अकरा तारखेची अकरा वर्षे

अकरा तारखेची अकरा वर्षे.....
आज, म्हणजे ११ सप्टेंबरला अकरा वर्षे पूर्ण होतील.
अकरा वर्षे झाली. घडले तेव्हा जगभर टीव्हीवर प्रसारितही झाले. आख्ख्या जगाला दिसले. तरीही मुळात घडले काय हेच अजून कुणाला ठाउक नाही म्हणतात.
ज्याने ते घडवल्याचा आरोप केला जातो, त्याला खलनायक दाखवलं जातं. त्याच्या ह्याच कामगिरीमुळं कित्येकांचा तो "हिरो" ठरला. त्याचा पूर्वेतिहास पाहता, त्यानेच हे घडवलेले असणे अशक्य वाटत नाही.
कुठल्याही मोठ्या घटनेबद्द्ल काही कॉन्स्पिरसी थिअरीज नेहमीच असतात. अगदि मर्लिन मन्रो हिच्या हत्येपासून , ताजमहालाच्या निर्मात्यापर्यंत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते खुद्द गाजलेलं " मानवाचं चंद्रावरचं पहिलं पाउल ".
दुनिया आहे ती अशी आहे. इथे काहीही निर्विवाद नाही. अगणित शक्याशक्यतांचा गलबला असाच राहणार.
अर्थातच तो पूर्वीही असावा. पण तेव्हा असा माध्यमांचा स्फोट झालेला नव्हता. प्रत्येकजण(माझ्यासारखेच) स्वतःला भारताचे/जगाचे भले चिंतणारा समजत प्रत्येक हेडलाइनवर, आशा - लता ह्यांच्या मतावर नि राजकिय नेत्यांनी दरदिवशी सोयीनं दिलेल्य वक्तव्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत नसायचा. त्याच्या मनोविश्वात त्याच्या स्वतःच्या जगाची जागा बरीच मोठी. पण माध्यम ध्वम फुटला आणि चित्र बदललं. तशातच आख्ख्या जगाला " त्यांच्यातले की आमच्यातले" असं विचारलं गेलं. ( "प्रत्येकाला आज ठरवावं लागेल, तुम्ही त्यांच्याकडून आहात की आमच्याकडून(तिच्यायला तटस्थ रहायचा ऑप्शन च नाही.") थोडक्यात, मुकाट्याने आमच्या मागं या असं सांगणं)
.
सत्तेचा सारीपाट नव्या रंगमंचावर बदलू लागला. परिमाणंच बदलून गेली. शीतयुद्धात हॉलीवूडपटांना नि अमेरिकन मानसिकतेला कम्युनिस्ट यु एस एस आर हा एक कायमचा ठाशीव शत्रू होता, सगळा राग काढायला. तोच अचानक संपल्यानं सगळा राग त्यांनी काल्पनिक "एलिअन्स"च्या संकटाम्वर काढून घेतला. पण फार काळ तो काढायची गरज नव्हती. सरसकट राग करायला लवकरच एक घबाड हाती लागणार होतं; ते लागलच्.
.
आजही घटनेचं श्रेय ज्याला दिलं जातं, त्याबद्दल खुद्द त्याच देशातल्या नागरिकांनी शंका उपस्थित केलयत.
ज्याला शासन म्हणून मारण्यात आलं, त्याला खरच मारण्यात आलं की नाही ह्यावरही प्रश्न आहेतच, कायमच राहतील.
काहींना तर मुळात असं कुणी मागच्या पंधरावर्षापासून जिवंत होतं का, हीच शंका आहे.
.
खरं खोटं (असलाच तर )देव जाणे.पण घटनेचे पडसाद कसेही कुठेही उमटले. हाती त्रिशूळ नि कपाळाला टिळा लावणार्‍या काहिंना आता "हे ही आमच्यासारखेच पोळलेले आहेत. स्वत्;च्या दुष्कर्माने का असेना पण त्यांना फार जबर किंमत द्यावी लागली आहे" असं वाटायला लागलं. लगोलग त्यांच्या मते शत्रू असनारे आता "सर्टिफाइड" व्हिलन झाले होते. काही विशिष्ट गोष्टी ठेवण्याची आता त्यांच्यातल्या कित्येकांना भीती वाटू लागली.
.
आमच्या शासनयंत्रणेला तर दरवेळी ऐकवायला डायलॉग मिळाला "अहो तेही कमी पडतात, १००% घटना थांबवायला, आमचे काय घेउन बसलात". थोडकयत आम्ही करतोय त्यात समाधानी रहा, तुमचा स्वतःचा अजून नम्बर लागला नाही, ह्याअबद्दल समाधानी रहा.
.
आठ दहा हजाराहूनही अधिक पुस्तकं छपली गेली. त्यातली कित्येक प्रचंड खपलीही.
.
बरच काही आहे, पण बहुसंख्य माणसं एकमेकांकडं संशयानं पहायला शिकली. अम्दाजानं गट ओळखून द्वेष करायला शिकली; हे महत्वाचं.
.
मागच्या काही दशकात घडलेल्या अत्यंत ठळक घटनांपैकी ही एक घटना म्हणावी लागेल. घडली तेव्हाअ तुमच्या आमचयतले कित्येकजण घटनास्थलापासून काही शे किमीच्या परिसरात होते. काही जण आदल्याच दिवशी तिथे जाउन आले होते.

