for the land where none dare go,
an internal inferno,
the anathema of anatomy.
ह्या ओळी अत्यंत piercing आहेत। इतकी अप्रतिम कविता
Share करण्याबद्दल धन्यवाद।
सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।
https://www.facebook.com
https://www.facebook.com/SmrutigandhaMarathi/videos/367367290346903/
.
.
सुरेश वाडकरांचे 'दयाघना' आपण खूप वेळा ऐकले असाल. राहुल देशपांडे हे गीत सादर करतानाचा हा व्हिडीओ अवश्य बघा !
गीतकार : सुधीर मोघे, गायक : सुरेश वाडकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
फेसबुकचे ते पानच लाईक केले
फेसबुकचे ते पानच लाईक केले आहे. सुंदर आहे. धन्यवाद.
.
https://www.facebook.com/SmrutigandhaMarathi/?hc_ref=ARRhncTVZbC7niqmUob...
दयाघना
उत्तम प्रेझेंटेशन. खळे स्टाईलमधे, हृदयनाथचं गाणं ऐकावं, तसं वाटलं. (म्हणजे तालाला सायडिंगला टाकूनही तालात!)
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
दर्शनाचा लाभ घ्यावा ...
********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||
त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि !!!
त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि !!!
नाट्यसंगीत आणि ग्रंज फ्यूजन
अलिकडे हा व्हिडीओ पाहण्यात आला. सुरुवातीचं इलेक्ट्रिक गिटारवर वाजवलेलं भारी आहे. नक्की ऐका. गायिकेचा आवाज अगदीच टाकाऊ.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
खुप छान, आवडला. गायिकेचा आवाज
खुप छान, आवडला. गायिकेचा आवाज रॉक संगीतासाठी बरा आहे. अमेय गावंद चा ग्रुप ही बराच आहे.
[https://m.youtube.com/watch?v=tthM-fTR-vQ] [Amey Gawand - Raag Jog Fusion {Acoustic} - YouTube] is good,have a look at it!
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
चौदावे , धन्यवाद . नवीन
चौदावे , धन्यवाद . नवीन प्रयोग !!! गायिकेचा आवाज सुमार आहे याच्याशी सहमत . लीड गिटार नोटभरहुकूम . ( पण मिन्ड काढण्याची सुवर्णसंधी वाया घालवलीय असं वाटतं का ? )
होय, बरीच.
शरण वर कातील मींड घेता आली असती, तीही दरवेळी वेगवेगळी. इलेक्ट्रीक गिटार वर तर जबरदस्त काढता आली असती... असो. हे असं अधिक ऐकायला मिळावं बाकी.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
ताईंच्या आवाजाने कानाला चरे
ताईंच्या आवाजाने कानाला चरे पडले.
पण प्रकार भारी हे नक्की.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
बापटण्णा, हे खरे आहे का?
बापटण्णा, हे खरे आहे का?
http://www.loksatta.com/coverstory-news/metal-music-blue-wheal-1535699/
खरं खोटं मी कसं सांगू अनुताई
खरं खोटं मी कसं सांगू अनुताई ?
हेवी मेटल बरेच आरोप बरीच मंडळी आपापल्या चवींनुसार करू शकतील , पण आत्ताच्या घडीला त्यामुळे कोणी आत्महत्येला प्रवृत्त होतोय हे ज .... रा जास्त ओढून ताणून वाटते .
गझल
रवी दातेंच्या दोन सुंदर गझला सुरेश वाडकर आणि देवकी पंडितांच्या आवाजात
सारेगामा कॅरव्हान खरेदी केला.
सारेगामा कॅरव्हान खरेदी केला. फारच मस्तं प्रकार आहे. प्रचंड आवडला.
http://www.saregama.com/carvaan
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे मल्लू गाणं सध्या धुमाकूळ
हे मल्लू गाणं सध्या धुमाकूळ घालतंय सगळीकडे. खूप आवडलं. त्यातली ती मुलगी तर अजूनच.
https://www.youtube.com/watch?v=Och5LmLGQjI
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वरीजनल... सध्या लूप वर
वरीजनल... सध्या लूप वर आईकल्यामुळे पाठ झालंय... थ्यांक्स टू यू...
माझ्या आईच्या कानातले झुमके बाबानी चोरले

आईने बाबांची ब्रांडीची बाटली पिऊन संपवली...
