अजाणताच

अजाणताच मी माझ्या मनात तुझा एक हसरा पुतळा उभा केला होता.
तुझी आठवण यायची तेव्हा मी तो न्याहाळून त्याच्या अभेद्यतेची कल्पना करायचे.
सगळं कसं शांत होतं, जणू तृप्तीने आसमंत भरला होता, जेव्हा तू आलास
तुझ्या एकाच कोमल स्पर्शाने माझ्या समक्ष तू त्या पुतळ्याचे तुकडे केलेस
ह्या आघातातून सावरत्ये तो पाहिलं की तू नाहीसा झाला आहेस
आणि माझ्या भोवती विखरून गेला आहेस काचांचे असंख्य तुकडे
त्यातून वाट काढताना मी राक्तबंबाळ होत्ये आणि तू ?
तू दूरवर छद्मीपणे हसताना आता मला दिसतोयस.

-ऋता

(ही रूढार्थाने कविता नही (कदाचित) ह्याची मला कल्पना आहे, तरीही या विभागात टाकणं योग्य वाटलं.)

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

नक्की समजली की नाहि माहित नाहि.. पण तरी 'अजाणताच आवडली' Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली.
माणसांपेक्षा माणसांच्या कल्पित पुतळ्यांवरच आपण प्रेम करतो कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय खरं आहे ते विशेषतः जर शुक्र अन नेपच्युन संलग्न असतील तर नक्कीच इल्युजन्स मागे धावतो आपण -

उस एक चेहरे मे आबाद थे कई चेहरे,
उस एक शख्स में किस किस को देखता मै|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कविता वाचून "मेरा सुंदर सपना बीत गया" हे जुने व "सपना मेरा टूट गया" हे तुलनेत नवे अशी दोन्ही गाणी आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश, नगरीनिरंजन, सहज दखल घेतल्याबद्द्ल धन्यवाद.
सहज : फसवणूक किंवा क्रूर विनोद सूचित करायचा आहे. अजाणताच कल्पित पुतळ्यांवर प्रेम करणारे कठोर शिक्षेस पात्र आहेत/धरावेत का?
नगरीनिरंजन : "माणसांपेक्षा माणसांच्या कल्पित पुतळ्यांवरच आपण प्रेम करतो कदाचित" बोलकं वाक्य वाटलं अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0