अकरा तारखेला आता अकरा वर्षे पूर्ण होताहेत.
.घटना वाटते तेवढी नक्कीच मोठी होती का?
जागतिक इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ती तुम्हाला वाटते का ? अगदि before आणि after असे त्या घटनेचे संदर्भ द्यावेत इतपत?
तुमच्यापैकी कुनी त्यावेळी आसपास होतं का/
तुमच्यावर काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिनाम झाला का?
तुम्ही थेट अधिक सावध मह्ना, किम्वा तुमच्या विचाराला काही वेगळी भर पडली का?

सुचे तसं इथेच टंकत जाणार आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

तुमच्यापैकी कुनी त्यावेळी आसपास होतं का/

मी त्यावेळी कॅलिफोर्नियात होतो. मला सकाळी भावाने फोन करून उठवून कळवल्याचं आठवतंय. टेररिस्ट ऍटॅक, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानं वगैरे ऐकलं खरं, पण झेपलं नाही. मग चित्रं दिसायला लागली. तरीही टीव्हीच्या स्क्रीनमध्ये ते जळणारे उभे ठोकळे माववण्यासाठी छोटे झालेले होते. शेकडो, हजारो लोकं तिथे आत आहेत हे बुद्धीला कळत होतं, पण मनाला काहीतरी भयंकर आहे इतकंच जाणवत होतं. काही वर्षांपूर्वी मी स्वतः त्या टॉवरच्या टोकावर गेलो होतो - खालचं न्यूयॉर्क शहर बघायला.

तुमच्यावर काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिनाम झाला का?

या देशात राहून तुमच्या सामाजिक विश्वात फरक न होणं शक्यच नाही. त्यानंतर वर्षभरानेच न्यूयॉर्कला जाण्याची वेळ आली. त्या इमारतींचा परिसर - ग्राउंड झीरो - कुंपणाने बंद केला होता. ते हजारो मीटर लांब कुंपण श्रद्धांजलीने, रागाने, दुःखाने भरलेलं होतं. प्रत्येक ठिकाणी कागद, फुलं, संदेश यातून लोकांनी आपल्या भावना ओकल्या होत्या. दोन बिल्डिंगी, सहा हजार माणसं... त्यांच्या नष्ट होण्याने इतका भावनांचा आवेग निर्माण होतो तर महायुद्धांमध्ये जेव्हा जगभर कोट्यवधी माणसं मेली, अपरिमित हानी झाली तेव्हा काय झालं असेल याची झलक मिळाली. युद्धांचा फोलपणा माहीत होताच, त्याला भक्कम आधार मिळाला.

तुम्ही थेट अधिक सावध मह्ना, किम्वा तुमच्या विचाराला काही वेगळी भर पडली का?

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने... मी काही स्वतः सावधगिरी वाढवली नाही. मी या सगळ्या प्रचंड प्रवाहातला एक लहान माणूस आहे. माझ्या काही करण्या न करण्याने फारसा फरक पडत नाही, हे जाणवलं होतं. कदाचित ९/११ मुळे ते अधिकच धृढ झालं असावं. अनेक लोकांच्यात वेगवेगळा फरक पडल्याचं ऐकून/पाहून आहे. आयुष्याच्या क्षणभंगूरत्वाची जाणीव इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेली मी पाहिलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागतिक इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ती तुम्हाला वाटते का ? अगदि before आणि after असे त्या घटनेचे संदर्भ द्यावेत इतपत?

होय राजकीय-सामाजिक संदर्भात वाटते.

तुमच्यापैकी कुणी त्यावेळी आसपास होतं का? तुमच्यावर काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिनाम झाला का?

नाही. मी त्यावेळी भारतात होतो, कॉलेजात शिकत होतो. मात्र जेव्हा न्यूयॉर्कला नोकरीनिमित्त गेलो तेव्हा दररोज ग्राऊंड झिरोवरूनच ये जा व्हायची.
त्या घटनेमुळे लोकांवर झालेले परिणाम प्रत्यक्ष पाहिलेत.. एकेकाचे अनुभव म्हणजे 'अनुभवच' आहेत.