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
बॅटमॅनने दिलेलं व्हर्जन
बॅटमॅनने दिलेलं व्हर्जन जास्तं चांग्लं आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
तुम्हाला त्या पोरी जास्त
तुम्हाला त्या पोरी जास्त आवडल्या असं म्हणायला हरकत नव्हती...
गाणं तेच आहे
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
प्रश्न
आमच्यासाठी पालींचे व्हर्जन कोठे मिळेल?
बंगालात मिळेल. लालबालपाल आठवा
बंगालात मिळेल. लालबालपाल आठवा.
अरबस्तानात गेलात तर पालीचा बाल होईल ते एक लक्षात असूद्यात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुन्हा एकदा , पुन्हा पुन्हा
पुन्हा एकदा , पुन्हा पुन्हा एकदा ...
Who wants to live forever ....
https://www.youtube.com/watch?v=_Jtpf8N5IDE
हे गाणं पुन्हा पुढे घेतोय ,
हे गाणं पुन्हा पुढे घेतोय , फ्रेडी बाबाचं स्मृतिदिन आज म्हणून
https://www.youtube.com/watch?v=_Jtpf8N5IDE
सुप्परमच्छी...
सन अॉफ सत्थ्यमुर्थी मधले एक झ्याक गाणं
https://m.youtube.com/watch?v=y1RdFITcoEY
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
अ स्टटर
टेकन ३ ह्या तद्दन मारधाडपटातलं हे गाणं. असंच एकदा मिळालं. संगीत फारच उच्च पातळीवरचं आहे. कविताही सुंदर आहे. शांतता हवीच असेल गाण्यातून; तर ती इथे मिळेल.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
गर्लफ्रेंड...
बॉइज मधलं छान गाणं
girlfriend
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
गर्लफ्रेंड...
बॉइज मधलं छान गाणं
girlfriend
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
गर्लफ्रेंड...
बॉइज मधलं छान गाणं
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
गर्लफ्रेंड...
बॉइज मधलं छान गाणं
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
'द सेल्समन' साउंडट्रॅक व तेहरान वॉल्ट्झ
नुकताच अॅमेझॉन प्राईमवर असगर फरहादीचा 'द सेल्समन' परत पाहिला. तेव्हापासून त्याचा साउंडट्रॅक सतत ऐकतोय. तिथेच युट्यूबवर शेजारी तेहरान वॉल्ट्झ म्हणून एक फीत सापडली, तीही मस्त आहे.
बोअर झालेला राव मला तो पिच्चर
बोअर झालेला राव मला तो पिच्चर. तसा रिअलिस्टिक वगैरे आहे परंतु समाधानकारक ठाशीव शेवटच नसल्यामुळे केएलपैड्य आले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिहिरजी
ट्रॅक फारच आवडला. शेजारच्या प्लेलिष्टित माझ्या एका लाडक्या बँडचा ट्रॅक सापडला आणि मी गुगल म्युजिकवर परत सगळे ट्रॅक्स ऐकायला घेतलेत. बँड आहे मालकांच्या ऑष्टिनातला Balmorhea.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
अ सेपरेशन
मग शेजारचा फरहादीच्याच 'सेपरेशन'चा ट्रॅकही ऐका. आणि पाहिला नसेल तर चित्रपटही पाहा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सेपरेशन
मिपावरचं तुमचं परीक्षण वाचल्यानंतर खूप वेळा पाहिलाय आणि अनेकांना दाखवलायही. अतिशय आवडलेला चित्रपट!
आभार
अॅमेझॉन प्राईमच्या टिपबद्दल आभार, मिहिर. दिवाळीनंतर 'द सेल्समन'.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
संगीतचौर्य
मागे ॲकॉर्डिअनची जी थीम आहे, ती 'बर्फी'मध्ये प्रीतमने सरळ उचललेली आहे.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
@१४टॅन - सेल्समन - बर्फी
अहो, हा 'बर्फी' चित्रपट 'सेल्समन'च्या खूप आधी आला आहे. 'बर्फी'तलं ॲकॉर्डिअन ढापलं आहे ते 'आमेली' चित्रपटातून. तेच नाही तर रंगसंगतीही ढापलेली आहे.
मला हे 'सेल्समन'चं संगीत काही नवं वाटलं नाही. 'आमेली'पेक्षा वेगळं काही दिसलं नाही. उलट 'आमेली' संगीतात कितीतरी छटा आहेत. चित्रपटात प्रसंगांना हे साजेसं असेलच, पण स्वतंत्र असं उल्लेखनीय काही वाटलं नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=3hBKBehjIxs
युट्युब वर वसंतरावांचा २ तासाचा अमेरिकेतल्या मैफिलिचा लाईव्ह व्हीडिओ आलेला आहे.
आधी ऐकला होता, आता बघितला.
Vasantrao Deshpande Live in Philadelphia - YouTube
. .
.
.
.
.
.
.
लताबाईंचा अतिकोवळा आवाज... जोडीला किशोरदा.
.
.
(No subject)
सगळ्यांच्या पलीकडचा असा आमचा
सगळ्यांच्या पलीकडचा असा आमचा प्रातःस्मरणीय जॉन लेनन याच्या वाढदिवसाची नोंद घेतल्याबद्दल (अपुरूषेय का अपौरुषेय का काय ते )दिन वैशिष्ट्यचे आभार !! बघा आणि ऐका
https://www.youtube.com/watch?v=XLgYAHHkPFs
हे एक खूप छान गाणे ऐकले --
हे एक खूप छान गाणे ऐकले --
https://youtu.be/VqkBvFERubg
********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||
होय छःआन आहे हे गाणं.
होय छःआन आहे हे गाणं.
Eyes wide shut मधला smooth
Eyes wide shut मधला smooth jazz मस्त आहे!
आणि joking jazz तर लय भारी आहे
===
Amazing Amy (◣_◢)
एक अत्यंत दुर्मिळ कार्यक्रम:
एक अत्यंत दुर्मिळ कार्यक्रम: प्रसिद्ध गायक व पुलंबरोबर काम केलेले लालजी देसाई, यांच्या लग्नानिमित्त, माणिक वर्मा यांची एक खास मैफिल आयोजण्यांत आली होती. ही साधारण १९६०-६५ मधली घटना आहे. त्यांत ,रंगरेखा घेऊनी मी, हे प्रसिद्ध भावगीत त्यांनी सादर केले होते. तीन मिनिटांच्या मूळ भावगीतावर त्यांनी सजवलेला साज पहा. आम्ही आज ५० वर्षे तरी या गाण्याची पारायणे केली आहेत.
Manik Varma Rangrekha
त्याचबरोबर नाथ हा माझा ची लिंक पण देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=wmLrd9edph4&index=2&list=PLrt18iZbfWnH2D...
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
उत्तम!
'नाथ हा माझा'चा ऑडिओ उपलब्ध असेल तर पाठवा, तो जरा साफ करून ऐकीन म्हणतो. डिस्टर्बन्स बराच आहे.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
नवीन अय्यरची बासरी सापडली
नवीन अय्यरची बासरी सापडली
लिंक:https://youtube.com/watch?v=szz7ShYgiRI
या मैथिली ठाकूर या मुली ने
या मैथिली ठाकूर या मुली ने धुमाकूळ घातलाय ...
.
.
मैं चला
उदास, बोरिंग दिवशी कोक स्टुडिओ पाकिस्तान जरूर ऐकावा. मूड बहलतो. अली अझ्मतचं हे गाणं-
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
स्टेअरवे टू हेवन .
https://www.youtube.com/watch?v=78AhpI0laT4
स्टेअरवे टू हेवन ...
कितव्यांदा कुणास ठाऊक . हे गाणं डोक्यातून जात नाही ..
कुठल्याही ग्रेट गाण्यांच्या लिस्टीत सापडेलच बघा हे तुम्हाला . "अँथेम " . रॉक ची .
आर्त सुरुवात करून माग टेम्पो वाढवल्यावर चा रॉबर्ट प्लांट चा शेवटच्या भागातला आवाज अजूनही झेपत नाही .
जिमी पेज यांची गिटार ऐकाच , विशेषतः मधला सोलो. आणि पहिल्या अर्ध्या भागात संपूर्ण ऑफ बीट कॉर्ड्स , कसं वाटतं बघा ..
या दोघांच्या थोरवी मध्ये जॉन बोनहॅम चे ड्रम उठून दिसत नाहीत , पण इतके सुयोग्य आणि कॉम्प्लेक्स ड्रम्स सापडणार नाहीत फार .
ऐकाच म्हणतो एकदा .