तुम्ही थेट अधिक सावध मह्ना, किम्वा तुमच्या विचाराला काही वेगळी भर पडली का?

फारशी नाही. मी मुंबई बॉम्बस्फोटानंतर तसाही सार्वजनिक ठिकाणी सावध असतो. प्रवास सीट खाली पाहणे, संशयास्पद सामानाचा अंदाज घेणे, घरी महत्त्वाची कागदपत्रे एकत्र आणि गरज पडताच घेऊन पळता येतील अश्या बेताने -खुणेने ठेवणे वगैरे मी तसेही करत होतो व आताही करतो
विचार म्हणाल तर या व अशा 'सार्वजनिक' घटनांपेक्षा काही वैयक्तिक घटनांनी विचारात अधिक फरक पडला आहे.

असो. या दिवशी विविध घटनांमध्ये आपले प्राण गमावलेल्या व्यक्तींना (पुन्हा एकदा) श्रद्धांजली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राघा, ऋषीकेश, दोघांनीहे चांगले मुदे मांडलेत.
सध्या ही पोच समजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

@राघा:-
युद्धांचा फोलपणा माहीत होताच, त्याला भक्कम आधार मिळाला.
अवांतर होइल; पण रहावत नाही. युद्धाचा फोलपणा सर्वांनाच पूर्वापार जाणवलेला आहे. अगदि महाभारत युद्धापासून युद्धातली प्रत्येक बाजू "आम्हाला युद्धास बाध्य करण्यात आलं" असं म्हणते किंवा "शांततेसाठी युद्ध आवश्यक झालय" असं म्हणत तलवारी खणखणतात. मानवी मनाबद्द्ल हेच तर आश्चर्य वाटतं. युद्ध नको असं प्रत्येक जण तोंडाने म्हणताना दिसतो, पण युद्धाला उतावीळ झालेलाही तोच दिसतो!
खरेखोटे माहित नाही. पण त्यानंतर कित्येक किश्श्यांचे पेव फुटले होते .(निव्वळ हल्ला पाहिलेल्यांनी(थेट काहीही शारीरिक इजा न झालेल्यांनी )) कित्येकांनी म्हणे I am traumatised असे मानसोपचारासाठी तज्ञास गाठले.
.
अनेक लोकांच्यात वेगवेगळा फरक पडल्याचं ऐकून/पाहून आहे. आयुष्याच्या क्षणभंगूरत्वाची जाणीव इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेली मी पाहिलेली नाही.

ज्या प्रमाणावर आनि ज्या पद्धतीने ते दृकश्राव्य माध्यमात कव्हर झालं, त्याचा ह्यात बराच सहभाग वाटतो. थेट जर ती घटना दिसली नसती, तर इतकी भयानकता जाणवली असती का असं मला राहून राहून वाटतं.
.
@ऋषीकेशः-
होय राजकीय-सामाजिक संदर्भात वाटते.
सामाजिक संदर्भात कल्पना नाही,. पण राजकिय संदर्बहत तिथून पुढे जे मथळे सुरु जहले, त्यावरून नक्कीच अंदाज बांधता येउ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्या घटनेच्या वेळी मी विद्यार्थी होते, भारतातच होते. तेव्हा लगेचच आयुष्यात फरक पडला नाही. पण त्यानंतर कधीतरी दोन-चार वर्षांत नियमित विमानप्रवास सुरू झाला तेव्हा ९/११ नंतरचं जग वेगळंच असतं याची जाणीव वयस्क, अनुभवी सहप्रवाशांमुळे अनेकदा झाली.

त्यानंतर पाश्चात्य देशात काही वर्ष वास्तव्य असल्यामुळे ९/११ पासून आलिप्त राहून कोषात जगणं शक्यच नव्हतं. पाश्चात्य उदारमतवाद्यांचा उदारमतवाद या घटनेनंतर अधिक दिसू लागला असंही कधीमधी वाटतं.

काँकॉर्ड विमानसेवा बंद पडण्यात ९/११ घटनेचा प्रमुख हात होता. आधीच तांत्रिक त्रुटींमुळे झालेल्या आर्थिक पडझडीतून सावरण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंकोर्डचे या हल्ल्यात काहीशे (नक्की आकडा कोणत्याशा कार्यक्रमात ऐकला होता, आता विसरले) ग्राहक गेले. या धक्क्यातून काँकोर्ड (चालवणार्‍या ब्रिटीश एअरवेज आणि एअर फ्रान्स) सावरलं नाही, काँकोर्ड बंद पडलं. न्यूयॉर्क-लंडन/पॅरिस अंतर (आता लागतो त्याच्या) निम्म्या वेळात जाण्याचं स्वप्न बहुदा स्वप्नच रहाणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.