रम्बल
बापट आणि इतर समकालीन लोकप्रिय पाश्चात्त्य संगीताच्या चाहत्यांना आवडेल असा एक चित्रपट 'पिफ'मध्ये आला होता : 'रम्बल - द इंडियन्स हू रॉक्ड द वर्ल्ड' अमेरिकेतल्या मूलनिवासींचं पारंपरिक संगीत आणि फोक-ब्लूज-रॉक-मेटलपर्यंत गेलेले त्याचे धागेदोरे असा विषय होता. सुरेख संगीत ऐकायला मिळालं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जंतू , धन्यवाद .
जंतू , धन्यवाद .
हि डॉक्युमेंटरी नेट वरती किंवा सीडी फॉर्म मध्ये उपलब्ध आहे किंवा कसे याबद्दल काही माहिती आहे का ?
बघायला नक्की आवडेल .
जॅम
संगीताची पार्श्वभूमी असलेला पिफमधला आणखी एक चित्रपट - जॅम. रेबेतिको म्हणून ओळखलं जाणारं पारंपरिक (ग्रीक?) संगीत आजी-आईकडून वारशानं आलेलं आहे आणि आताच्या आर्थिक मंदीच्या काळात ते जिवंत ठेवू पाहणारी तुर्को-ग्रीक मुलगी जगण्याशी संघर्ष करते आहे अशी गोष्ट होती.
चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री-गायिका त्याच परंपरेतल्या संगीताचा एक तुकडा सादर करताना -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अबापट यांनी दिलेलं हेवन ऐकलं.
अबापट यांनी दिलेलं हेवन ऐकलं. वाद्यांचा गोंगाट,खडखडाट/ठणठणाट नाही त्यात.
खफवर लिहिलेलं Bafut पुस्तक ( १९४९, कॅमरूनमधून लंडनच्या झूसाठी लेखकाने प्राणी आणले त्याची गोष्ट, )
त्याची पिडीएफ लिंक अमुककडून मिळाली. ते पुस्तक ऐकलं. छान आहे,माझ्या आवडीचा विषय आहे.
मोबाइलमधून डाउनलोड केलेली पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो,त्रासही होतो. pdf ऐकवणारी अॅप मदतीला आली. ePub पुस्तके ऐकवणारी अॅप नसली तरी त्याचे pdf करून मिळते ओनलाइन. काम सोपे झाले.
pdf चे txt केले तर टिव्हि स्क्रीनवरही पाहता येते. ( त्यात photo -video - audio - text पर्याय असतात.)
फ्री बर्ड लिनर्ड स्किनर्ड
किंग्समन , द सीक्रेट सर्विस परवा कुठल्यातरी चॅनेल वर लागलं होतं . शेवटचा धमासान कापाकापी चा सीन चालू असताना पार्श्वसंगीत म्हणून गिटार ची फास्ट टेम्पो मधील जबरदस्त जुगलबंदी चालू झाली आणि आठवणी चाळवल्या . ' फ्री बर्ड 'या खास लिनर्ड स्किनर्ड च्या गाण्याची . हेच गाणं फॉरेस्ट गम्प ( यात यांचंच स्वीट होम अलाबामा पण आहे ) , (ढेरेंचं) सिम्पसन्स , हाऊस ऑफ कार्ड्स , एव्हरीबडी लव्हज रेमंड , दॅट सेव्हन्टीज शो , फॅमिली गाय आणि इतर काही चित्रपटात आणि सिरियल्स मध्ये वापरलं गेलंय . गाणं १९७३ मधील आहे.
'लिनर्ड स्किनर्ड' म्हणजे सदर्न रॉक या रॉक च्या सबजॉनर मधील अतिशय लोकप्रिय करणारा बँड . सदर्न रॉक वाली मंडळी ( अमेरिकन स्टँडर्ड्स नी ) गरीब आर्थिक परिस्थितीतील , फारसे न शिकलेले , वर्किंग क्लास वाले . थोडक्यात न उच्चभ्रू . ( त्यामुळेच बहुधा ) यांच्या गाण्याच्या लिरिक्स मध्ये फारसे 'वैश्विक भान ', हेवी तत्वज्ञान , किंवा सराईत कवींची सफाई वगैरे शोधू नये . लिरिकली ही सिम्पलटन्स ची गाणी असतात . गिटार आणि ड्रम्स मध्ये मात्र हि मंडळी दादा . कौशल्यपूर्ण .
काही लोकांच्या मते रॉक च्या इतिहासातील स्टेअरवे टू हेवन ला टक्कर देईल इतके दमदार हे गाणे . ( पण सालं इथं पण पुण्यामुंबईचं { पक्षी : ब्रिटिशांचं } वर्चस्व . कोल्लापूर { पक्षी दक्षिणी राज्य : अलाबामा , फ्लोरिडा , टेक्सास , लुईसियाना } यांच्यावर अन्याव आणि अनुशेष .
[आता अदिती तिथे गेल्या आहेत त्यामुळे लढा तीव्र होईल आणि हा अन्याय कमी होईल बहुधा . ]१९७० साली फॉर्म झालेला पण १९७७ साली विमान अपघातात तीन मुख्य मेम्बर मृत्यू पावल्याने काही काळ थांबलेला हा ग्रुप ' लिनर्ड स्किनर्ड' म्हणजे सिग्नेचर सदर्न रॉक . इगल्स प्रमाणेच एकाहून जास्त कुशल लीड गिटारिस्ट असलेल्या या ग्रुप च्या गाण्यांमध्ये दमदार गिटार ड्रम्स आणि व्होकलस नेहमी असते . या गाण्याची एक गम्मत सांगतो . कुठल्याशा एका कॉन्सर्ट मध्ये यांनी सगळ्यात शेवटी हे गाणे एक्सटेंडेड , पंधरा मिनिटे वगैरे वाजवले . तेव्हापासून त्यांच्या कुठल्याही कॉन्सर्ट ला शेवटी हेच्च गाणे वाजवायची फर्माईश पब्लिक करून लागले . नंतर हे फॅड असे पसरले कि कुठलाही बँड परफॉर्म करत असेल तरी लोकं सगळ्यात शेवटी लोकं 'फ्री बर्ड पायजेल 'असं (त्यांच्या भाषेत आणि टोन मध्ये ) बोंबलू लागली आणि खास लोकेच्छेमुळे इतर बँड्सना ते सादर करावे लागे . म्हणे .
लिनर्ड स्किनर्ड म्हणजे सिग्नेचर सदर्न रॉक .
फ्री बर्ड म्हणजे सिग्नेचर लिनर्ड स्किनर्ड.
गाण्यात फार अर्थ वगैरे शोधू नका नका .सुरुवात स्लो टेम्पो ने . ऐका सुरुवातीचे स्लाईड गिटार आणि शेवटची इलेक्ट्रिक गिटार्स ची फास्ट टेम्पो मधील जुगलबंदी आणि त्यालासाजेशी ड्रम्स ची साथ . ( हि अशी गिटार वाजवायला लै म्हणजे लैच दम आणि कौशल्य लागतं . )
पहिला देतोय ऑफिशिअल व्हिडिओ . मस्त आहेच
https://www.youtube.com/watch?v=D0W1v0kOELA
पण त्याहून जास्त ही लाईव्ह व्हर्जन ऐका .. ग्रुप विमान अपघातात मरण्याआधी दोन चार महिने परफॉर्म केलेली .
दोन कारणांमुळे
१. यात बिली पॉवेल ला पियानो वर थोडे कौशल्य दाखवायची संधी मिळाली आहे .
२. अॅलन कोलीन्स आणि स्टीव्ह गेन्स ची लीड गिटारची जुगलबंदी .. विशेषतः साडेसहा मिनिटांपासून पुढे पाच मिनिटे . थोर आहे हे . फुल्ल कल्ला .
या एका गाण्यापुरतं बँड चा लिडर आणि गायक रॉनी व्हॅन ( कि फॅन ) Zannt ला विसरू शकतो . कारण हिरो गिटार्स आहेत
कॅमेरॅमन हरामखोर आहे . कॅमेरा जास्त वेळ कमी कपड्यातल्या मुलींवर फिरवलाय . खरं तर कॅमेरा फुल फ्रेम दोन्ही गिटार्स वर पाहिजे , निदान शेवटच्या जुगलबंदी च्या वेळी तरी )
https://www.youtube.com/watch?v=QxIWDmmqZzY
दोन्ही गाणी पाहिली,ऐकली.
दोन्ही गाणी पाहिली,ऐकली. गिटार मस्त वाजतय पहिल्यात घोडे पळताहेत तेव्हा.
हो घेतो ही गाणी.
हो घेतो ही गाणी.
भिमण्णा व जसराज.
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
बाबांशिवाय दुसय्रा कुणाला
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.